The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा पोपट अभ्यासात हुशार तर होताच पण शिक्षकांना शंका पण विचारायचा..!

by द पोस्टमन टीम
21 September 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लहानपणी ‘माझा आवडता पक्षी’ या विषयावर निबंध आला तर पटकन ‘पोपट’ डोळ्यासमोर यायचा. पोपटी रंग, लाल चोच, मिठू मिठू आवाज करत काहीतरी बोलण्यासाठी असलेली धडपड, मिर्ची आणि पेरुसाठी त्याची असलेली ओढ आणि अशा कितीतरी गोष्टी लगेच डोळ्यासमोर यायला लागतात.

पोपट हा विषय कितीही जिव्हाळ्याचा असला तरी त्याच्याबद्दल वैज्ञानिक माहिती आपल्याला फार नसते. त्या संबंधी अभ्यास करणाऱ्या किंवा त्याची आवड असलेल्या लोकांनाच त्याबद्दल माहिती असते. आज या लेखाच्या माध्यमातून आपण आपल्या लाडक्या पक्ष्याविषयी आणि एका खास प्रजातीच्या पोपटाविषयी थोडी वेगळी माहिती जाणून घेणार आहोत.

‘लोरीक्युलास व्हरनॅलीस’ हे पोपटाचे शास्त्रीय नाव आहे. बऱ्याच वर्षांच्या संशोधनानंतर आणि त्याच्यावर काही चाचण्या केल्यावर शास्त्रज्ञांनी पोपटाचे साधारण आयुर्मान देखील शोधून काढले.

कुठलाही मुक्त संचार करणारा पोपट साधारणतः २५ ते ३० वर्षे जगू शकतो पण तोच जर ‘अ‍ॅलेक्स पोपट’ असेल तर त्याचे आयुर्मान साधारण ४५ ते ५० असते पण तो पोपट पिंजऱ्यात बंदिस्त असेल तर त्याचे आयुर्मान अजूनच वाढते. ते  अगदी  ७५ ते ८० वर्षांपर्यंत सुद्धा जाऊ शकते!

पोपटाच्या असंख्य जाती असतात. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक पक्षी मित्रांनी याविषयी संशोधन करून भरपूर नव्या प्रजाती जगासमोर आणल्या. भारतात प्रामुख्याने रेनबोव पोपट, कैक पोपट, रोज रिंग्ड पोपट, ब्लू-यल्लो मकाव, अमेझॉन पोपट, अलेक्झान्द्राइन पोपट, गलाह पोपट, बडगेरीगर पोपट, आफ्रिकन ग्रे पोपट या प्रजाती आढळतात तर स्कारलेट मकाव, सल्फर – क्रेस्टेड कॉककाटो, अम्ब्रेला कॉककाटो, कोनुर्स पोपट, मोन्क पोपट, एकलेक्टस पोपट या काही प्रसिद्ध प्रजाती जगातल्या साधारण प्रत्येक देशांमध्ये आढळतात.



वेगवेगळ्या रंगांच्या, आकाराच्या, अनोख्या आवाजाच्या, विविध सवयींच्या पोपटांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातले गुणधर्म तपासले जातात. त्यामध्येच ‘अ‍ॅलेक्स’ नावाच्या पोपटाने सर्वोत्तम प्रतिसाद देत अनेक बाबतींत बाजी मारली. प्रशिक्षकाने शिकवलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात ठेवण्यात ‘आफ्रिकन ग्रे’ या पोपटाने उत्तम प्रतिसाद दिला.

संशोधनात समोर आलेल्या अभ्यासात त्यांना असं जाणवलं की या सगळ्या जातींमध्ये सर्वाधिक जलद गतीने गोष्टी शिकण्यात ‘आफ्रिकन ग्रे पोपट’ अग्रेसर आहेत किंवा सामान्यपणे त्यांनाच ‘अ‍ॅलेक्स’ नावाने देखील ओळखले जाते. भारतात आढळणाऱ्या पोपटांची लांबी जवळपास पंधरा सेंटीमीटर असते पण मूळ आफ्रिकेत आढळणारा हा खास पोपट म्हणजेच ‘अ‍ॅलेक्स’ नेहमी आढळणाऱ्या पोपटापेक्षा आकाराने बराच मोठा असतो कारण त्याची लांबी जवळपास ३० ते ३३ सेंटीमीटरपर्यंत वाढू शकते आणि रंग देखील राखाडी असतो.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

लालबुंद शेपटी, डोळ्यांभोवती असलेले पांढरे गोल निशाण आणि काळीभोर चोच पटकन लक्ष वेधून घेते. पूर्वी प्रामुख्याने आफ्रिकेमध्ये काँगो, गाबोन, घाना, उन्ग्डा, अंगोला या भागांमध्ये जास्त आढळायचे. पण आता जगभरातून या पक्षाला मागणी असल्याने सगळ्याच देशांमध्ये या पोपटांचे अस्तित्व जाणवते. पक्षांच्या बाबतीत शौकीन असलेले, पक्षीमित्र किंवा अभ्यासक खास आफ्रिकेतून मागवून ते पाळतात. भारतातून देखील आजकाल ‘अ‍ॅलेक्स’साठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यानुसार आफ्रिकेतून मागवून त्यांचे पालन केले जाते.

आपल्याला सगळीकडे जरी ‘अ‍ॅलेक्स’ दिसत असला तरी प्रामुख्याने हे पक्षी टोळीने रेन फॉरेस्टमध्येच राहणे पसंत करतात. ‘अ‍ॅलेक्स’ वर केलेल्या चाचण्या आणि प्रयोग खूप रंजक आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक तज्ज्ञांनी ‘अ‍ॅलेक्स’ वर काम केले पण प्रसिद्ध शास्त्रज्ञ आयरेन पेपरबर्ग यांनी ‘अ‍ॅलेक्स’च्या केलेल्या अभ्यासाला विशेष महत्व आहे.

१९७७ साली शिकागोहून त्यांनी एक ‘अ‍ॅलेक्स’ खरेदी केला जेव्हा त्या पोपटाचे वय केवळ एक वर्ष होते. डॉ पेपरबर्ग यांनी इतकी वर्ष या एकाच पोपटावर काम केलं की त्या अ‍ॅलेक्सची ओळख त्यांचा सहकारी म्हणूनच करून द्यायच्या. या प्रभावी पक्ष्यांमध्ये साधारण ५ वर्षांच्या मानवी मुलाएवढी मानसिक आणि भावनिक क्षमता असते.

‘अ‍ॅलेक्स’च्या मानसिकतेवर दीर्घ काळ काम करणाऱ्या पेपरबर्ग यांनी त्यांच्या संशोधनातून सिद्ध केले की हे पोपट हजारो शब्द लक्षात ठेऊ शकतात आणि त्याच शब्दांच्या आधारे ते योग्य वाक्य आणि वाक्प्रचार देखील जुळवून त्याच्या प्रशिक्षकाशी गप्पा मारू शकतात.

एकदा त्याला त्याच्या अस्तित्वाविषयी प्रश्न विचारला असता त्याने आरशाकडे खूण करून स्वतःची प्रतिमा दाखवली आणि आश्चर्यकारकरित्या त्याने स्वतःचा रंग विचारला. तेव्हा डॉ पेपरबर्ग यांनी ‘ग्रे’ असा शब्द उच्चारला, तो सहा वेळा त्याला शिकवला आणि तेव्हा त्याच्या डोक्यात ते पक्क बसलं आणि आपल्या पंखांचं अस्तित्व ‘ग्रे’ रंगात असल्याची जाणीव झाली.

त्यांनी त्या पोपटाला इतकं घडवलं की तो पोपट त्याला शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये शंका देखील विचारू लागला. या प्रकाराने तर पेपरबर्गना फारच सुखद धक्का बसला होता. कालांतराने त्यांना लक्षात आलं की ‘आफ्रिकन ग्रे; ही जातच मुळात खूप हुशार आणि महत्वाची आहे.

पक्ष्यांचं काही मानसिक आरोग्य असू शकतं हेच कोणी आधी अभ्यासलं गेलं नव्हतं, पण ते आव्हान स्वीकारलं डॉ पेपरबर्ग यांनी! त्यांनी दीर्घ काळ केलेलं संशोधन आपल्याला विश्वास ठेवायला भाग पाडतं की पक्षांची मानसिक क्षमता देखील जबरदस्त असते. एखाद्या पक्षाला इतकं घडवणं आणि त्याच्या मनातलं काढून घेणं हे नक्कीच कठीण होतं पण ते काम त्यांनी लीलया पेललं. त्यांचं संशोधन झालं नसतं तर कदाचित आज जी माहिती आपल्यासमोर आहे ती देखील कधी येऊ शकली असती की नाही असा प्रश्न पडतो. त्यामुळे जेवढं कौतुक अ‍ॅलेक्सचं आहे तितकंच कौतुक डॉ. आयरेन पेपरबर्ग यांचं देखील आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

टुमॉरोलँड फेस्टिवल म्हणजे जगभरातल्या संगीतप्रेमींची जत्राच असते..!

Next Post

हिमालयातील स्वर्ग ‘शंभला’ राज्य, जिथे गेल्यावर मानवाला अमरत्व प्राप्त होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

हिमालयातील स्वर्ग 'शंभला' राज्य, जिथे गेल्यावर मानवाला अमरत्व प्राप्त होतं

भारतीय बाजारपेठेतून थम्सअपला हद्दपार करण्यासाठी कोकाकोलाने जंगजंग पछाडलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.