The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक ज्यू कलाकार ना*झी जर्मनीसाठी आर्यन आयडॉल बनला होता..!

by द पोस्टमन टीम
3 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एक अभिनेता म्हणून कारकीर्द घडवणे फार कठीण आहे. त्यातही ज्यू म्हणून जन्माला येऊन ना*झी राजवटीत जर्मनीमध्ये जगणे-वाचणे आणि आपली कारकीर्द घडवणे अधिकच कठीण! मात्र, लिओनेल रॉयस या सगळ्याला अपवाद ठरला. या ज्यू अभिनेत्याला चक्क ना*झींनी सर्वोच्च प्रतिभा आणि श्रेष्ठ वंशाची मूर्ती म्हणून मिरवले. ना*झी अ*त्याचारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने दीर्घ काळ स्वतःची ओळख लपवली, अभिनेता म्हणून स्वतःला प्रस्थापित केले. युरोप आणि अमेरिकेत नाटक आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाचा मानदंड म्हणून स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले.

लिओन मॉरीझ रॉयसचा जन्म १८९१ मध्ये ऑस्ट्रिया-हंगेरी येथे ज्यू कुटुंबात झाला. त्याने ऑस्ट्रो-हंगेरियन सैन्यात लेफ्टनंट पदावर काम केले. आपल्या लक्षणीय कामगिरीबाबत पदक देऊन त्याचा गौरव करण्यात आला. मात्र, यु*द्ध संपल्यानंतर तो त्याच्या आवडत्या अभिनयाच्या क्षेत्राकडे वळला.

त्याने १९१३ मध्ये व्हिएन्ना येथील संगीत उपयोजित कला अकादमीमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण पूर्ण केले. ‘लिओ रॉयस’ हे नाव धारण करून अभिनयाच्या क्षेत्रात धुमाकूळ घालण्यास तो सज्ज झाला.

व्हिएन्नामध्ये अभिनयामध्ये स्वतःची ओळख निर्माण झाल्यानंतर तो एका थिएटर कंपनीत सहभागी झाला. त्याच कामासाठी तो बर्लिनला गेला. जर्मनीमध्ये अल्पावधीत रंगमंचावरील अभिनेता म्हणून त्याची विशेष ओळख निर्माण झाली. सन १९२१ ते १९३० च्या दशकात त्याने बर्लिनच्या नाट्य क्षेत्रामध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले.

त्याच वेळी जर्मनीमध्ये ना*झींच्या उदयामुळे लिओनला सभोवतालचे जग संकुचित होत असल्याचे जाणवू लागले. त्याच्या स्वातंत्र्य आणि अधिकारांवर मर्यादा येत गेल्या. देशभरात ज्यू विरोधी वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सन १९३५ च्या उत्तरार्धात ज्यू वंशीयांचे सर्व हक्क आणि नागरिकत्वाचा हक्क काढून घेण्यात आले. अधिकृतपणे, ज्यू वंशीयांना कायदेशीररित्या कनिष्ठ वंश म्हणून घोषित करण्यात आले. लिओनसाठी हा मोठा धक्का होता. त्यामुळे तो बर्लिन सोडून त्याचे मूळ स्थान असलेल्या ऑस्ट्रियाला परतला.



ऑस्ट्रियामध्येही भेदभाव कमी नव्हते. लिओनलाही अनेक नकार आणि शत्रुत्वाच्या भावनेला तोंड देत होता. या त्रासदायक वातावरणात तो अचानक गायबच झाला आणि एका वर्षानंतर ‘कास्पर ब्रॅंडहोफर’ या जगात अवतरला. हा नवीन अवतार म्हणजे त्याच्या अभिनयाच्या क्षमतेचा कळसच म्हणता येईल.

त्याने दाढी वाढवली. स्थानिक टायरोलियन शेतकर्‍यांच्या जीवनपद्धती आणि वागण्या-बोलण्याच्या शैलीचा बारकाईने अभ्यास आणि सराव केला. त्याने हायड्रोजन पेरोक्साईडने दर १० दिवसांनी अंघोळ करून चेहरा आणि शरीराचे केस ब्लीच करायला सुरुवात केली. वर्षभर स्वतःला जगापासून दूर ठेऊन लिओन जणू या जगाच्या रंगमंचावर कास्पर ब्रँडहोफर, ख्रिश्चन शेतकरी, अभिनेता म्हणून अवतरला.

नव्या अवतारात लिओनने मॅक्स रेनहार्ड या दिग्दर्शकांकडे ऑडिशन दिली: त्याने या पूर्वी मॅक्स यांच्याकडे काम केले होते. त्यामुळे भीती आणि अस्वस्थता अशा भावना सहन करत त्याने हे धाडस केले. मात्र, आपली ओळख लपवण्यात त्याला यश आले. मॅक्स यांनी व्हिएन्ना येथील नाट्य निर्माता अर्न्स्ट लोथर यांच्याकडे शिफारस केल्यामुळे पुन्हा एकदा लिओनच्या प्रतिभेला वाव मिळाला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

फ्रुलीन एल्सच्या नाटकामध्ये लिओनला वैशिष्ट्यपूर्ण भूमिका मिळाली. व्हिएन्नामध्ये नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. लिओनने मोठी जोखीम पत्करली होती. नाटकातल्या बहुतेक सहकारी अभिनेत्यांबरोबर त्याने आधी काम केले होते. त्यामुळे त्याची खरी ओळख उघड होण्याची भीती होती. तो त्याच्या ख्रिश्चन टायरोलियन शेतकरी व्यक्तिमत्त्वात पूर्णपणे विरघळून गेला होता हे मात्र खरे!

आपली खरी ओळख लपवण्यासाठी त्याने अभिनयाच्या क्षेत्रात नवशिका असल्याचे नाटकही केले. व्यावसायिक भाषा देखील माहित नाही, ‘एकपात्री’ म्हणजे काय हे माहित नाही, अशा बतावण्याही केल्या. त्याच्या एका सहकाऱ्यानेत्याला ‘एकपात्री प्रयोग’ म्हणजे काय ते समजावून सांगितलं. त्यावर ‘अरे हो, मला आता कळलं. माझ्या प्रभूशी, देवाशी संवाद म्हणजे एकपात्री’,असे साळसूद उद्गार त्याने काढले.

लिओन रॉयस याने ‘कास्पर ब्रँडोफर’ म्हणून रंगमंचावर अवतरणे कमालीचे यशस्वी ठरले. रंगमंचावरील पदार्पणानंतर त्याला संवेदनशील अभिनेता, भविष्यातील स्टार, ऑस्ट्रियन आल्प्सचा विनम्र शेतकरी, त्या काळातील उत्कृष्ट नैसर्गिक अभिनयशैली असलेला अभिनेता म्हणून गौरवण्यात आले.

ना*झींनीही त्याला विशेष पसंती दिली. त्यांच्या दृष्टीने तो आर्य वंशाच्या श्रेष्ठत्वाचा निर्विवाद पुरावा होता. एका सामान्य शेतकऱ्याने अभिनयाच्या क्षेत्रात मानदंड प्रस्थापित केल्याची त्यांची धारणा होती. एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्याचा गौरव करण्यात आला. लोथरने त्याच्याशी ३ वर्षांचा करार केला. रंगमंचावरचा त्याचा पुढचा मार्ग मोकळा झाला. 

‘कॅस्पर ब्रॅंडहोफर’ हे अल्पावधीत एक लोकप्रिय आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व ठरले. सामान्य प्रेक्षक, नाट्य रसिक, समीक्षक आणि ना*झी कट्टरपंथीयांचेही अलोट प्रेम त्याच्या वाट्याला आले. मात्र, स्वतःची मूळ ओळख विसरून फार काळ वावरणे त्याला जमले नाही. त्याला आपली कुचंबणा होत असल्याचं जाणवलं. अखेर त्याने मुखवटा उतरवला आणि आपली खरी ओळख जाहीर केली.

लिओनने आपली खरी ओळख जाहीर केल्यावर प्रचंड खळबळ माजली. खोट्या नावाने जगल्याबद्दल त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. वंश नव्हे तर प्रतिभा ही एका अभिनेत्याला जन्माला घालते, असं त्याने न्यायालयात ठासून सांगितलं. न्यायालयाने त्याला दंड ठोठावला. अर्थातच दंडाची रक्कम त्याच्या दृष्टीने किरकोळच होती. खरी ओळख जाहीर केल्यानंतर ना*झी विचारसरणीच्या लोकांकडून उपद्रव होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने न्यूयॉर्कमध्ये जाण्याचे निश्चित केले. ‘मॅकबेथ’ची भूमिका त्याला खुणावत होती. सन १९३७ मध्ये लिओनने युरोप सोडला आणि अमेरिका गाठली.

मेट्रो गोल्डविन मेयरचे सह-संस्थापक लुई बी. मेयर यांनी लिओनची व्हिएन्नामधली अभिनयाच्या क्षेत्रातली ऐतिहासिक कामगिरी स्वतःच्या नजरेने पाहिलेली होती. त्यामुळे त्यांनी त्याला करार करण्याची संधी दिली. अमेरिकेत लिओनने त्याचे तिसरे आणि शेवटचे ‘लिओनेल रॉयस’ हे नाव धारण केले. ‘एमजीएम कॉन्ट्रॅक्ट’नुसार त्याला छोट्या छोट्या चित्रपटात भूमिका मिळू लागल्या. गंमत म्हणजे, त्याला मिळणाऱ्या भूमिका बहुतेक वेळा जर्मन ना*झींच्या असायच्या. तरीही, त्याची प्रतिभा निर्विवाद होती आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा नशिबाचे दरवाजे उघडले. त्याला मिळालेली संधी अगदी अनपेक्षित, अनाकलनीय होती.

ऑगस्ट १९३९ मध्ये वॉशिंग्टनमधील जर्मन दूतावासाने लिओनला ‘मानद आर्यन’ दर्जा देऊन जर्मनीला परत येण्याची आणि युनिव्हर्सल फिल्म एजी ही जर्मन फिल्म आणि टेलिव्हिजन निर्मिती कंपनी चालवण्याची ऑफर दिली. मात्र, लिओनने त्यांची ऑफर नाकारली.

सुमारे ९ वर्षाच्या कालावधीत लिओनने अमेरिकेत चित्रपट आणि रंगमंच अभिनेता म्हणून एक मजबूत कारकीर्द घडवली. ‘गिल्डा’ हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्याने रीटा हेवर्थ आणि ग्लेन फोर्ड यांच्यासोबत काम केले होते. त्याचे आयुष्य १९४६ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने संपुष्टात आले. तेव्हा तो केवळ ५५ वर्षांचा होता.

केवळ नामांतराचा नव्हे तर पूर्ण व्यक्तिमत्त्वच पालटून टाकून नाझीच्या डोळ्यात शूळाफेक करत स्वतःला युरोप आणि अमेरिकेच्या कला क्षेत्रात अजरामर करणारी लिओनची जीवनकहाणी मोठी रंजक आहे आणि उद्बोधकही!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

युक्रेनवर ‘व्हॅक्यूम बॉ*म्ब’चा वापर केल्याचा रशियावर आरोप होतोय तो ‘व्हॅक्यूम बॉ*म्ब’ किती घातक आहे?

Next Post

द*हश*तवादी संघटनांचं उत्पन्नाचं साधन काय असतं..? त्यांनी महागडी शस्त्रास्त्रं कशी परवडतात..?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

द*हश*तवादी संघटनांचं उत्पन्नाचं साधन काय असतं..? त्यांनी महागडी शस्त्रास्त्रं कशी परवडतात..?

चीनने प्रकाशित केलेली नवीन दिनदर्शिका वादात का सापडलीय..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.