The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोदरेजच्या या साबणाची जाहिरात लागली की पालक पोरांना पाणी आणायला पाठवायचे

by द पोस्टमन टीम
25 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


काही वस्तूंच्या जाहिराती प्रचंड गाजतात पण, कालांतराने या वस्तू बाजारातून कायमच्या गायब होतात. पण, त्यांच्या हटके जाहिराती मात्र कायम स्मरणात राहतात. स्त्रिया आणि सौंदर्य प्रसाधने हे समीकरण कधी रूढ झाले याचा इतिहास शोधायचा म्हटले तरी खूप मागे जावे लागेल. निखरती त्वचा आणि कोमल, मुलायम, दाट मजबूत केस इतके असले की आणखी काय हवे सौंदर्य खुलण्यासाठी? पण, यासाठीच किती तो अट्टाहास सुरु असतो, याची कल्पनाच केलेली बरी. मग त्यासाठी विविध उत्पादने आणि खास स्त्रियांना आकर्षित करतील अशा त्यांच्या जाहिराती.

१९८० च्या दशकातील अशीच एक जाहिरात आली होती एका “साबण कम शाम्पूची”. ज्यात डिंपल कापडियाने तथाकथित संस्कारी भारतीय नारीच्या प्रतिमेला छेद देत एक बोल्ड स्त्री साकारली होती. हे साबण आणला होते, भारतीयांच्या लाडक्या गोदरेज कंपनीने.

विशेष म्हणजे हे एकच साबण त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी उपयोगी होते. क्राउनिंग ग्लोरी नावाचे हे साबण आज कुठे पाहायला सुद्धा मिळणार नाही. पण, या साबणाच्या जाहिरातीने मात्र अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या जाहिरातीच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

या जाहिरातीने संस्कारी नारीच्या प्रतिमेला थोडीशी छेद दिली. स्त्रियांना नेहमी गोशात पाहण्याची सवय लागलेल्या भारतीय समाजमनाला ही जाहिरात पाहताना खजील झाल्यासारखे वाटायचे. या साबणाला किती लोकप्रियता मिळाली ही बाब नगण्य राहिली. पण, ही जाहिरात मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली.



या जाहिरातीत डिंपल कपाडियाने सोज्वळ भारतीय नारीचे रूप टाकून एकदम बोल्ड अवतार धारण केला.

डिंपल कपाडियाची ती सेकंड इनिंग होती. १६व्या वर्षापासून चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या डिंपलच्या करिअरला संसारात गुंतल्यामुळे काहीशी खीळ बसली होती. त्यातून बाहेर पडत ती पुन्हा एकदा ग्लॅमरसच्या दुनियेत प्रदार्पण करण्यास उत्सुक होती.

डिंपलचे सौंदर्य आणि त्यातही तिच्या केसांची जादू काही औरच होती. तिचे मोकळे घनदाट केस पहिल्यानंतर कोणत्याही स्त्रीला तिचा हेवा वाटणारच. म्हणूनच तर जुल्फ घनेरी श्याम है क्या? हे गाणे तिच्यासाठीच तर लिहिले नसेल ना असे वाटते. तिच्यासारखे घनदाट काळेभोर केस असावे अशी इच्छा बाळगणाऱ्या कित्येक ललना त्याकाळी होत्या. (आजही आहेत).

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

याचवेळी गोदरेजने खास स्त्रियांसाठी बनवलेल्या साबणाच्या जाहिरातीतली बोल्ड डिंपल फारच चर्चेत आली. त्याकाळी टीव्हीवर देखील भारतीय स्त्रीला साडी आणि “सिंदूर”मध्येच बघणे जास्त पसंत केले जायचे. मात्र या जाहिरातीत डिंपल सिंदूर संस्कृतीपासून दूर जाताना दिसली. त्याकाळी असे उघडेवागडे बोलणे देखील निषिद्ध मानले जायचे.

मात्र डिंपलने या जाहिरातीत एक खुमासदारपणा आणि उत्साह ओतला होता. स्विमिंग पूलमधील कपाडियाने त्याकाळचे सामाजिक नीतीनियम झिडकारून लावले. अशाप्रकारे स्त्रियांना पाहण्याची अजून तरी सवय नव्हती.

घराघरात टीव्हीवर जेव्हा ही जाहिरात लागायची तेव्हा लहान मुलांसमोर पुरुषमंडळी संकोचून जात. जणू जाहिरात नसून एखादी पोर्न क्लिपच आहे. 

आधुनिक भारतातील स्त्रियांनी अजूनही जुनाट रीतीरिवाजांना चिकटून राहण्याची काय गरज असा प्रश्न आणि मानसिकताही या जाहिरातीने निर्माण केली. अगदी अल्पावधीतच या जाहिरातीला प्रचंड यश मिळाले.

सिंथॉलच्या जाहिरातीनंतर लागलीच ही जाहिरात आली होती. सिंथॉलच्या जाहिरातीत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी काम केले होते. या जाहिरातीतून त्यांची हँडसम मॅन अशी प्रतिमा तयार झाली.

क्रौनिंग ग्लोरीची जाहिरात लिहिण्यास खुद्द परमेश्वर गोदरेज यांनीच पुढाकार घेतला आणि जफर हाई यांनी या जाहिरातीचे चित्रीकरण केले होते.

मध्यमवर्गीय कुटुंबातील संस्कार आणि शिस्त त्याकाळी वेगळीच होती. त्यामुळे गोदरेजची ही जाहिरात आली की घरातील मोठे लोक लगेच चॅनेल बदलून टाकायचे. कुटुंबीयांसह ही जाहिरात बघताना त्यांना संकोचल्यासारखे होत असे.

आलेक पदमसी हे जाहिरात क्षेत्रातील एक मोठे नाव. त्यांनीच लिरीलची जाहिरातही केली होती. ज्या जाहिरातीत एक तरुण मुलगी खुलेपणाने धबधब्याखाली नाहताना दाखवली होती.

त्यांच्या मते हा काळ बदलाचा होता. जाहिरातीतील स्ट्रॅटेजी बदलत होत्या आणि सामाजिक वारे देखील बदलत होते. हा बदल आम्ही फक्त जाहिरातीतून कॅच केला असे त्यांचे म्हणणे होते. स्त्रियांनी सामाजिक नीतीनियम मोडून खुलेपणा स्वीकारण्यास हरकत नसावी असा समज निर्माण होण्याचा होत काळ होता.

जुनी कात टाकून भारत आधुनिकतेची कास धरत होता. हीच मानसिकता जाहिरातीतून अधिक अधोरेखित केली जात होती.

अशा बोल्ड जाहिरातीतून कदाचित हाच संदेश द्यायचा असेल की, सामाजिक रूढी-परंपरांना चिकटून न राहणे आणि त्यांचा त्याग करणे ही एक सहज बाब आहे. अर्थात, चांगली आणि लक्षवेधक जाहिरात तुमच्या ब्रँडला प्रसिद्धी मिळवून देऊ शकतात. पण, बाजारात टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे दर्जा असणे आवश्यक आहे. दर्जा नसेल तर कितीही आकर्षक आणि मोठी जाहिरात बनवा तुमचा ब्रँड बाजारात टिकणार नाही, असा सल्ला देखील पदमसी द्यायचे.

गोदरेजच्या या साबणाची जाहिरात प्रचंड गाजली पण साबणाला तितकी लोकप्रियता मिळाली नाही. शेवटी गोदरेजला हे साबण बाजारातून मागे घ्यावे लागले. आज क्राउनिंग ग्लोरीचे नावही कुठे दिसत नाही. पण, डिंपल कपाडिया आणि तिची जाहिरात मात्र लोकांच्या मनात घर करून आहे.

काळाच्या गरजेनुसार कोणत्याही वस्तूमध्ये बदल हे करावेच लागतात. ज्या वस्तू काळानुरूप बदलत जातात त्याच टिकतात. अन्यथा त्यांची ओळख पुसली जाते. गोदरेज साबणाच्या बाबतीतही कदाचित हेच झाले असेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एकदा सचिनने पाकिस्तानकडून फिल्डिंग केली होती, त्यातच कपिलचा कॅचही सोडला होता

Next Post

या रशियन माणसाची अमेरिका आजन्म ऋणी राहिली तरी कमीच आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या रशियन माणसाची अमेरिका आजन्म ऋणी राहिली तरी कमीच आहे

'सिंगर कप' पाकिस्तानने जिंकला पण तो फेमस झाला 'सनथ जयसूर्या'मुळे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.