The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जुने आयफोन जाणीवपूर्वक स्लो केले म्हणून ॲपलला १३ कोटी डॉलर्सचा दंड भरावा लागला होता

by द पोस्टमन टीम
23 September 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सध्या फोनशिवाय आपलं पान देखील हालत नाही. काही तर असे देखील लोक आहेत जे जेवताना, झोपताना आणि चक्क टॉयलेटमध्ये देखील फोन सोबत ठेवतात. फोन एक स्टेटस सिम्बॉल देखील झाला आहे. जितक्या जास्त किंमतीचा फोन तितकं तुमचं स्टेटस हाय समजलं जात. एखाद्या व्यक्तीकडं आयफोन दिसला म्हणजे नक्कीच तो श्रीमंत आहे, असा अलिखित नियम झाला आहे.

अर्थात त्याच्या मागे असलेलं कारणंही तसंच आहे म्हणा. जगातील चौथी सर्वात मोठी स्मार्टफोन उत्पादक कंपनी असलेल्या ॲपलचे फोन इतर स्मार्टफोनच्या तुलनेत जास्त महाग आहेत. तरी देखील तरुणाईमध्ये या फोनची प्रचंड क्रेझ आहे.

युरोपात तर ॲपलचा एखादा नवीन फोन लॉन्च होणार असेल तर कितीतरी दिवस अगोदरच बुकींग करून ठेवलं जातं. लॉन्चिंगच्या दिवशी दुकानांच्या बाहेर लांबच लांब रांगा दिसतात. मात्र, काही वर्षांपूर्वी याच ॲपलवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली होती. ॲपलनं आपल्या जुन्या फोनचे प्रोसेसर्सची गती मुद्दाम कमी केल्याचा आरोप ग्राहकांनी कंपनीवर केला होता. हे प्रकरण ‘बॅटरीगेट’ नावानं प्रसिद्ध झालं आहे.

ॲपलनं हँडसेट वापरकर्त्यांना कुठलंही स्पष्टीकरण किंवा इतर पर्याय न देता त्यांचे प्रोसेसर्स स्लो केले आहेत, असे आरोप जगभरातून करण्यात आले. २०१७ साली पहिल्यांदा हा प्रकार समोर आला होता.



नवीन iOS अपडेटपासून, काही आयफोन हँडसेट्सची बॅटरी ३० टक्के असतानाच ते अचानक शटडाऊन होऊ लागले होते. बॅटरीच्या टर्मिनल व्होल्टेजमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानं असे प्रकार होत असण्याची शक्यता होती. डिसेंबर २०१६ मध्ये कंपनीनं एक माहितीपत्रक काढलं.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१५ मध्ये तयार केलेल्या iPhone 6S मॉडेल्सच्या बॅटरीमध्ये डिफेक्ट असल्याचं कंपनीनं कबूल केलं. हा दोष जास्त काळजी करण्यासारखा नाही. परंतु यामुळे बॅटरीची क्षमता नक्कीच कमी होऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं होतं. आपण या समस्येवर काम करण्यास सुरुवात केल्याचंही कंपनीने जाहीर केलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये जारी केलेल्या नवीन iOS 10.2.1 अपडेटनंतर iPhone 6 आणि iPhone 6S फोनमधील बॅटरी शटडाउनच्या घटना कमी झाल्याची नोंद झाली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

मात्र, हे प्रकरण वरकरणी जरी साधं दिसत असलं तरी ते तितकं साधं नव्हतं याची जाणीव डिसेंबर २०१७ मध्ये सर्वांना झाली. बेंचमार्किंग टूल गीकबेंचच्या डेव्हलपर्सनं आयफोनच्या समस्यांबाबतचा एक अहवाल जारी केला. त्यानुसार, iPhone 6 मध्ये iOS 10.2.1 पूर्वी आलेल्या आणि iPhone 7 मध्ये iOS 11.2 च्यापूर्वी आलेल्या अपग्रेडमुळेसुद्धा काही हॅन्डसेटची कामगिरी मंदावली होती. ही गोष्ट कंपनी विरोधात ठोस पुरावा ठरली.

ॲपलनं जाणीवपूर्वक बॅटरीची समस्या घडवून आणली होती. जेणेकरून नव्याने येणाऱ्या नवीन मॉडेल्सची विक्री वाढेल, असा अर्थ यातून निघत होता. डेव्हलपर्सचा अहवाल समोर आल्यानंतर जगभरातील आयफोन ग्राहकांमध्ये खळबळ उडाली होती. त्यांनी कंपनी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

या अहवालांना प्रतिसाद म्हणून, ॲपलनं CNET ला एक निवेदन जारी केलं. ज्याकाही अडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी कंपनीनं अगोदरच उपाययोजना केल्या आहेत. सिस्टमची स्थिरता टिकवण्यासाठी आणि अचानक होणारे शटडाउन टाळण्यासाठी जुन्या आयफोन डिव्हाइच्या बॅटरीज् सॉफ्टवेअरवर काम केल्याचं कंपनीनं स्पष्टीकरण दिलं. त्यासोबत ग्राहकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील केला होता. ‘ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणं’ हाच आमचा उद्देश आहे.

उपकरणाची कामगिरी आणि त्याचं आयुष्य वाढवणं याची सुरुवातीची जबाबदारी देखील कंपनीची आहे. फोनसारख्या वस्तूमध्ये तांत्रिक बिघाड होणं, ही खूप सामान्य गोष्ट आहे. आम्ही ग्राहकांच्या सेवेत तत्पर असल्याचं आश्वासन ॲपलनं दिलं.

कंपनीवर जे आरोप झाले आहेत. त्यापैकी कुठलीही गोष्ट कंपनीनं जाणीवपूर्वक केलेली नाही. मात्र, ग्राहकांचा आदर म्हणून हॅन्डसेटच्या डिफेक्टेड बॅटरी बदलून देण्याची आमची तयारी असल्याचं ॲपलनं म्हटलं.

जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ पर्यंत iPhone 6 आणि iPhone 6S च्या बॅटरी बदलण्यावर ५० डॉलर सूट देण्याची घोषणा केली. मात्र, काही अमेरिकन पत्रकारांच्या मते, ॲपलनं ग्राहकांना विनामूल्य बॅटरी बदलून देणं अपेक्षित होतं.

या प्रकरणावरून जानेवारी २०१८ पर्यंत, ॲपलच्या विरोधात ३२ क्लास ॲक्शन खटले दाखल करण्यात झाले होते. शिकागोच्या एका वकीलानं तर ५०लाख डॉलर्सचा क्लास-ॲक्शन घटला दाखल केला होता. ॲपलनं फोनच्या बॅटरींसोबत छेडछाड करून नंतर डिस्काउंट देण्याचं आश्वासन देऊन ग्राहकांचा अपमान केला. आयफोनची प्रत्येक आवृत्ती खरेदी करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या निष्ठावंत ग्राहकांची फसवणूक कंपनीनं केली असल्याचा युक्तीवाद या वकिलानं केला होता.

असेच खटले जगभरात विविध ठिकाणी उभे राहिले होते. कंपनीला आपली प्रतिष्ठा आणि ग्राहक टिकवण्यासाठी मोठा भूर्दंड भरावा लागला. ७ फेब्रुवारी २०२० रोजी फ्रेंच ग्राहक विभागानं या प्रकरणाची औपचारिक चौकशी केल्यानंतर ॲपलला २.५ करोड डॉलर्सचा दंड ठोठावला.

त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी कॅलिफोर्नियातील न्यायालयात कंपनीनं ५० करोड डॉलरची सेटलमेंट करण्याची तयारी दर्शवली. ज्या अंतर्गत iPhone 6, iPhone 6+, iPhone 6S, iPhone 6S+, iPhone SE, iPhone 7 किंवा iPhone 7+ हे डिव्हाइस खरेदी केलेल्या सर्व यूएसमधील रहिवाशांना भरपाई मिळणार होती. याशिवाय ३४ राज्य आणि कोलंबिया डिस्ट्रिक्टमध्ये बॅटरीच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. नोव्हेंबर २०२० मध्ये या प्रकरणाच्या सर्व चौकश्या पूर्ण झाल्या. त्यानंतर ॲपलनं पुन्हा ११ कोटी ३० लाख डॉलर्सचा दंड भरला.

आयफोनच्या बॅटरीची समस्या अनावधानाने झाली होती की जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली होती, हे कंपनीलाच माहित. मात्र, हे प्रकरण कंपनीला चांगलंच भोवलं होतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हि*टल*रच्या डॉक्टरने त्याच्या नकळत औषधांमधून ड्र*ग्ज देऊन त्याला व्यसन लावलं होतं..!

Next Post

या शास्त्रज्ञाच्या उलट्या बुद्धीमुळे सोविएत रशिया कित्येक दशकं मागे गेला..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या शास्त्रज्ञाच्या उलट्या बुद्धीमुळे सोविएत रशिया कित्येक दशकं मागे गेला..!

या पोराने केलेले फ्रॉड्स वाचले तर आपले नेतेसुद्धा याच्यापुढे कच्चे वाटतील

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.