The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Explainer: 5G तंत्रज्ञानाला जगभरातून विरोध का होतोय? ते खरंच धोकादायक आहे का?

by द पोस्टमन टीम
25 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


टेलिकम्युनिकेशन सेक्टरमधील मेजर प्लेयर असलेल्या रिलायन्स जिओनं भारतामध्ये 5G डेटा नेटवर्क आणण्याची घोषणा केली. 5G नेटवर्क कमालीचा स्पीड, लोअर लेटन्सी आणि डेटा नेटवर्कला अधिक सक्षम करतं. 5G आपल्या नेटवर्क स्लाइसिंगद्वारे भव्य मशीन टाईप कम्युनिकेश आणि व्हर्च्युअल नेटवर्क लागू करण्याचीही शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवतं.

दरम्यान, जिओनं 5Gच्याही पलिकडे जाऊन 6G नेटवर्कवर काम करण्याचीही तयारी सुरू केली आहे. 6G आपल्या टेराहर्ट्झ फ्रिक्वेन्सीद्वारे, सेल-फ्री मिमो, इंटेलिजेंट सरफेस यासारख्या युनिक क्षमतांद्वारे डिजिटायझेशनचा विस्तार करू शकतं.

एकूणच जर 5G आणि 6G नेटवर्क फॅसिलिटीजं एकत्र उपलब्ध असतील तर ग्राहक आणि एंटरप्राइझ वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. ही गोष्ट लक्षात घेऊन जिओ इस्टोनिया ओयु आणि फिनलंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ओलूनं एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही घटकांच्या भागीदारीमुळं 6G नेटवर्कमध्ये जगभरातील संधी शोधण्यासाठी एक भक्कम पाया प्रस्थापित होणार आहे.

मात्र, जेव्हा एकीकडे ही हातमिळवणी सुरू असताना जगाच्या दुसऱ्या टोकावर 5G नेटवर्क मोठ्या समस्येचं कारण बनलं होतं! अमेरिकेमध्ये 5G नेटवर्कमुळं विमानसेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आली होती. 5G नेटवर्क आणि विमानसेवा ठप्प होण्याचा काय संबंध आहे? हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…

मोबाईल नेटवर्कची पाचवी पिढी म्हणजेच 5G हे 4G पेक्षा खूप वेगवान असल्याचं म्हटलं जातं. यामध्ये इंटरनेटचा वेग १० पटीने जास्त असेल, तर लेटन्सी १० पटीने कमी होऊन एक मिलीसेकंद (सेकंदाचा १००० वा भाग) होईल. लेटन्सी म्हणजे एका डिव्‍हाइसवरून दुसर्‍या डिव्‍हाइसवर डेटा पाठवण्‍यासाठी लागणारा वेळ. 

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, सेल्फ-प्रोपेल्ड कार, वस्तू वितरित करणारे ड्रोन, रोबोटिक शस्त्रक्रिया आणि टेलिमेडिसिन इत्यादी नवीन युगातील तंत्रज्ञानासाठी 5G हा आधार आहे. त्याशिवाय भविष्याची कल्पना करणं शक्य नाही. अमेरिकेमध्ये सध्या 5Gनेटवर्क मोठ्या चिंतेचा विषय ठरलं आहे. अमेरिकेमध्ये 5G नेटवर्क रोल्ड आऊट करण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप त्यात अनेक त्रूटी आहेत. सध्या ते तुम्हाला एखादा चित्रपट अधिक जलदगतीनं डाउनलोड करू देतं. पण, हे नेटवर्क ऑटोमॅटिक वाहनं, आधुनिक उत्पादन, स्मार्ट शहरे, टेलिहेल्थ आणि इंटरनेट-कनेक्टेड उपकरणांवर अवलंबून असणार्‍या इतर क्षेत्रांसाठी गंभीर ठरू शकतं. याचीच प्रचिती अमेरिकेमध्ये आली.

अमेरिकेत 5G नेटवर्क लाइव्ह झाल्यामुळं काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आपली उड्डाणं रद्द केली आहेत. 5G चा हा नवीन बिट रेडिओ स्पेक्ट्रमच्या एका भागावर कार्यरत आहे. हा भाग रेडिओ अल्टिमीटर नावाच्या विमान उपकरणांद्वारे वापरल्या जाणार्‍या श्रेणीच्या जवळपास जाणारा आहे. RTCA या एव्हिएशन संशोधन गटानं 2020 च्या अहवालात हा मुद्दा हायलाइट केला होता. 5G नेटवर्क पायलट आणि एअरलाइन्सच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकतं असं त्यात सांगण्यात आलं होतं. तरीदेखील या गोष्टीचा फारसा गांभीर्यानं विचार केला गेला नाही. म्हणून जेव्हा अमेरिकेमध्ये 5G नेटवर्क लाईव्ह केल्या-केल्या अनेक विमानवाहतूक कंपन्यांनी आपल्या फ्लाईट कॅन्सल केल्या. यामध्ये भारतीय विमानवाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाचादेखील समावेश आहे. 

युएसमध्ये 5G इंटरनेट सेवांसाठी 3.70 ते 3.98 GHz च्या सी-बँड फ्रिक्वेन्सीचा वापर केला जात आहे. 4.20 ते 4.40 GHz या वारंवारतेच्या आसपास, अनेक एअरलाइन्सच्या उपकरणांची संपर्क यंत्रणा काम करते. एअरलाइन्स उपकरणांची फ्रिक्वेन्सी आणि 5Gजी फ्रिक्वेन्सी एकमेकींच्या जवळपास आहेत. म्हणून एअरलाईन कंपन्यांना भीती आहे की, या दोन फ्रिक्वेन्सी एकमेकांवर परिणाम करू शकतात. असं झाल्यास, उड्डाणाची उंची, अल्टीमीटरचे रीडिंग, ऑटोमॅटिक लँडिंग, वाऱ्याचे प्रवाह आणि धोके इत्यादी ओळखणं कठीण होऊ शकतं.

याशिवाय धुकं, खराब हवामान आणि दाट ढग अशा परिस्थितीमध्ये तर अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असं विमान कंपन्यांचं म्हणणं आहे. अशा अडणींमुळं मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मुद्दा थेट नागरिकांच्या जीवाशी आणि विमान कंपन्यांच्या विश्वासार्हतेशी जोडला गेलेला आहे.

युएसमधील एअरलाइन्स कंपन्यांनी 19 जानेवारी 2022 रोजी फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या (FAA) विमान वाहतूक नियामकानं प्रभावित झालेल्या विमानतळांपासून सुमारे दोन मैलांच्या अंतरापर्यंत 5G सिग्नल बंद ठेवण्यास सांगितली आहेत.

त्यापूर्वी एअरलाइन्सनं अमेरिकन सरकारला धोकादायक ठरू शकणाऱ्या ५० विमानतळांची यादी दिली आहे. या विमानतळांच्या जवळील क्षेत्रामध्ये टेलिकॉम कंपन्यांनी सध्या 5G बंद केलं आहे. यामुळे विमानसेवा तात्पुरती पूर्ववत होण्यास आणि तोडगा काढण्यास थोडा वेळ मिळाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अनेक विभाग, दूरसंचार आणि विमान कंपन्या अमेरिकन सरकारशी चर्चा करत आहेत. यातून ठोस उपाय समोर येण्यासाठी आणखी काही महिन्यांचा काळ लागू शकतो. कारण, 5G रोल्ड आऊट करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्स पणाला लागलेले आहेत.

एक जमेची बाजू म्हणजे भारतात अद्याप कोणत्याही विमान कंपनीने 5G नेटवर्कबाबत अमेरिकेसारख्या धोक्याची चिंता व्यक्त केलेली नाही. 3G आणि 4G च्या काळात सैन्यदल आणि प्रसार भारतीनं आक्षेप घेतला होता. ट्राय आणि दूरसंचार विभागानं हे मतभेद दूर केले होते. 5G मध्येही काही आक्षेप असतील तर त्यावर उपाय शोधण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल, यात शंका नाही. 

टेलिकॉम रेग्युलेटरनं सांगितल्यानुसार, भारतात 5G सेवा सुरू झाल्यामुळं विमानवाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण, भारतात 5G नेटवर्कसाठी 3.3 ते 3.6 GHzचे फ्रिक्वेन्सी बँड निश्चित केले आहेत. दोन्ही बँड एअरलाइन अल्टिमीटर वापरत असलेल्या 4.2 GHz च्या खाली आहेत. दोन्ही बँडमध्ये पुरेसे अंतर असल्यानं उड्डाणांवर परिणाम होणार नाही, असं सांगितलं जात आहे.

सध्या अमेरिकेमध्ये जी अडचण उभी राहिली आहे ती इतर कोणत्याही 5G वापरणाऱ्या देशांमध्ये जाणवली नाही. जगभरात सध्या 40 देशांमध्ये 5G सेवा आहेत. ‘फ्रिक्वेन्सी बँड’ हे या समस्येचं मूळ मानलं जात आहे. त्यामध्ये काही तडजोड करण्यात आली तर कदाचित अमेरिकेतील 5G नेटवर्क आणि एअरलाइन्सची अडचण दूर होईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 


ShareTweet
Previous Post

आणखीन एका आफ्रिकन देशात अराजक, मिलिटरीने राष्ट्राध्यक्षांना गायब करून सत्ता काबीज केली

Next Post

ग्राहकांची लोकेशन चुकीच्या पद्धतीने ट्रॅक केल्यामुळे गुगलवर खटला भरलाय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

ग्राहकांची लोकेशन चुकीच्या पद्धतीने ट्रॅक केल्यामुळे गुगलवर खटला भरलाय

जगातली ती प्रयोगशाळा, जिथे अनेक मृतदेह पुन्हा जिवंत होण्याच्या आशेने ठेवले जातात

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.