The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चीनने प्रकाशित केलेली नवीन दिनदर्शिका वादात का सापडलीय..?

by द पोस्टमन टीम
2 March 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


चीनने प्राण्यांवर आधारित १२ वर्षांच्या राशीचक्राचा समावेश असलेली दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. प्राण्यांवर आधारित राशीचक्राची चीनमध्ये प्रचलित असलेली पद्धत मूळ चिनी आहे की कोरियन यावरून नेटकरांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, एका चिनी भाषा संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार भारतीय ज्योतिषशास्त्राच्या पायावरच चिनी ज्योतिष आधारलेले आहे.

चिनी ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वर्ष हे एका विशिष्ट प्राण्याच्या प्रभावाखाली असते. त्या वर्षात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये त्या त्या प्राण्याची गुणवैशिष्ट्ये आढळून येतात. काशगर विद्यापीठाच्या शैक्षणिक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या त्यांच्या निबंधामध्ये शिनजियांग समाजशास्त्र अकादमीच्या भाषिक संशोधन संस्थेचे माजी संचालक प्रा. ली शिनहुई यांनी नमूद केल्यानुसार,

चिनी ज्योतिषाचे ज्ञान हे प्राचीन बॅबिलोनियन संस्कृतीतून उदयास आले आहे. त्याचे मूळही प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्रात आहे. हे ज्ञान रेशीम मार्गाने येणारे व्यापारी आणि प्रवासी यांच्याबरोबर सुमारे तिसऱ्या शतकात चीनमध्ये आले. चीनमध्ये भारतीय ज्योतिषशास्त्रात काही बदल करून चीनने स्वतःच्या ज्योतिषशास्त्राला आकार दिला. चिनी राशीची उत्पत्ती प्राणीशास्त्र किंवा प्राणी पूजेमध्ये असल्याचे मानले जाते.

२०२२ साली मात्र चीनने आपली दिनदर्शिका प्रसिद्ध केल्याचे वृत्त समाजमाध्यमातून प्रसिद्ध होताच कोरियन नेटकरांनीही प्राण्यांवर आधारित राशीचक्र असलेल्या ज्योतिषशास्त्रावर आपलाही दावा सांगायला सुरुवात केली आहे. एका कोरियन नेटकऱ्याने, प्राण्यांच्या राशींवर आधारित ज्योतिष जितके चीनचे आहे तितकेच ते दक्षिण कोरियाचे देखील आहेत, असा दावा केला. आमचा देश देखील कृषीप्रधान देश आहे. चिनी ज्योतिष प्रणाली जोसेन युगात (१३९२-१९१०) विकसित झाली. हा केवळ चीन, जपान आणि दक्षिण कोरियासह पूर्व आशियाई देशांचा सांस्कृतिक वारसा आहे.

त्याला प्रत्युत्तर देताना एका चिनी नेटकऱ्याने लिहिले, “ही प्रणाली चीनच्या हवामानावर आधारित आहे. हवामान अर्थातच भौगोलिक वातावरणावर अवलंबून असते. चीन हा मोठा देश आहे, तर कोरिया छोटा आहे. दोन्ही देशांची हवामान वैशिष्ट्ये सारखी असू शकतात का?”



चिनी राशिचक्र ही चंद्र दिनदर्शिकेवर आधारित एक पारंपारिक संकल्पना आहे. बारा वर्षांच्या चक्रामध्ये प्राणी आणि त्याच्या विशिष्ट गुणांचा समावेश या ज्योतिषशास्त्रात करण्यात आला आहे. ही पद्धती चीनशिवाय अनेक पूर्व आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये लोकप्रिय आहेत. जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम, कंबोडिया, सिंगापूर, नेपाळ, भूतान आणि थायलंड या देशांमध्येही त्याचा वापर केला जातो. चिनी राशीची उत्पत्ती प्राणीशास्त्र किंवा प्राणी पूजेमध्ये आहे,

चीनमध्ये अशी मान्यता आहे की, सुमारे २ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये भगवान बुद्धांनी किंवा जेड सम्राटाने देशाला संकटातून सोडवण्यासाठी सर्व प्राण्यांना आमंत्रित केले होते. परंतु त्या दिवशी तेथे फक्त बारा प्राणी पोहोचले. त्यामध्ये उंदीर, बैल, चित्ता, मांजर, ड्रॅगन, साप, घोडा, बकरी, माकड, कोंबडा, कुत्रा आणि डुक्कर यांचा समावेश आहे. भगवान बुद्धांनी ज्या क्रमाने हे प्राणी तेथे पोहोचले, त्या क्रमाने त्यांना त्या त्या वर्षाचा ‘अधिष्ठाता’ बनवले. 

दुसऱ्या एका कथेप्रमाणे सम्राटाने देशातल्या सगळ्या प्राण्यांची शर्यत आयोजित केली. त्यातील पहिल्या १२ प्राण्यांना निवडून त्या प्रमाणे राशीचक्र बनविले.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ही प्राणी वर्षांचे चक्र दर बारा वर्षांनी पुन्हा पहिल्यापासून फिरत राहते. पूर्वीच्या काळी चीनमध्ये व्यक्तिगत भविष्यकथन करण्याची पद्धत नव्हती. समूहाचे, म्हणजेच प्रांताचे, राज्याचे देशाचे भविष्य, पावसाचे भाकीत, शेतीविषयक अंदाज व्यक्त केले जायचे. ‘हान’ सम्राटांच्या काळात व्यक्तिगत भविष्य सांगण्याची पद्धत विकसित करण्यात आली.

आजही, चीनमधील लाखो लोक या ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात. चिनी लोक लग्न ठरवताना राशींचा आवर्जून विचार करतात. काहीजण त्यांच्या स्वतःच्या राशीशी सुसंगत असलेल्या व्यक्तीला शोधून त्यांना जोडीदार आणि मित्र बनवतात. कोणता माणूस आपल्या कामाचा आहे आणि कोणता नाही हे ठरविण्यासाठी देखील राशींचा आधार घेतला जातो. सर्वसाधारणपणे, राशिचक्र राशीनुसार लोक जीवन कसे जगतात याचे मार्गदर्शन करते.

चिनी ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात ‘स्व’ असतो आणि त्याच्याभोवती अनेक स्तर असतात. प्रत्येक थराचा आकार, पोत आणि आभा भिन्न असतो त्या ती व्यक्ती खरोखर कोण आहे हे ठरते. चिनी राशिचक्र किंवा चीनी जन्मकुंडली व्यक्तीची व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये, सामर्थ्य, कमजोरी, इतर लोकांशी सुसंगतता आणि भविष्याचा अंदाज घेण्यासाठी व्यक्तीच्या जन्माचा तपशील वापरते. चिनी ज्योतिषाला कोणताही धार्मिक आधार नसून मानवाने ५ हजार वर्षांच्या निरीक्षणावर ते आधारित आहे, असा दावा त्सेन रिंपोचे या चिनी भविष्यवेत्त्यांनी केला आहे. माहिती गोळा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे निरीक्षण, असे ते म्हणतात.

राशिचक्र वर्षाच्या सुरुवातीच्या विषयी चिनी ज्योतिषशास्त्रात दोन वेगवेगळ्या मान्यता आहेत. एका मान्यतेनुसार चिनी नववर्ष किंवा वसंत ऋतुपासून सुरू होते तर दुसऱ्या विचारानुसार नववर्ष चंद्र वर्षाचा पहिल्या दिवशी सुरु होते. हा दिवस २१ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीतील एक दिवस असतो. पारंपारिक चिनी चंद्र वर्षात १२ महिने आणि ३५३ ते ३५५ दिवस असतात. लीप वर्षात १३ महिने आणि ३८३ ते ३८५ दिवस असतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

द*हश*तवादी संघटनांचं उत्पन्नाचं साधन काय असतं..? त्यांनी महागडी शस्त्रास्त्रं कशी परवडतात..?

Next Post

आजही कित्येक देशांचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा ब्रिटिश म्युझियममध्ये कैद आहे..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

आजही कित्येक देशांचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा ब्रिटिश म्युझियममध्ये कैद आहे..!

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी कलम ३७० रद्द केल्यामुळे भारताचा निषेध केला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.