The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

BMW ने रोल्स रॉयसला हाताशी धरून फॉक्स वॅगनचा पद्धतशीर गेम केला होता..!

by Heramb
22 November 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कार. कोणाच्या गरजेची वस्तू, तर कोणासाठी ऐषारामाची आणि श्रीमंतीचं द्योतक असणारी वस्तू, तर काहींसाठी निव्वळ आवड. ऑटोमोटिव्ह उद्योगामध्ये असं काहीतरी खास आहे, ज्यामुळे सर्वच काळांमध्ये कार आणि एकूणच ऑटोमोटिव्ह उद्योगामध्ये प्रचंड चढाओढ सुरु असते. पण या चढाओढीमुळे आपल्याला आज काही प्रीमियम आणि ग्रँड कार्स पाहायला मिळतात.

फेरारी आणि लॅम्बोर्गिनी:

स्पोर्ट्स कार्सच्या कंपन्यांमधील आपापसातील संघर्ष सर्वसामान्य गोष्ट आहे. पण फेरारी आणि लॅम्बोर्गिनी हा संघर्ष अद्वितीय आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. इटालियन स्पोर्ट्सकारच्या विश्वावर वर्चस्व गाजवणाऱ्या आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या स्पोर्ट्सकार कंपन्या म्हणजे फेरारी आणि लॅम्बोर्गिनी. लॅम्बोर्गिनीची सुरुवात कार तयार करणारी कंपनी म्हणून झाली नव्हती. लॅम्बोर्गिनी कंपनीने “ट्रॅक्टर उत्पादक” म्हणून सुरुवात केली होती.

पण लॅम्बोर्गिनीचे सर्वेसर्वा ‘फेरुसियो लॅम्बोर्गिनी’ यांना स्पोर्ट्सकारची विशेष आवड होती. आवड म्हणून त्यांनी फेरारी स्पोर्ट्सकार खरेदी केली. काही दिवस कार चालवल्यानंतर, त्याला फेरारीचा क्लच बदलण्याची गरज असल्याचे समजले. क्लच बदलण्यासाठी त्याने तीन वेळा गाडी गॅरेजमध्ये नेली, पण फेरारीच्या व्यवस्थापनाकडून किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून काही विशेष प्रतिसाद मिळाला नाही.

वैतागलेल्या फेरुसियोने आपल्या प्रमुख अभियंत्याला संपूर्ण फेरारी कार सुटी करायला सांगितली. त्यावेळी ट्रॅक्टरमध्ये वापरलेला क्लच आणि या ‘स्पोर्ट्सकारचा’ क्लच अगदी सारखाच असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने क्लचच्या समस्येबद्दल तक्रार केली आणि फेरारीमधील उच्च व्यवस्थापनाकडे, अगदी एन्झो फरारीपर्यंत त्याने तक्रारी केल्या.

फेरारी व्यवस्थापनाने अखेर त्याच्या तक्रारीला उत्तर दिले आणि लॅम्बोर्गिनीच्या मालकाने रेस कारवर स्वतःच्या टिप्पण्या न करता ट्रॅक्टर व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे असे सांगितले. या उद्धटपणाच्या उत्तरामुळे फेरुसियोला राग आला आणि त्याने नवीन रेस कार कंपनी लॅम्बोर्गिनी सुरू केली.



फोक्सवॅगन आणि बीएमडब्लू:

१९९८ साली फोक्सवॅगन आणि बीएमडब्लू या जर्मनीच्या दोन सर्वात प्रभावशाली कार ब्रँड्समुळे इतर मोठ्या कार ब्रँड्सचं महत्व कमी होऊ लागलं होतं. फोक्सवॅगनने आता आपलं लक्ष रोल्स रॉयसवर केंद्रित केलं. रोल्स रॉयस ही एक ऑटोमोबाईल कंपनी तर होतीच, शिवाय याच कंपनीने रॉयल एअरफोर्स साठी मर्लिन इंजिन तयार केले होते.

“ब्रँड” असलेले ‘रोल्स रॉयस’ हाताने तयार केलेल्या लक्झरी कारमुळे अन्य कार उत्पादन कंपन्यांसमोर मोठे आव्हान होते. शिवाय ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना विशेष दर्जा असणे आवश्यक होता. परंतु, आर्थिक मंदीमुळे रोल्स रॉयसवर अनपेक्षित संकटे येत होती आणि म्हणूनच रोल्स रॉयस कंपनीला आपला ऑटोमोटिव्ह विभाग विकायचा होता.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

फोक्सवॅगन आणि बीएमडब्ल्यूने रोल्स रॉयस खरेदी करण्यासाठी स्पर्धा केली. फोक्सवॅगनने ७० करोड डॉलर्सची बोली जिंकली. बीएमडब्लूसुद्धा एक विमान इंजिन उत्पादक संस्था होती आणि त्यांचे रोल्स रॉयसशी चांगले संबंध होते. त्यांनी अंतर्गत योजना करून रोल्स रॉयच्या कार्सच्या उत्पादनाबद्दलची महत्वाची माहिती गहाळ केली. फोक्सवॅगनने फक्त कार विभाग विकत घेतला होता परंतु ब्रँडचे नाव विकत घेतले नव्हते. बीएमडब्ल्यूने या संधीचं सोनं करून लगेच ब्रँडचे नाव वापरण्याचा परवाना खरेदी केला.

बीएमडब्लू रोल्स रॉयसला इंजिनचा पुरवठा करत असे. पण त्यांनी ‘इंजिन पुरवठा बंद करू’ असा इशारा फोक्सवॅगनला दिला आणि फोक्सवॅगनने बीएमडब्ल्यूशी वाटाघाटी सुरू केल्या. कारण रोल्स-रॉयस नावाशिवाय लक्झरी कार विकू शकत नाहीत हे त्यांच्या लक्षात आले होते. बीएमडब्ल्यूने करार केला आणि फोक्सवॅगनला चार वर्षांसाठी रोल्स-रॉईस कार तयार करण्याची परवानगी दिली. त्यानंतर ७० करोड डॉलर्सचं रोल्स रॉयसचं ऑटोमोटिव्ह युनिट ४ करोड डॉलर्समध्ये बीएमडब्लूने ताब्यात घेतले.

अ‍ॅस्टन मार्टिन/लोटस कार:

जेम्स बॉण्ड आणि अ‍ॅस्टन मार्टिन यांचं नातं सर्वश्रुत आहे. अ‍ॅस्टन मार्टिन कंपनीला लोटस या कारला ‘स्पोर्ट्सकार’ म्हणून बाजारात आणायचे होते. तसेच जेम्स बॉण्ड प्रसिद्ध असल्याने, कंपनीच्या सीईओला ‘जेम्स बाँड कार’ म्हणून लोटसचे मार्केटिंग करायचे होते. त्याने जेम्स बाँडच्या प्रॉडक्शन टीमचे मन वळवण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

मग सीईओने एक युक्ती केली, त्याने एक लोटस कार काही आठवड्यांसाठी प्रॉडक्शन हाऊसच्या समोर पार्क केली. साहजिकच या ‘स्पेशल’ कारने प्रॉडक्शन टीमचे मन वळवले आणि त्यांनी लोटस कार वापरूनच प्रसिद्ध ‘सबमरिन कार’चे चित्रीकरण केले.

टेसला कंपनीचा सीईओ एलोन मस्कने ही कार अलीकडेच खरेदी केली. एलोन मस्कला या कारमध्ये ‘टेस्ला इलेक्ट्रिक ड्राइव्ह’ बसवून ती खरंच पाण्याखाली चालवायची आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या डॉक्टरने लिहिलेल्या पुस्तकाने हजारो नवजात बालकांचा बळी घेतला होता..!

Next Post

या हुकूमशहाला पायउतार केलं म्हणून आज दक्षिण कोरियाची अवस्था उत्तर कोरियापेक्षा बरी आहे

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या हुकूमशहाला पायउतार केलं म्हणून आज दक्षिण कोरियाची अवस्था उत्तर कोरियापेक्षा बरी आहे

ऑस्ट्रेलियन क्रिकेटची बेअब्रू करणारा 'टीम पेन' काही पहिलाच खेळाडू नाही, ही घ्या पूर्ण यादी..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.