The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंटरनेट सेन्सेशन बनलेली ग्रम्पी कॅट करोडो डॉलर्सची मालकीण बनली होती

by द पोस्टमन टीम
8 January 2026
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


तुम्हाला ‘पॉल’ नावाचा ऑक्टोपस आठवतोय? २०१० साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या फुटबॉल विश्वचषकाच्यावेळी त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. त्यानं अनेक सामन्यांची भविष्यवाणी केली होती. जर्मनीच्या सर्व सामन्यांबाबत त्यानं दिलेले सर्व कल अचूक आले होते. याशिवाय स्पेन आणि हॉलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याबाबत देखील त्यानं स्पेनच्या विजयाचा कल दिला होता. स्पेन विजयी झाल्यानंतर तर जगभरात पॉलच्या नावाची धूम होती. खेळाडुंपेक्षाही त्याचीच जास्त चर्चा होती. त्याच्या रुपात पहिल्यांदाच इंटरनेटवर एखाद्या प्राण्याला एवढी प्रसिद्धी मिळाली होती.

अमेरिकेतल्या एका मांजरीनं पॉलला देखील मागे सोडलं. ‘ग्रम्पी कॅट’ नावानं प्रसिद्धी झालेली ही मांजर अल्पावधीतचं इंटरनेट सेलिब्रेटी झाली होती. अगदी एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणचं तिचा थाट होता.

ॲरिझोना प्रांतातील मॉरिस्टोनमध्ये राहणाऱ्या तबॅथा बॅन्सन यांच्या घरी ४ एप्रिल २०१२ रोजी ‘टारडर सॉस’चा जन्म झाला होता. कॅलिको मांजर आणि निळ्या-पांढरा टॅबी बोका तिचे पालक होते. टारडर तिच्या इतर भावंडांपेक्षा काहीशी वेगळी होती. तिच्या ठेंगणेपणामुळं तिचा चेहरा विचित्र दिसत असे. ती कायम वैतागलेली आहे, असं दिसे. त्यामुळं तिला गमतीनं ग्रम्पी हे नाव पडलं. ‘ग्रम्पी कॅट’चं खरं नाव ‘टारडर सॉस’ असं होतं. २२ सप्टेंबर २०१२ रोजी तिची मालकीण असलेल्या तबॅथा बॅन्सनचा भाऊ, ब्रायननं न्यूज वेबसाइट रेडिटवर तिचं छायाचित्र पहिल्यांदा पोस्ट केलं. त्यानंतर ती रातोरात प्रसिद्ध झाली. रेडीट वापरकर्त्यांनी तिच्या फोटोपासून तयार केलेले ‘Lolcats’ आणि विडंबन लोकप्रिय झाले. ती एका लोकप्रिय इंटरनेट मिमचा विषय झाली होती.

मांजरी कशाही असो जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेकांना, विशेषत: महिला वर्गाला मांजर हा प्राणी प्रचंड आवडतो. त्यामुळं जेव्हा ग्रम्पी कॅटला देखील मोठ्या प्रमाणात लोकांचं प्रेम मिळालं. सोशल मीडियावर तर या ग्रम्पी कॅटचा मोठा जलवा होता.

मिम मॅनेजर असलेल्या ‘बेन लॅशेस’ यानं कीबोर्ड कॅट आणि न्यान कॅटमध्ये ग्रम्पी कॅटचा समावेश केला. २०१३ मध्ये तिची मालकीण तबॅथा ग्रम्पी कॅटचं शेड्युल सांभाळण्यासाठी चक्क आपली पूर्णवेळ नोकरी सोडून दिली. तिचा भाऊ ब्रायन ग्रम्पी कॅटची वेबसाइट, फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटर खाती सांभाळतो. २३ ऑगस्ट २०२० पर्यंत ग्रम्पी कॅटच्या अधिकृत फेसबुकपेजला एकूण ८३ लाख, इन्स्टाग्रामवर २६ लाख, ट्विटरवर १५ लाख फॉलोअर्स आणि यूट्यूबवर २ लाख ८३ हजार सबस्क्रायबर्स होते.



इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झालेली ग्रम्पी कॅट एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणं मीडियाला सामोरी जाई. तिला अनेक टेलिव्हिजन शोज मध्ये बोलवण्यात आलं. शक्यतो तबॅथा, तिचा भाऊ ब्रायन आणि बहिण क्रिस्टल यांच्यासह ती कॅमेराच्या समोर जाई. अनेक प्रसिद्ध टॉकशोमध्ये तिच्या मालकिणीच्या मुलाखती घेण्यात आल्या. याशिवाय ‘फ्रिस्कीज’ आणि ‘जनरल मिल्स’च्या हनी नट चेरिओस जाहिरातींमध्ये देखील तिला घेण्यात आलं होतं.

मार्च २०१३ मध्ये, साऊथ बाय साउथवेस्ट (एसएक्सएसडब्ल्यू) इंटरएक्टिव्ह सेशनमध्ये ती उपस्थित होती. मॅशेबल हाऊसमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये ती दररोज दोन तास दिसत असे. तिच्या स्पोकसॅट प्रायोजकत्वाचा भाग म्हणून, फ्रिस्कीनं तिला ‘विल किटी प्ले विथ इट?’ या चित्रपटासाठी मानधन आणि प्रवास खर्चही दिला.

एसएक्सएसडब्ल्यूचं इंटरऍक्टिव्ह सेशननंतर सीएनएन, सीबीएस न्यूज आणि सीएनईटीने ग्रम्पी कॅटला एलॉन मस्क, अल गोर आणि नील गेमन यांच्यापेक्षाही प्रसिद्ध असल्याचं म्हटलं होतं. एसएक्सएसडब्ल्यूमध्ये तिचे चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी तासन् तास रांगेत थांबले होते. या चाहत्यांच्या गर्दीमध्ये इंटरनेट आंत्रप्रिनॉर डेनिस क्रॉली, गायक अँड्र्यू डब्ल्यू के आणि अभिनेता इयान सोमरहाल्डरही होते. सोमरहॅल्डरनं ग्रम्पी कॅटसोबत फोटो काढले आणि तिला आपलं ‘नवीन प्रेम’ म्हटलं होतं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

गंमत म्हणजे या मांजरीच्या नावानं ‘ग्रम्पी कॅट लिमिटेड’ नावाची कंपनी देखील सुरू करण्यात आली आहे. या कंपनीकडे युनायटेड स्टेट्स पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेले आठ ट्रेडमार्क आहेत. अधिकृत ग्रम्पी कॅट ऑनलाइन शॉपवर १०८२ वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या. टी-शर्ट आणि मग सारख्या परवानाकृत वस्तूंची जाहिरात ग्रम्पी कॅट वेबसाइटवर केली जाते आणि त्या विकल्याही जातात. याशिवाय मांजरीचे सॉफ्ट टॉइज देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

क्रॉनिकल बुक्सनं २०१३ पासून दरवर्षी ‘द ग्रम्पी कॅट वॉल कॅलेंडर’ प्रकाशित केलं आहे. या कॅलेंडरच्या माध्यमातून अमेरिकेतील घराघरात ही मांजर जाऊन पोहचली आहे. २३ जुलै २०१३ रोजी ‘ग्रम्पी कॅट: अ ग्रम्पी बुक’ हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाला देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. हे पुस्तक जगभरातील मोठ्या आणि किरकोळ विक्रेत्यांकडे प्रिंट आणि डिजिटल अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. डोव्हर पब्लिकेशन्सनं देखील ग्रम्पी कॅट पेपर डॉल, स्टिकर, कलरिंग आणि टॅटू बुक्स प्रकाशित केली आहेत.

ग्रम्पी कॅटची अनेक डिजिटल प्रोडक्टस् देखील बाजारात आणली गेली आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये, ‘ग्रंपी कॅट: अनइम्प्रेस्ड’ नावाचा एक अधिकृत व्हिडिओ गेम गॅन्झ स्टुडिओनं रिलीज केला होता. तो फेसबुक, आयओएस डिव्हाइस आणि अँड्रॉइड डिव्हाइसवर प्ले करण्यायोग्य आहे. हा गेम एक मॅच-थ्री गेम आहे. खेळाडूंना प्रत्येक लेवलपार करताना मिम्स अनलॉक करावे लागतात. अतिशय गमतीदार असलेल्या गेमला देखील लोकांचा प्रतिसाद मिळाला होता.

१४ मे २०१९ रोजी वयाच्या सातव्या वर्षी ग्रम्पी कॅटनं अखेरचा श्वास घेतला.

मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे तिचा मृत्यू झाल्याचं तिच्या मालकिणीनं सांगितलं. मृत्यूनंतर तीन दिवसांनी, १७ मे रोजी सोशल मीडियावर तिच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. तिच्या मृत्यूनंतर जगभरात तिला लोकांनी श्रद्धांजली वाहिली. सोशल मीडियावर अनेक शोकसंदेशही लिहले गेले.

साधारण माणूस जर चेहऱ्यावर कायम वैतागलेले हावभाव घेऊन वावरला तर लोक त्याला टाळण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हेच हावभाव चेहऱ्यावर घेऊन एका मांजरीनं जगभरातील असंख्य लोकांच्या मनावर राज्य केलं होतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

स्वतःला पुन्हा चालता यावं म्हणून पैसे जमवले, परंतु एका लहानग्याच्या उपचारासाठी दान केले

Next Post

१९७३ सालापासून म्हणजे तब्बल ५१ वर्षे साधू अमर भारती यांनी एक हात वर केला आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

१९७३ सालापासून म्हणजे तब्बल ५१ वर्षे साधू अमर भारती यांनी एक हात वर केला आहे

भारतीय हवाई दलाची शान असलेल्या 'सुखोई' लढाऊ विमानाबद्दल जाणून घ्या..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.