The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भटकंती – महड येथील श्री वरदविनायक मंदिर

by द पोस्टमन टीम
22 November 2024
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


लेखक – प्रफुल कुलकर्णी

गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचं अतिशय लाडकं दैवत. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपल्याकडे गणपतीच्या पूजनाने किंवा स्मरणाने केली जाते. गणेशोत्सव दरवर्षी आपण सगळे उत्साहात साजरा करतो. गणपती बाप्पाचा वार असलेल्या मंगळवारी किंवा संकष्टी चतुर्थीला त्याच्या मंदिरांमधून दर्शनाकरिता भक्तांची गर्दी जमलेली पहायला मिळते.

गणपती बाप्पा तसं पहायला गेलं, तर पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. जगभरातल्या बऱ्याच देशांमध्ये त्याची मंदिरं आहेत, पण आपल्या महाराष्ट्रात विशेषकरून त्याची आठ ठिकाणं फार प्रसिद्ध आहेत, ज्यांना आपण ‘अष्टविनायक’ म्हणून ओळखतो.

गणपतीच्या भक्तांमध्ये ही सर्व ठिकाणं अतिशय लोकप्रिय आहेत. त्या सर्व अष्टविनायकांची एकत्रित यात्राही बरेचजण करत असतात. या आठ गणपतींपैकी पाच मंदिरं पुणे जिल्ह्यात, दोन रायगड जिल्ह्यात तर एक नगर जिल्ह्यात आहे. यांपैकीच एक आहे, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात महड इथे असलेलं श्री वरदविनायक मंदिर.



शास्त्रानुसार अष्टविनायकांमध्ये या गणपतीचा चौथा क्रमांक लागतो. अष्टविनायक स्थानांपैकी प्रत्येकाची काही ना काही वैशिष्ट्यं आहेत तशी ती या ठिकाणाचीही आहेत. आज तीच वैशिष्ट्यं आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

मुंबईपासून सगळ्यांत जवळचा असा हा अष्टविनायकांतला गणपती असल्यानं मुंबईहून अष्टविनायक दर्शनाला येणारे बरेच लोक इथूनच सुरुवात करतात. त्यामुळे इथे नेहमीच गर्दी असते, आणि त्या गर्दीत जास्त ते मुंबईकरच असतात.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

या मंदिराच्या वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती असा आहे जिथं थेट गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला स्पर्श करता येतो. दुपारचे बारा वाजेपर्यंत भाविकांना स्वतःच्या हातांनी या गणपतीची पूजा करता येते. बाकीच्या सात मंदिरांत असं होत नाही. तिथल्या गाभाऱ्यात भाविकांना सोवळ्याचे कडक नियम पाळूनच प्रवेश मिळतो. पण या मंदिरात तसं बंधन नाही.

या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिरामध्ये गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ तेवत असलेला नंदादीप. सुमारे १८९२ पासून या गणपतीच्या समोर दिवा अखंडपणे तेवत राहिलेला आहे. तो कधीच विझला नाही. आता याचं नेमकं कारण काय, ते मात्र माहीत नाही.

या ठिकाणच्या आख्यायिकेनुसार, इंद्राच्या आशीर्वादाने जन्मलेल्या गृत्समद ऋषींनी गणपतीची घोर तपश्चर्या केली. जेव्हा गणपती त्यांना प्रसन्न झाला, तेव्हा त्याने दिलेल्या वरदानानुसार इथे वास्तव्य केलं. या ठिकाणाचं सत्ययुगात ‘पुष्पकवन’, त्रेतायुगात ‘मणिपूर’, द्वापारयुगात ‘वनन’ तर कलियुगात ‘भद्रक’ असं नाव पडलं. गणेश उपासकांच्या गाणपत्य संप्रदायाची स्थापना याच गृत्समद ऋषींनी केली, असं म्हणतात.

या मंदिरातली गणपतीची मूर्ती मंदिरामागच्या तळ्यात धोंडू पौडकर यांना गणपतीच्या दृष्टांतानुसार शोधल्यावर १६९० साली सापडली. त्यावेळी हे मंदिर इथं नव्हतं. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी हे मंदिर बांधून महड गावही वसविला.

मंदिराच्या चारही बाजूंना चार हत्तींच्या मूर्ती आहेत. इथल्या गाभाऱ्याचं बांधकाम हे पेशवेकालीन आहे. पूर्वी हे मंदिर अतिशय साधं कौलारू होतं. नंतरच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन आताचं मंदिर उभारण्यात आलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गणपतीबरोबरच रिद्धी-सिद्धी यांच्याही मूर्त्या आहेत, शिवाय एक छोटंसं शंकराचं मंदिरही या मंदिरातच आहे. हेही या ठिकाणचं एक वैशिष्ट्य म्हटलं, तर हरकत नाही. मंदिरात गणपतीचं दर्शन घेण्याआधी या शिवपिंडीचं दर्शन भाविक घेतात.

या मंदिरातली मूळ मूर्ती बरीच जुनी झाल्याने भग्न पावली. हे लक्षात येताच त्याठिकाणी नवीन मूर्ती स्थापन करण्यात आली, जी आता आपल्याला गाभाऱ्यात विराजमान दिसते. जुनी मूर्तीही मंदिरातच गाभाऱ्याबाहेर ठेवण्यात आली आहे.

मंदिर परिसरात तलाव आहेच, शिवाय शनी व नवग्रहांचंही एक मंदिर आहे.

मंदिरात येणारे भाविक बाप्पाला दुर्वा, फुलं, शेंदूर वाहतात. मंगळवार, विनायकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी अशा विशेष दिवसांना भक्तांची गर्दी इथे जमतेच. पण हा गणपती मूल नसलेल्यांना विशेष पावतो असं म्हटलं जातं. इथल्या माघी चतुर्थीला प्रसादात मिळालेला नारळ खाल्ल्यावर बहुतेक जोडप्यांना मूल झाल्याचे अनुभव आले आहेत. इथल्या गर्दीचं हेही एक कारण असावं.

एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे म्हणजे, महड आणि महाड ही दोन पूर्ण वेगळी ठिकाणं असून ती दोन्ही रायगड जिल्ह्यातच आहेत. महड म्हणजे वरदविनायकाचं मंदिर असलेलं ठिकाण, हे खोपोलीपासून जेमतेम ५ किमी अंतरावर आहे. तर महाड हे रायगड जिल्ह्यातील एक शहर असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चवदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी केला तो महाडमध्ये. या दोन्ही ठिकाणांमध्ये सुमारे १०० किमीचं अंतर आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आपल्याकडे बिटकॉइनला अजून मान्यता नाही, आणि तिकडे बिटकॉइन सिटी तयार होतेय

Next Post

या डॉक्टरने लिहिलेल्या पुस्तकाने हजारो नवजात बालकांचा बळी घेतला होता..!

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

या डॉक्टरने लिहिलेल्या पुस्तकाने हजारो नवजात बालकांचा बळी घेतला होता..!

BMW ने रोल्स रॉयसला हाताशी धरून फॉक्स वॅगनचा पद्धतशीर गेम केला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.