The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कम्प्युटरमधील एका एररमुळे नासाची अपोलो-११ मोहीम धोक्यात आली होती! 

by Heramb
20 September 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे  सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सध्याचं जग हे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं आहे. विसाव्या आणि एकविसाव्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती ज्या गतीने झाली तितक्या वेगाने अशी प्रगती ज्ञात मानवी इतिहासात कधीच झाली नव्हती. विशेषतः दुसऱ्या महायु*द्धानंतर तंत्रज्ञानाच्या प्रगतीने वेग घेतला. त्याचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधील संघर्ष!

आता एकविसाव्या शतकात तर ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली. एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा पाया असणाऱ्या संगणकातील एका चुकीमुळे अपोलो-११ ही अमेरिकी चंद्रयान मोहीम काही काळासाठी धोक्यात आली होती.

अपोलो-११ ही नासाचीच नाही तर संपूर्ण अमेरिका आणि जगासाठीही महत्त्वाची मोहीम होती. मानवी इतिहासात पहिल्यांदाच हे होणार होतं आणि माणूस आपल्यापासून कित्येक मैल दूर असलेल्या चंद्रावर पाय ठेवणार होता. मानवी संस्कृतीने चंद्रावर जाणं हे काही एका रात्रीत घडलं नव्हतं. ज्या मानवाला एकेकाळी आकाशात उडणाऱ्या विमानाचं आणि हेलिकॉप्टर्सचं आश्चर्य वाटायचं तोच माणूस चंद्रावर उतरणार होता. अमेरिकेच्या प्रशासनाने आणि नासाने (नॅशनल ऐरोनौटिक स्पेस एजन्सी) पहिला माणूस चंद्रावर पाठवण्यासाठी जय्यत तयारी केली होती.

पृथ्वीच्या कक्षेत लुनार मॉड्यूलची चाचणी अपोलो-९ मोहिमेद्वारे करण्यात आली. ही मोहिम मार्च १९६९ मध्ये यशस्वीपणे पार पडली. या मोहिमेच्या यशामुळे नासाचा आत्मविश्वास वाढला होता आणि आता ते चंद्रावर माणूस पाठवण्याच्या तयारीत होते. चंद्रावर माणूस पाठवून त्याला परत पृथ्वीवर सुरक्षितरित्या आणण्याची मोहीम ही तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. कॅनेडी यांची महत्वाकांक्षी योजना होती आणि अपोलो-९ मोहिमेच्या यशस्वीतेमुळे राष्ट्राध्यक्ष कॅनडींची ही महत्वाकांक्षी योजना यशस्वी होण्याची चिन्हं दिसत होती.

त्याच वर्षी अपोलो-१० मोहीम आखण्यात आली ज्यामध्ये चंद्रावर लँडिंग करण्याची रिहर्सल करण्यात आली. या मोहिमेच्या यशाबरोबरच जुलैमध्ये अपोलो-११ मोहिमेच्या माध्यमातून माणूस चंद्रावर उतरेल अशी अशा होती, पण अद्याप बरेच काम बाकी होते. अपोलो-११ मोहिमेसाठी फ्लाइट हार्डवेअरची चाचणी केनेडी स्पेस सेंटरमध्ये सुरू होती. ऐतिहासिक अपोलो-११ चंद्रावर मानव चंद्रावर उतरल्याचा ५०वा वर्धापनदिन २० जुलै २०१९ रोजी झाला.



पाच दशकांपूर्वी घडलेल्या हा वैज्ञानिक पराक्रमामध्ये, चंद्रावर उतरण्यापूर्वी मिशन कंट्रोल सेंटरशी संवाद साधताना अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ एल्ड्रिन यांच्यातील रेकॉर्ड केलेले ऑडिओ काळजीपूर्वक ऐका. तुम्ही जर कॉम्प्युटर विश्व किंवा स्पेस फ्लाइटचे चाहते असाल तर कदाचित तुमच्या लक्षात आलेही असेल. एरर १२०१ आणि १२०२ क्रमांक म्हणून ओळखला जाणारा आवाज अलार्मद्वारे त्यांना सावध करण्याचा प्रयत्न करीत होता.

या अभियानात अगणित एरर कोड्स होते. हे एरर कोड प्रत्येकी चार अंकी होते आणि त्यांच्या स्पेसक्राफ्टमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यावर ते एरर कोड सिग्नल देण्याचे काम करत. चंद्राच्या लँडरसाठी सिस्टीम डिझाइन करताना सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या टीमने हे एरर कोड्स तयार केले होते, जेणेकरून कॉम्प्युटरला स्पेसक्राफ्टमध्ये काही चुकीचे अथवा धोकादायक आढळल्यास ते निदर्शनास आणलं जाऊ शकतं.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

इथेच मोठी गडबड होती. जेव्हा अंतराळवीरांनी सिम्युलेटेड लँडिंग केले होते, तेव्हा सर्व संभाव्य एरर कोड्स तपासले गेले नाहीत. काही एरर कोड्स असे होते ज्यांचे अर्थही अंतराळवीरांना माहित नव्हते. नेमके याच एररकोड्स पैकी १२०१ आणि १२०२ एरर कोड्स अंतराळवीरांच्या प्रशिक्षणात किंवा या मोहिमेच्या रिहर्सलमध्ये कोठेही दर्शवले गेले नसल्याने अचानक अंतराळात आणि चंद्राच्या पृष्ठभागाजवळ पोहोचताना अंतराळवीरांना कोड्यात टाकत होते.

शिवाय, लँडिंगवर देखरेख करणाऱ्या बहुतेक मिशन कंट्रोल कर्मचाऱ्यांना देखील १२०१ आणि १२०२ या एरर कोड्स बद्दल माहिती नव्हती. चंद्रावर लँडिंग करण्याच्या काही मिनिटे आधी अलार्म्स वाजू लागले होते, स्पेसक्राफ्टमधील बटणं चमकत होती, अशा परिस्थितीत मूळ मोहिमेवरून आपलं लक्ष भटकणं सहाजिकच आहे. आपल्यला या एरर कोड्सबद्दल काहीही सांगितलं गेलं नाही हे यानात उपस्थित असलेल्या अंतराळवीरांना काही क्षणांतच लक्षात आले,आणि त्यांनी पृथ्वीवरील मिशन कंट्रोलशी संपर्क साधला आणि विचारलं, “इट्स 1202, व्हॉट इस दॅट? गिव्ह अज रिडींग ऑन 1202 प्रोग्रॅम अलार्म…”

मिशन कंट्रोलमध्ये सगळ्यांची चिंता वाढली होती. कारण कोणालाही या एरर कोडबद्दल माहिती नव्हते. दरम्यान, स्टीव्ह बेल्स नावाच्या एका अधिकाऱ्याला बोलावण्यात आले. जॉन गार्मन, या नासाच्या अभियंत्याने तयार केलेल्या असंख्य एरर कोडच्या यादीवर त्याने नजर टाकली. गायडन्स आणि नॅव्हिगेशन संबंधित कॉम्प्युटर मोठ्या प्रमाणात दिल्या गेलेल्या टास्क्समुळे ओव्हरलोड झाले होते. त्यामुळे  या एरर कोडचा सिग्नल येत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

एरर सिग्नल्स येत असूनही नॅव्हिगेशन अँड गायडन्स कॉम्प्युटर्स उत्तमरीतीने चालू आहेत हे कंट्रोल रूममधील लोकांना लक्षात आले. चालू असलेल्या कॉम्प्युटरच्या प्रोसेसमध्ये कसलाही खोडा न घालताही काम होणार होते. त्याच्यामते, या टप्प्यावर अंतराळवीरांनी थांबण्याची गरज नव्हती.

मिशन कंट्रोल रूममध्ये, डार्मोन आणि बेल्सने अंतराळवीरांनी लँडिंगसाठी पुढे जावे असे सांगितले. कॅपकॉम चार्ली ड्यूक अंतराळवीरांना म्हणाले, “वी आर गो ऑन दॅट अलार्म!”.  “गो” म्हणजे लँडिंग निःशंकपणे केली जाऊ शकते. तसेच, अंतराळवीरांना त्या अलार्मविषयी पुढे काय करावे याविषयी कोणतीही सूचना दिली जात नसल्याने, अलार्मचा अर्थ काहीही असो, दुर्लक्ष केला जाऊ शकतो असा होता. 

जर तुम्ही रेकॉर्डेड ऑडियो ऐकले तर १२०२ च्या एररचा सिग्नलसह आता १२०१ एरर सिग्नलही येत होता. ही एकसारखीच एरर असल्याने मिशन कंट्रोलने अंतराळवीरांना त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. प्रत्यक्ष लँडिंगच्या वेळी ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी, हा अंतराळवीर आणि मिशन कंट्रोल दरम्यानचा हा संवाद काही चिंतेची बाब नव्हती. असा संवाद बहुतेकदा तांत्रिक स्वरूपाचा असतो आणि त्याचा शाब्दिक अर्थ काय आहे हे बहुतेकांना कळतही नाही. पण इथे चिंतातुर आवाज होता, प्रत्यक्ष चंद्रावरचं लँडिंगचं दृश्य पाहणाऱ्या लोकांना या एरर कोड्समुळे लँडिंग पूर्णपणे बंद होऊ शकते याची कल्पनाही नव्हती.

अंतिमतः चंद्रावर माणसाने पाऊल ठेऊन इतिहास रचला आणि अमेरिकेत सगळीकडे एक आनंदाचं वातावरण होतं.  पण अंतराळवीरांना धडकी भरवणाऱ्या त्या एरर कोडचा अर्थ नेमका काय होता? नासाच्या कंट्रोल रूममध्ये त्यावेळी चिंतेचं वातावरण होतं. यामध्ये डॉन अयल्स नावाच्या तरुण आणि नवख्या कम्प्युटर प्रोग्रामरला मोठी चिंता भेडसावत होती. कारण त्यानेच स्पेसक्राफ्टवरील गायडन्स आणि नेव्हिगेशन करणाऱ्या कम्प्युटर व्यवस्थेचे प्रोग्रॅमिंग केले होते.

डॉन अयल्सला नासामध्ये काम करण्याच्या आधी कोणत्याही प्रकारचा अनुभव नव्हता. शिवाय तो एक नवखा अभियंता होता. ६०च्या दशकातील कम्प्युटर्स म्हणजे भले मोठी मशिन्स. या मशिन्स पूर्ण एक मोठी खोली किंवा इमारतीचा पूर्ण एक मजलाच व्यापून टाकत. एवढा मोठा आकार कमी करून अयल्सला स्पेसक्राफ्टमध्ये बसेल असा लहान कम्प्युटर तयार करायचा होता. त्यासाठी त्याने ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला ते पुढे जगभर मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलं. ‘इंटिग्रेटेड सर्किट्स’चा वापर करून त्याने एका डब्याएवढा कम्प्युटर तयार केला होता, शिवाय नासाच्या जवळ जवळ सर्व गरजा त्याने पूर्ण केल्या होत्या.

आपण वापरत असलेल्या मेलची साईझ सुमारे ७५केबी इतकी असते, त्यावेळी नासाला फक्त ३६ केबीची माहिती कम्प्युटर्समध्ये टाकायची होती. पण ही लिखित स्वरूपात आणली तर ४०० पानाच्या सुमारे ५ वह्या भरतील इतकी माहिती होती. इतकी माहिती साठवून ठेवण्यासाठी एका विशिष्ट मेमरीचा वापर करण्यात आला. त्या मेमेरीचं नाव होत ‘कोर रोप’. अशा प्रकारच्या मेमरीच्या मदतीने. ‘इंटिग्रेटेड सर्किट्स’चा वापर करून तयार केलेल्या कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्कच्या आकाराचे ६ कोर रोप मेमरीचे डबे बसवण्यात आले होते.

परंतु ऐन वेळी आलेल्या या एरर कोड्समुळे त्याचे कष्ट वाया जातील आणि कदाचित मिशनच अबोर्ट करावं लागेल अशी त्याला भीती होती. मिशन पूर्ण झाल्यावर या घटनेच्या मुळाशी जाण्याचं ठरवण्यात आलं.

एक रडार युनिट ऑनबोर्ड कम्प्युटरवर अनावश्यक डेटा साठवत होतं, हे तपासानंतर उघड झालं. मेमरी भरल्यानंतर मात्र १२०२ चा अलार्म वाजू लागला आणि डेटा ओव्हरफ्लो झाल्यानंतर कम्प्युटर रिबूट होण्याचा १२०१ चा अलार्म वाजू लागला. पण यामध्ये कम्प्युटर इंजिनिअर डॉन अयल्सची काहीही चूक नव्हती. स्पेसक्राफ्टचं हार्डवेअर सेट करताना एक स्विच चुकीच्या पद्धतीने लावला गेल्याने रडार चालू राहून अनावश्यक डेटाचा भडीमार कम्प्युटरवर होत असल्याचे सिद्ध झाले. 

पण शेवटी हे मिशन यशस्वीपणे पूर्ण झाले..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

थेट ना*झी अधिकाऱ्यांशी सौदा केला आणि हंगेरीतल्या १६०० ज्यूंना हॉलोकॉस्ट पासून वाचवलं

Next Post

१० हजार उधारीवर घेऊन सुरु केलेला व्यवसाय आज करोडोंची उलाढाल करतोय..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

१० हजार उधारीवर घेऊन सुरु केलेला व्यवसाय आज करोडोंची उलाढाल करतोय..!

मियांदादचा जीव अडकलेली ऑडी रवी शास्त्रींनी जिंकली आणि टशन के साथ मैदानावर फिरवली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.