The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा कुत्रा बालवाडीतील लहान मुलांना रोज रस्ता ओलांडायला मदत करतोय..!

by द पोस्टमन टीम
11 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


आपल्याला अनेकांच्या पाळीव कुत्र्यांच्या कथा माहिती असतात. कुत्रा हा माणसाचा चांगला मित्र आहे हे आपल्याला दिसून येईल.

महाराणा प्रताप यांच्या ‘चेतक’ घोड्याचीही कहाणी अशीच. चेतक हा महाराणा प्रतापांचा निष्ठावंत आणि लाडका घोडा. तो अतिशय चपळ आणि हुशार होता. महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात एक युद्ध झालं ज्यात महाराणा प्रताप स्वतः चेतक घोड्यावर स्वार झाले होते. याच युद्धाच्या चकमकीत एका मुघल सैनिकाच्या तलवारीचा वार चेतकच्या एका पायाला लागला आणि चेतक त्यात जखमी झाला. जखमी होऊनही चेतक थांबला नाही, महाराणा प्रतापांचा जीव वाचवण्यासाठी तीन पायांवर तो वेगाने धावत सुटला, मध्ये एक तुडुंब भरलेला नाला लागला, त्यातूनही त्याने महाराणा प्रतापांना सुखरूप बाहेर काढलं. महाराणा प्रताप वाचले पण चेतकने मात्र आपले प्राण सोडले. या प्रसंगानंतर हा स्वामिनिष्ठ ‘चेतक’ इतिहासात अजरामर झाला.

‘हचीको’ हा असाच एक जपानमध्ये राहणारा अतिशय प्रामाणिक कुत्रा. जपानमधल्या एका प्रोफेसरने हचीकोला आपल्या घरी आणलं होतं. त्याला प्रेमाने वाढवलं होतं. प्रोफेसर कामावरून परत येताना हचीको स्टेशनला जाऊन त्यांची वाट बघत बसायचा. त्याचा दिनक्रमच होता हा. एके दिवशी प्रोफेसर कामावर असतानाच आकस्मिक आजाराने त्यांचा मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे हचीको स्टेशनवर जाऊन त्यांची वाट बघत बसला. यावेळी मात्र प्रोफेसर कामावरून परतले नाहीत. इथून पुढची सलग ९ वर्ष रोज हचीको स्टेशनवर जाऊन बसत होता. आपल्या लाडक्या प्रोफेसरची वाट बघत होता. कधीनाकधी तो नक्की परत येईल ही भाबडी आशा हचीकोला रोज स्टेशनकडे घेऊन जायची. याचा शेवट तेव्हाच झाला जेव्हा ९ वर्षांनी हचीकोचाही मृत्यू झाला.

हे सगळे प्राणी आता आपल्यात नसले तरीही इतिहासात ते अजरामर होऊन राहिले आहेत. अशाच एका कुत्र्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत होता. जॉर्जिया देशातल्या बाटुमी शहरातला हा कुत्रा. त्याचं नाव कुपाता.



या कुत्र्याच्या लोकप्रियतेमागे एक वेगळंच कारण आहे. बाटुमीमधल्या एका बालवाडीतील लहान लहान मुलं रस्ता क्रॉस करत होती. ही मुलं रस्ता क्रॉस करत असताना कुपाताही त्यांच्यासोबत रस्ता क्रॉस करत होता.

रस्त्यावरच्या गाड्यांकडे बघून तो भुंकत होता, गाड्यांना तिथेच थांबायला सांगत होता. मुलांना रस्ता नीट सुरक्षितपणे ओलांडता यावा म्हणून कुपाता सतत त्यांच्या आजूबाजूला घुटमळत होता. कुपाताचा हा मुलांना रस्ता ओलांडायला मदत करतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि कुपाता जगभरात जाऊन पोहोचला.

नोना नावाची एक बाई कुपाताचा सांभाळ करते. तिच्या घराबाहेर तो दिवसभर बसलेला असतो, ती त्याला खाऊ-पिऊ घालते. कुपाताला लहान मुलं फारच आवडतात. तो त्यांच्यासाठी बागेत जाऊन थांबतो, लहान मुलांसोबत खेळतो. त्याला कोणतीही लहान मुलं रस्ता क्रॉस करताना दिसली की तो लगेच उठून त्यांना मदत करायला जातो.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

कुपाताला शहरातले अनेक लोक वेगवेगळ्या लाडाच्या नावाने ओळखतात. कोणी त्याला बिम हाक मारतं तर कोणी कुर्शा. कोणी त्याला टेट्रा म्हणून हाक मारतं तर कोणी कुपाता.

त्याचं कुपाता हे नाव जास्त लोकप्रिय झालं. कुपाता एक जॉर्जियन शब्द आहे. कुपाताचा अर्थ सॉसेज (एक खाण्याचा पदार्थ). कुपाताला सॉसेज खायला फार आवडतात म्हणून एका मांसविक्रेत्याने त्याचं नाव कुपाता असं ठेवलं. लोकांनाही ते फार आवडलं आणि सगळे त्याला त्याच नावाने ओळखू लागले.

आता तर बाटुमीच्या टुरिझम ऑफिसने त्याला स्वतःचं छोटंसं ‘डॉग हाऊस’ आणून दिलं. त्यावर त्याने केलेल्या कामाचं कौतुक म्हणून एक चांदणीच्या आकाराचा शिक्का उमटवला आणि त्यावर “पिपल्स चॉईस” असे शब्द छापले. कुपाताला लहान मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळे तो आता एक लोकल सेलिब्रिटी झालाय. त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे तो जगभरातल्या लोकांच्या कौतुकाचा विषय होऊन बसलाय.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जग फिरायचं म्हणून विमानाच्या चाकाला लटकला, विमान उडताच खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला

Next Post

हा माणूस इस्लामिक स्टेटच्या तावडीतून ५० हजारापेक्षा जास्त हस्तलिखितांचं रक्षण करतोय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

हा माणूस इस्लामिक स्टेटच्या तावडीतून ५० हजारापेक्षा जास्त हस्तलिखितांचं रक्षण करतोय

धुळ्याच्या या डॉक्टरने पेशंटच्या किडनीतून १ लाख ७२ हजार १५५ खडे काढून वर्ल्ड रेकॉर्ड बनवलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.