The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निसानचा CEO पियानो मध्ये बसून जपान मधून निसटला होता

by द पोस्टमन टीम
14 April 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

लेखक : हर्षल नाईक 

===

सोशल मीडियामध्ये पियानो किंवा गिटारच्या पेटीमध्ये लपून स्वतःचे फोटो टाकण्याचा एक ट्रेंड सुरु आहे, खासकरून जपान मध्ये.



त्यावर यामाहा म्युझिक कंपनीने निवेदन दिलंय की या पेट्या फक्त संगीत वाद्य ठेवण्यासाठीच आहेत, तेव्हा लोकांनी त्याचा गैरवापर करू नये.

सोशल मीडिया मध्ये हा ट्रेंड सुरु होण्यामागे ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक फार मोठी घटना जबाबदार आहे. तिच्याबद्दल हा छोटासा लेख…

१९९९ मध्ये जेव्हा जपानची निसान मोटार कंपनी डबघाईला आली होती तेव्हा फ्रांस च्या रेनो (Renault) कंपनी सोबत त्यांचा करार झाला ज्याद्वारे रेनोने निसानचे सुमारे ३७% शेयर घेतले. यानंतर रेनोचे CEO कार्लोस घोन यांच्या नेतृत्वाखाली Nissan Revival Plan नुसार निसान ब्रँड ने जगभर भरारी घेतली. या भरारीला कॉर्पोरेट जगतात आजही एक यशस्वी ‘केस स्टडी’ मानतात.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

 

ही भरारी एवढी मोठी होती कि २०१७ मध्ये ‘रेनो-निसान-मित्सुबिशी’ हि जगातील सर्वाधिक हलक्या प्रवासी कार विक्री असलेली कंपनी बनली.

म्हणजेच जगात विकल्या गेलेल्या प्रत्येकी ९ कार पैकी १ कार रेनो-निसान-मित्सुबिशी ची होती. भारतात या तिन्ही कार फार लोकप्रिय नसल्याने आपल्याला या गोष्टीवर सहज विश्वास बसणार नाही.

या सर्व यशस्वी प्रवासादरम्यान निसान वरील नियंत्रणाबद्दल सतत विवाद राहिले.

निसानला अर्थातच स्वतःचे जपानी नियंत्रण यावर हवे होते. एप्रिल २०१७ मध्ये कार्लोस घोन यांनी निसान च्या CEO पदाचा राजीनामा दिला, पण ते चेयरमनपदी कायम राहिले. २०१८ मध्ये रेनो कडे निसानचे सुमारे ४४% शेयर होते.

पुढे नोव्हेंबर २०१८ मध्ये अचानक जे घडलं त्याने सर्व ऑटोमोबाईल जगताला धक्का बसला. कार्लोस घोन हे खासगी विमानाने जपान मध्ये आले तेव्हा त्यांना जपान सरकारकडून आर्थिक गुन्ह्याच्या आरोपाअंतर्गत अटक करण्यात आली.

याच दिवशी निसानचे नवीन CEO सैकावा यांनी कार्लोस घोन यांना निसानच्या व्यवस्थापनातून काढून टाकण्याची घोषणा केली.

यांनतर पुढील १ वर्ष म्हणजेच डिसेम्बर २०१९ पर्यंत कार्लोस घोन हे बहुतांश काळ जपानमध्ये तुरुंगवासात राहिले, या दरम्यान त्यांची जामिनावर सुटका देखील झाली.

पण ३० डिसेम्बर २०१९ ची सकाळ जपानी मीडिया आणि ऑटोमोबाईल जगतासाठी अजूनच जास्त धक्कादायक होती कारण या सकाळी झळकली एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे कार्लोस घोन जपानमधून निसटून लेबनॉन देशात पोहोचल्याची.

ते जपानमधून कसे निसटले, कधी निसटले यावर फक्त तर्क वितर्क ऐकायला येत होते.

यानंतर काहीच दिवसांनी कार्लोस घोन यांनी स्वतःच समोर येऊन आपण जपानच्या अन्यायापासून मुक्त होऊन लेबनॉन मध्ये आता राहत असल्याची माहिती दिली.

 

या सर्व घटनेत मीडियात असे सांगितले जातेय की “कार्लोस घोन हे जामिनावर बाहेर असताना जपानमधील एका हॉटेलमध्ये दिसले होते. त्याच हॉटेलमधून २ माणसं यामाहाच्या मोठ्या संगीत वाद्याच्या पेट्या घेऊन बाहेर जाताना दिसले.

या पेट्या नंतर जपानच्या एका विमानतळावरून एका खासगी विमानात ठेवण्यात आल्या. पेट्या मोठ्या असल्याने त्या एक्स रे स्कॅनिंग मशीन मध्ये तपासण्यात आल्या नव्हत्या. याच पेट्यांमधून कार्लोस घोन निसटले”.

आता इंटरपोलने घोन यांच्या अटकेसाठी रेड नोटीस सुद्धा काढली आहे.

पण जपान आणि लेबनॉन मध्ये प्रत्यार्पण करार नाही म्हणूनच जगातील अनेक मोठे पुरस्कार मिळवलेल्या आणि ३ देशांचे नागरिकत्व असणाऱ्या कार्लोस घोन यांना पकडणे जपानसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

जगातील एका मोठ्या वाहन कंपनीच्या प्रमुखाची अशा प्रकारे एका पेटाऱ्यातून झालेली सुटका निश्चितच थरारक आणि धक्कादायक घटना आहे. पुढे काय होते, बघूया.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

पोर्तुगीजांची झोप उडवणारा मराठ्यांच्या इतिहासातील अजरामर सेनापती

Next Post

रोझ शानिना : सोव्हिएत संघाची स्नाय*पर जिने ५९ ना*झींची बेदरकारपणे ह*त्या केली.

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

रोझ शानिना : सोव्हिएत संघाची स्नाय*पर जिने ५९ ना*झींची बेदरकारपणे ह*त्या केली.

इतिहास, राष्ट्रवाद, सांप्रदायिकता आणि रोमिला थापर

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.