The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्फिंग करताना त्रासदायक ठरणाऱ्या पॉपअप ॲड्स बनवणाऱ्याने नेटिझन्सची माफी मागितली आहे

by Heramb
16 September 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


इंटरनेटवर काम करत असताना मध्येच ‘पॉप-अप ॲड’ आल्यानंतर आपापल्या स्वभावानुसार एकतर संताप तरी येतो किंवा निराशा तरी होते आणि त्यातही जर आपण एखादं महत्वाचं काम करत असू किंवा एखादा महत्वाचा शैक्षणिक व्हिडीओ पाहताना जर मध्येच जाहिरात आली तर मात्र तळपायाची आग मस्तकात जाते. कधीतरी तर आपण केलेलं कामही या पॉप-अप ॲड्समुळे वाया जातं.

या पॉप-अप ॲड्सचा शोध लावणाऱ्या एथान झुकेरमॅनने काही काळापूर्वीच जगासमोर दिलगिरी व्यक्त करून त्याचे मूळ उद्देश जगाला सांगितले. एथान झुकेरमॅनने आपली बाजू ‘द अटलांटिक’ या वृत्तपत्रात मांडली आहे. 

नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात झुकरमॅनने ट्रायपॉड.कॉम या कंपनीसाठी काम केलं. ट्रायपॉड.कॉम पदवीधर विद्यार्थ्यांना गरज असलेल्या साधन-सामग्री आणि सेवा उपलब्ध करवून देत असे. ही व्यवसायाची कल्पना अयशस्वी झाल्यानंतर ट्रायपॉड.कॉमने आपल्या व्यवसायाची कल्पना बदलली आणि वेबपेज-होस्टिंग देणाऱ्या कंपनीबरोबरच ट्रायपॉड.कॉम हे एक “प्रोटो-सोशल नेटवर्क” बनले. पण ट्रायपॉडला यातूनही काहीच नफा मिळत नव्हता.

ट्रायपॉडने व्यवसाय चालू ठेवण्यासाठी अनेक नफा मिळवून देणाऱ्या मार्गांचा अवलंब केला; विविध प्रकारच्या मालाची विक्री, सबस्क्रिप्शन सेवा आणि अगदी सशुल्क मासिक, सगळं विफल ठरलं. पण शेवटी सगळ्यात प्रभावशाली आणि अर्थार्जन करवून देणारा मार्ग सापडला तो म्हणजे जाहिरातींचा आणि इथूनच या पॉप-अप ॲड्स प्रकाराला सुरुवात झाली. एथान झुकेरमॅनने आपल्या द अटलांटिक या वृत्तपत्रातील लेखात लिहिलं होतं:



“एवढं सगळं करूनही शेवटी आम्हाला जाहिरातीतून नफा मिळाला. आम्ही तयार केलेले मॉडेल यूजर्सच्या होमपेजचे अभ्यासात्मक विश्लेषण करत, जेणेकरून त्यांनी भेट दिलेल्या वेबपेजेसवर आम्ही जाहिराती दाखवू शकू, अशाप्रकारे आम्ही जाहिरातदाराच्या टूलकिटमधील सर्वात घृणास्पद साधन तयार केलं – पॉप-अप जाहिरात.

पॉप-अप जाहिरात म्हणजे यूजर्सच्या पेजशी काहीही संबंध नसताना थेट त्या पेजवर एखादी जाहिरात अचानकपणे टाकून देणे. यामुळे जाहिरातदारांना आपली जाहिरात आणि त्या पेजवरील मजकूर याचा काही संबंध असेल की नाही याची चिंता सतावत असे, उदाहरणार्थ एखाद्या शैक्षणिक वेबसाईटवर अचानक बिअरची जाहिरात आली तर? किंवा एखाद्या ऑनलाईन गेममध्ये शैक्षणिक साहित्याची जाहिरात आली तर?

अचानक विंडो लाँच करण्यासाठी आणि त्यात जाहिरात चालवण्यासाठीचा कोड मी लिहिला. मला माफ करा. आमचा हेतू चांगला होता.”

एम.आय.टी. येथील सेंटर फॉर सिव्हिक मीडियासाठी काम करणारा झुकेरमॅन सध्याच्या इंटरनेटविश्वाबद्दल खदखद व्यक्त करतो. त्याला सध्याच्या अतिप्रमाणात झालेल्या  जाहिरातींवर आधारित इंटरनेटच्या स्थितीबद्दल वाईट वाटत असल्याचं तो सांगतो. त्याच्या मते जाहिरात हीच वेबचं मूळ पाप आहे, तसेच वस्तू आणि सेवा विकण्यासाठी जाहिरात हाच एक पर्याय मानल्यामुळे इंटरनेटची अवस्था बेकार झाल्याचंही तो नमूद करतो.

जाहिरातक्षेत्र हे अनेक व्यवसायांना जरी फायद्याचं असलं तरी जाहिरात हाच एकमेव पर्याय नाही, अशी त्याची मान्यता आहे. आम्हाला इंटरनेटचे भविष्य जसे हवे आहे, तशा भविष्याकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी याच तंत्रज्ञानात उपलब्ध आहेत किंवा सहजासहजी उपलब्ध होऊ शकतात, आपण फक्त शोध घ्यायला हवा.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘द वेब वी वॉन्ट’ नावाचा उपक्रम! या उपक्रमाला वर्ल्ड वाईड वेबचे सर्वेसर्वा सर टीम बर्नर्स ली वैयक्तिकरित्या पाठिंबा देतात. या उपक्रमाद्वारे आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या, मुक्त आणि खाजगी इंटरनेटसाठी मोहीम चालवली जाते.

झुकेरमेनच्या मते व्यवसायात नफा मिळवण्यासाठी इतर मॉडेल्सचे इम्प्लिमेंटेशनही करता येईल आणि कदाचित त्यापैकी काही आज अस्तित्वात असतीलही. पुढे तो म्हणतो, “इंटरनेट वापरकर्त्यांच्या सेवांसाठी शुल्क आकारणे आणि त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करणे हा यावरील एक सोपा उपाय आहे, कारण सेगॉव्स्की कंपनी आपल्या पिनबोर्ड वेबसाईटच्या बाबतीत असंच करत आहे. ही एक बुकमार्किंग साईट आहे, ज्यात प्रत्येक यूजरसाठी साइन-अप शुल्क आकारलं जातं, हे शुल्क एका यूजरला एकाच वेळी भरण्याची आवश्यकता असते. जाहिरातमुक्त फेसबुकची सदस्यता घेण्यासाठी आणि तुमचा मुख्य आणि डेटा आणि मेटाडेटा विकला जाणार नाही यासाठी असा काय खर्च येईल?”

पुढे तो लिहितो, “अत्यंत कमी प्रोसेसिंग फी घेऊन आर्थिक व्यवहार करणाऱ्या बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीसारख्या सिस्टीमचे आमच्यासारखे  डिजिटल जगातील तज्ज्ञच निकटवर्तीय आहेत. क्रिप्टोकरन्सीला मुख्य प्रवाहात आणणे हे स्टेलरसारख्या प्रकल्पांचे मुख्य ध्येय आहे आणि क्रिप्टोकरन्सीसारख्या  सिस्टिम्स केवळ  डिजिटल जगातील तज्ज्ञांसाठीच नसून प्रत्येकाला त्या वापरता याव्या असे त्यांना वाटते.” (पण प्रत्यक्षात मात्र बिटकॉइन व्यवहाराचा खर्च सध्या तरी डॉलरचा महत्त्वपूर्ण अंश आहे.)

पुढे झुकरमॅन म्हणतो, “जर स्टेलर आणि तद्वत कंपन्या मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आणि अशा क्रिप्टोकरन्सीज्-ची प्रोसेसिंग फी कमी झाली तर आपण इंटरनेटला खूप कमी किमतीतही वापरू शकतो.”

थोडक्यात झुकरमॅनच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला पॉप-अप ॲड्स किंवा इंटरनेटवर दिसणाऱ्या ॲड्स नको असतील तर त्यासाठी क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि क्रिप्टोकरन्सी सामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या स्टेलरसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपल्या सर्वांचं यावरील मत कमेंट्सद्वारे नक्की कळवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेच्या स्थानिक रेड इंडियन्सच्या हक्कांसाठी याने बलाढ्य अमेरिकेला अंगावर घेतलं होतं

Next Post

या ब्रिटिश अधिकाऱ्याने पेरियार नदीवर धरण बांधलं आणि मद्रास प्रांताचा दुष्काळ कायमचा संपला

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या ब्रिटिश अधिकाऱ्याने पेरियार नदीवर धरण बांधलं आणि मद्रास प्रांताचा दुष्काळ कायमचा संपला

माशा मारण्याच्या पंख्यामुळे दोन देशांमध्ये संघर्ष पेटला होता आणि तो तब्बल ७३ वर्षे चालला!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.