The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नासाने एकदा एक ‘स्पेस शटल’ लॉस एंजेलिसच्या रस्त्यावरून चालवत नेलं होतं..!

by द पोस्टमन टीम
28 August 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जर एखादा ट्रॅक्टर ड्रायव्हर हवेत ट्रक्टर उडवू लागला तर..? किंवा अंतराळात यान सोडणारी संस्था रस्त्यावर यान चालवू लागली तर..? या गोष्टींची कल्पना करणं देखील कठिण आहे. मात्र, ‘नासा’सारख्या संस्थेनं ही अशक्य गोष्ट करून दाखवली आहे आणि तेही एकदा नाही तर दोनदा! आतापर्यंत नासानं अवकाशात अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत.

१२ ऑक्टोबर २०१२ रोजी नासानं ‘एन्डेवर’ हे स्पेसशटल आणि २१ मे २०१६ रोजी यानांचं एक्सटर्नल फ्युएल टँक अमेरिकेतील रस्त्यावर चालवण्याची किमया केली. ही अवजड व अवाढव्य धडांची रस्त्यांवरून वाहतूक करताना भयंकर कसरत करावी लागली. मात्र, नेहमी अवकाशात काम करणाऱ्या नासाला रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली? असा प्रश्न अनेकांच्या मनात आता निर्माण झाला असेल. काळजी करू नका त्याचं उत्तर देण्यासाठीचं हा लेखन प्रपंच!

जून २०११ मध्ये नासाच्या ‘एन्डेवर’ या स्पेसशटल ऑर्बिटरनं आपली शेवटची मोहिम पूर्ण केली. त्यानंतर त्याला सेवानिवृत्त करण्यात आलं. निवृत्ती दिल्यानंतर या भल्या थोरल्या धुडाला नष्ट न करता त्याला कायमस्वरूपी प्रदर्शनात ठेवण्याचा निर्णय नासानं घेतला. मात्र, त्यासाठी त्याची रवानगी साऊथ लॉस एंजेलिसमधील ‘कॅलिफोर्निया सायन्स सेंटर’मध्ये करावी लागणार होती.

एडवर्ड्स एअर फोर्स बेसवर असलेल्या नासाच्या ड्रायडेन फ्लाइट रिसर्च सेंटरपासून त्याला कॅलिफोर्निया सायन्स सेंटरपर्यंत पोहचवण्याची एक नवीनचं आणि निराळी मोहिम नासाला हाती घ्यावी लागली. ‘एन्डेवर’ला एका शटल कॅरियर एअरकराफ्टच्या सहाय्यानं आरामात लॉस एंजेलिस आंतराराष्ट्रीय विमानतळापर्यंत नेण्यात आलं. तिथून पुढे मात्र, खरी कसरत सुरू झाली. १६० चाकांच्या वाहनावर ‘एन्डेवर’ची स्वारी बसवण्यात आली. विमानतळापासून ते सायन्स सेंटरपर्यंतचं १२ मैलांचं अंतर पार करण्यासाठी संपूर्ण लॉस एंजेलिस शहरातील रस्त्यांवरून त्याला फिरवावं लागलं. रस्त्यावरून आपल्या शेवटच्या मोहिमेवर निघालेल्या ‘एन्डेवर’च्या प्रवासासाठी तब्बल १ कोटी डॉलर्सचा खर्च करण्यात आला होता!

१२२ फूट लांबी आणि ७८ फूट विंगस्पॅन असलेल्या या स्पेस शटलला अरुंद रस्ते आणि तीक्ष्ण वळणांमधून बाहेर काढण्यात अनेक अनपेक्षित अडचणी आल्या. मात्र, तंत्रज्ञ, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनी या अडचणींवर यशस्वीपणे मात करण्यात आली. आकाशात हवेच्या वेगाशी सामना करणार एन्डेव्हर जमिनीवर मात्र, असहाय्य दिसत होत. ताशी दोन मैलांपेक्षा कमी वेगानं त्याचा प्रवास सुरू होता. असंख्य ट्रान्समिशन लाईन आणि ४०५ फ्रीवे ओलांडून शेवटी त्याला त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचवण्यात आलं. कॅलिफोर्निया सायन्स सेंटरच्या ‘सॅम्युअल ओस्चिन स्पेस शटल पॅव्हेलियन’मधील सहा दिवसांच्या स्पेसफेस्टमध्ये ‘एन्डेव्हर’ सर्वात अगोदर ठेवलं जाणार होतं.



‘एन्डेवर’ हे नासाचं पाचवं आणि शेवटचं स्पेस शटल आहे. २८ सप्टेंबर १९८७ रोजी त्याची बांधणी सुरू झाली होती आणि एप्रिल १९९१ मध्ये ते कॅलिफोर्निया ‘पामडेल असेंब्ली प्लांट’मधून तयार होऊन बाहेर पडलं होतं. १७६८ मध्ये दक्षिण पॅसिफिक पार करण्यासाठी निघालेला खलाशी जेम्स कुकच्या जहाजाचं नाव या स्पेस शटलला देण्यात आलं होतं. एन्डेवरनं आपल्या कारकिर्दीत २५ वेळा उड्डाण केलं असून १२.३ करोड मैलांचा प्रवास केलेला आहे. याशिवाय २९९ दिवस ते अंतराळात राहिलं आहे. डिस्कव्हरी, एंटरप्राइज आणि अटलांटिस प्रमाणं, एन्डेवर देखील संशोधक व अभियंत्यांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहिलं.

‘एन्डेवर’ला त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी सुखरूप पोहचवल्यानंतर चार वर्षांनंतर पुन्हा नासाला तशीच एक ‘रस्ते मोहिम’ हाती घ्यावी लागली नासाच्या स्पेस शटल कार्यक्रमातील अस्तित्वात असलेली शेवटची ‘फ्लाईट क्वालिफाईड एक्सटर्नल फ्युएल’ (इंधन) टँक लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवरून कॅलिफोर्निया सायन्स सेंटरमध्ये पोहचवण्याची ही मोहिम होती. २१ मे २०१६ रोजी १६.५ मैलांचा हा प्रवास यशस्वीपणे पार पाडण्यात आला होता. १५४ फूट लांबींची ही(ईटी-९४) टाकी मरीना डेल रे बंदरातून सायन्स सेंटरकडे नेण्यात आली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

बाह्य टाकीसारख्या मोठ्या वस्तूची वाहतूक करणं ही काही सोपी गोष्ट नाही. अशा टाक्या नियमितपणे नासाच्या न्यू ऑर्लन्समधील मिचौड असेंब्ली केंद्रातून फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरला बार्जच्या (मालवाहक नौका) सहाय्यानं हस्तांतरित केल्या जातात. मात्र, रस्त्यावरून त्यांची वाहतूक जास्त गुंतागुंतीची होती.

२०१२ साली स्पेस शटल ऑर्बिटर एन्डेवरनं लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळापासून कॅलिफोर्निया सायन्स सेंटरपर्यंत असाच प्रवास केला होता, त्यामुळं लॉस एंजेलिसला अगोदर अशा प्रकारच्या आव्हानाचा अनुभव होता. ईटी-९४ टँक एन्डेवरपेक्षा रुंदीला आणि उंचीला कमी होती मात्र, लांबीला खूपच जास्त होती. त्यामुळं रस्त्याला थोडे जरी वळण असेल तरी मोठ्या आव्हानांचा डोंगर समोर उभा राहत होता. मात्र, या सर्वांवर मात करून ईटी-९४ टँकला सुरक्षित सायन्स सेंटरमध्ये पोहचवण्यात आलं.

२००३ मध्ये, एसटीएस -१०७ मोहिमेदरम्यान कोलंबिया या अंतराळ यानाचा अपघात झाला. ईटी – ९४ सिस्टर टँक असलेल्या ईटी -९३ च्यामाध्यमातून कोलंबियाला इंधन भरण्यात आलं होतं. त्यानंतर ईटी -९४ ही एकमेव लाईटवेट टाकी अस्तित्वात होती. त्यामुळं कोलंबियाच्या अपघातात टँकच्या बाहेरील बाजूला असणाऱ्या इन्सुलेटिंग फोमची काय भूमिका होती हे तपासण्यासाठी ईटी -९४ च्या अनेक तपासण्या करून विश्लेषण केलं गेलं होतं.

विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर, तिला मिचौड असेंब्ली फॅसिलिटीमध्ये ठेवण्यात आलं. अंतराळात उड्डाण करण्याच्या संधीची तिला प्रतिक्षा होती. मात्र, भविष्यात तिला ती कधीच मिळाली नाही. कारण ती नवीन सुपर-लाइटवेट टाक्यांच्या तीव्रतेशी स्पर्धा करू शकत नव्हती. अखेरीस, नासानं ईटी – ९४ टँक सार्वजनिक प्रदर्शनासाठी कॅलिफोर्निया सायन्स केंद्राच्या ताब्यात देऊन टाकली. ईटी – ९४ टँक ही एसटीएस फ्लाइट हार्डवेअरचा सध्या अस्तित्वात असलेला एकमेव नमुना आहे.

नासानं अंतराळात अनेक कठिण मोहिमा पार पाडल्या होत्या. आता ‘एन्डेवर’ हे स्पेसशटल आणि ईटी-९४ एक्सटर्नल फ्युएल टँक अमेरिकेतील रस्त्यावर चालवण्याची किमया देखील करून दाखवली. गंमतीची गोष्ट म्हणजे त्यापूर्वी कितीतरी वर्ष अगोदर भारतीयांनी सायकलवरून रॉकेटचे भाग वाहून नेले होते!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

१५० लोकांचा बळी घेणारी सर्वात म्हातारी सीरिअल कि*लर बाबा अनुज्का

Next Post

भारताने २४ तासांत ५ कोटी झाडांची लागवड करून जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

भारताने २४ तासांत ५ कोटी झाडांची लागवड करून जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय

अमेरिकेने कारगिल यु*द्धात GPS ची मदत नाकारली, मग इस्रोने बनवलं स्वदेशी ‘नॅव्हिक’

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.