The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अणुबॉ*म्बचा जनक असलेल्या ओपेनहायमरने आपल्या गुरुला विष द्यायचा प्रयत्न केला होता

by द पोस्टमन टीम
5 July 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


१९२४-२६ या काळात एक तरुण अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात पदवी घेण्यासाठी संशोधन करत होता. त्याची मानसिक स्थिती फारशी चांगली नव्हती. त्याच्या आईसोबत त्याचे सारखे वाद होत असत आणि नुकताच त्याचा ब्रेकअप देखील झाला होता.

थेअरॉटिकल फिजिक्समध्ये त्याला रूची होती. मात्र, तरी देखील त्याला बेरिलियमच्या पातळ फिल्म्स बनवण्याच्या प्रयोगशाळेत बसण्यास भाग पाडलं जात होतं. या सर्वाला कंटाळून या पठ्ठ्यानं आपल्या शिक्षकावरच विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला! या विद्यार्थ्यांचं नाव ऐकलं तर तुम्ही देखील चकित व्हाल. त्याला सर्व जग ‘फादर ऑफ ॲटमबॉ*म्ब’ म्हणून ओळखतं. हो, हा विद्यार्थी नोबल पारितोषिकासाठी तीन वेळा नामांकित झालेला भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहायमर होता!

जे. रॉबर्ट ओपेनहायमर हा अशा शास्त्रज्ञांपैकी एक होता ज्याने अणुबॉ*म्ब विकसित करण्यासाठी मदत केली होती. मॅनहॅटन प्रकल्पादरम्यान, ओपेनहायमर लॉस अल्मोस प्रयोगशाळेचा संचालक होता. अणुबॉ*म्बच्या संशोधन आणि डिझाइनची जबाबदारी त्याच्यावर होती.

१९४२ साली मॅनहॅटन प्रकल्प सुरू झाला तोपर्यंत ओपेनहायमर एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ मानला जात होता. तो अणुबॉ*म्ब निर्मितीच्या शक्यतांबाबतच्या संशोधनात गुंतलेला होता. तो वेगवान न्यूट्रॉनवर संशोधन करत होता. बॉ*म्बसाठी किती सामग्रीची आवश्यकता असू शकते आणि ते किती कार्यक्षम असू शकते याची आकडेवारी करण्याच्या प्रयत्नात तो होता.

ओपेनहायमरला व्यवस्थापकीय कामाचा अनुभव नव्हता. मात्र, जनरल लेस्ली ग्रोव्सनं त्याच्यातील वैज्ञानिक तेज ओळखलं. ग्रोव्सनं लॉस अल्मोस प्रयोगशाळेचा संचालक म्हणून त्याची केलेली निवड योग्यच असल्याचं त्यानं सिद्ध करून दाखवलं होतं. कारण, ग्रोव्सनं शस्त्रास्त्रांच्या विकासासाठी ओपेनहायमरची लॉस अल्मोस प्रयोगशाळेचा संचालक म्हणून निवड केल्यानंतर तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीतच अमेरिकेनं जपानवर दोन अणुबॉ*म्ब टाकले.



जे. रॉबर्ट ओपेनहायमरचं संपूर्ण आयुष्य विविध कारणांमुळं नेहमीच वादग्रस्त राहिलं. थेअरॉटिकल फिजिसिस्ट म्हणून मोठं यश आणि प्रसिद्धी मिळवलेल्या ओपेनहायमरला लहानपणापासून भौतिकशास्त्राचं कमालीचं आकर्षण होतं. २२ एप्रिल १९०४ रोजी जन्मलेल्या ओपेनहायमरचं कुटुंब सुशिक्षित होतं. ते एथिकल कल्चर सोसायटीचा भाग होते. या सोसायटीनं न्याय, नागरी जबाबदारी आणि धर्मनिरपेक्ष मानवतावादावर भर दिला. त्यांनी एथिकल कल्चर स्कूलची स्थापना देखील केली होती. याच शाळेत सप्टेंबर १९११ मध्ये ओपेनहायमरने प्रवेश घेतला.

वयाच्या १० व्या वर्षीच त्यानं खनिजे, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केला होता. न्यूयॉर्क मिनरलॉजिकल क्लबशी सुरू असलेला त्याचा पत्रव्यवहार इतका प्रगल्भ होता की, सोसायटीनं त्याला व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी रॉबर्ट ओपेनहायमर हा फक्त बारा वर्षांचा होता! या वयात सामान्य मुलांना भौतिकशास्त्राची संपूर्ण ओळख देखील झालेली नसते. त्या वयात ओपेनहायमर याच विषयावर व्याख्यान देऊन बसला होता. 

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

१९२१ मध्ये त्यानं हायस्कूलमधील शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मात्र तो आजारी पडला आणि त्यामुळं त्याचा हार्वर्डमधील प्रवेश लांबला. ओपेनहायमरनं सप्टेंबर १९२२ मध्ये हार्वर्डमध्ये प्रवेश घेतला. तीन वर्षांत त्यानं रसायनशास्त्रात प्रावीण्य मिळवलं. पदवी जरी रसायनशास्त्रात असली तरी आपली खरी आवड भौतिकशास्त्रातच असल्याची जाणीव त्याला झाली आणि त्यानं त्यादृष्टीनं अभ्यास केला. त्यानंतर त्यानं केंब्रिज विद्यापीठात संशोधन केलं. याच ठिकाणी त्यानं आपल्या शिक्षकाला विष देण्याचा प्रताप केला.

१९२४ मध्ये, ओपेनहायमरला सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ (थेअरॉटिकल फिजिसिस्ट) म्हणून केंब्रिज विद्यापीठातील प्रतिष्ठित क्रिस्ट कॉलेजमध्ये निवडण्यात आलं होतं. तिथे त्याला एक्सपिरीमेंटल फिजिसिस्ट पॅट्रिक ब्लॅकेटच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्यास सांगण्यात आलं होतं. ब्लॅकेट त्याच्या कॉस्मिक रेज आणि पालीओमॅग्नेटिझमवरील संशोधनासाठी प्रसिद्ध होता. ब्लॅकेटच्या हाताखाली काम करण्यास ओपेनहायमर उत्सुक नव्हता. त्यामुळं त्यांची जोडी काही विशेष जमली नाही. ओपेनहायमर प्रयोगशाळेत स्वतःला सिद्ध करू शकला नाही. त्याला एक एक्सपिरीमेंटल फिजिसिस्ट म्हणून ब्लॅकेटच्या कौशल्याचा हेवा वाटे.

१९२६ मध्ये, वैयक्तिक आयुष्यातील नैराश्य आणि ब्लॅकेटबद्दल असलेली असुया त्याला असह्य झाली. याचं मनस्थितीमध्ये त्यानं ब्लॅकेटला ठार मारण्याची योजना आखली. बोलून चालून शास्त्रज्ञच तो. त्यानं अतिशय हुशारीनं ही योजना तयार केली.

आपल्या साथीदारांसह कोर्सिकाला सुट्टीवर जाण्याअगोदर त्यानं एका सफरचंदावर प्रयोगशाळेतील विषारी रसायनांचा लेप लावून ते ब्लॅकेटच्या डेस्कवर ठेवलं आणि निघून गेला. म्हणजे जर ब्लॅकेटच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ओपेनहायमरवर संशय येणार नाही. ब्लॅकेटच्या सुदैवानं म्हणा की, ओपेनहायमरच्या दुर्दैवानं, ब्लॅकेटनं ते विषारी सफरचंद खाल्लं नाही आणि त्याचा जीव वाचला.

हे प्रकरण विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर ओपेनहायमरवर मोठी कारवाई होणं अपेक्षित होतं. मात्र, प्रतिष्ठेच्या कारणामुळं केंब्रिजनं हे प्रकरण दडपून टाकलं. फक्त त्याला काही दिवस अकॅडमीक प्रोबेशनवर ठेवण्यात आलं आणि नियमित मानसशास्त्रीय मूल्यमापन करण्याचे आदेश देण्यात आले. १९२६ च्या शेवटी, गॉटिंगेन विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स बोर्नच्या निमंत्रणानंतर ओपेनहायमरनं केंब्रिज सोडलं.

पुढे १९२७ मध्ये डॉक्टरेट मिळवली आणि बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक पद स्वीकारले. बर्कलेमध्ये जगातील सर्वोच्च प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ आणि सायक्लोट्रॉनचा संशोधक अर्नेस्ट लॉरेन्सशी ओपेनहायमरची चांगली मैत्री झाली. ज्या काळात युरोपियन भौतिकशास्त्रज्ञ क्वांटम मेकॅनिक्सचा आधारभूत सिद्धांत विकसित करत होते नेमक्या त्याच काळात ओपेनहायमरला युरोपमध्ये राहण्याचं भाग्य लाभलं होतं. याच दोन गोष्टींचा फायदा त्याला मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये झाला.

दुसऱ्या यु*द्धानंतर ओपेनहायमर अणुऊर्जा आयोगाचा सल्लागार बनला आणि त्यानं आंतरराष्ट्रीय शस्त्र नियंत्रणासाठी लॉबिंग केलं. १९४७ पासून ओपेनहायमरनं न्यू जर्सीतील प्रिन्स्टनमध्ये ‘इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडीज’चं संचालक म्हणून काम पाहिलं.

जेव्हा मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये रॉबर्ट ओपेनहायमरची निवड वादग्रस्त ठरली होती. कारण सुरुवातीच्या काळात त्याला कम्युनिस्टांबाबत सहानुभूती होती. मात्र, त्यानं आपल्या कामामध्ये आपली विचारसरणी न येऊ देता आपल्या देशासाठी इमानेइतबारे काम केलं. त्यानं नेतृत्व केलेल्या अणुप्रकल्पामुळं जपानमध्ये असंख्य लोक मारले गेले असले तरी त्याला विज्ञानाबाबत प्रचंड आदर होता.

अल्बर्ट आइन्स्टाईन, बी. रसेल आणि जोसेफ रोटब्लॅटसह त्यानं १९६० मध्ये ‘वर्ल्ड अकॅडमी ऑफ आर्ट अँड सायन्स’ची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी जगभरात व्याख्यानं सुरू ठेवली. ओपेनहायमरला तीन वेळा नोबेल पुस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. मात्र, एकदाही त्याला हा सन्मान मिळाला नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

पौराणिक कथांना मूर्त रुप देणारा दक्षिण भारतीय उत्सव ‘गोलू’

Next Post

म्हणून मुघलांना धूळ चारणाऱ्या लसिथ बोरफुकोन यांना आसामचे शिवाजी महाराज म्हणतात

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

म्हणून मुघलांना धूळ चारणाऱ्या लसिथ बोरफुकोन यांना आसामचे शिवाजी महाराज म्हणतात

अमेरिकेच्या स्थानिक रेड इंडियन्सच्या हक्कांसाठी याने बलाढ्य अमेरिकेला अंगावर घेतलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.