The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृष्णवर्णीयांना शारीरिक दुःख होत नाही ही अंधश्रद्धा आजही पाश्चात्य डॉक्टर मानतात!

by द पोस्टमन टीम
19 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगभरात सर्वत्र धर्म, पंथ, प्रांत, भाषा यांत मोठ्या प्रमाणात विविधता आढळून येते. या गोष्टींमध्ये एकेकाळी भेदाभेद न मानले जाता विविधता म्हणूनच पाहिले जात असे, ज्यामुळे लोकांमध्ये एकतेची भावना असायची. यानंतर कालांतराने ज्यांच्याकडे अधिकार येत गेले, अशांनी त्या अधिकारांच्या बळावर या विविधतेला भेदभावाचे आणि उच्चनीचतेचे रूप दिले आणि त्यातूनच पुढे जगभरात मोठ्या प्रमाणात कलह निर्माण होत गेले.

हे भेदभावही एक वेळ ठीक होते असे म्हटले तरी चालेल पण एक काळ असा आला जेव्हा भेदभावाची आणि उच्चनीचतेची भावना निर्माण होण्यासाठी एक वेगळा घटक पुढे आणला गेला, तो म्हणजे रंगाचा किंवा वर्णाचा. गौरवर्ण आणि कृष्णवर्ण म्हणजे गोऱ्या रंगाची आणि काळ्या किंवा करड्या रंगाची माणसं असा भेद निर्माण झाला.

२१व्या शतकापूर्वी पाश्चिमात्त्य देशांमध्ये शेकडो वर्षे कृष्णवर्णीय गरीब असलेल्यांना नोकर किंवा गुलाम म्हणून वागवले जाऊ लागले. गुलामगिरीची एक नवी प्रथा पडली ज्यामध्ये कृष्णवर्णीय व्यक्ती ही एखाद्या गोऱ्या रंगाच्या माणसाचा गुलामच असली पाहिजे असं मानलं जाऊ लागलं.

कृष्णवर्णीयांना गुलाम ठरवण्याची ही भावना निर्माण होण्यामागे काही कारणं होती. याला बऱ्याच अंधश्रद्धा देखील कारणीभूत होत्या ज्यामध्ये एक अंधश्रद्धा म्हणजे या माणसांना भावना नसतात, यांच्या शरीराची अंतर्गत ठेवण गोऱ्या माणसासारखी नसते, त्यांचा मेंदू हा वेगळ्या प्रकारचा असतो आणि मुख्य म्हणजे जन्माने कृष्णवर्णीय लोक हे गोऱ्यांचे गुलाम होण्यासाठीच जन्माला आलेले असतात.

याच असलेल्या अंधश्रद्धेचा विस्तार होऊन कृष्णवर्णीय लोकांना जाणिवा नसतात, त्यांना कोणतीही वेदना होत नाही वगैरे शारीरिक अंधश्रद्धाही वाढल्या आणि त्यांनी पाश्चिमात्य वैद्यकशास्त्रात घुसखोरी केली. याचा कळस म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अजूनही हे खोटं शिकवलं जात आहे!



यामागची पार्श्वभूमी लक्षात घेण्यासाठी आपल्याला एकोणिसाव्या शतकात जावं लागेल. काळ्या त्वचेच्या माणसांना कमी लेखण्याच्या या मिथकाच्या जन्मासाठी ज्या माणसाला श्रेय दिलं जातं तो म्हणजे डॉ. थॉमस हॅमिल्टन. त्याने गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय लोक यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक स्तरावर भेद हे असतातच हे सिद्ध करण्याचा जणू ध्यासच घेतला होता.

हे करण्यासाठी हॅमिल्टनने कृष्णवर्णीयांच्या शरीरावर फार भयानक असे वैद्यकीय प्रयोग केले आणि त्यातून त्याने सिद्धांत मांडला. त्यानुसार काळ्या लोकांची त्वचा जाड आणि कमी संवेदनशील असते असे त्याने सगळ्यांना सांगितले.

त्याच्या प्रयोगांबद्दलची ही सर्व बाहेर न आलेली माहिती लेखक ‘जॉन ब्राउन’ याने जगासमोर आणली जो स्वतः एक गुलाम म्हणून या हॅमिल्टनच्या प्रयोगांचा एक भाग होता. १८३० मध्ये हॅमिल्टनच्या प्रयोगशाळेतून तो पळून गेला आणि १८५५ मध्ये त्याने ‘स्लेव्ह लाईफ इन जॉर्जिया’ नावाचं आत्मचरित्र लिहिलं. ज्यामध्ये त्याला ज्या अत्याचारी प्रयोगांना सामोरं जावं लागलं त्याचं त्याने तपशीलवार वर्णन केले आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ॲनेस्थेशियाचा शोध त्यावेळी लागला नव्हता त्यामुळे सर्व प्रयोग चाकू किंवा तशाच काही धारदार शस्त्रांनी जिवंत माणसावर केले गेले. त्याने जेवढा काळ हे प्रयोग केले तोपर्यंत हॅमिल्टन म्हणत राहिला की “तुम्ही आमच्यापेक्षा वेदना सहन करण्यास अधिक सक्षम आहात” आणि असं म्हणतानाही त्याला कृष्णवर्णीयांना त्याच्या प्रयोगामुळे होणाऱ्या वेदनांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या तरीही तो हेच म्हणत राहिला.

एवढं करूनही शेवटी त्याचं म्हणणं काही सिद्ध होऊ शकलं नाही कारण त्याने कृष्णवर्णीयांच्या त्वचेवर केलेल्या प्रयोगामुळे त्यांना त्वचा रोग होऊ लागले, फोड येऊ लागले पण त्यांना संवेदना नाहीत असं कुठेही दिसून आलं नाही.

जरी हॅमिल्टनचे प्रयोग त्याच्या सिद्धांताचे समर्थन करत नसले तरीही, तो लोकांना सांगत राहिला की कृष्णवर्णीय लोकांना कमी वेदना होतात, त्यांना संवेदना नसतात वगैरे आणि आश्चर्य म्हणजे लोकही त्या काळात या गोष्टी पसरवत राहिले.

दुर्दैवाने, काळ्या लोकांवर प्रयोग करणारा हॅमिल्टन हा एकमेव डॉक्टर नव्हता. अमेरिका आणि अगदी युरोपमधील इतर अनेक डॉक्टरांनी या मिथकावर विश्वास ठेवला. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही असे हजारो प्रयोग केले आणि कित्येक कृष्णवर्णीयांचे जीव घेतले.

१७८७ मध्ये, डॉ. बेंजामिन मोसेले यांनी ट्रॉपिकल रोगांवर एक ग्रंथ लिहिला ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की कृष्णवर्णीय लोकांची गुलामगिरी त्यांच्या कमकुवत फुफ्फुसांमुळे योग्यच आहे जी केवळ कठोर परिश्रमांद्वारे मजबूत केली जाऊ शकते. त्यामुळे असे श्रम देण्यासाठी कृष्णवर्णीय लोकांना गुलाम बनवलं पाहिजे. कृष्णवर्णीय लोकांच्या वेदना सहन करण्याच्या क्षमतेबद्दल बरंच काही सांगून त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न करत त्याने लिहिलं की “काळे लोक गोर्‍या लोकांपेक्षा शस्त्रक्रिया जास्त प्रमाणात सहन करू शकतात.”

डॉ. जे. मेरियन सिम्स याला “स्त्रीरोगशास्त्राचा जनक” म्हटलं जातं. तो या कृष्णवर्णीय मिथकावर विश्वास ठेवणाऱ्या डॉक्टरांपैकी एक होता. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून त्याने गुलाम असलेल्या कृष्णवर्णीय स्त्रियांवर प्रयोग करून या विषयातले अनेक शोध लावले. या प्रयोगांमध्ये त्याने भावनाशून्य रीतीने व्यवहार केले.

सिम्सच्या काळात ॲनेस्थेशियाचा शोध लागला होता, तरीही तो फक्त त्याच्या गोर्‍या रूग्णांना भूल (ॲनेस्थेशियाचा डोस) देत असे, कारण त्याचा असा विश्वास होता की “काळ्या लोकांना वेदना होत नाहीत, मग भूल का वाया घालवायची?”

सिम्स आणि हॅमिल्टन या दोघांनीही कृष्णवर्णीय लोकांना त्यांच्यात “वेदना सहन करण्याची क्षमता असते आणि त्यांना भावना नसतात” या एकाच सिद्धांतावर ठाम राहून कृष्णवर्णीयांना गुलाम का केलं जातं हे प्रत्यक्षात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. उच्च शारीरिक कार्यक्षमता आणि सहनशक्ती यामुळे काळे लोक नेहमीच गुलाम बनवले जातात असं म्हणत त्यांनी आपल्या म्हणण्याचं समर्थनच केलं.

आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे थॉमस जेफरसन यांनी त्यांच्या ‘नोट्स ऑफ द स्टेट ऑफ व्हर्जिनिया’मध्ये कृष्णवर्णीय आणि गोर्‍या लोकांमधील फरक हा “निसर्गाने निर्माण केलेला फरक आहे” असं नमूद करून या सर्व विचारसरणीचं समर्थन केलं होतं. त्यांचा मुख्य युक्तिवाद असा होता की कृष्णवर्णीय लोकांच्या नैसर्गिक “विशिष्ट भिन्नतेमुळे” ते समाजात खालच्या स्तरावरच असले पाहिजेत आणि गोरे लोक हे विशेषाधिकार प्राप्त, शक्तिशाली पुरुष शीर्षस्थानी असले पाहिजेत कारण गोरे लोक हे चांगले गुण घेऊनच जन्माला येतात.

हे सगळं झालं शंभर दोनशे वर्षांपूर्वीचं. पण आजही या गोष्टी संपलेल्या नाहीत. फारफार तर लोकांनी नवनवीन शिक्षण घेतलं पण तरीही या काही जुन्या गोष्टी संपायला तयार नाहीत. युरोप आणि अमेरिकेत शिकणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना अजूनही हीच गोष्ट शिकवली जाते. 

या विषयावर उपलब्ध असलेल्या असंख्य ऐतिहासिक पुराव्यांवरून, वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांनी हे मिथक खोटं आहे हे वारंवार सिद्ध करूनही अजून कित्येक जणांना यावर विश्वास बसतोच आणि हा भाग पाश्चात्य वैद्यकीय शिक्षणातून हे बाहेर पडलेला नाही.

२०१४ मध्ये ब्राऊन युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्स आणि आफ्रिकन स्टडीज विभागातील प्रोफेसर ब्रॉन यांनी हा समज खोटा ठरवण्यासाठी बरेच वर्षं काम केलं. प्रोफेसर ब्रॉन म्हणतात की हे खोटं मिथक अजूनही वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे आणि पाठ्यपुस्तकांमध्येही छापलं जात आहे.

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्स’ने प्रकाशित केलेल्या २०१६ च्या अभ्यासात असं आढळलं की, प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या ४०% वैद्यकीय विद्यार्थ्यांनी “काळ्या लोकांची त्वचा गोर्‍या लोकांपेक्षा जाड असते आणि त्यामुळे त्यांच्या संवेदना बोथट असतात” या समजुतीचं समर्थन केलं आहे.

याचं कारण असे की वैद्यकीय क्षेत्रातील अनेक अभ्यासक विशेषत: अमेरिकेत – अजूनही यावर विश्वास ठेवतात. अनेक वर्षे निरर्थक संशोधन करून अस्तित्त्वात नसलेली गोष्ट ते सिद्ध करण्याचा तेवढाच निरर्थक प्रयत्न करत आहेत.

त्याच संशोधन टीमने दुसरा अभ्यास केला होता की, युनायटेड स्टेट्सच्या हॉस्पिटलमधील सरासरी काढली तर निम्म्या डॉक्टरांचा अजूनही या मिथकावर विश्वास आहे. बाकीचे निष्कर्ष आणखी चिंताजनक आहेत. 

२०१२ च्या एका अभ्यासात असं आढळून आलं की अनेक बालरोगतज्ज्ञ डॉक्टर हे कृष्णवर्णीय रूग्णांच्या वेदनांवर उपचार करताना पूर्वग्रह मनात ठेवून उपचार करतात. त्यांना जास्त वेदना देणारी औषधं दिली जातात आणि गोऱ्यांना कमी वेदनादायक औषधं मिळतात. २०१९ च्या एका अभ्यासात असं दिसून आलं की हा वांशिक पूर्वाग्रह आजच्या काळातही दिवसेंदिवस वाढत आहे.

एके ठिकाणी डॉक्टरांच्या एका गटाला वेगवेगळ्या फोटोंमध्ये रुग्णांनी व्यक्त केलेल्या वेदना ओळखायला सांगितलं गेलं. सहभागी डॉक्टरांनी कृष्णवर्णीय रूग्णांच्या चेहऱ्यांच्या तुलनेत गोर्‍या रूग्णांच्या चेहऱ्यांवरून वेदना खूप सहज ओळखल्या. याचं कारण म्हणजे सहजपणे कृष्णवर्णीयांकडे केलेलं दुर्लक्ष आणि काळानुसार सततच्या हालअपेष्टा सोसून या कृष्णवर्णीयांची त्वचा तेवढ्या जास्त वेदना सहन करण्यासाठी सक्षम झाली असेल तर हे स्वाभाविकच नाही का ?

यावरून त्यांनी असं सांगितलं की, डॉक्टरांना कृष्णवर्णीय लोकांविरुद्ध वांशिक पूर्वग्रह सुरवातीपासून नसतो, पण हे खोटं त्यांच्या मनात एवढं भरवलं गेलं आहे की ते वैद्यकशास्त्राचा एक भाग असल्यासारखं त्यावर खरोखर विश्वास ठेवतात. म्हणूनच जर आपण काही वैद्यकीय अभ्यासकांचे डोळे उघडू शकलो नाही जे अजूनही या मिथकवर विश्वास ठेवतात आणि शिकवतात, तर निदान आपण अशा विद्यार्थ्यांचे डोळे उघडले पाहिजेत जे नजीकच्या भविष्यात हे खोटं नष्ट करू शकतील.

डॉक्टरांनी कृष्णवर्णीय रूग्णांच्या वेदनांना कमी लेखणं थांबायला हवं कारण कमी किंवा चुकीचे औषधोपचार केल्याने पुढे रुग्णांमध्ये वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकते किंवा एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तीला योग्य उपचार मिळाले नाहीत तर त्याला त्याचे चुकीचे परिणाम भोगावे लागू शकतात.

म्हणूनच संशोधक एक रक्त चाचणी विकसित करत आहेत ज्यात बायोमार्कर वापरतात जे रुग्णाला जाणवलेल्या वेदनांचे प्रकार तसेच त्याची तीव्रता यांचं विश्लेषण करू शकतात. यातून कृष्णवर्णीय आणि गोऱ्या अशा सगळ्यांनाच होणारी वेदना ही सारखीच असते आणि यात काहीही भेद नाही हे सिद्ध होऊ शकेल.

तरीही, वैद्यकीय व्यवस्थेतील या सर्व अंमलबजावणीबरोबरच, पाश्चात्य लोकांनी हा समज दूर करून सर्वांना समान उपचार मिळावेत याची जागृती करणं आवश्यक आहे. या निव्वळ वर्णभेदावर आधारित खोट्याबद्दल सत्य जितकं जास्त लोकांना कळेल तितक्या लवकर पाश्चात्य समाज हा वर्णभेदमुक्त होऊन सुखाने जगू शकेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हे आहेत जगाच्या इतिहासातील सर्वांत जास्त वेळ चाललेले वेढे..!

Next Post

मोजक्या भांडवलावर सुरु केलेली ही कंपनी आज त्या क्षेत्रातील “ब्रॅण्ड” आहे..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

मोजक्या भांडवलावर सुरु केलेली ही कंपनी आज त्या क्षेत्रातील "ब्रॅण्ड" आहे..!

आजही अनेक वैज्ञानिक त्यांचे वायरलेस इलेक्ट्रीसिटीचे स्वप्न सत्यात उतरवायच्या प्रयत्नांत आहेत..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.