The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सामान्य जीवनाला कंटाळून हा माणूस शेळी बनून जगतोय

by द पोस्टमन टीम
31 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


ही कथा अशा एका अवलियाची आहे जो माणूस असून देखील गेल्या १०-१५ वर्षांपासून शेळीचे जीवन जगत आहे. तुम्हीबरोबर ऐकलंत.

खरे पाहता माणसांच्या चक्रमपणाची देखील कमाल असते. थॉमस तेवेत नावाचा माणूस जो आपल्या आयुष्याला कंटाळून स्विस पर्वत रांगावर गेला आणि तिथे अक्षरश: एक शेळी म्हणून जगू लागला.

GoatMan how to eat grass - Business Insider
थॉमस

गेल्या १० ते १२ वर्षापासून हा माणूस स्वत:चे घरदार सोडून आल्प्स पर्वतावर राहायला गेला आणि नुसता राहायलाच गेला नाही तर एका शेळीसारखे तेथे राहू लागला. जेंव्हा पत्रकारांनी थॉमसला शोधून काढलं आणि त्याला याबाबत विचारलं त्यावेळी त्याची खरी कहाणी बाहेर आली.

थॉमसला आपल्या एकसुरी आयुष्याचा प्रचंड कंटाळा आलेला. ऑफिस, ऑफिस ते घर तेच ते कंटाळवाने काम, राजकारण, यु*द्धे, सिरीयन मुलांचे हाल या सगळ्या गोष्टीनी तो वैतागून गेलेला. तो स्वत: कर्जांच्या विळख्यात देखील अडकलेला होताच. बिल्स देता देता थकून गेला होता.

 



thomas-thwaites | Tumblr

मित्राच्या कुत्र्याकडे बघताना त्याला वाटायचे आपल्यापेक्षा या कुत्र्याचे आयुष्य चांगले आहे. यातूनच पुढे कदाचित वेगळं आयुष्य जगता येईल का याचा त्याचा विचार सुरु झाला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

आपल्याला प्राण्याचं जीवन जगायचं आहे हा विचार तर पक्का होता मग त्यातल्या त्यात कुठल्या प्राण्याचं जीवन जगता येईल याबाबत थोमसने विचार सुरु केला.

अगोदर आपण हत्तीसारखे जगून बघुया म्हणून त्याने हत्तीवर संशोधन करायला सुरुवात केली. परंतु हत्तीमध्ये देखील त्याला मानवाप्रमाणे बरेच गुण आढळून आले त्यामुळे त्याने हत्तींचा नाद सोडला आणि शेळीला पसंती दिली.

शेळी म्हणजे अगदी स्वच्छंदपणे जगणारा प्राणी आहे त्यामुळे व्हायचं असेल तर शेळी होवूयात हा त्याचा विचार पक्का झाला. त्याचा हा विचार इथपर्यंतच थांबला नाही.

When Being Human Got His Goat, This Designer Became One | WCAI

खरी मजा तर पुढे आहे. थॉमसने शेळीसारखे ४ पायांवर राहायचे म्हणून ४ पायांचे प्रोस्थेटिक्स बनवून घेतले. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींकडून एक शेळी तिचे जीवन कसे जगते याची प्रात्याक्षिके घेतली. ती खाते कशी, राहते कशी याबाबतचा त्याने सखोल अभ्यास केला. अगदी ४ पायांवर चालायला देखील सुरुवात केली.

No kidding: what I learned from becoming GoatMan | Science | The ...

एक वर्षभरानंतर थॉमस स्वित्झर्लंडला आल्प्स पर्वतावर गेला तिथल्या शेळीच्या कळपाला जॉईन करण्यासाठी.
सगळ्यात मोठं आव्हान होतं शेळ्यासारखे गवत खाणे. मानवी आतडी ही कच्चे गावात पचवू शकत नाहीत त्यामुळे याबाबत काय करता येईल याचा देखील थॉमसने रिसर्च केला. शेवटी असे गवत खाण्यासाठी त्याने प्रेशर कुकरचा वापर सुरु केला.

खरं तर गवतावर जगणे त्याला अवघड जाते परंतु थॉमस सध्या आपले शेळीचे आयुष्य आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी निवांतपणे एन्जॉय करत आहे. जगभरातून लोक त्याला तिथे भेटायला येतात आणि त्याच्या अशा राहण्यावर आश्चर्य व्यक्त करतात पण अर्थात थॉमसला त्याची फिकीर नाही. थॉमस आता ऑफिशियल गोट मॅन म्हणून ओळखला जातो आणि आपल्या ओळखीचा त्याला अभिमान देखील आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकन लोक लॉकडाउनमध्ये कोंबडीचे पिल्लू विकत घेण्यासाठी रस्त्यावर गर्दी का करत आहेत?

Next Post

जगातला सर्वात कुल सायंटिस्ट – द क्युरिअस केस ऑफ मिस्टर फाईनमन

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जगातला सर्वात कुल सायंटिस्ट - द क्युरिअस केस ऑफ मिस्टर फाईनमन

या शास्त्रज्ञाच्या संशोधनामुळे घराघरात वीज पोहोचवणं आपल्याला शक्य झालं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.