The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…म्हणून या लढाऊ हेलिकॉप्टरला आकाशात उडणारा रणगाडा म्हणतात…!

by द पोस्टमन टीम
14 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


विमान, हेलिकॉप्टर या गोष्टींचं आकर्षण आपल्याला अगदी लहानपणापासून असतं. आकाशात विमान किंवा हेलिकॉप्टर उडतानाचा आवाज आला, की लगेच आपण जिथं असू तिथून ते बघण्याचा प्रयत्न करणं, आयुष्यात एकदा तरी विमानप्रवास करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. काहींना ते शक्य होतं, काहींना नाही. आधी केवळ हवाईमार्गे प्रवासी व सामान वाहतुकीसाठी वापरली जाणारी ही विमानं आणि हेलिकॉप्टर्स पुढे जाऊन यु*द्धासाठीदेखील वापरली जाऊ लागली. शत्रूवर हवाईमार्गे ह*ल्ला करणे व केलेला ह*ल्ला परतवून लावणे यासाठी त्यांचा वापर सुरु झाला.

आपला स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनाच्या वेळी होणाऱ्या संचलनाच्या कार्यक्रमात आपल्या हवाईदलातील लढाऊ विमानांतर्फे एक सलामी दिली जाते. त्या शोमध्ये आपल्या एअरफोर्समधली बोईंग विमानं समाविष्ट असतात. असंच एक फायटर हेलिकॉप्टर आपल्या एअरफोर्सच्या ताफ्यात दाखल झालंय.

जगातील एक शक्तिशाली लढाऊ हेलिकॉप्टर म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. त्याचं नाव आहे, बोईंग AH-64 अपाचे. हे एक अमेरिकी बनावटीचं ट्विन टर्बोशाफ्ट अटॅक हेलिकॉप्टर आहे.

अमेरिकेत ह्यूज हेलिकॉप्टर्स या कंपनीने १९७५ साली प्रथम अमेरिकी लष्करासाठी एक आधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर म्हणून याचं मॉडेल 77 तयार केलं. यामुळे आधी वापरात असलेल्या बेल AH-1 कोब्रा हेलिकॉप्टर्सचा वापर थांबला. ३० सप्टेंबर १९७५ रोजी पहिल्यांदा हे हेलिकॉप्टर आकाशात झेपावलं. लष्करानं मान्यता दिल्यावर त्याचं उत्पादन सुरू झालं.

१९८४ साली अमेरिकेच्या मॅकडॉनेल डग्लस या कंपनीने ह्यूज हेलिकॉप्टर्स आपल्या ताब्यात घेतल्यानंतरही AH-64 चं काम पुढे चालूच ठेवण्यात आलं. एप्रिल १९८६मध्ये अमेरिकेच्या लष्करी ताफ्यात AH-64 दाखल झालं. त्यानंतर मार्च १९९७ मध्ये याची सुधारित आवृत्ती असलेलं AH-64D अपाचे लॉंगबो हे लढाऊ हेलिकॉप्टर अमेरिकी लष्कराकडे आलं. अमेरिकेशिवाय जपान, ग्रीस, इस्त्राईल, नेदरलँड्स, सिंगापूर अशा इतर देशांनीही या हेलिकॉप्टरचा वापर केलेला आहे.



याचं मूळ मॉडेल AH-64A या नावाने ओळखलं जात होतं. यामध्ये क्रू सीटभोवती एक चिलखतासारखं आवरण होतं. याला दोन GE T700 टर्बोशाफ्ट इंजिन्स होती. साधारण १९९० पर्यंत याच इंजिन्सचा वापर होत होता. त्यानंतर आधुनिक 701C इंजिन्स यामध्ये लावण्यात आली. २०१२ पर्यंत AH-64A मॉडेलची हेलिकॉप्टर्स अमेरिकी लष्कराने वापरली. त्यानंतर ती बदलण्यात आली.

१९९१ मध्ये ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्मनंतर AH-64B ही या हेलिकॉप्टर्सची सुधारित आवृत्ती तयार करण्यात आली. यामध्ये नवीन रोटर ब्लेड्स, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस), अपडेटेड नेव्हिगेशन सिस्टीम आणि नवीन रेडिओ समाविष्ट करण्यात येणार होता. अमेरिकन काँग्रेसने यासाठी ८२ दशलक्ष यूएस डॉलर्सची तरतूदही केली होती, पण त्याला उशीर झाल्यामुळे १९९२ मध्ये हा प्रोजेक्ट रद्द करण्यात आला.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

नंतर पुन्हा एकदा या हेलिकॉप्टर्सच्या आधुनिकीकरणाची योजना बनवण्यात आली. AH-64C नावाच्या या मॉडेलला केवळ आधुनिक 700C इंजिन आणि मास्ट माऊंटेड रडार वगळता लॉंगबो हेलिकॉप्टरची सर्व वैशिष्ट्यं असणार होती. मात्र १९९३ नंतर याच्या नावातील C वगळून AH-64As असं नाव देण्यात आलं.

याचं पुढचं मॉडेल AH-64D अपाचे लॉंगबोमध्ये काचेचं कॉकपिट आणि आधुनिक सेन्सर्स आहेत. त्याशिवाय यात आधुनिक रडार सिस्टीम आहे जी अडथळ्यांमागील लक्ष्यही भेदू शकते. केवळ तीस सेकंदांतच हल्ला करण्यासाठी हे हेलिकॉप्टर तयार होतं. यात अपरेटेड T700-GE-701C इंजिनांची जोडी आहे. न्यू नेव्हिगेशन, टॅक्टिकल इंटरनेट, फॉरवर्ड फ्यूजलेज अशा अनेक सुविधा यात आहेत. याच्या जपानी मॉडेलला AIM-92 स्टिंगर एअर टू एअर मिसाईल जोडण्याची क्षमता आहे.

२०१२ साली AH-64E हे अपडेटेड व्हर्जन लॉंच करण्यात आलं. आधी याला AH-64D ब्लॉक III असं नाव देण्यात आलं होतं. यात सुधारित डिजिटल कनेक्टिव्हिटी, जॉईंट टॅक्टिकल इन्फॉर्मेशन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, सुधारित फेस गिअर ट्रान्समिशनसह आधुनिक T700-GE-701D इंजिन, सुधारित लँडिंग गिअर्स, आधुनिक रोटर ब्लेड्स ई. वैशिष्ट्यं आहेत. नोव्हेंबर २०११ पासून याच्या बुकिंगला सुरुवात करण्यात आली.

२०१४ साली AH-64F ची संकल्पना मांडली गेली. यामध्ये फ्यूचर व्हर्टिकल लिफ्ट ही अत्याधुनिक सिस्टीम असणार आहे. अधिक गतिमान इंजिन, मागे घेता येण्याजोगे लँडिंग गिअर्स, क्रूज दरम्यान मुख्य रोटरमधून लिफ्ट ऑफलोड करण्यासाठी स्टब विंग्स व टेल रोटर जो ९०° च्या कोनात फिरू शकेल अशा अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे.

याशिवाय १९८० मध्ये AH-64A च्या पाण्यातून चालणाऱ्या मॉडेलसाठी टेस्टिंग सुरू झाली होती. तिथल्या नौदलाकडून AH-1 चा वापर सुरू होता. अमेरिकन मेरीटाईम बोर्डाला या नवीन मॉडेलमध्ये खूप रस होता. सुमारे दोन आठवडे त्यांनी याच्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या, पण पुढे जाऊन त्यासाठी निधी न मिळाल्यामुळे हे प्रकरण तिथेच थांबलं.

आपल्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात २०२० च्या जुलै महिन्यात AH-64E अपाचे हेलिकॉप्टर्स दाखल झालेली आहेत. एकूण २२ हेलिकॉप्टर्सची मागणी नोंदवली गेली असून टप्प्याटप्प्यात ती भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केली जातील. वायुसेनेच्या पठाणकोट येथील तळावर AH-64E तैनात असून त्याला ‘उडता टॅंक’ असंही म्हणतात. याची आकाशात २० हजार फुटांपर्यंत उडण्याची क्षमता आहे. क्षेपणास्त्र जोडता येत असल्यामुळे तब्बल २५६ ठिकाणी एकाचवेळी ह*ल्ला करण्याची क्षमता हे हेलिकॉप्टर बाळगून आहे.

इस्त्राईलमध्ये बनलेल्या स्पाईक NLOS या अतिशय भेदक क्षेपणास्त्रासोबत याची चाचणीही करण्यात आलेली आहे. या हेलिकॉप्टरचा वापर करणारा भारत हा जगातील १४वा देश आहे. हे हेलिकॉप्टर दिवसा तसंच रात्रीदेखील ह*ल्ला करू शकतं. अमेरिकेने इराक व अफगाणिस्तानसह झालेल्या यु*द्धात याचा वापर केला होता. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची ताकद आता आणखीन वाढली आहे, यात शंकाच नाही!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या महिलेने पैठणीपासून बनवलेल्या वस्तूंनी तरुणाईला भुरळ घातलीये..!

Next Post

भटकंती : या श्रीकृष्णमंदिरांना तुम्ही एकदातरी भेट द्यायलाच हवी!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

भटकंती : या श्रीकृष्णमंदिरांना तुम्ही एकदातरी भेट द्यायलाच हवी!

रणजीत विक्रम रचले, एकच कसोटी खेळायची संधी मिळाली आणि फिक्सिंगमध्ये अडकला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.