The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हायरल फोटोत जोकोविचच्या घरात दिसणाऱ्या कृष्णाच्या पेंटिंगचं सत्य काय आहे..?

by द पोस्टमन टीम
15 November 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


हिंदू धर्म हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे. जागतिक स्तरावर जवळपास १.३२ अब्ज लोक हिंदूधर्माचं पालन करतात. भारतातून उगम पावलेला हा धर्म जगातील सर्वात प्राचीन धर्म मानला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानाचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडल्याचं दिसत आहे. इंडोनेशिया, श्रीलंका, कॅनडा, युनायटेड स्टेट्स यासारख्या अनेक देशांमध्ये हिंदू धर्माचा आणि त्यातील तत्वज्ञानाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे.

सामान्य लोकच नाही तर अगदी जागतिक स्तरावर नावाजलेले अनेक सेलिब्रेटी देखील हिंदू तत्वज्ञानाचे पालन करत आहेत. यामध्ये काही खेळाडूंचा देखील समावेश आहे. अनेक खेळाडूंनी जाहीरपणे सांगितलं आहे की, मन:शांती मिळवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ते नियमितपणे ध्यानधारणा (मेडिटेशन) करतात. 

फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहॅमनं तर देवनागरी लिपीमध्ये आपल्या पत्नीच्या नावाचा एक टॅटू आपल्या डाव्या हातावर गोंदवून घेतलेला आहे. यावरून त्याला हिंदू संस्कृतीविषयी असलेलं कुतुहल दिसून येतं. त्याच्या पाठोपाठ आता टेनिसचा बादशाह असलेला सर्बियन खेळाडू नोवाक जोकोविच सुद्धा हिंदू संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा चाहता असल्याचं समोर आलं आहे.

१४ जुलै २०१९ रोजी, नोवाक जोकोविचनं विम्बल्डनच्या सर्वात प्रदीर्घ अंतिम सामन्यात रॉजर फेडररचा पराभव करून पाचवं विम्बल्डन जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये तो आपल्या मुलासोबत खेळताना दिसत होता. मात्र, या फोटोंतील आणखी एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. जोकोविचच्या घरामध्ये हिंदू देवता श्रीकृष्णाचं एक मोठं चित्र असल्याचं व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दिसत होतं. त्यामुळं ते फोटो खरे आहेत की नाहीत याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र, जुलै २०१९ मध्ये व्हायरल झालेले फोटो एकदम खरे होते आणि ते जोकोविचच्या घराचेच होते. श्रीकृष्णाच्या चित्रासह व्हायरल झालेले फोटो स्वत: जोकोविचनं ऑगस्ट २०१८ मध्ये आपल्या ट्विटरवर शेअर केले होते. तेच फोटो २०१९ मध्ये त्यानं विम्बल्डन विजेतेपद पटकावल्यानंतर पुन्हा समोर आले. काही चाणाक्ष भारतीय चाहत्यांची नजर फोटोच्या बॅकग्राउंडला दिसणाऱ्या कृष्णाच्या चित्रावर पडली आणि त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.



जोकोविचच्या घरामध्ये असलेल्या चित्रात हिंदू देवता श्रीकृष्ण रास खेळत असल्याचं रेखाटलेलं आहे. चित्राचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं टेनिस कोर्टाचा बादशाह हिंदू धर्माशी संबंधित संकल्पनांचं पालन करतो का? अशा प्रश्न अनेकांना पडला होता. कारण त्यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या एका मुलाखतीत नोवाकनं टेनिसमधील यशाचं श्रेय योग, ध्यानधारणा आणि विगन आहाराला दिलं होतं. खेळा व्यतिरिक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील तो हिंदू संकल्पनांचे पालन करतो आणि देवतांची पूजा करतो अशा चर्चा व्हायरल फोटोंमुळे सुरू झाल्या होत्या.

डिसेंबर २०१४ मध्ये इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीगसाठी नोवाक जोकोविचनं भारताला भेट दिली होती. तेव्हा त्यानं भारतीयांचा दयाळूपणा आणि आदरातिथ्याबद्दल खूप कौतुक केलं होतं. त्याच्या या भारत भेटी दरम्यान त्याला श्रीकृष्णाची पेटींग भारतातून भेट मिळाली असल्याची देखील शक्यता आहे. नोवाकच्या घरामध्ये श्रीकृष्णाची प्रतिमा असल्याचं सर्वांना माहिती झालं.

कृष्णाचं चित्र त्याच्या कोणत्या घरामध्ये लावलेलं आहे याबाबत मात्र, माहिती मिळाली नाही. मॉन्टे-कार्लोचा रहिवासी आणि सर्बियाचा नागरिक असलेल्या नोवाकची या दोन्ही ठिकाणी आलिशान घरं आहेत. याशिवाय बेलग्रेड, मोनॅको, न्यूयॉर्क सिटी, मियामी, मार्बेला आणि दुबईमध्ये देखील त्याच्या नावे घरं आहेत.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

जोकोविचच्या टेनिस कारकर्दीचा विचार केला असता तो कमालीची प्रतिभा असलेला खेळाडू आहे. त्यानं वयाच्या चौथ्या वर्षापासून टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती. ९०च्या दशकामध्ये युद्धग्रस्त सर्बियामध्ये येत असलेल्या अडचणींचा सामना करून त्यानं टेनिसमध्ये आपले पाय रोवले.

वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत तो युरोपमधील अव्वल खेळाडू झाला होता. जोकोविचनं वयाच्या अठराव्या वर्षी असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (ATP) च्या टॉप १०० मध्ये प्रवेश केला. जुलै २००६ मध्ये त्यानं आपली पहिली एटीपी स्पर्धा जिंकली होती. तेव्हापासून सुरू झालेली त्याची घोडदौड अखंडपणे सुरू आहे.

२००७ मध्ये त्यानं फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या दोन्ही स्पर्धांच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्याच वर्षी त्यान यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती मात्र, तिथे तो रॉजर फेडररकडून सरळ सेटमध्ये पराभूत झाला.

२००८ मध्ये जोकोविचचा धडाकेबाज खेळ त्याला ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात घेऊन गेला. तो अंतिम सामना जिंकून त्यानं आपल्या कारकिर्दीतील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. टेनिसच्या चार सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक स्पर्धा जिंकणारा तो पहिला सर्बियन ठरला होता. त्याच वर्षी त्यानं बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर त्यानं सातत्यपूर्ण खेळ करून अनेक स्पर्धा जिंकल्या. अनेक विक्रम आपल्या नावे केले. यावर्षी (२०२१) जुलैमध्ये त्यानं विम्बल्डन स्पर्धा जिंकून आपल्या कारकिर्दीतील विसावं ग्रॅण्डस्लॅम मिळवलं. याबरोबरचं त्यानं नदाल आणि फेडरर या दिग्गजांच्या ग्रॅण्डस्लॅमशी बरोबरी केली.

आपल्या गुणवत्तापूर्ण खेळाच्या बळावर त्यानं जगभरात कोट्यवधी चाहते मिळवले आहेत. अगदी भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशामध्ये देखील त्याचे अनेक चाहते आहेत. २०१४ मध्ये केलेल्या भारत दौऱ्यावेळी, आपल्याला भारतीय संस्कृतीचं आकर्षण असल्याचं त्यानं स्वत: सांगितलं होतं. त्याच्या घरामध्ये असलेली कृष्णाची प्रतिमा कदाचित याचाच पुरावा असावा.

नोवाकच्या तर घरामध्ये फक्त एक प्रतिमा आहे. मात्र, त्याच्याशिवाय असे अनेक आतंरराष्ट्रीय ख्यातीचे सेलिब्रेटी आहेत जे भारतीय संस्कृती आणि हिंदू तत्त्वज्ञानाचे चाहते आहेत. अनेकांनी आपल्या शरीरावर टॅटू देखील करून घेतलेले आहेत. ब्रँडी नॉरवुड, रिहाना, मिली सायरस, ब्रिटनी स्नो, अँजेलिन जोली, जेसिका अल्बा, केटी पेरी आणि ऍडम लेविन यांनी हिंदू देवता आणि संस्कृत शब्दांचे टॅटू काढून घेतलेले आहेत. केटी पेरीनं तर राजस्थानमध्ये येऊन हिंदू परंपरेनुसार लग्न देखील केलं होतं. याचं सेलिब्रेटींच्या यादीमध्ये नोवाकचा देखील समावेश केल्यास वावगं ठरणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

IIT मुंबईच्या मुलांनी इलॉन मस्क फाउंडेशनचं २५०००० डॉलर्सचं अनुदान जिंकलंय

Next Post

ब्रिटनने जर्मनीच्या हवाई ह*ल्ल्यातून वाचण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली होती

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

ब्रिटनने जर्मनीच्या हवाई ह*ल्ल्यातून वाचण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली होती

डेटालॉव्ह खिंडीत झालेल्या ९ गिर्यारोहकांच्या रहस्यमय मृत्यूचे गूढ अजूनही उलगडले नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.