The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाची लस अनिवार्य करू नका म्हणून अनेक देशांतील लोक रस्त्यावर उतरलेत..!

by Heramb
21 November 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कोविड-१९ महामारीने २०२० साली संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. त्यावर प्रतिबंधात्मक लस येण्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत होत, पण लस उपलब्ध झाल्यावर मात्र जगातील अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. ऑस्ट्रेलियातील आंदोलक शनिवारी कोविड-१९ लसीकरण आदेशाविरोधात निदर्शने करत रस्त्यावर उतरले, अशा अनेक घटना जगभरात घडत आहेत, त्याबद्दलच आजचा हा विशेष लेख..

  • ऑस्ट्रेलिया:

ऑस्ट्रेलियातील अनेक प्रमुख शहरांमध्ये शनिवारी आंदोलकांनी निदर्शने केली. सिडनीमध्ये सुमारे १० हजार निदर्शक जमले होते. निदर्शकांनी लस न घेतलेल्यांसाठी केलेल्या उपाययोजनात्मक प्रतिबंधांना विरोध केला. निदर्शने मोठ्या प्रमाणात शांततापूर्ण होती. काही ठिकाणी लसीकरणाच्या समर्थनार्थ निदर्शनाच्या बातम्याही आल्या. या निदर्शनांमध्ये लोकांनी नागरिकांना लसीचे डोस घेण्याचे आवाहन केले. ऑस्ट्रेलियामध्ये ८५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. ऑस्ट्रेलियाचा लस कार्यक्रम ऐच्छिक आणि अत्यंत यशस्वी आहे.

मेलबर्नमधील नागरिकांनी कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये वाढ होत असताना २६० दिवस लॉकडाऊनमध्ये घालवले होते. रेस्टॉरंट्स, पब आणि कॅफे बंद राहिल्याने सिडनीमध्ये १०६ दिवस लॉकडाऊन होते. तसेच सिडनी शहरात जूनमध्ये सर्व दुकाने आणि शाळा बंद झाल्या होत्या. कारण सरकारने केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. याशिवाय सरकारने पाच किलोमीटरहून अधिक प्रवासावर देखील बंदी घातली होती कारण ऑस्ट्रेलिया त्यावेळी कोरोनाव्हायरसच्या डेल्टा व्हेरियंटविरूद्ध लढा देत होता.

या लसीकरणाविरोधी निदर्शनांदरम्यान, व्हिक्टोरिया राज्याने शनिवारी १६०० हून अधिक कोविड-१९  रुग्णांची नोंद केली असून पाच मृत्यू झाले आहेत. न्यू साउथ वेल्समध्ये १८२ कोरोनाव्हायरसची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तथापि, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) नुसार ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात कमी कोरोनाव्हायरस प्रकरणे आहेत.



ऑस्ट्रेलियन सरकारने कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १८ महिन्यांहून अधिक काळ प्रवासावर कठोर बंदी घातली होती परंतु गेल्या महिन्यात पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी लसीकरण दर ८० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे नागरिक घरी परत येऊ शकतील असे घोषित केले. कोरोना व्हायरस महामारीदरम्यान, ऑस्ट्रेलियन सरकारने जगातील सर्वात कठोर सीमा निर्बंध लादले होते. त्यांनी याने अनेक उड्डाणे रद्द केली आणि गृहविभागाने आपल्याच नागरिकांच्या हजारो विनंत्या नाकारल्या आणि आपल्या नागरिकांना परत येऊ दिले नाही.

लसीकरणाच्या वादविवादाचा परिणाम ‘ऑस्ट्रेलियन ओपन’स्पर्धेवरही होताना दिसत आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी सर्व खेळाडूंना लसीकरण करणे आवश्यक आहे असा आग्रह टूर्नामेंट प्रमुख क्रेग टिली यांनी धरला. ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत १ लाख ९५ हजार रुग्णांची आणि १९३३ मृत्युंची नोंद झाली आहे.

  • युरोप:

ऑस्ट्रेलियाबरोबरच अनेक युरोपीय देशांमध्येही अशीच निदर्शने होत आहेत. नेदरलँड्समधील लस-विरोधी मोर्चे हिंसक झाले आहेत. नेदरलँड्समधील हेगमध्ये लोकांनी पोलिसांवर जळते फटाके टाकले आणि सायकलींना आग लावली. रॉटरडॅममधील निषेध हिंसक झाल्यानंतर आणि पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. यामध्ये सात लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ऑस्ट्रिया सरकारने देशातील वाढत्या कोरोनाव्हायरस संक्रमणाला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन जाहीर केल्यानंतर शनिवारी व्हिएन्ना येथे हजारो निदर्शक जमले. कोरोनाव्हायरस प्रतिबंधात्मक उपायांविरुद्ध रोममध्ये देखील निदर्शने होत आहेत.

यादरम्यान, कोविड-१९ लसीकरणाविरुद्ध निदर्शने करण्यासाठी शनिवारी शेकडो निदर्शक रोमच्या सर्को मॅसिमो येथे जमले. कोविड-१९ लसीकरणाचा पुरावा असलेल्या ग्रीन पासच्या वापरालाही लोक विरोध करत होते. तसेच स्वित्झर्लंड, क्रोएशिया आणि इटलीमध्येसुद्धा अशीच निदर्शने नियोजित होती. क्रोएशियामध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांसाठी लसीकरण अनिवार्य केल्याने याचा विरोध करण्यासाठी हजारो लोकांनी राजधानी झाग्रेबमध्ये मोर्चा काढला.

इटलीमध्ये, चित्रपटगृहांसारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची परवानगी मिळण्यासाठी लोकांनी त्यांचा ग्रीन पास दाखवला पाहिजे असा नियम आहे. शुक्रवारी रात्री, डच पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. तर ‘फ्रेंच ओव्हरसीज डिपार्टमेंट’ असलेल्या ‘ग्वाडेलूप’ या कॅरिबियन बेटावरील अशांतता कमी करण्यासाठी फ्रेंच अधिकारी आणखी पोलिस दल पाठवत आहे. फ्रान्सच्या कोविड पासच्या विरोधात निदर्शने हिंसक झाल्यानंतर रात्रभर झालेल्या दंगलीत लोकांनी अनेक दुकानांची तोडफोड केली आणि काही दुकानं पेटवून दिली.

  • अमेरिका:

तिकडे अमेरिकेत काही वेगळं वातावरण नाही. डिस्नीने आपल्या फ्लोरिडा थीम पार्कमधील कर्मचार्‍यांसाठी कोरोनाव्हायरस लस आदेशास तूर्तास स्थगिती दिली आहे. राज्य विधानमंडळ आणि राज्यपालांनी सर्व कामगारांना लसीचे डोस घेणे अनिवार्य करणे कंपन्यांसाठी बेकायदेशीर केल्यानंतर डिस्नीने हा निर्णय घेतला. बिडेन प्रशासनाने मोठ्या कंपन्यांमधील आणि सरकारी कामगारांसाठी लसीकरणाचे आदेश दिले आहेत, परंतु या गोष्टीला संपूर्ण अमेरिकेतून विरोध झाला आहे. फ्लोरीडाने या फेडरल आदेशांना न्यायालयात आव्हान दिले आहे.

विकसित आणि प्रगत देशांमध्येच नागरिक व्हॅक्सिनेशन आणि प्रतिबंधात्मक उपायांना विरोध करत असताना भारतात मात्र कोव्हीड-१९ महामारी आटोक्यात येताना दिसत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जपानच्या या बेटाचा काळा इतिहास आजही जगापासून लपवून ठेवला आहे.!

Next Post

‘थ्री चाईल्ड पॉलिसी’ आणूनही चीनचा जन्मदर एक टक्क्यांपेक्षाही खाली आलाय..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

'थ्री चाईल्ड पॉलिसी' आणूनही चीनचा जन्मदर एक टक्क्यांपेक्षाही खाली आलाय..!

...तेव्हा इलॉन मस्कलाही रतन टाटांचं कौतुक करण्याचा मोह आवरला नव्हता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.