The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रॉबिन विलियम्सने अलादिनमधल्या जीनीच्या आवाजासाठी मानधन नाकारलं होतं..!

by द पोस्टमन टीम
27 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपण ओळखत असलेल्या किंवा आपल्याला आवडत असलेल्या काही लोकांचा अनपेक्षित मृत्यू आपल्यासाठी मोठा धक्का असतो. विशेषत: जर त्या व्यक्तीनं आत्मह*त्येसारखा पर्याय अवलंबला असेल तर त्या धक्क्याची तीव्रता आणखी जास्त असते. अमेरिकन अभिनेता रॉबिन विल्यम्सनं ऑगस्ट २०१४ मध्ये केलेली आत्मह*त्या त्याच्या चाहत्यांसह अनेक प्रेक्षकांसाठी एक धक्कादायक घटना होती.

मृत्यूपूर्वीच्या काही महिन्यात विल्यम्सला आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्याची चित्रपटातील कारकीर्द जवळपास ठप्प झाली होती. त्याचे सिटकॉम, द क्रेझी ओन्स, सीबीएसवर प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात अयशस्वी ठरले होते. आपली दुसरी पत्नी मार्शा गार्सेसकडून घटस्फोट घेतल्याबद्दल त्याच्या मनात अपराधीपणाची भावना होती. अशा नानाविध कारणांनी विल्यम्स झपाटून गेलेला होता.

तरी देखील रॉबिन विल्यम्ससारखा दिलदार आणि ‘हॅपी गो लकी’ माणूस आत्मह*त्या करूच कशी शकतो? हा प्रश्न अनेकांना सतावत राहिला. रॉबिन विल्यम्सचं व्यक्तिमत्व शब्द मर्यादेत बांधून टाकणं कठीण आहे. मात्र, तरी देखील त्याच्या आयुष्याचा आढावा घेणारा लेख लिहिण्याचा हा प्रपंच नक्की वाचा..

मला जेव्हा-जेव्हा एकदम निराश झाल्यासारखं वाटतं तेव्हा मी सरळ ‘गुड विल हंटिंग’ हा हॉलिवुडपट पाहत बसते. मॅट डमोनची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट मला प्रचंड जवळचा वाटतो. मानसिक गुंतागुंतीमध्ये अडकलेल्या कॉलेजकुमाराची (विल हंटिंग) भूमिका मॅटनं हुबेहुब साकारली आहे. मात्र, विलपेक्षाही मला त्याचा थेरेपीस्ट डॉ. शॉन मॅग्वायर जास्त भावतो. रॉबिन विल्यम्सनं साकारलेली डॉ. शॉनची भूमिका पाहून त्याच्या अभिनय कौशल्याची प्रचिती येते.

चित्रपटामध्ये विल्यम्सच्या तोंडी एक डायलॉग आहे. “You’ll Have Bad Times, But It’ll Always Wake You Up To The Good Stuff You Weren’t Paying Attention To”, असा तो डायलॉग. या ओळीचा अर्थ समजून घेतला तर कुणालाही जगण्याची नवीन उमेद देण्यास ती पुरेशी आहे, असं मला तरी वाटतं. या भूमिकेसाठी विल्यम्सला ऑस्कर मिळाला.

सहसा विनोदी आणि हलक्या फुलक्या भूमिका करण्यासाठी ओळखला जाणारा विल्यम्स धीरगंभीर भूमिका करू शकतो हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. एक उत्कृष्ट अभिनेता असण्याव्यतिरिक्त विल्यम्स कमालीचा ‘व्हॉईस ओव्हर आर्टीस्ट’ होता. त्याचा आवाज असलेला अलादीनचा जिनी नक्कीच प्रत्येक कार्टून फॅनच्या लक्षात असेल.



१९९२ मध्ये डिस्नेनं आपला क्लासिक मुव्ही ‘अलादीन’ रिलीज केला होता. त्यावेळी या चित्रपटानं ६६.४ करोड डॉलर्सची कमाई केली होती. मुख्य पात्र असलेल्या अलादीन आणि जॅस्मिनपेक्षाही रॉबिन विल्यम्सचा आवाज असलेल्या जिनीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. रॉबिन विल्यम्ससाठी हा चित्रपट खास होता. आपल्या मुलांसाठी काहीतरी अप्रतिम आठवण मागे ठेवावी, हा विचार करून त्यानं आपल्या मानधनामध्ये मोठी कपात केली.

नव्वदच्या दशकामध्ये विल्यम्स आपल्या आवाजासाठी भरभक्कम किंमत लावत असे. प्रत्येक चित्रपटासाठी तो साधारण १०.५ मिलियन अर्थात एक कोटी ५ लाख डॉलर्स आकारत असे. जिनीच्या आवाजासाठी देखील तो अशीच मोठी रक्कम मागेल, अशी डिस्नेला अपेक्षा होती. मात्र, आपण जिनीच्या आवाजासाठी कुठलीही किंमत लावणार नाही, अशी प्रतिक्रिया देऊन विल्यम्सनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

प्रत्यक्षात पहायला गेलं तर ही गोष्ट डिस्नेसाठी फायद्याची होती. मात्र, तरीदेखील त्यांनी विल्यम्सला काहीतरी मानधन घेण्याची गळ घातली. डिस्नेच्या विनंतीला मान देऊन विल्यम्सनं ९८ हजार डॉलर्सचं मानधन स्विकारलं. पण, त्यासोबत त्यानं एक अट देखील घातली. जिनीचा आवाज चित्रपट वगळता इतर कुठेही वापरला जाणार नाही, अशी ती अट होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

याबाबत १९९३ मध्ये एका मुलाखतीमध्ये रॉबिन विल्यम्सनं आपली प्रतिक्रिया दिली होती. त्याला ॲनिमेशन ट्रॅडिशनचा भाग होण्याची इच्छा होती. अलादीनच्या जिनीच्या रुपात त्याला ही संधी मिळाली. अलादीन आणि जिनीची लोकप्रियता तो जाणून होता. आपण जर जिनीला आवाज दिला तर, आपल्या मुलांसह येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या मनात आपल्याला खास जागा मिळेल, असा विचार त्यानं केला.

जवळपास ३० तास मेहनत घेऊन रॉबिन विल्यम्सनं आपल्या आवाजाच्या मदतीनं जिनीच्या पात्रामध्ये जिवंतपणा आणला होता, तेही मोठा आर्थिक तोटा स्विकारून. कालांतरानं डिस्नेनं त्यानं घातलेली अट मोडली. जिनीचा आवाज इतर व्यावसायिक कारणांसाठी वापरला गेला. या गोष्टीनं रॉबिन विल्यम्सच्या मनात डिस्नेबाबत आदर राहिला नाही. पुन्हा कधीही डिस्नेसोबत काम न करण्याचा निर्णय त्यानं घेतला.

रॉबिनच्या अभिनय कारकिर्दीचा विचार केला तर, आपल्या सहज सुंदर अभिनय कौशल्यानं त्यानं चाहत्यांच्या मनामध्ये स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली होती. त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटांनी त्याला चांगली ओळख मिळवून दिली होती. मात्र, १९८७ मध्ये आलेल्या ‘गुड मॉर्निंग, व्हिएतनाम’ या चित्रपटातील बेजबाबदार लष्करी डिस्क जॉकी एड्रियन क्रोनॉरच्या भूमिकेनं त्याला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळवून दिली. या भूमिकेमुळं विल्यम्सला त्याचं पहिलं ऑस्कर नामांकन मिळालं. त्यानंतर ‘डेड पोएट्स सोसायटी’मधील प्रीपरेटरी स्कूलमधील इंग्लिश शिक्षकाची प्रेरणादायी भूमिका केल्याबद्दल पुन्हा त्याला ऑस्कर नामांकन मिळालं.

१९९० च्या सुरुवातीला त्यानं मिसेस डॉटफायरसह अनेक फॅमिली-सेंटर्ड चित्रपटांमध्ये काम केलं. आपल्या मुलांशी जवळीक साधण्यासाठी स्त्रीचा वेश धारण केलेल्या एका घटस्फोटित पुरुषाची केलेली भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर त्यानं आपल्या कारकीर्दीमध्ये शेकडो भूमिका केल्या. प्रेक्षक आणि समिक्षकांनी त्याचं वेळोवेळी कौतुकही केलं.

अभिनयाव्यतिरिक्त विल्यम्स विविध सामाजिक संस्थांसोबत काम करत होता. युनायटेड सर्व्हिस ऑर्गनायझेशन्स, आयएनसी. (यूएसओ) सोबत मिळून त्यानं परदेशात तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यासाठी काम केलं. मे २०१४ मध्ये, त्याला पार्किन्सन्स आजार असल्याचं निदान झालं. या आजारपणामुळं विल्यम्सचं मानसिक खच्चीकरण झालं. सोबतचं त्याला ‘लेवी बॉडी डिमेन्शिया’ही होता. ही गोष्ट त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदनात समोर आली. कदाचित यामुळेच रॉबिन विल्यम्सनं आत्मह*त्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एक्सप्लेनेर : आज नौदलाकडे हस्तांतरित झालेलं ‘INS विशाखापट्टणम’ एवढं विशेष का आहे..?

Next Post

‘शारजाह ड्रेसिंग रूम कांड’ जेव्हा कपिल देवनं दाऊदला बाहेरचा रस्ता दाखवला होता..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

'शारजाह ड्रेसिंग रूम कांड' जेव्हा कपिल देवनं दाऊदला बाहेरचा रस्ता दाखवला होता..!

जपानच्या या बेटाचा काळा इतिहास आजही जगापासून लपवून ठेवला आहे.!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.