The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना कुठे नोंदणी ना कुठे मुख्यालय, तरीही बायनान्स जगातील सर्वांत मोठं क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज बनलंय

by द पोस्टमन टीम
17 January 2025
in विश्लेषण, गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एखादा बिझनेस सुरू करण्यासाठी कुठल्या गोष्टी सर्वांत जास्त महत्त्वाच्या आहेत, असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? कुठलाही बिझनेस सुरू करण्यासाठी बिझनेस आयडिया, पुरेसं आर्थिक भांडवल, कायदेशीर परवाने आणि बिझनेसच्या कार्यालयासाठी जागा आवश्यक असते, अशी उत्तरं बहुतेक जण देतील. सारासार विचार केला तर, कुठल्याही व्यवसायासाठी वरील गोष्टी आवश्यक आहेतच. त्यापैकी एखाद्या जरी गोष्टीची कमतरता असेल तर बिझनेस उभा करण्याची कठीण गोष्ट आणखी कठीण होते.

मात्र, सध्या जगात अशी एक व्यक्ती आहे जिनं कुठल्याही ऑफिसशिवाय आणि परवान्याशिवाय अब्जावधी रुपयांचा बिझनेस उभा केला आहे. इतकंच नाही तर या व्यक्तीनं एकेकाळी श्रीमंतीच्याबाबतीत आशियातील सर्वात श्रीमंत बिझनेसमन असलेल्या मुकेश अंबांनींनाही मागे टाकलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही व्यक्ती आहे तरी कोण? या व्यक्तीचं नाव आहे ‘चांगपेंग झाओ’. 

झाओनं सर्वांत अस्थिर गोष्ट असलेल्या क्रिप्टो एक्सचेंजच्या मदतीनं अब्जावधी रुपयांचा डोलारा उभा केला आहे. एका लहानशा प्रसंगातून मिळालेल्या कल्पनेचा आधार घेत चांगपेंग झाओनं अवघ्या चार वर्षांपूर्वी ‘बायनॅन्स’ नावाची कंपनी स्थापन केली. सध्याच्या घडीला डिजिटल करन्सी सेक्टरमध्ये ही कंपनी जगावर राज्य करत आहे. 

लंडन, न्यूयॉर्क आणि हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजमध्ये या कंपनीच बोलबाला आहे. क्रिप्टो करन्सी जायंट ठरलेल्या बायनॅन्सची स्थापना कशी झाली? कंपनीचा संस्थापक असलेला चांगपेंग झाओ कोण आहे? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…

क्रिप्टो करन्सी वर्ल्डमध्ये सध्या रॉकस्टार असलेल्या चांगपेंग झाओला चार वर्षांपूर्वी मित्र आणि नातेवाईक वगळता कुणीही ओळखत नव्हतं. आता त्याच झाओचे ट्विटरवर ८८ लाख फॉलोअर्स आहेत. ४४ वर्षीय झाओला सगळं जग ‘सीझेड’ या नावानं ओळखतं. विविध अतरंगी उद्योगांचं माहेरघर असलेल्या चीनमध्ये ‘चांगपेंग झाओ’चा जन्म झाला होता. त्याचे आई-वडील शिक्षक होते. वयाच्या बाराव्या वर्षी झाओ आणि त्याचे पालक कॅनडाला गेले.



कॅनडातील व्हॅन्क्युव्हरमध्ये असताना झाओनं पैसे मिळवण्यासाठी दोन-दोन ठिकाणी काम केलं. दिवसा तो मॅकडोनाल्ड्समध्ये बर्गर टीममध्ये काम करत असे तर रात्री पेट्रोल पंपावर काम करत असे. दरम्यान, माँट्रियलमधील मॅकगिल युनिव्हर्सिटीमधून त्यानं कम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवली. काही काळ टोकियो व न्यूयॉर्कमध्ये ब्लूमबर्ग एलपीसारख्या वित्तीय कंपन्यांमध्ये काम केलं.

२००५ साली झाओ चीनला परत गेला. तिथे त्यानं शांघायमध्ये फ्यूजन सिस्टम्सची निर्मिती केली. फोर्ब्सच्या अहवालानुसार, फ्यूजन सिस्टम ही ब्रोकरसाठी सर्वात फास्ट आणि हाय फ्रिक्वेन्सी असलेली ट्रेडिंग सिस्टम आहे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

असं म्हणतात जगातील सर्वांत जास्त भन्नाट कल्पना सहज सुचतात. अगदी टॉयलेटमध्येसुद्धा एखाद्या व्यक्तीला आयुष्य बदलून टाकणारी कल्पना सुचू शकते. ‘बायनॅन्स’ स्थापन करण्याचा पायासुद्धा पोकर क्लबमध्ये घातला गेला होता.

२०१३ मध्ये शांघायमधील एका पोकर क्लबमध्ये बसलेल्या चांगपेंग झाओनं पहिल्यांदा बिटकॉईनबद्दल ऐकलं होतं. झाओच्या बॉबी ली नावाच्या मित्रानं त्याला त्याच्या संपत्तीपैकी १० टक्के रक्कम बिटकॉइनमध्ये गुंतवण्याचा सल्ला दिला होता. 

बॉबी ली हा बीटीसी चायनाचा सीईओ होता. झाओनं आपल्या मित्राचा सल्ला ऐकून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याला या क्षेत्रामध्ये जास्त रस निर्माण झाला. झाओनं काही काळ ‘ओके कॉईन’चा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम केलं. मात्र, झाओ यावरती समाधानी नव्हता.

त्याला काहीतरी लार्जर दॅन लाईफ करण्याची इच्छा होती. म्हणून, २०१७ मध्ये बायनॅन्स नावाचं क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज सुरू करण्यासाठी त्यानं नोकरी सोडली. यासाठी त्यानं आपलं राहता फ्लॅटही विकला आणि त्यातून मिळालेले पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवले. सध्या बायनॅन्समधील ९० टक्के शेअर्स झाओकडे आहेत.

बायनॅन्सनं सुरुवातीला बिटकॉइन आणि असंख्य ऑफशूट्सच्या ट्रेडिंगवर लक्ष केंद्रित केलं होतं. परंतु कंपनीनं युजर्सला मेनस्ट्रीम करन्सीच्या बदल्यात डिजिटल करन्सीची देवाणघेवाण करण्याची परवानगी दिली नव्हती. फक्त इंग्रजी भाषा वापरणाऱ्या स्पर्धकांच्या विरोधात उभे राहण्यासाठी बायनॅन्सनं आपल्या वेबसाइटवर नऊ भाषा देऊ केल्या. झाओनं एक असा प्लॅटफॉर्म विकसित केला जो कमालीचा युजर फ्रेंडली ठरला.

जुलै २०१७ मध्ये बायनॅन्सनं ‘BNB’ नावाच्या स्वतःच्या डिजिटल कॉईनची सुरुवात केली. त्याच्या प्रारंभिक ऑफरमध्ये 15 दशलक्ष डॉलर्स जमा केले. त्यावेळी कंपनीतील इतर गुंतवणूकदार देखील चीनमधीलच होते. असं असलं तरी, कंपनीचे युजर्स मात्र, दक्षिण आफ्रिका, रशिया आणि भारत यांसारख्या कमी-विकसित आर्थिक प्रणाली असलेल्या देशांमधील जास्त होते. केवळ सुरुवातीच्या सहा महिन्यातच बायनॅन्स सर्वात मोठी क्रिप्टो एक्सचेंज बनली.

जितक्या वेगात कंपनीनं प्रगती केली तितक्याच लवकर कंपनीतील अधिकार्‍यांसह झाओला विविध समस्यांना तोंड द्यावं लागलं. 2017 च्या उन्हाळ्यात बायनॅन्सनं शांघायच्या बाहेर विस्तार करण्यास सुरुवात केल्यानंतर दोन महिन्यांनी, चिनी सरकारनं क्रिप्टो एक्सचेंजेसवर बंदी घातली. यामुळं 30 पेक्षा जास्त जणांची टीम असलेल्या बायनॅन्सनं जपान गाठलं. मात्र, तिथे देखील झाओला कायदेशीर परवानगी मिळाली नव्हती.

तरीसुद्धा त्यानं जपानच्या आर्थिक नियामकांचं उल्लंघन करून ट्रेडिंग केली. परिणामी जपान सरकारनं बायनॅन्सला वॉर्निंग दिली. त्यानंतर, बायनॅन्सनं आपलं लोकेशन दर्शवणंच बंद केलं. 

कंपनीचे सीईओ झाओसह इतर कर्मचारी जगभरात विखुरलेले आहेत. सर्वजण आपापल्या घरून काम करतात. याचाच अर्थ असा होतो की, बायनॅन्सला हेडक्वॉर्टरच नाही! बायनॅन्सचं सर्वत्र अस्तित्व असूनही ती अस्तित्त्वात नाही.

ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि फीच्या ब्लूमबर्ग विश्लेषणानुसार, २०२१ च्या मध्यापर्यंत बायनॅन्सनं २० अब्ज डॉलर्स कमावले. यामुळं कंपनीचे सीईओ चांगपेंग झाओ जगातील टॉप बिलेनियर्सच्या यादीत सामील झाले होते. जानेवारी २०२२ पर्यंत झाओची एकूण संपत्ती ९६.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचली.

सध्या चांगपेंग झाओ संयुक्त अरब अमीरातीमध्ये आपले पाय रोवण्याच्या विचारात आहेत. काही दिवसांपूर्वी झाओनं अबू धाबीतील रॉयल फॅमिलीसोबत एक मीटिंग आणि पार्टी केली. याशिवाय त्यानं दुबईत एक अपार्टमेंटही खरेदी केलं आहे. युएईमध्ये बायनॅन्स आपला एक्सचेंज बिझनेस सुरू करण्यास उत्सुक आहे.

क्रिप्टो मार्केट हा एक अतिशय अस्थिर व्यवसाय मानला जातो. याठिकाणी क्षणात राजाचा रंक होऊ शकतो किंवा रंकाचा राजा. अशी स्थिती असतानाही चांगपेंग झाओनं आपल्या कौशल्याच्या बळावर बायनॅन्सला क्रिप्टोवर्ल्डमध्ये टॉपला नेऊन ठेवलं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आणि त्यादिवशी जपानने अमेरिकन आणि फिलिपिन्सच्या सैनिकांच्या मृतदेहांचा खच पाडला

Next Post

ऑस्ट्रेलियाचा निवेथन राधाकृष्णन दोन्ही हातांनी बॉलिंग करून बॅटर्सला कन्फ्युज करतोय

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

ऑस्ट्रेलियाचा निवेथन राधाकृष्णन दोन्ही हातांनी बॉलिंग करून बॅटर्सला कन्फ्युज करतोय

ॲन फ्रँकला दगा कोणी दिला याचा एवढ्या वर्षांनी का होईना पण उलगडा झालाच!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.