The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मिल मालकांना कळलं की धान्याच्या पोत्यांचा वापर फ्रॉक शिवण्यासाठी होतोय, ते रंगीबेरंगी पोते बनवू लागले

by द पोस्टमन टीम
16 August 2025
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


२०२१ मध्ये ‘हिस्ट्री ऑल डे’ या फेसबुक पेजनं एक फोटो पोस्ट केला. या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोमध्ये विविध डिझाईन्स असलेल्या पोत्यांच्या थप्पीजवळ एक व्यक्ती बसलेला दिसत आहे आणि फोटोसोबत काही ओळी देखील होत्या..

‘१९३९ मध्ये, कन्सासमधील महिला मुलांचे कपडे शिवण्यासाठी गव्हाची पोती वापरत असल्याची माहिती गहू गिरणी मालकांना मिळाली. तेव्हा गिरण्यांनी पोती तयार करण्यासाठी रंगीबेरंगी फुलांच्या फॅब्रिकचा वापर सुरू केला जेणेकरून मुलांना सुंदर कपडे मिळतील. गिरणी मालकांचं हे कृत्य दयाळूपणा दाखवणार आहे’, अशा त्या ओळी होत्या.

पोस्टमधील माहिती अचूक आहे. मात्र, यामुळं वाचकांवर काहीस चुकीचं इम्प्रेशन गेलं. फक्त कन्सासमध्येच धान्याच्या पोत्यांचा वापर कपडे शिवण्यासाठी केला जाई, असा नागरिकांचा समज झाला आहे. प्रत्यक्षात २०व्या शतकात संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये अनेक ठिकाणी पोत्यांचा वापर कपडे शिवण्यासाठी केला जात होता.

तसं पाहिलं तर घरगुती कामांसाठी पोत्यांचा वापर भारतीयांना काही नवीन नाही. धान्य भरण्याव्यतिरिक्त अनेक गोष्टींसाठी आपल्याकडे पोती वापरली जातात. मग, शेतातील भाजीपाला मार्केटला नेण्यासाठी असो किंवा उन्हाळ्यात माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी असो. गाव-खेड्यांमध्ये तर कित्येक घरांमध्ये पायपुसणी म्हणून सरळ एक पोतं घडी करून दरवाज्यात टाकलं जातं.



अमेरिकन्स जरा याबाबत सौम्य म्हणावे लागतील. ते गव्हाच्या पोत्यांपासून फक्त कपडे तयार करत. नेमकं असं काय कारण होतं की, समृद्ध अमेरिकन लोकांवर पोत्यांपासून कपडे तयार करण्याची वेळ आली होती. याचा शोध घेण्यासाठी आपल्याला ‘द ग्रेट डिप्रेशन’ आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जावं लागेल.

आपल्याकडे तागापासून पोती तयार केली जातात. अमेरिकेमध्ये जाड प्रतीच्या कापडापासून धान्याची पोती तयार करत. १८व्या शतकापासून अमेरिकेत धान्य आणि इतर अनेक गोष्टी कापडापासून तयार केलेल्या पोत्यांमध्ये वितरित केल्या जाऊ लागल्या. वजनाला हलक्या असलेल्या या पोत्यांमध्ये पीठाची देखील वाहतूक केली जाऊ शकते हे गिरणी मालकांच्या लक्षात आलं. त्याअगोदर लाकडी पेट्यांमधून पिठाची वाहतूक केली जाई. त्यासाठी खर्च आणि श्रम दोन्ही जास्त लागत.

धान्य आणि गिरणी मालकांप्रमाणं गृहिणींनी देखील कापडाच्या पोत्यांची उपयुक्तता शोधून काढली. पीठ काढून घेतल्यानंतर लहान-सहान घरगुती वापरासाठी घरांच्या आजूबाजूला पडलेल्या या पोत्यांचा वापर त्यांनी सुरू केला. सुरुवातीला प्रामुख्यानं किचनमध्ये भांडी पुसण्यासाठी कापडी पोती वापरली जाऊ लागली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पोत्यांचं कापड जर आकर्षक असेल तर त्याचा वापर आणखी कितीतरी उपयुक्त गोष्टी तयार करण्यासाठी होईल ही बाब काही गिरणीमालकांच्या लक्षात आली. ऑक्टोबर १९२४ मध्ये मिस्टर बेल्स, रोस्को, मिसौरी यांनी विविध आकाराची आणि नक्षीकाम असलेली पोती तयार करण्याचं पेटंट दाखल केलं. जेणेकरून त्यांचा वापर अगदी कपडे शिवण्यासाठी देखील करता येईल.

मात्र, गिंगहॅम गर्ल, मदर गिंगहॅम, बेबी गिंगहॅम, आणि गिंगहॅम क्वीन या वेगवेगळ्या ब्रँडमध्ये विभागल्या गेलेल्या मीलला अशी पोती वापरण्याचं सर्वात अगोदर पेटंट मिळालं. त्यांनी त्यांच्या मीलमध्ये एका विशिष्ट पॅटर्नची पोती वापरण्यास सुरुवात केली. त्यावर फुलांचं नक्षीकाम होतं. यामुळं गिरणीला मोठा फायदा झाला आणि त्यांची ग्राहकसंख्येमध्ये वाढ झाली. हे पाहून इतर गिरण्यांनी देखील स्वतःचे फॅशनेबल पॅकेजिंग विकसित करण्यास सुरवात केली. पेस्टलपासून ते नॉव्हेल्टी प्रिंट्स असलेली पोती वापरली जाऊ लागली. पोत्यांचा सर्वात आकर्षक नमुना कोण विकसित करू शकतं? याची जणू स्पर्धाचं गिरणी मालकांमध्ये लागली होती.

पुढे १९४० च्या दशकापर्यंत युनायटेड स्टेट्स दुसऱ्या महायु*द्धात गुंतलं. प्रत्यक्ष यु*द्धात नसलेल्या अमेरिकन लोकांनी आपल्या सैनिकांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये यासाठी अनेक त्याग केले. देशात शिल्लक असलेला कापूस, सुत आणि लोकर सैनिकांसाठी कपडे तयार करण्यासाठी पाठवला गेला. परिणामी नागरिकांच्या कपड्यांसाठी कापडाची कमतरता निर्माण झाली. मात्र, हताश न होता गृहिणींनी पिठाच्या कापडी पोत्यांपासून मोठ्या प्रमाणात कपडे तयार केले.

अल्पावधीतच ‘पिठाच्या पोत्याचा ड्रेस’ ही अमेरिकेत अगदी सामान्य गोष्ट झाली. त्यावेळी जिकडे पाहालं तिकडे पिठाच्या पोत्यांचे कपडे दिसत. गंमत म्हणजे महिलांसाठी शिवणकाम स्पर्धा देखील घेतल्या. त्यात महिलांनी पोत्यांचा वापर करून आपलं शिवणकामाचं कौशल्य दाखवलं. हे कपडे काटकसर करून जगणाऱ्या ग्रामीण स्त्रियांसाठी आपला ‘फॅशन सेन्स’ दाखवण्याचा उत्तम मार्ग झाला. १९६० च्या दशकापर्यंत पिठाच्या पोत्यांचे कपडे अमेरिकेत सर्रास वापरले जात होते.

दुसऱ्या महायु*द्धादरम्यान युनायटेड स्टेट्समधील जवळपास ३० लाख महिला आणि मुले पोत्यांचे पोशाख परिधान करत होते. अमेरिकेच्या कृषी विभागानं १९५१ मध्ये दिलेल्या अहवालानुसार, शहरी भागात राहणाऱ्या ७५ टक्के आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या ९७ टक्के महिलांनी पिठाच्या पोत्यांपासून कपडे तयार केले होते. नंतरच्या काळात मात्र, हे कपडे वापरणं गरिबीचं लक्षण मानलं जाई. त्यामुळं आपले कपडे पिठाच्या पोत्यापासून तयार केलेले आहेत, हे लपवण्यासाठी त्यावरील लोगो मिटवणं, त्याला निळ लावणं यासारखे पर्याय वापरले जात.

स्मिथसोनियन इन्स्टिट्युटच्या म्हणण्यानुसार, पिठाच्या पोत्यांना काटकसरी महिलांनी सर्जनशीलतेच्या नवीन उंचीवर नेलं. कधीकाळी टाकाऊ वाटणाऱ्या पोत्यांचं अंडरवेअर, टॉवेल, पडदे, रजाई आणि इतर घरगुती वस्तूंमध्ये रूपांतर केलं. २०व्या शतकातील ही ‘फीड सॅक फॅशन’ ग्रामीण अमेरिकन संस्कृतीचं प्रतिबिंब आहे.

जगातील बहुतांशी फॅशनचा इतिहास हा ग्रामीण जनतेच्या फॅशनचा समावेश न करताचं लिहिला गेला आहे. आता मात्र, तळागाळातून आलेल्या नवोदित फॅशन डिझायनर्सच्या प्रयत्नांमुळं ‘फीड सॅक फॅशन’ सारख्या जुन्या, ग्रामीण कपडे पुन्हा चर्चेत आले आहेत. फरक फक्त इतकाच आहे की, पूर्वी ते गरज म्हणून आणि स्वस्त असल्यामुळं वापरले जात तर आता फॅशन म्हणून वापरले जातात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अमेरिकन इतिहासातील एकमेव माणूस जो मृत्यूनंतर बुटांच्या जोडीमध्ये रुपांतरीत झाला..!

Next Post

या महिलेने पैठणीपासून बनवलेल्या वस्तूंनी तरुणाईला भुरळ घातलीये..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

या महिलेने पैठणीपासून बनवलेल्या वस्तूंनी तरुणाईला भुरळ घातलीये..!

...म्हणून या लढाऊ हेलिकॉप्टरला आकाशात उडणारा रणगाडा म्हणतात...!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.