The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इतिहासातील अशी यु*द्धं ज्यात कमजोर गटाने आश्चर्यकारक पराक्रम गाजवला होता!

by द पोस्टमन टीम
13 March 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘यु*द्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं,’ असं नेहमी म्हटलं जातं. मात्र, ही गोष्ट प्रत्येकच वेळी योग्य ठरेल असं नाही. कधी-कधी यु*द्धातील एक बाजू फारच बलवान असते तर दुसरी बाजू फारच कमकुवत असते.

हीच बाब लक्षात घेऊन दुसऱ्या महायु*द्धानंतर जिनिव्हा कन्व्हेन्शन करण्यात आलं. कन्व्हेन्शननुसार यु*द्धासंदर्भात १६१ नियम करण्यात आले. या नियमांना १९६ देशांनी मान्यताही दिलेली आहे. हे सर्व देश यु*द्धाच्या काळात या नियमांचं पालन करण्यास बांधील आहेत. जे लोक लढत नाहीत किंवा लढण्याच्या स्थितीत नाहीत त्यांना संरक्षण मिळण्याच्या हेतूनं हे नियम तयार करण्यात आले आहेत.

सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन यु*द्धाच्या पार्श्वभूमीवर यु*द्धाचे हे नियम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यु*द्ध नेहमी दोन तुल्यबळ शक्तींमध्ये लढलं गेलं पाहिजे, असं महाभारतामध्येदेखील म्हटलं गेलं आहे. पण, इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्यामध्ये एकमेकांची तुलनाही न होऊ शकणारी राष्ट्रं एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली होती. इतिहासामध्ये अशी काही यु*द्धं झाली आहेत, ज्यामध्ये कमजोर गटानं जोरदार पलटवार केलेला आहे. अशाच काही प्रसिद्ध यु*द्धांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

यु*द्धातील सर्वात यशस्वी ‘अंडरडॉग्ज’ म्हणून व्हिएतनामचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. या लहानशा देशानं एक नव्हे, तर दोन जागतिक महासत्तांना पराभूत केलेलं आहे. यापैकी पहिलं यु*द्ध १९४० च्या उत्तरार्धात आणि १९५०च्या सुरुवातीला वसाहतवादी शासन संपुष्टात आणण्यासाठी फ्रान्सविरोधात झालं. 

त्यानंतर १९६० आणि ७०च्या दशकाच्या सुरुवातीला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकासोबत व्हिएतनामचं दुसरं यु*द्ध झालं. या दोन्ही यु*द्धांमध्ये फ्रान्स आणि अमेरिका व्हिएतनामचे शत्रू होते. हे दोन्ही देश बलाढ्य होते तरी देखील केवळ गनिमी काव्याची रणनीती आणि आत्मविश्वासाच्या बळावर व्हिएतनामनं आपल्या दोन बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. व्हिएतनामच्या सैन्यानं मायभूमीवर यु*द्ध खेळताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा पुरेपुर फायदा करून घेतला होता.



वेस्टरप्लेटचं यु*द्धदेखील अंडरडॉग्ज फाईटबॅकचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. या यु*द्धाबाबत जाणून घेण्यासाठी आपण दुसऱ्या महायु*द्धाकडे परत जाऊ. थर्ड रीक आणि सोव्हिएत युनियननं पोलंडवर केलेल्या आक्र*मणाची सत्यता कायम लपवली गेली आहे.

१७ सप्टेंबर रोजी सोव्हिएत सैन्यानं मागील बाजूने ह*ल्ला करण्यापूर्वी, पोलंडनं ह*ल्ला करणाऱ्या वेहरमॅच आणि वॅफेन एसएस युनिट्सच्या विरोधात भयंकर प्रतिकार केला होता. डॅनझिंग येथील वेस्टरप्लेट लष्करी तळावरील धुमश्चक्री सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

संरक्षणासाठी मोजके बंकर असलेल्या पॉलीश सैन्याकडं जर्मन सैन्याला १२ तास रोखण्याचं काम देण्यात आलं होतं. सप्टेंबर १९३९ मध्ये, घडलेल्या या घटनेत चिवट पोलीश सैन्यानं जर्मनांचा तब्बल आठवडाभर प्रतिकार केला. त्यांनी हवाई ह*ल्ले, नौदलाची बॉ*म्बफेक, जर्मन मरीनचं लँडिंग आणि उर्वरित तटबंदीमध्ये व्यत्यय आणण्यासाठी पोलीश अभियंत्यांनी अकल्पनीय प्रयत्न केले होते.

अंदाजे २०० पोलीश सैनिकांनी तीन हजाराहून अधिक जर्मन सैन्य, एक यु*द्धनौका आणि दोन टॉर्पेडो बोटींचं लक्ष विचलित करण्याची किमया करून दाखवली होती. विशेष म्हणजे मृतांच्या संख्येमध्येदेखील कमालीची विषम होती: ७ सप्टेंबर रोजी आत्मसमर्पण करण्यापूर्वी, जर्मन लोकांचे ५० सैनिक मारले गेले होते तर १५० जखमी झाले होते. त्या तुलनेत २०० पैकी केवळ १५ पोलीश मारले गेले होते तर ४० जखमी झाले होते.

‘विंटर वॉ*र’ हे इतिहासवेड्या लोकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. तरीही जगभरातील अनेक शालेय अभ्यासक्रमांमध्ये त्याचा फारसा उल्लेख दिसत नाही. मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप कराराच्या गुप्त प्रोटोकॉलमध्ये, ना*झी जर्मनी आणि सोव्हिएत युनियननं पूर्व व उत्तर युरोपचा बराचसा भाग विभागून घेतला होता. कराराच्या आधारे फिनलंड सोव्हिएत युनियनचं होते.

ऑक्टोबर १९३९मध्ये रशियानं फिनलंडकडे कॅरेलियन इस्थमस, उत्तरेकडील काही मोक्याचा भाग आणि फिनलंडच्या आखातातील बेटांची मागणी केली होती. याशिवाय, फिनलंडची राजधानी हेलसिंकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दक्षिण फिनलंडमधील सोव्हिएत लष्करी तळासाठी इस्थमसवरील फिन्निश तटबंदी नष्ट करून जमीन भाड्यानं देण्याचीही मागणी केली होती.

यादरम्यान, फिनलंडनं सोव्हिएतसोबत वाटाघाटी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तुंबळ यु*द्ध झालं. दोन्ही देशांच्या लष्करी शक्तीची तुलना केली तर मुंगी आणि हत्तीच्या गोष्टीची आठवण नक्की येईल. मुंगी इतकी लष्करी शक्ती असलेल्या फिनलंडनं निकराचा प्रतिकार करून रशियन सैन्याला सळो की पळो करून सोडलं होतं.

१९५६मध्ये झालेली हंगेरियन क्रांती ‘हंगेरियन उठाव’ म्हणूनही ओळखली जाते. हंगेरियन पीपल्स रिपब्लिक आणि हंगेरियन देशांतर्गत स्टालिनिस्ट सरकारविरुद्ध झालेली देशव्यापी क्रांती होती. युएसएसआरनं लादलेल्या धोरणांचा या क्रांतीमध्ये कडवा विरोध करण्यात आला. बलाढ्य सोव्हिएतविरोधात हंगेरिय लोकांनी दिलेला हा लढा अनेकांना प्रेरणा देणारा ठरला.

द पेनिनसुलर वॉ*र (द्वीपकल्पीय यु*द्ध) हे देखील अंडरडॉग्ज कॅटेगरीमध्ये मोडतं. १८०८ मध्ये नेपोलियनच्या फ्रेंच साम्राज्यानं पोर्तुगालवरील ह*ल्ल्याला मदत करण्यासाठी त्याचा पूर्वीचा मित्र स्पेनचा ताबा घेतला. हे कोणत्याही अडचणीशिवाय घडलं कारण स्पॅनिश कमांडर्सना फ्रेंच सैन्याच्या आक्रमणाची अपेक्षा नव्हती.

स्पॅनिश राजा आणि त्याचा उत्तराधिकारी या दोघांनीही सत्तेचा त्याग केला आणि नेपोलियनचा भाऊ जोसेफ स्पेनचा राजा झाला. मात्र, त्यानंतर ही गोष्ट फ्रेंचांना आश्चर्यकारकपणे महागात पडली. कारण, १८१४ मध्ये नेपोलियनचा पराभव होईपर्यंत फ्रान्सच्या संसाधनाची आणि मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. सुरुवातीला फ्रेंच आक्रम*णानंतर हतबल झालेल्या स्पॅनिश लोकांनी केलेला पलटवार नक्कीच अविश्वसनीय होता.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, युरोपीय शक्तींनी आफ्रिकेला आपापसात इतकं विभागून घेतलं की शतकाच्या अखेरीस फक्त एक देश स्वतंत्र राहू शकला होता, तो म्हणजे इथिओपिया. शतकाच्या शेवटच्या दशकात इटलीनं देशाला आपल्या वसाहतीत सामील करण्याचा प्रयत्न केला होता.

इटली आणि इथोपियातील पहिल्या युद्धाच्या अगोदर सम्राट मेनेलिक II यानं आपल्या लोकांना एकत्र आणण्याचं व्यवस्थापन केलं. त्यानं इथिओपियाचं आधुनिकीकरण करण्यास सुरुवात केली. त्याच्या कारकिर्दीत इथिओपियन लोकांना राष्ट्रीय बँक, रेल्वेमार्ग, वीज आणि आधुनिक बंदुक या सर्व गोष्टींचा परिचय झाला. तसंच त्यानं अदिस अबाबा येथे नवीन राजधानी बांधली.

या सम्राटानं युरोपियन शक्तींसोबत चतुर मुत्सद्देगिरीकरून या गोष्टी साध्य केल्या होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रान्स आणि रशियाकडून त्यानं इथिओपियन सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी शस्त्रं आणि लष्करी सल्लागार मिळवले होते.

१८९४ मध्ये जेव्हा इटली आणि इथिओपियामध्ये पहिले यु*द्ध सुरू झाले तेव्हा मेनेलिक II च्या अर्ध्या सैन्याकडं धनुष्य, भाले आणि तलवारी ही पुरातन शस्त्रं होती. मात्र, त्यानं इटालियन सैन्याविरुद्ध आपली संख्यात्मक श्रेष्ठता वापरली. इथिओपियन लोकांनी त्यांच्या प्रदेशावर आक्रमण करणार्‍या जवळजवळ संपूर्ण इटालियन सैन्याचा नाश केला.

त्यानंतर सुमारे ४० वर्षांनंतर, हॅली सेलासी I च्या कारकिर्दीत, इटलीनं मुसोलिनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा इथिओपिया जिंकण्याचा प्रयत्न केला. यावेळीदेखील इथिओपियन सैन्यानं भयंकर प्रतिकार केला. मात्र, यावेळी रणगाडे आणि विमानांचा वापर करणाऱ्या इटालीकडून त्यांचा पराभव झाला. दोन्ही वेळी इथोपियन सैन्यानं बलाढ्य इटलीचा सामना केला. इटलीला इथोपियाकडून इतक्या कडव्या प्रतिकाराची अजिबातच अपेक्षा नव्हती.

२०व्या शतकाच्या पूर्वार्धात, चीनला वारंवार गृहयु*द्धे आणि परकीय हस्तक्षेपाचा सामना करावा लागला. त्यापैकी १८३१ मध्ये मांचुरियावर जपानचं आक्र*मण आणि त्यानंतर १९३७ मध्ये चीननं केलेलं आक्र*मण सर्वात उल्लेखनीय मानलं जातं. अनेक सरदारांनी भूमीवर दावा केल्यानं देश त्रस्त होता. विविध प्रदेशांवर तसेच परदेशी आक्र*मणकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं.

१९४०च्या दशकाच्या उत्तरार्धात माओ झेडोंग यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट आणि चियांग काई सेक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी लोकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. ही नक्कीच आश्चर्याची गोष्ट होती.

१९३५ मधील कुप्रसिद्ध लाँग मार्चनंतर, माओ झेडोंगच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट सैन्यानं उत्तरेकडील चीन-सोव्हिएत सीमेवर सोव्हिएत युनियनच्या रसदीवर तग धरत प्रतिकार केला होता. १९४९ पर्यंत, हाँगकाँग येथील ब्रिटीश वसाहत, मकाऊची पोर्तुगीज वसाहत आणि तैवानमधील कुओमिंतांग सैन्य सोडून मुख्य भूप्रदेश चीनवर त्यांचं संपूर्ण नियंत्रण होते. त्यांच्या विजयात कम्युनिस्ट आणि राष्ट्रवादी या दोन घटकांचा मोलाचा वाटा होता.

बलाढ्य शत्रूंविरोधात लढा देण्याचं धाडस दाखवलेल्या या लोकांची इतिहासानं दखल घेतलेली आहे. शत्रू बलाढ्य असला तरी इच्छाशक्ती आणि रणनीतीच्या बळावर त्याचा पराभव करता येतो, हे यातून सिद्ध होतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

“टु मिनिट” मॅगीच्या ३० वर्षांच्या प्रवासाची कहाणी…

Next Post

अमेरिकन जनतेपासून लपवून ठेवलेल्या ‘द अमेरिकन फाईल्स’!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

अमेरिकन जनतेपासून लपवून ठेवलेल्या 'द अमेरिकन फाईल्स'!

बिटकॉइन चोरून लोकांना गंडा घालणारं हे जोडपं एका छोट्याश्या चुकीमुळे अखेर पकडलं गेलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.