The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हावर्ड ह्युजने आयुष्यभर विमानं बनवली, उडवली आणि विमानातच जीव सोडला..!

by द पोस्टमन टीम
23 December 2024
in मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


पैसे कमावण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही करत असतो, कोणी डॉक्टर होतो तर कोणी इंजिनिअर, कोणी चित्रपट बनवतं तर कोणी विमान चालवतं.

पण एक अफलातून माणूस असा आहे जो एक निर्माता होता, वैमानिक होता, चलचित्रपट निर्माता होता, आणि स्वतः विमानही बनवत होता!

या माणसाचं नाव आहे हावर्ड ह्युज!

हावर्ड ह्युज हा एक बहुआयामी असा व्यक्ती होता. हावर्डकडे प्रचंड पैसा-अडका आणि संपत्ती होती. पण तो एका वेगळाच कारणासाठी प्रसिद्ध होता ते म्हणजे त्याचा विक्षिप्तपणा आणि त्याचा एकाकीपणा!

हावर्डचे वडीलही संशोधक होते. त्यांनी ड्रिल मशीनसाठीच्या एका ‘बिट’चा धारदार लोखंडी टोकाचा शोध लावला. या बिटचा वापर करून कठीणातले कठीण दगड फोडले जात. तोपर्यंत कठीण दगड फोडले जातील असं अवजार उपलब्ध नव्हतं पण हावर्डच्या वडिलांच्या शोधामुळे कठीण दगड फोडून त्याखाली असलेल्या तेलाच्या साठ्यापर्यंत पोचणं अगदी सोपं झालं. याच्या पेटंट आणि निर्मितीमधून हावर्डच्या वडिलांना बराच नफा झाला.



हावर्ड लहान असताना त्याला फार मित्र नव्हते, तो शाळेतही फार रमायचा नाही. शाळेत अभ्यास करत बसण्यापेक्षा त्याला वेगवेगळ्या मशिन्स हाताळून त्यापासून काहीतरी नवीन मशीन तयार करायला आवडायचं. कॉलेजला असताना त्याच्या आईने त्याला मोटारसायकल घेऊन द्यायला नकार दिला पण हावर्डने हार मानली नाही. त्याने स्वतः एक मोटार तयार केली, तिला आपल्या सायकलसोबत जोडून स्वतःची मोटारसायकल बनवली!

हावर्ड अवघ्या १६ वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर दोनच वर्षांनी त्याच्या बाबांचंही निधन झालं. यानंतर हावर्डने शिक्षण सोडून दिलं आणि आपल्या वडिलांच्या कंपनीचा ताबा घेतला. त्यानंतर काहीच वर्षांनी त्याने ही कंपनी विकून टाकली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हावर्डने लग्न केलं. १९२६ साली त्याने आपल्या पत्नीसह हॉलिवूडला जाण्याचा निर्णय घेतला. हॉलिवूडमध्ये हावर्डचे काका राहत असत जे एक पटकथालेखक होते. तिथे राहत असताना हावर्डला चित्रपट बनवण्यात रस निर्माण होऊ लागला.

त्याने एकामागोमाग एक अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्याच्या ‘टू अरेबियन नाईट्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपटाचा पुरस्कारही मिळाला. या यशानंतर १९२७ मध्ये हावर्डने ‘हेल्स एंजल’ चित्रपट बनवायला घेतला. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनेक संकटं आली. बरेच अभिनेते, निर्माते काम सोडून गेले पण हावर्डने हार न मानता अखेर १९३० साली हा चित्रपट पूर्ण केला. यादरम्यान मात्र हावर्ड आपल्या पत्नीला वेळ देऊ शकला नाही आणि यामुळेच त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली.

घटस्फोटानंतरही हावर्डने चित्रपट बनवणं सुरूच ठेवलं, नंतर त्याने तब्बल २५ चित्रपट बनवले.

यानंतर मात्र हावर्डला अजून एक वेड लागलं, विमानांचं!! १९३२ साली त्याने ह्युज एअरक्राफ्ट कंपनीची स्थापना केली. त्याला एक वेगवान विमान बनवायचं होतं, त्यासाठी त्याने अनेक इंजिनिअर्स आणि डिझायनर्सना कामावर ठेवलं, त्याने अनेक विमानंही खरेदी केली.

१९३८ साली त्याने विमानातून पृथ्वीप्रदक्षिणा केली, ती ही सगळे विक्रम मोडीत काढणारी ठरली! ९१ तास आणि १४ मिनिटांमध्ये त्याने बनवलेल्या विमानातून पृथ्वीभोवती चक्कर मारली.

जगात दुसरं महायु*द्ध सुरू असताना हावर्डचं लक्ष मिलिटरीच्या विमानांकडे गेलं. सैनिकांची आणि यु*द्धसामग्रीची ने-आण करायला त्याने एक मोठं विमान बनवायला घेतलं. या विमानाच्या वापरासंबंधी सरकरशीही बोलणी केली. युरोपातील यु*द्धात या विमानाचा वापर केला जाणार होता.

हावर्डच्या विमान बनवण्याच्या काळात त्याला अनेक अपघाती दुर्घटनांना सामोरं जावं लागलं. एका भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर हावर्ड थोडक्यात बचावला. या अपघातात त्याच्या बरगड्या मोडल्या, अनेक ठिकाणी जखमा झाल्या आणि तो आगीतही होरपळला गेला.

त्याच्यावर उपचार सुरू असतानाही तो शांत बसला नाही, हॉस्पिटलमध्ये असताना त्याने इंजिनिअर्सच्या मदतीने नवीन हॉस्पिटल बेड बनवला.

१९६६ साली तो लास वेगासला गेला आणि ‘डेझर्ट इन’ हॉटेलमध्ये वास्तव्यास राहिला. काही दिवसांनी त्याला हॉटेलमधून काढून टाकण्याची धमकी दिली गेली तेव्हा त्याने चक्क सगळं हॉटेलच विकत घेतलं! यानंतर त्याने लास वेगास शहरात अनेक हॉटेल्स आणि जमीन विकत घेतली.

या दरम्यान हावर्डला फार लोकांनी बघितलं नाही. त्याने स्वतःला हॉटेलमध्येच कोंडून घेतलं होतं. या एकटेपणात त्याला OCD (Obsessive–compulsive disorder)ने ग्रासले. त्याच्या शेवटच्या वर्षांत तो झोप न घेता काम करत बसे, त्याच्या काम करायचा खोलीतही पूर्ण काळ्या रंगाचे पडदे होते. त्या खोलीत तो दिवसेंदिवस काम करत राहत असे. ड्रग्जच्या अति सेवनाने आणि योग्य आहार न घेतल्याने तो क्षीण होऊ लागला. काहीच दिवसांत तो काम करण्यास असमर्थ झाला.

१९७६ साली मेक्सिकोहून टेक्सासला जात असताना विमानातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या शेवटच्या दिवसात त्याची तब्येत इतकी खालावली होती की त्याला ओळखणंही कठीण होऊन बसलं होतं. त्याच्या मृत्यूनंतर त्याची ओळख पटवण्यासाठी त्याच्या बोटांचे ठसे घेण्यात आले.

हावर्डला अमेरिकेत त्याच्या चित्रपटांच्या योगदानासाठी ओळखलं जातं.

हावर्डचं स्वतःचं आयुष्यच इतकं भन्नाट होतं की त्याच्यावरच अनेक चित्रपट बनवले गेले. ‘द अमेझिंग हावर्ड ह्युज’ , ‘एविएटर’, ‘मेलवीन अँड हावर्ड’ हे त्यातले काही चित्रपट.

अतिशय हुशार, मेहनती, प्रसिद्ध पण तितकाच एकलकोंडा असलेल्या हावर्डच्या अनेक चित्रपटांचा संग्रह आता ‘फिल्म अकॅडमी’जवळ ठेवण्यात आला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या माणसाने तब्बल ७७ वर्षं एकच रोल्स रॉयस चालवली..!

Next Post

हॉलिवूड सुपरस्टार ‘सिल्व्हस्टर स्टॅलोन’ने हरिद्वारमध्ये त्याच्या मुलाचं श्राद्ध घातलं होतं..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

हॉलिवूड सुपरस्टार 'सिल्व्हस्टर स्टॅलोन'ने हरिद्वारमध्ये त्याच्या मुलाचं श्राद्ध घातलं होतं..!

'रन आउट' झालेल्या 'इयान बेल'ला धोनीने परत बोलावलं, आणि जगासमोर स्पोर्ट्समनशिपचं उदाहरण ठेवलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.