The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय महिलांचं दुसऱ्या महायु*द्धातलं योगदान आपल्या पूर्णपणे विस्मरणात गेलं आहे..!

by Heramb
26 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसऱ्या महायु*द्धातील स्त्रियांच्या सहभागाबद्दल तुम्ही वाचलंच असेल. पण दुसऱ्या महायु*द्धात भारताचा प्रत्यक्ष संबंध नसतानाही रणभूमीच्या दोन्ही बाजूंनी हजारो भारतीय स्त्रियांनी लढा दिला होता हे आपल्यापैकी काहीच जणांना माहिती असेल. मित्र राष्ट्रांच्या बाजूने अर्थात ब्रिटनच्या बाजूने लढणाऱ्या स्त्रिया ‘सैनिक’ म्हणून आपलं कर्तव्य बजावण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या. तर मित्र राष्ट्रांच्या विरोधात, अक्ष राष्ट्रांबरोबर लढणाऱ्या स्त्रिया मातृभूमीच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होत्या. म्हणूनच आझाद हिंद सेनेमधील स्त्रियांच्या तुकडीला नाव देण्यात आले होते ‘राणी ऑफ झांसी रेजिमेंट’ किंवा ‘झाशीची राणी रेजिमेंट’!

ब्रिटिशांच्या बाजूने ‘वूमन रॉयल इंडियन नेव्हल सर्व्हिस’, ‘वूमन रॉयल नेव्हल सर्व्हिस’ची भारतीय तुकडी ब्रिटीश सैन्याला अक्ष राष्ट्रांना रोखण्यास मदत करत होती. त्यामुळे या दोन्ही भारतीय महिलांच्या तुकड्या एकमेकांविरुद्धच उभ्या ठाकल्या होत्या. या सर्व रणरागिणींचे स्मरण करणे आवश्यक आहे, कारण रणांगणात सांडलेला रक्ताचा प्रत्येक थेम्ब हीच स्वातंत्र्याची खरी किंमत असते!!

राणी ऑफ झाँसी रेजिमेंट:

ही रेजिमेंट काय होती हे पाहण्याआधी आपण आझाद हिंद सेनेचा थोडक्यात आढावा घेऊ. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि जपानी राजेशाही यांच्या संयुक्त उपक्रमाने १९४२ साली सशस्त्र सैन्य दल, आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यात आली. गांधीजींची अहिं*सात्मक मार्गाची चळवळ प्रभावी नसल्याने ब्रिटिश राजवट सशस्त्र लढाईच्या मदतीने उलथून टाकण्यासाठी सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यात आली.

राणी ऑफ झाँसी रेजिमेंटची घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जुलै १९४३ मध्ये सिंगापूरमधील भारतीय महिला स्वयंसेवकांसोबत केली होती. राणी लक्ष्मीबाईंनी दाखवलेले शौर्य आणि चिकाटी प्रत्येक भारतीय स्त्रीने दाखवावे यासाठी हे नाव देण्यात आले होते. सुरुवातीला सुमारे १७० कॅडेट्ससह रेजिमेंटचे नाव झाशी राणीच्या नावावर ठेवण्यात आले. त्यानंतर, राणी ऑफ झाँसी रेजिमेंटचा विस्तार रंगून आणि बँकॉकपर्यंत करण्यात आला. नोव्हेंबरपर्यंत अंदाजे तीनशे कॅडेट्स या रेजिमेंटमध्ये जमा झाले.


राणी झाँसी रेजिमेंटची झलक

“ती (झाशीची राणी) एक अद्भुत स्त्री आहे, ती खूप धाडसी आणि दृढनिश्चयी आहे. माणसं (तिची माणसं) अजिबात तिच्यासारखी नाहीत हे आपल्यासाठी भाग्याचं लक्षण!” हे बोल आहेत ‘थर्ड बॉम्बे लाइट कॅव्हलरीचे कॉर्नेट कॉम्बे’ या ब्रिटिशाचे.

महिलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नॉन-कमिशन्ड किंवा सिपाही या गटांमध्ये विभागले गेले. कॅडेट्सना लढाईचे, हँडग्रेनेड, रायफल यांसारखी शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि काहींना जंगलात राहण्याचे प्रशिक्षणही दिले गेले. ३० मार्च १९४४ रोजी ५०० युवती असलेल्या रेजिमेंटची पासिंग आऊट परेड पार पडली. दोनशे कॅडेट्सना नर्सिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांनी चांद बीबी नर्सिंग कॉर्प्सची स्थापना केली.

इंफाळची लढाई आणि माघार:

इंफाळ मोहीम मणिपूरची राजधानी इंफाळ येथे झाली. मित्र राष्ट्रांचा नाश करण्यासाठी इंडियन नॅशनल आर्मीने जपानी सैन्यासह इंफाळवर आक्र*मण करण्याची योजना आखली होती. इम्फाळ आक्र*मणानंतर गंगेच्या मैदानात प्रवेश करण्याच्या दृष्टीने मूळ सैन्याला कव्हर देण्यासाठी राणी ऑफ झाँसी रेजिमेंटच्या शंभर लढाऊ युवतींच्या सैन्याला मायमो येथे तैनात करण्यात आले होते. राणी ऑफ झाँसी रेजिमेंटच्याच दुसर्‍या भागाने त्याच ठिकाणी इंडियन नॅशनल आर्मी रुग्णालयात नर्सिंग युनिटची स्थापना केली होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

तरी ही लढाई इंडियन नॅशनल आर्मी आणि जपानसाठी एक मोठं संकट ठरली. इम्फाळची लढाई मित्र राष्ट्रांसाठी विजयी ठरली आणि जपानी सैन्याला खूप त्रास सहन करावा लागला. त्यांचे अनेक सैनिक उपासमारीने आणि आजारपणाने मरण पावले. रेजिमेंटने शौर्याने लढा दिला असला तरी ही ते लढाई हरले. पराभवानंतर, राणी ऑफ झाँसी रेजिमेंटने वैद्यकीय मदत पुरवली.

कालांतराने हे युनिट बंद करण्यात आले.

वूमन रॉयल इंडियन नेव्हल सर्व्हिस (WRINS):

जानेवारी १९४४ मध्ये स्थापित, वूमन रॉयल इंडियन नेव्हल सर्व्हिस ही वूमन ऑक्सिलरी कॉर्प्स नौदल शाखा होती. समुद्रात राहणाऱ्या सैनिकांना मदत करण्यासाठी ही सर्व्हिस सुरु करण्यात आली होती. पितृसत्ताक नियमांची पायमल्ली करून या महिला भारतीय महिलांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक बनल्या. त्यांनी जरी थेट लढाईत भाग घेतला नसला तरी कारकुनी आणि वैद्यकीय कामांमध्ये त्यांनी विशेष मदत केली. गुप्त संदेश डीकोड करणे, विविध उपकरणांचा मेन्टेनन्स करणे अशा कामांमध्ये त्यांचा सहभाग असायचा.

वूमन रॉयल इंडियन नेव्हल सर्व्हिसच्या सर्वांत उल्लेखनीय महिला अधिकाऱ्यांपैकी एक म्हणजे सेकंड ऑफिसर कल्याणी सेन. १९४५ साली युनायटेड किंगडममध्ये आमंत्रित केलेल्या त्या पहिल्या भारतीय नौदल सेवेतील महिला होत्या. त्यांनी वूमन रॉयल इंडियन नेव्हल सर्व्हिस मधील प्रशिक्षण आणि प्रशासनाचा तुलनात्मक अभ्यास केला होता आणि त्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. ब्रिटनमध्येही ऑफिसर कल्याणी सेन यांनी साडी नेसली होती. भारतीय संस्कृती जपत स्त्रियांनी आधुनिक आणि योग्य विचारसरणी कशी स्वीकारावी याचे हे उत्तम उदाहरण आहे.

सेकंड ऑफिसर कल्याणी सेन

दुसरी स्वतंत्र आणि प्रमुख मुख्य अधिकारी मोइना इमाम होती. तिचे वडील एक प्रसिद्ध सरकारी अधिकारी – सय्यद हाफीज इमाम होते. तिचे आडनाव पटकन ओळखून, ब्रिटिश रिक्रुटरने तिच्या वडिलांना कळवले. मोईना नौदलात सामील झाली आहे हे तिच्या वडिलांना माहित नव्हते. पण विरोधाला न जुमानता तिने वूमन रॉयल इंडियन नेव्हल सर्व्हिसमध्ये आपला पाय घट्ट रोवला.

जपानी आक्र*मण जवळ आल्याने, या स्त्रिया लिंग असमानता आणि जातिव्यवस्थेला ओलांडून त्यांच्या कर्तव्यपूर्तीसाठी लढल्या. १९९२ पर्यंत भारतीय सशस्त्र दलांतील ‘गैर-वैद्यकीय’ क्षेत्र वगळता वूमन ऑक्सिलरी कॉर्प्स आणि वूमन रॉयल इंडियन नेव्हल सर्व्हिस ही महिलांची पहिली आणि एकमेव नेव्हल युनिट होती.

WRINS आणि राणी ऑफ झाँसी रेजिमेंटच्या बाहेरून लढणारी ‘फॉरगॉटन’ स्पाय:

ती वूमन रॉयल इंडियन नेव्हल सर्व्हिसचा भाग नव्हती शिवाय राणी ऑफ झाँसी रेजिमेंटमध्येही नव्हती. पण तरीही तिचे बलिदान उल्लेखनीय आहे. भारतीय गुप्तहेर राजकुमारी ‘नूर इनायत खान’ ही म्हैसूरचा राजा टिपू सुलतानची वंशज होती आणि ना*झी शासित फ्रान्समध्ये तिला मृत्युदंड देण्यात आला.

नूर इनायत खान

ती भारतीय वंशाची ब्रिटिश गुप्तहेर होती.  नूर इनायत खान ‘स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह’चा भाग होती. दुसऱ्या महायु*द्धादरम्यान, ना*झींनी तिला पकडले आणि ब्रिटीश सरकारची आणि यु*द्धाची माहिती देण्यासाठी तिचा छळ केला.

मृदुभाषी आणि धीरगंभीर स्त्री असूनही, तिने यु*द्धाशी संबंधित कोणतीही माहिती दिली नाही, शेवटी तिला जीवे मारण्यात आले. नूर इनायत खान यांना १९४९ मध्ये मरणोत्तर ‘जॉर्ज क्रॉस’ आणि ‘फ्रेंच क्रोइक्स डी गुएरे यांना सिल्व्हर स्टार’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ज्यावेळी भारतीय महिला चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होती तेव्हा या महिलांनी त्यांच्या कर्तव्यासाठी आणि राष्ट्रासाठी उभे राहून अनेक सामाजिक अडथळे तोडले. एखाद्या स्त्रीने मनावर घेतले तर काहीही अशक्य नाही हे या महिलांनी सिद्ध केले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

संधी मिळत नाही म्हणून निराश होताय..? मग क्रिकेटर प्रवीण तांबेंची ही गोष्ट वाचाच..!

Next Post

या ब्रिटिश महिलेने ४० वर्षे सोव्हिएतसाठी हेर म्हणून काम केलं, ब्रिटनची न्यू*क्लिअर सिक्रेट्स रशियाला पुरवली

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या ब्रिटिश महिलेने ४० वर्षे सोव्हिएतसाठी हेर म्हणून काम केलं, ब्रिटनची न्यू*क्लिअर सिक्रेट्स रशियाला पुरवली

एक्स्प्लेनर - कोरोना व्हायरसचा नवीन सापडलेला व्हॅरिएंट किती धोकादायक आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.