The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या व्यक्तीने जगभरातील लोकांच्या नाश्त्यामध्ये क्रांती घडवून आणली..!

by द पोस्टमन टीम
19 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


ब्रेड आपल्या रोजच्या जीवनाचा आणि खाण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. ब्रेडच्या हजारो रेसिपीज आपण पाहत असतो. फार पूर्वीपासूनच ब्रेड सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय आहे. इतका की, एकेकाळी ९ मिलियन लोकसंख्या असलेले ब्रिटिश जवळपास १२ मिलियन ब्रेड एका दिवसात फस्त करत होते. आपल्याकडे मात्र ब्रेड खाण्याची परंपरा नव्हती. ब्रिटिश आणि त्यांच्यासोबत आलेल्या मिशनरींनी देशात ब्रेड आणला. सुरुवातीला ब्रेड खाल्ल्यावर आपला धर्म बाटेल अशी भीती वाटत असलेले भारतीयही आता दररोज ब्रेड-बटर किंवा चहा-ब्रेडने दिवसाची सुरुवात करतात.

बाजारात ब्रेडचे २०० पेक्षा जास्त प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये मग मोठा पेटी पाव असो, वडापावचा लादी पाव असो, बर्गरचा बनपाव असो वा सँडविचचा स्लाईस ब्रेड असो. आपल्याला कधीही आणि कोठेही ब्रेड सहजच मिळून जातो किंवा घरीसुद्धा बनवता येतो. अगदी लॉकडाऊन चालू असताना जेव्हा सगळे व्यवसाय मंदीत होते, तेव्हा ब्रेड बनविण्याच्या व्यवसायामध्ये १३% वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

पूर्वी हातानेच ब्रेड बनवावा लागत असे आणि त्यासाठी अपार मेहनत सुद्धा करावी लागत होती. मात्र एका अवलियाने ही पद्धतच बदलून टाकली. त्याने ब्रेड तयार करण्यासाठी चक्क मशीन्स बनवल्या. जोसेफ ली असं या अवलियाचं नाव. 

जोसेफ ली यांना ब्रेड इंडस्ट्रीचे जनक म्हणून ओळखलं जात. चला पाहू कोण होते जोसेफ ली आणि त्यांनी बनवलेल्या मशीन्समुळे आपल्या ब्रेडवर काय परिणाम झाला?

जोसेफ ली यांचा जन्म १८४९ रोजी बॉस्टनमध्ये झाला. त्यांचं बालपण गुलामगिरीच्या कचाट्यातून सुटलं नव्हतं. त्यांनी वयाच्या लवकरच बेकरीमध्ये काम करायला सुरुवात केली. यातूनच त्यांची ब्रेडसाठी असणारी ओढ वाढली. त्याकाळी ब्रेडचा आकार आणि पोत एकसारखी नव्हती. ब्रेडची कणिक मळण्यासाठी जास्त माणसांची गरज पडत होती, आणि इतकी मेहनत करुनही ब्रेड कडक होत असत. या सगळ्या समस्यांवर उपाय शोधत असतानाच, जास्तीत जास्त चांगला ब्रेड कसा बनवू शकतो याचा विचार चालू झाला आणि यातूनच जोसेफ यांच्या ब्रेड बनवण्याच्या मशीनचा जन्म झाला.



त्यांनी बनवलेली मशीन ब्रेडसाठी लागणारी कणीक मळून देत होती, यामध्ये पिठाचं तापमान वाढत नव्हतं, एकसारखी कणीक असण्यामुळे तयार होणारा ब्रेडही मऊ-मऊ होत होता.

ही एकटी मशीन तब्बल सहा माणसांचे कष्ट वाचवत होती. सोबतच या मशीनसाठी आधीच्या पद्धतींपेक्षा कमी साधनसामग्री लागत होती. शिवाय ब्रेड तयार करताना इतर वेळी होणारा जास्तीचा पसाराही होत नव्हता. या मशीनमुळे पैशांची बचत होत होती आणि कमी वेळात खूप जास्त ब्रेड तयार होत होते. ७ मे १९९४ साली त्यांना त्यांच्या पहिल्या मशीनचं पेटंट मिळालं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय असलेले जोसेफ वयाच्या विसाव्या वर्षीच वूडलॅंड पार्क हॉटेलचे मालक झाले होते. त्यांच्या हॉटेलमध्ये अगदी प्रेसिडेंटसुद्धा येऊन गेले होते. त्यांच्या हॉटेलच्या भरभराटीमुळे ते लवकरच न्यूटन शहरातील श्रीमंत लोकांच्या यादीत जाऊन बसले. याच वेळी परत एकदा त्यांचं लक्ष ब्रेडकडे गेलं. त्यांच्या मशीनमुळे ब्रेड जास्त प्रमाणात तयार होत होते. परंतु त्यांचा वापर वेळेत झाला नाही, तर दुसऱ्याच दिवशी ते फेकून द्यावे लागत होते. त्यामुळे ब्रेड वाया जाण्याचं प्रमाण भरमसाठ होतं, आणि ही एक नवीन डोकेदुखी ठरू लागली होती.

म्हणून जोसेफ यांनी एक अशी मशीन तयार केली जी शिल्लक राहिलेल्या शिळ्या ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून शेवटी त्यांचे ‘ब्रेड क्रम्ब्स’ बनवत होती. १९९५ मध्ये त्यांनी या मशीनवर देखील पेटंट मिळवलं. या ब्रेड क्रम्ब्सचा उपयोग केक, मासे, सलाद/सॅलेड यासाठी आजही केला जातो.

ली यांनी त्यांच्या ब्रेड बनविण्याच्या मशीनचे राईट्स द नॅशनल ब्रेड कं. यांच्याकडे दिले होते. याचा मोबदला म्हणून ली यांनी त्यांच्या काही शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती. शिवाय काही रॉयल्टीज स्वतःकडे राखून ठेवल्या होत्या. तर दुसऱ्या ब्रेड क्रम्ब्स बनवणाऱ्या मशीनची विक्री रॉयल वॉरचेस्टर ब्रेड क्रम्ब कंपनी, बोस्टन यांना केली होती. इतकंच करून ते थांबले नाहीत, तर या मशिन्समध्ये अजून काही सुधारणा करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. अशाप्रकारे अमेरिकन-आफ्रिकन वंशाचे जोसेफ ली हे एक यशस्वी व्यावसायिक, हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मालक, आणि उद्योजकही ठरले. शिवाय आपल्या ब्रेड बनवण्याच्या मशीनमुळे त्यांनी जगभरातील लोकांच्या ब्रेकफास्टमध्ये क्रांती आणली होती.

विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ली यांच्या मशीन्सचा प्रवास व्यावसायिक पातळीवर सुरु झाला होता. हॉटेल जगताला ली यांच्या मशीनमुळे नवी उभारी दिली होती. फोर्ब्ससारख्या मासिकाने त्यांच्या या संशोधनाची दाखल घेतली होती. साधी मांडणी आणि प्रभावशाली वापर ही त्यांच्या मशिन्सची वैशिष्ट्ये होती.

अलीकडच्या काळात घरगुती वापरासाठी पॅनासोनिकसारख्या कंपन्या ब्रेड बनविण्याच्या मशिन्स बनवत असल्या, तरी त्यांचं मूळ हे जोसेफ ली यांच्याच मशिन्समध्ये आहे. १९८६ला पहिलं घरगुती ब्रेड बनविण्याचं मशीन बनवलं गेलं, आणि पुढे ते जास्तीत जास्त लोकप्रिय होत गेलं. जोसेफ ली आणि त्यांच्या मशिन्सचा आढावा घेणारं – ‘ली’ज ब्रेड मशिन्स : द फादर ऑफ ऑटोमेटेड ब्रेड मेकिंग’ नावाचं पुस्तक देखील बाजारात उपलब्ध आहे. २०११ मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

झिम्बाब्वेच्या खेळाडूने फाटक्या बुटांचं एक ट्विट केलं आणि त्यांना पुमाने स्पॉन्सरशिप दिली

Next Post

८० रुपये उधार घेऊन सुरू केलेल्या ‘लिज्जत’ची आज हजारो कोटींची उलाढाल होतेय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

८० रुपये उधार घेऊन सुरू केलेल्या ‘लिज्जत’ची आज हजारो कोटींची उलाढाल होतेय

अटलजींनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रतिस्पर्धी गोविन्दाचार्यांचं करिअर संपलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.