The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्या सर्वांचं आवडतं टेलिग्राम लाँच झालं त्यामागे पुतिनला झालेला विरोध होता..

by Heramb
24 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसऱ्या महायु*द्धानंतरच्या जगात व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मोठ्या प्रमाणात पुरस्कार करण्यात आला. प्रत्त्येक देशातील प्रत्येक नागरिकाला आपापली मते मांडण्याचा अधिकार त्या त्या देशाच्या संविधानाने दिला आहे. काही अपवाद वगळता सगळ्या जगात असं स्वातंत्र्य दिलं जातं. ९० च्या दशकामध्ये इंटरनेटचा शोध लागला. त्यानंतर मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. काहींच्या मते यामुळे लोकशाहीला बळकटी येत होती, तर काहींच्या मते या सगळ्यांमुळे देशांत अस्थिरता निर्माण होत असे.

फेसबुकसारखे माध्यम आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरीनेच त्याचा वापर राजद्रोह आणि देशद्रोहासाठी होऊ लागल्याचे काही देशातील सरकारांच्या निदर्शनास आले. चीन आणि उत्तर कोरियामध्ये तर फेसबुक, गुगलसारख्या अमेरिकन प्लॅटफॉर्म्सवर बंदी आहे. यामध्ये रशियासुद्धा मागे नव्हतं. रशियाबरोबरच चीन, इराण, म्यानमार, तुर्कमेनिस्तान आणि युगांडा या देशांमध्ये फेसबुकवर बंदी आहे. या देशांमधील अनेक अवलिये असाच प्लॅटफॉर्म आणण्याचा प्रयत्न करतात. असंच एक उदाहरण आहे रशियामधलं, त्याने केलेल्या ‘जुगाड’मुळे जगातील तिसरा सर्वांत जास्त वापरला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार झाला. नेमकं काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया या लेखातून…

कॉलेजचा शेवटचा दिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील भावनिक क्षण असतो. एऱ्हवी रोज भेटणारे मित्र-मैत्रिणी आता क्वचितच भेटणार असतात. पण त्यांच्या संपर्कात राहण्याची इच्छा सगळ्यांचीच असते. अशाच कॉलेजच्या शेवटच्या दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहण्यासाठी कोणतंही साधन नाही हे पाव्हेल डुरोव्हच्या लक्षात आले. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. यावर उपाय म्हणून त्याने २००६ साली एक ॲप डेव्हलप केले, त्याचे नाव व्ही-कॉन्टॅक्ट.

व्ही-कॉन्टॅक्ट दुसरं तिसरं काही नसून फेसबुकचं रशियन व्हर्जन आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सुरुवातीला व्ही-कॉन्टॅक्ट फक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित होतं, पण या ॲपने अत्यल्प काळात विद्यापीठाच्याही बाहेर पाऊल टाकले. अगदी थोड्याच वर्षात या ऍपच्या युजर्सची संख्या ३५ करोडवर पोहोचली होती. व्ही-कॉन्टॅक्टची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच होती.



दरम्यान व्ही-कॉन्टॅक्टच्या यशाबरोबरच अनेक आव्हाने देखील होती. २०११ साली रशियात झालेल्या वादग्रस्त निवडणुकांनंतर व्लादिमिर पुतीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. या निवडणुकांनंतर मात्र व्ही-कॉन्टॅक्टचा वापर सरकारविरोधी आंदोलनांमध्ये होण्यास सुरूवात झाली. व्ही-कॉन्टॅक्टच्या मदतीने सरकारविरोधी आंदोलनांची सर्व सूत्रे हालत असत. या आंदोलनांचे नेतृत्व होते ॲलेक्सी नवेलनीकडे.

सरकारविरोधी आंदोलनांमध्ये व्ही-कॉन्टॅक्टचा वापर करण्यात आला हे समजायला रशियन सरकारला फारसा वेळ लागला नाही. रशियन सरकारने व्ही-कॉन्टॅक्टचा सर्वेसर्वा पाव्हेल डुरोव्हला सर्व विरोधी पक्षांचे पेजेस त्याच्या व्ही-कॉन्टॅक्ट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश दिले. पण या सरकारी आदेशांकडे फक्त दुर्लक्षच केलं नाही तर सरकारचा अवमान करण्यासाठी पाव्हेल डुरोव्हने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

या पोस्टमध्ये त्याने एका कुत्र्याचा फोटो पोस्ट केला होता. त्या कुत्र्याचे तोंड हुडीमध्ये होते आणि त्याने जीभ बाहेर काढली होती. याशिवाय त्याने त्या पोस्टमध्ये लिहिले होते, “पाव्हेल डुरोव्ह, मार्च १३, २०१४. व्ही-कॉन्टॅक्ट कायमचे बंद करायच्या धमकीखाली मी ॲलेक्सी नवलनीचा भ्रष्टाचारविरोधी ग्रुप बंद करावा अशी मागणी सरकारी वकिलांच्या कार्यालयाने मला केली. पण मी डिसेंबर २०११ मध्ये हा गट बंद केला नाही आणि अर्थातच, मी आताही तो बंद करणार नाही. गेल्या आठवडाभरापासून माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणला जात आहे. एका महिन्याहून अधिक काळ मला यशस्वीपणे त्यांचा सामना करता आला. परंतु आता असे म्हणण्याची वेळ आली आहे की मी किंवा माझी टीम राजकीय सेन्सॉरशिप करणार नाही. आम्ही नवलनीचा भ्रष्टाचारविरोधी ग्रुप किंवा अन्य कोणताही ग्रुप हटवणार नाही. माहितीच्या प्रसाराचे स्वातंत्र्य हा औद्योगिकोत्तर समाजाचा (पोस्ट-इंडस्ट्रियल सोसायटी) अविभाज्य अधिकार आहे. हा अधिकार काढून घेतला तर व्ही-कॉन्टॅक्टच्या अस्तित्वाला काहीच अर्थ राहणार नाही.”

पाव्हेल डुरोव्हची पोस्ट

पण क्रेमेलीन अर्थात रशियन सरकारच्या कार्यालयाने याला दिलेला रिप्लाय त्याच्या जीवावर बेतला. ही पोस्ट केल्यानंतर अगदी काही तासांत त्याच्या राहत्या घरावर सैन्याने छापा घातला. या भयावह अनुभवानंतर मात्र  पाव्हेल डुरोव्हने देश सोडला आणि दुबई येथे स्थायिक झाला. दुबईमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्याने एक अत्यंत सुरक्षित असे मेसेजिंग ॲप आणले. त्याच ॲपला आज आपण टेलिग्राम म्हणून ओळखतो.

या ॲपमध्ये ‘अनबिटेबल एन्क्रिप्शन’ पद्धती वापरल्या असून सरकारच्या कोणत्याही सिस्टिमला त्यातील मेसेजेस वाचता येणार नाही असा दावा करण्यात आला आहे. सध्या टेलिग्रामचे ७० करोडपेक्षा अधिक ॲक्टिव्ह युजर्स असून टेलिग्राम जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सोशल मीडिया ॲप आहे. आपल्यावर झालेल्या “सरकारी दादागिरी”ला न जुमानता पाव्हेल डुरोव्हने यातच त्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रती असलेली आस्था दिसून येते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बड्या कंपन्यांचे क्लोन करून, पुन्हा त्याच कंपन्यांना विकून त्यांनी करोडो डॉलर्स कमावले आहेत

Next Post

दोन दशके रखडलेली स्कायबस अखेर ट्रॅकवर येतीये..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

दोन दशके रखडलेली स्कायबस अखेर ट्रॅकवर येतीये..!

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.