The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खऱ्या आयुष्यातील ‘इंडियाना जोन्स’ ॲमेझॉनच्या जंगलात मोहिमेवर असताना बेपत्ता झाला होता

by द पोस्टमन टीम
28 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की काय घडू शकते, ध्येयाने झपाटलेला माणूस कायकाय करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे पर्सी फॉसेटची गोष्ट.

पर्सी फॉसेट हा मनुष्य बरेच काही होता. म्हणजे तो भूगोलशास्त्रज्ञ होता, लष्करी अधिकारी होता, नकाशातज्ञ होता, पुरातत्त्वशास्त्रज्ञ होता, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दक्षिण अमेरिकेचा एक्सप्लोररही होता. १९२५ साली अशाच एका मोहिमे दरम्यान तो त्याच्या मुलासह नाहीसा झाला. त्यानंतर त्याचा कोठेही शोध लागू शकला नाही.

त्या काळात पर्सी आणि त्याच्या सारख्याच इतर काही संशोधकांच्या मते, ब्राझीलच्या जंगलामध्ये पूर्वी एक शहर नांदत होते. कालौघात ते शहर आणि तिथली संस्कृती हे सर्व लयाला गेले होते. या हरवलेल्या प्राचीन शहराला त्याने ‘झेड’ असे नाव दिले होते आणि त्याच शोधमोहीमेवर तो निघाला होता.

पर्सी फॉसेट याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. भारतात जन्मलेले त्याचे वडील ‘रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी’चे सदस्य होते आणि त्याचा मोठा भाऊ गिर्यारोहक होता. अशा वातावरणात लहानाचा मोठा झालेल्या पर्सीवर याच प्रकारचे संस्कार झाले. त्यातूनच त्याला मानवी संस्कृती, भूगोल, पुरातत्त्वशास्त्र या विषयांमध्ये रुची निर्माण झाली. पुढे फॉसेटने शिक्षण पूर्ण करून सैन्यात प्रवेश घेतला. त्याच काळात त्याचे लग्नही झाले. काही काळातच त्याला सैन्यात बढती मिळत गेली आणि हॉंगकॉंग, माल्टा, त्रिंकोमाली (श्रीलंका) अशा अनेक ठिकाणी त्याने काम केले.



सैन्यदलात असताना त्याचे मुख्य काम सर्वेक्षण आणि नकाशे तयार करणे हे होते. यु*द्धशास्त्रात रणनीती आखण्यासाठी या दोन्ही कामांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्या काळात हे काम करणे तितकेच जिकिरीचे होते. आजच्यासारखे आधुनिक तंत्रज्ञान तेव्हा उपलब्ध नव्हते. त्यामुळे विशिष्ट भूप्रदेशाचे सर्वेक्षण किंवा नकाशे तयार करण्यासाठी महिनोन्महिने चालणाऱ्या मोहिमा आखल्या जात.

फॉसेटची दक्षिण अमेरिकेची पहिली मोहीम १९०६ मध्ये पार पडली. त्यावेळी त्याने रॉयल जिऑग्रफिकल सोसायटीच्या सांगण्यावरून ब्राझील आणि बोलिव्हिया यांच्या सीमेलगत असलेल्या जंगलाचा नकाशा तयार केला. या मोहिमेदरम्यान त्याने ६२ फूट लांबीचा महाप्रचंड आणि राक्षसी ॲनाकोंडा पाहिल्याचा दावा केला. पण त्यावर कुणी विश्वास ठेवेना. त्याच्या या दाव्याची अनेकांनी खिल्ली उडवली.

याशिवाय या मोहिमांच्या दरम्यान त्याने जगाला अज्ञात असलेले असे इतरही काही प्राणी बघितल्याचा दावा केला. यामध्ये एक मांजरीसारखा दिसणारा, आकाराने साधारण मोठ्या शिकारी कुत्र्याएवढा असलेला कुत्रा, दोन नाक असलेला शिकारी कुत्रा, तसेच एक मोठा विषारी कोळी यांचा समावेश होता. अत्यंत दुर्गम आणि अनोळखी प्रदेश, पावलापावलावर असणारा मृत्यूचा धोका आणि सहनशीलतेची कसोटी बघणारे वातावरण अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्याने ही मोहीम नियोजित वेळेच्या अर्ध्या वेळेतच पूर्ण केली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१९०६ ते १९२४ या काळात फॉसेटने सात मोहिमा केल्या. प्रत्येक मोहिमेची नवीन आव्हाने होती. पण त्याचे एक होते – तो नेहमी आपल्या सहकाऱ्यांना सर्व संभाव्य धोक्यांची माहिती देऊन ठेवत असे. ज्यांना मोहिमेदरम्यान त्याच्या वेगाने चालणे किंवा काम करणे जमत नसे त्यांना तो तिथेच सोडून देत असे. मात्र त्याचवेळी स्थानिकांशी तो अत्यंत प्रेमाने, आपुलकीने वागत असे. त्याने त्यांची भाषाही आत्मसात केली होती.

१९०८ साली त्याने ब्राझीलमधील ‘रिओ व्हरडे’ या नदीच्या उगमाचा शोध लावला, तर १९१० साली पेरू आणि बोलिव्हिया यांच्या सीमेलगत असलेल्या हीथ नदीचा उगम शोधण्यासाठी मोहीम आखली. जसजसे त्याचे दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन जंगल आणि ब्राझील यांच्याबद्दलचे ज्ञान वाढत गेले तसतशी त्याच्या मनातील कल्पना जास्तच प्रबळ होऊ लागली. त्यातूनच त्याने ॲमेझॉनच्या जंगलात लपलेल्या ‘झेड सिटी’ बद्दलचा सिद्धांत मांडला.

त्याच्या मते, प्राचीन काळी ॲमेझॉनच्या जंगलात एक शहर नांदत होते. ते नंतर लुप्त झाले. पण आजही जंगलात खोलवर त्या संस्कृतीचे अवशेष लपलेले आहेत. त्या शहराला त्याने झेड सिटी हे नाव दिले. त्याच्या म्हणण्यानुसार ही झेड सिटी ब्राझीलच्या नैऋत्येकडे असलेल्या ‘मातो ग्रॉसो’ या प्रदेशात असावी. आपल्या कल्पनेच्या पुष्ट्यर्थ त्याने ‘मॅन्युस्क्रिप्ट-५१२’ हा दहापानी दस्तऐवजही सादर केला.

१९२४ मध्ये त्याने परत एकदा ब्राझीलची मोहीम आखली. यावेळी त्याच्याबरोबर त्याचा मुलगा जॅक हा देखील होता. या मोहिमेच्या वेळी पर्सी फॉसेटने स्पष्ट सूचना देऊन ठेवल्या होत्या, की मोहिमेत सहभागी असलेली माणसे जर परत आली नाहीत तर त्यांच्या शोधासाठी कोणतेही रेस्क्यू ऑपरेशन करू नये. आतापर्यंत त्याच्या गाठीशी अनेक वर्षांचा अनुभव जमा झालेला होता. आपल्याबरोबर डबाबंद अन्नपदार्थ, दुधाची भुकटी, बंदुका व इतर शस्त्रे, सेक्स्टंट आणि क्रोनोमीटर ही उपकरणे घेऊन तो मोहिमेसाठी रवाना झाला.

यावेळी त्याच्याबरोबर दोन मुख्य सहकारी (त्याचा मुलगा जॅक आणि त्याचा मित्र राले), दोन ब्राझिलियन कामगार, दोन घोडी, आठ खेचरे आणि कुत्र्यांची एक जोडी होती. या मोहिमेदरम्यान प्रचंड उष्ण आणि दमट हवा, ॲमेझॉनच्या जंगलातील कीटक, आणि रोजची १५ मैलांची चाल यामुळे राले थकून गेला होता, जॅक मात्र वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालत राहिला.

डेड हॉर्स कॅम्प या तळावरून त्याने आपल्या बायकोला एक पत्र लिहिले होते, जो त्यांच्यातील शेवटचा संवाद होता. तारीख होती २९ मे १९२५. त्यात त्याने लिहिले होते, की तो मुलगा जॅक आणि त्याचा मित्र राले या दोघांनाच घेऊन एका अपरिचित मुलुखात मोहिमेला निघाला होता. एकंदर पत्राचा सूर आशादायी होता. तो ही मोहीम यशस्वी करूनच परतेल अशी त्याच्या बायकोची खात्री होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही.

तो किंवा त्याचा मुलगा किंवा त्याचा सहकारी, कुणीच परत आले नाही.

अखेरीस दोन वर्षांनी, जानेवारी १९२७ मध्ये, ‘रॉयल जिऑग्रफिकल सोसायटी’ने त्यांना बेपत्ता जाहीर केले. त्यानंतर लगेचच अनेक स्वयंसेवकांनी तिथे जाऊन त्यांना शोधण्याची तयारी दर्शवली. अनेकांनी तसे प्रयत्नही केले. परंतु पर्सी फॉसेटचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यानंतर त्यांच्याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले. काही जणांच्या मते स्थानिक रहिवाशांनी त्यांना ठार मारले होते, तर काहींच्या मते ते जंगलात कुठेतरी हरवले आणि नंतर उपासमारीने त्यांचा मृत्यू झाला होता.

मात्र या सगळ्यात पर्सी फॉसेटची पत्नी नीना फॉसेट हिचे योगदान अमूल्य आहे. सर्व मोहिमांमध्ये, त्या यशस्वी करण्यासाठी पर्सी प्रयत्न करत असताना, तिने त्याला उत्तम साथ दिली. शेवटपर्यंत त्याच्यावर विश्वास दाखवला. शेवटी तिची आणि तिच्या जोडीदाराची कायमची ताटातूट झालीच हा यातील दुर्दैवी योग.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इसवीसन २९५७ साठी पुरून ठेवलेलं टाइम कॅप्सूल MIT ला चुकून २०१५ सालीच सापडलं होतं

Next Post

महाराष्ट्रातील या दोन बहिणींनी ४० मुलांचं अपहरण करून त्यांचा अमानुषपणे खू*न केला होता..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

महाराष्ट्रातील या दोन बहिणींनी ४० मुलांचं अपहरण करून त्यांचा अमानुषपणे खू*न केला होता..!

विश्वास बसणार नाही पण आजच्या वापरातले हे शोध 'लिओनार्दो-द-विंची'ने लावलेत..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.