The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Explainer – मेटाव्हर्स नेमकं काय आहे..? त्याने आपल्या खऱ्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत..?

by द पोस्टमन टीम
26 January 2026
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


काही वर्षांपूर्वी फ़ेसबुकनं त्याचं नाव बदलून मेटा असं केलं आहे. बघायला गेलं तर ही एक क्रांतिकारक घटना आहे. भविष्याचं चित्रं दाखवू पहाणारी ही घटना आहे. भविष्यातलं चित्रं पहाण्याआधी जरा भूतकाळात डोकावू.

१९९२ साली जेंव्हा इंटरनेट ही गोष्ट नवखी, कुतुहलाची आणि सामान्य माणसाचं आयुष्य व्यापून टाकणारी नव्हती तेव्हाची गोष्ट, नील स्टिफ़न्सन या अमेरिकन कादंबरीकारानं या “व्हर्च्युअल रिअॲलिटी” अर्थात आभासी वास्तवाबद्दल बोललं होतं. त्या काळात ही कल्पना कथा-कादंबरीत शोभावी अशीच होती.

एक असं आभासी मात्र अगदी वास्तववादी जग जिथे तुम्ही तासन तास रेंगाळू शकता. जे वास्तव जगात करता तेच सगळं या अभासी जगात करण्याची सोय असेल हे त्यानं मांडलं आणि लेखकाची रम्य कल्पना म्हणून त्याची चर्चाही झाली. या आभासी जगाला त्यानं,” मेटाव्हर्स” म्हटलं. 

मेटा या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे, पलिकडे आणि व्हर्स म्हणजे जग. अर्थात आपण जगत आहोत त्या पलिकडचं अगदी याची प्रतिमा असणारं असं आभासी जग. या जगात ऑफ़िसेस असणार होती, मैत्रीचे कट्टे असणार होते आणि खेळ, मजाही असणार होती. केवळ तीन दशकांपूर्वी त्यानं मांडलेली कल्पना आज आपण जगत आहोत आणि आपलं भविष्य मेटाव्हर्सच असणार आहे. आज मायक्रोसॉफ़्ट, ॲपल, फ़ेसबुक आणि गुगल यांनी आपल्याला मेटाव्हर्सशिवाय जगणं किती कठीण आहे, हे दाखवून दिलं आहे.

गेली दोन एक वर्षं संपूर्ण जग एका रात्रीत कोविड नावाच्या शत्रूने ह*ल्ला करुन पॉज केलं. वास्तव जगातले सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना जगभरात एक मोबाईल स्क्रिन आणि डेटा यांच्या जोरावर हे मेटाव्हर्स सुरळीत चालू होतं. इतकंच नाही तर आपली सीमा विस्तारत हे मेटाव्हर्स वास्तव जगाला पर्याय बनलं. अशा अनेक गोष्टी होत्या ज्या मेटाव्हर्समुळे टिकल्या.



अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर शाळा, ऑफ़िसेस, मनोरंजन, वैद्यकीय उपचार आणि आर्थिक व्यवहार हे सगळं या डिजिटल जगानं चालू ठेवलं. जवळपास नव्वद टक्के व्यवहाराना मेटाव्हर्सद्वारे जगभरात चालू ठेवलं गेलं.

आता प्रश्न असा उद्भवतो की अशा अभासी जगाची भविष्यात आपल्याला खरंच गरज आहे का? वास्तव जगाला पर्याय म्हणून मेटाव्हर्स स्वीकारायलाच हवं आहे का? मेटाव्हर्स काय करतं? तर इंटरनेट हा कालपरवापर्यंत पाहण्याचा प्रकार होता तो आता “अनुभवायचा” प्रकार झाला आहे. अगदी साधं उदाहरण म्हणजे, इथे तुम्ही तुमचे अवतार बनवून तुमच्या कुटुंबासोबत व्हर्च्युअल जगात अगदी एखादा बैठा खेळही खेळू शकता. तुमच्या हालचाली व्हर्च्युअल अवतारात प्रतिबिंबीत होतात. म्हणजे तुम्ही हे तंत्रज्ञान केवळ बघत नाही तर तिथे उपस्थित राहून अनुभवताही.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

गेमिंगच्या क्षेत्रात याची सुरवात यापूर्वीच झालेली आहे. या गेम्समध्ये त्यांचं स्वत:चं जग असतं, तिथलं स्वतंत्र अर्थकारण असतं, अभासी चलन असतं ज्यात अभासी जगातले व्यवहार होतात इतकंच नाही तर अभासी कथाही असतात ज्यांचा भाग बनत तुम्ही गेममधला प्रवास करत असता. पात्रांसाठी कमवता आणि खरेदीही करता. हा सगळा मेटाव्हर्सचाच एक भाग आहे. हा एक खेळ न उरता एक आभासी जग, सायबर स्पेस बनलं आहे. 

आता प्रश्न असा येतो की अशी किती मेटव्हर्स असू शकतात? एकच असेल की अनेक? याचं उत्तर आहे, भविष्यात अनेक मेटाव्हर्सची निर्मिती होण्याच्या शक्यता आहेत आणि यात सध्या बाजी मारलेल्या फ़ेसबुकनं याची सुरवात करून या कमानीत आपण शिखरावर असल्याचं दाखवून दिलं आहे.

ॲपल सध्या व्हर्च्युअल रिअॲलिटी गॅजेटच्या निर्मितीत व्यस्त आहे. असं म्हटलं जातं की मेटाव्हर्समधे या गॅजेटच्या रुपात क्रांती येण्याची शक्यता आहे. 

यानंतर गूगल हेदेखील अशा प्रकारच्या अभासी विश्वाच्या निर्मितीत स्वतंत्र आणि इतरांहून वेगळं असं मेटाव्हर्स बनवत आपला हिस्सा राखण्याच्या प्रयत्नात आहेच. या तीन दिग्गजांनंतर आणखीन एक नाव म्हणजे मायक्रोसॉफ़्ट. मेश या नावानं मायक्रोसॉफ़्टचं डिजिटल जग बनत आहे.

यानंतरचं नाव आहे डिझनी. मनोरंजनाच्या क्षेत्रात एक मोहमयी जग बनविण्याचा अनुभव डिझनीकडे आहेच. डिझनीनं आजवर पडद्यावरचं जग वास्तवात डिझनीलॅण्डच्या रुपात उतरवून जगभरातल्या पर्यटनात भर टाकली आहे. आता डिझनीचा प्रवास बरोबर उलट दिशेनं होणार आहे. डिझनी अभासी जगाची निर्मिती करणार आहे. अर्थात डिझनीचं स्वप्निल जग त्यांच्या मेटाव्हर्समधे असणार आहे.

खाजगी कंपन्याच नाही तर सरकारी यंत्रणाही या मेटाव्हर्स निर्मितीच्या शर्यतीत उतरू पहात आहेत, कोरियन सरकारनं २०२१ साली विविध मेटाव्हर्स एका छताखाली आणत आणखीन नवं दालन उघडलं आहे. थोडक्यात नजीकच्या भविष्यात मेटाव्हर्स हा अपरिहार्य ठरू पहाणारा घटक आहे. जर असं आहे तर मग काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला गांभिर्यानं शोधावी लागतील.

काय आहेत हे प्रश्न? 

या मेटाव्हर्समधे खाजगीपणा जपला जाणार आहे का?, मेटाव्हर्स हे सर्वसमावेशक जाग असणार आहे का? इथे लोकशाही मार्ग अवलंबला जाणार आहे का? किंवा दुसर्‍या शब्दात सांगायचं तर इथले व्यवहार लोकशाही पध्दतीनं घडणार आहेत का? नेमक्या काय मर्यादा आखल्या जातील? आणि या सर्वाहून महत्वाचा असा प्रश्न , हे सगळं कितपत सुरक्षित असेल? आज गूगलवर मॅपच्या सहाय्यानं वापरकर्त्यांची खाजगी माहिती वापरल्याचा आरोप होत खटला चालू असण्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न म्हणजे सावध ऐका पुढल्या हाका आहे.

आतापासूनच या जगातली गुन्हेगारी कृत्यं समोर येऊ लागली आहेत. गत वर्षीच्या डिसेंबर महिन्यातली घटना आहे. सॅन फ़्रेन्सिस्को येथील एक महिला आपला डिजिटल अवतार धारण करून नेहमीप्रमाणे शूटर गेममधे प्रवेशकर्ती झाली आणि इथे एक अपरिचित अवतार येऊन तिला डिजिटली त्रास देऊ लागला. हा काही एकमेव प्रकार नाही असे प्रकार मिनिटामिनिटाला घडत आहेत. जरी व्हर्च्युअल गुन्हा जगात होत असला तरीही मनस्ताप वास्तव जगातल्या व्यक्तीला होतो हे लक्षात घ्यावं लागेल.

मग आता हा प्रश्न येतो की अशा सगळ्यात महान मुलं कितपत सुरक्षित राहतील? कारण गेमिंगचा मुख्य ग्राहक लहान मुलं आणि तरूण असतात. अनेक अभ्यासांनी हे सिध्द केलेलं आहे की इंटरनेटचा वापर मुलांसाठी घातक आहे. इथल्या जगात धुमाकूळ घालणार्‍या व्हायरसना कसं थोपविलं जाणार आहे? या सर्व प्रश्नांची सकारात्मक उत्तरं मिळणार नाहीत तोवर मेटाव्हर्सला पर्यायी जग म्हणून स्वीकारणं घातक असणार आहे. 

मेटाव्हर्स हे कवीकल्पना राहण्यातच शहाणपणा असेल कारण एक हळवा स्पर्श, आपल्या घराची ऊब, आपल्या हातानं बनविलेलं अर्धं कच्चं जेवण आणि ते एकत्र हसत खेळत जेवण्याची मजा कोणत्याही अभासी जगात अनुभवता येणं अशक्य आहे. याचसाठी पॅनडॅमिकचं बोट धरून हे जे अभासी जग तुमच्या माझ्या वास्तव जगावर राज्य करू पहात आहे त्याला थोपविण्यातच शहाणपण आहे तरच माणूस म्हणून आपण जिवंत राहू अन्यथा आपलं रुपांतर डिजिटल अवतारात होण्यास वेळ लागणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

सलग ८ वर्ष बरड माळावर राबून नंदनवन फुलवलं; पद्म पुरस्काराने गौरव झाला!

Next Post

या माणसाने फेसबुक, गुगलला खोटी बिलं पाठवून त्यांच्याकडून १२१ मिलियन डॉलर्स उकळले होते

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या माणसाने फेसबुक, गुगलला खोटी बिलं पाठवून त्यांच्याकडून १२१ मिलियन डॉलर्स उकळले होते

भारतीय पेमेंट कंपनी 'RuPay'मुळे अमेरिकन Visa आणि MastarCard ची चांगलीच तंतरलीये

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.