The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना*झी सैन्याचे गुप्त संदेश उलगडून हिने दोस्त राष्ट्रांच्या विजयाचा पाया घातला होता

by द पोस्टमन टीम
14 March 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


ना*झी जर्मनी आणि दोस्त राष्ट्रांमध्ये झालेल्या यु*द्धाच्या पूर्वार्धात जर्मनीचं पारडं दोस्त राष्ट्रांपेक्षा चांगलंच जड राहीलं. जमिनीवरच्या यु*द्धात मित्र राष्ट्रांवर कुरघोडी करण्याबरोबरच मित्र राष्ट्रांची जहाजं समुद्रात बुडवून टाकण्यात ना*झी पाणबुड्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळालं. या यशाचं श्रेय ना*झी सैन्याच्या संदेश यंत्रणांना होतं. जोपर्यंत त्यांचे गुप्त संदेश ‘डीकोड’ करणं मित्र राष्ट्रांच्या सैन्याला जमत नव्हतं, तोपर्यंत ते पीछाडीवर राहिले. मात्र, गुप्त संदेशांचे अर्थ उलगडण्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेने जंग जंग पछाडले आणि ते जमवलं तेव्हा यु*द्धाचं पारडंच फिरलं.

ना*झी सैन्याच्या संदेशांचं विश्लेषण (डीकोडिंग) करून मित्र राष्ट्रांना महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देणारी विश्लेषक म्हणून ‘जोआन एलिझाबेथ लोथर क्लार्क’चे योगदान महत्वपूर्ण आहे. प्रामुख्याने ना*झी सैन्याच्या नौदल एनिमा मशीनची ‘डीकोडर’ म्हणून ब्लेचले पार्क इथलं तिचं काम उल्लेखनीय ठरलं. यु*द्ध संपुष्टात आल्यानंतर तिने नाण्याची अभ्यासक म्हणूनही महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

जोआन एलिझाबेथ लोथर क्लार्क ही एक ब्रिटीश नागरिक होती. तिला गणितात असलेलं स्वारस्य तिला दुसऱ्या महायु*द्धादरम्यान संप्रेषणाचे साधन म्हणून वापरल्या गेलेल्या ना*झींच्या एनिग्मा मशीनच्या ‘डीकोडिंग’चे काम करण्यासाठी ब्लेचले पार्कमध्ये रवाना होण्यास कारणीभूत ठरलं.

क्लार्क आणि तिच्या टीमला जर्मन यू-बोटशी संबंधित कोड उलगडून गुप्ता माहिती मिळविण्याचं महत्त्वाचं काम सोपवण्यात आलं. त्यांच्या महत्त्वाच्या कामगिरीमुळे मित्र राष्ट्रांची मोठी संभाव्य हानी टळली आणि ना*झींच्या डावपेचांची आधीच माहिती मिळाल्यानं दोस्त राष्ट्रांना त्यांच्यावर सरशी करण्यात यश मिळालं. एक महिला असूनही, तिने ब्लेचले पार्कमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवलं आणि नेव्हल एनिग्माच्या (याला डॉल्फिन देखील म्हटले जाते) डीकोडिंगमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

यु*द्धाच्या शेवटी आणि डीकोडिंगची कारवाई यशस्वी झाल्यानंतर क्लार्क तिच्या पतीसह स्कॉटलंडला गेली. तिथे तिने नाणकशास्त्रात रस घेऊन स्कॉटिश अंक शास्त्रातही खूप अभ्यास केला. नेव्हल एनिग्माच्या डीकोडिंगमध्ये तिचं योगदान महत्त्वाचं असलं तरी, ब्लेचले पार्कमधील एकूण कामकाजाबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली जात आहे. त्यामुळे क्लार्क आणि तिच्या चमूच्या या संदर्भातल्या कामगिरीची संपूर्ण माहिती अद्याप अज्ञात आहे.



तिने स्वतःही कधी आपल्या या कामाचं गुणगान गात प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या हेरगिरीसारख्या कामाबद्दल तिनेही मौन पाळणे पसंत केलं. मात्र, जोआन क्लार्कने ब्लेचले पार्क येथे डीकोडर म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे इतिहासकारांच्या अंदाजानुसार यु*द्धाचा कालावधी दोन ते तीन वर्ष कमी झाला आणि हजारो लोकांचे जीव वाचवले.

जोन एलिझाबेथ लोथर क्लार्क यांचा जन्म २४ जून १९१७ रोजी लंडन येथे झाला, ती विल्यम केम्प लोथर क्लार्क आणि डोरोथी एलिझाबेथ क्लार्क यांची सर्वात धाकटी मुलगी होती. तिच्या तीन भाऊ आणि बहिणीसह का सुसंस्कृत आणि विद्वान कुटुंबात तिचं संगोपन झालं. तिच्या वडिलांच्या कुटुंबातील अनेक सदस्य ‘होली ऑर्डर्स’मध्ये होते आणि केंब्रिज कॉलेजेसचे ‘फेलो’ होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

तिने ‘डुलविच हायस्कूल ऑफ गर्ल्स’मध्ये शालेय शिक्षण घेतले. तिथेच तिला न्यूनहॅम कॉलेजमध्ये (केंब्रिज) प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली. सन १९३७ मध्ये ती गणितीय ‘ट्रायपोस’च्या पहिल्या सत्रात पहिली आली. गणिताचा अधिक व्यापक अभ्य्साक्रम पूर्ण करून तिने ‘बीए’ची पदवी १९३९ मध्ये प्राप्त केली.

तिचे महाविद्यालयीन शिक्षण संपेपर्यंत, लंडनपासून ५० मैल अंतरावर एका व्हिक्टोरियन इमारतीत ‘ब्लेचले पार्क’ या नावाने एक अत्यंत गुप्त शासकीय कोड आणि सायफर स्कूल (GCCS) प्रकल्प राबला जात होता. ज्येष्ठ गणितज्ञ ‘जीसीसीएस’ प्रकल्पासाठी मनुष्यबळ निवडण्याची जबाबदारी असलेले गॉर्डन वेल्चमन, यांनी जोनने पदवी प्राप्त करण्यापूर्वी भूमितीमधील तिच्या कामाचं परीक्षण केलं होतं.

तिच्या क्षमतेची पुरेपूर जाणीव असल्याने तिला ब्लेचले पार्क प्रकल्पात सामील होण्यासाठी आमंत्रित केले. क्लार्कच्या क्षमतेमुळे ती लवकरच ब्लेचले पार्कमधल्या काही मोजक्या महिला कोडब्रेकर्सपैकी एक महत्त्वाची कोड ब्रेकर बनली.

तिच्या कौशल्यामुळे आणि अचूक काम करण्याच्या शैलीमुळे तिला १९४३ पर्यंत डॉल्फिन कोड आणि शार्क एनिग्मा डीकोडिंगच्या प्रभारी असलेल्या ‘हट 8’ संघांची सदस्य बनवण्यात आलं. अमेरिकेने शार्क एनिग्मा डीकोड करण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले होते. त्यामुळे अनेक ‘हट 8’ कर्मचाऱ्यांची बदली त्या कामासाठी करण्यात आली.

जोआन आणि तिच्या टीमने यु*द्ध संपेपर्यंत नेव्हल एनिमा संदेश उलगडण्याचं काम चालूच ठेवलं. ‘ब्लेचले पार्क’मध्ये असताना, जोआन क्लार्कची तिथला सहकारी ॲलन ट्युरिंग याच्याशी मैत्री झाली. ट्युरिंग हा महायु*द्धाच्या काळातला सर्वांत कुशल कोडब्रेकर होता. या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. क्लार्क आणि ट्युरिंग यांनी विवाह केला. मात्र, ट्युरिंग समलैंगिक प्रवृत्तीचा असल्याने हा विवाह फार काळ टिकला नाही. तरीही, सन १९५४ मध्ये ट्युरिंगच्या मृत्यूपर्यंत त्यांच्यातील घनिष्ठ मैत्री कायम राहिली.

दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात एनिग्माचे डीकोडिंग हे जोआन क्लार्कचे मुख्य कार्य म्हटले पाहिजे दुसऱ्या महायु*द्धातील मित्र राष्ट्रांच्या विजयासाठी शत्रूंच्या संदेशांच डीकोडिंग हे महत्वपूर्ण योगदान ठरलं.

एनिग्मा मशीन सन १९१९ मध्ये ह्यूगो कोच यांनी विकसित केलं. टाईपरायटरसारखे दिसणारे हे मशीन मूलत: व्यावसायिक हेतूंसाठी वापरण्यात आलं. जर्मन सैन्याने गुप्ता संदेश देण्यासाठी या मशीनचं रुपांतर केले आणि तिची एन्कोडिंग प्रणाली मजबूत बनवली.

या पोर्टेबल मशीन्सनी अगणित वेगवेगळ्या अक्षररचना तयार केल्या. त्यामध्ये बहुतेक कोडेड जर्मन संदेश पाठविण्यात आले. ना*झी जर्मनांचा पराभव करायचा असेल तर ब्रिटीश सरकारला एनिग्मा कोड उलगडणं अत्यावश्यक होतं. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी देशातल्या सर्वोत्तम गणितज्ञ, बुद्धिबळ चॅम्पियन्स आणि इजिप्तोलॉजिस्ट यांना शोधून शोधून कामाला लावलं.

सन १९४० मध्ये ना*झी जर्मन सैन्याने फ्रान्सचा ताबा घेतल्यानंतर, एनिग्मा डीकोड करण्याची गरज अधिकाधिक तीव्र स्वरूपात जाणवू लागली. जर्मन सैन्याने आता बिस्केच्या उपसागरातून अटलांटिकमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आयात उत्पादनांवर अवलंबून असलेल्या ग्रेट ब्रिटनका आपल्या व्यापारी जहाजांना मार्ग बदलण्यास भाग पाडले गेले.

सन १९४० च्या अखेरीस, क्लार्कच्या टीमने रोटर्स परत मिळवले होते आणि ब्लेचले पार्कने क्रिब्सची एक लायब्ररी तयार केली होती, क्लार्कचा मित्र ॲलन ट्युरिंग याने बनब्युरिझम प्रक्रिया म्हणून ओळखली जाणारी प्रक्रिया विकसित केली. त्यामध्ये छिद्र असलेली कागदी पत्रके वापरली जात असंत त्यावर सायफर-टेक्स्ट मेसेजेस पंच केलेले असत. अत्याधुनिक सांख्यिकीय पद्धती वापरण्याआधी छिद्रे परिश्रमपूर्वक मोनून संदेशाचे संभाव्य अर्थ समजून घेतले जात.

संदेश उलगडण्या प्रक्रियेला गती देण्यासाठी इतर पद्धती आवश्यक होत्या; क्लार्कने सांख्यिकीय दृष्टिकोनावर आधारित योक्सॅलिमस पद्धत वापरली. त्यात भर पडली आणि कोड तोडण्याच्या तिच्या निश्चयामुळे क्लार्कने प्रक्रियेला गती देण्यासाठी स्वतःची पद्धत विकसित केली.

क्लार्कच्या संघाचे पहिले लक्षणीय यश फेब्रुवारी ते जून १९४१ दरम्यान दिसून आले. या कालावधीत काही ट्रॉलर्स पकडले गेले त्यामध्ये सायफर उपकरणे आणि कोड होते. बॅनबुरिस्मस पद्धत लागू केल्यानंतर, टीमने बुडलेल्या बोटी बुडण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाली. ही कामगिरी यशस्वी केल्यानंतर क्लार्कच्या टीमवर शार्क एनिग्माद्वारे येणारे संदेश उलगडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

डिसेंबर १९४२ च्या मध्यात हे कोड तोडण्यात टीम यशस्वी ठरली. मात्र, १९४३ मध्ये यूएस कोडब्रेकिंग युनिटने शार्क एनिमाशी संबंधित कामं हाती घेतली. याचा परिणाम म्हणून ब्लेचले पार्कमधील अनेक कर्मचार्‍यांची इतर विभागांमध्ये किंवा इमारतींमध्ये बदली करण्यात आली, परंतु जोन क्लार्क मात्र ‘हट 8’ मध्ये कायम राहिली. सन १९४४ च्या सुरुवातीला ती या विभागाची उपप्रमुख बनली. यु*द्धाच्या समाप्तीपर्यंत तिने नेव्हल एनिमाचे डीकोडिंग करण्याचे काम केले.

यु*द्ध संपल्यानंतर, क्लार्क ब्लेचेली पार्कमधून शासकीय कम्युनिकेशन्स मुख्यालयात गेली, जिथे ती सेवानिवृत्त लष्करी अधिकारी, लेफ्टनंट-कर्नल जे (जॉक) के.आर. मरे यांना भेटली, त्यांच्याशी तिने १९५२ मध्ये लग्न केलं. कालांतराने पतीची तब्येत खराब असल्याने या जोडप्याला स्कॉटलंडला जावं लागलं. मरे यांच्या प्रभावामुळे, तिला अंकीय इतिहासात रस निर्माण झाला आणि तिने १६व्या आणि १७ व्या शतकातील स्कॉटिश नाण्यांवर अनेक शोधनिबंध लिहिले.

सन १९८६ मध्ये तिच्या पतीच्या मृत्यूनंतर जोआन क्लार्क ही ऑक्सफर्डजवळ हेडिंग्टन इथे स्थलांतरित झाली आणि तिने सर हॅरी हिन्सले यांच्यासोबत सन १९८८ च्या ‘ब्रिटिश इंटेलिजन्स ऑन द सेकंड वर्ल्ड वॉर’च सहलेखन केलं. एनिग्मा खंडित करण्यासाठी पोलिश, फ्रेंच आणि ब्रिटिश तज्ज्ञांच्या योगदानांचे मूल्यांकन याचे लेखन केले. वयाच्या ७९ व्या वर्षी ४ सप्टेंबर १९९६ रोजी जोआन क्लार्कचे निधन झाले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या माणसाने पहिल्या महायुद्धाच्या १७ वर्ष आधीच त्याची भविष्यवाणी केली होती!

Next Post

डॉ. सलीम अली होते म्हणून सायलेंट व्हॅली टिकली, नाही तर…

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

डॉ. सलीम अली होते म्हणून सायलेंट व्हॅली टिकली, नाही तर...

जयपूरमधील टेकड्यांमध्ये वसलेला हा 'गलता' कुंड कधीही आटत नाही!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.