The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपला लाडका ‘लक्ष्या’ आपल्यातून गेलाय यावर आजही विश्वास बसत नाही..!

by द पोस्टमन टीम
15 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आजही मराठीतील विनोदी चित्रपट म्हटलं की डोळ्यासमोर लगेच काही चेहरे उभे राहतात. त्यातला सर्वांचा लाडका म्हणजे लक्ष्या, लक्ष्मीकांत बेर्डे.  शहरी ग्रामीण भागातील लाखो रसिकांना आपल्या अभिनयाने भुरळ पाडणारा आपला लक्ष्या.

लक्ष्याला चित्रपट व नाटकांची गोडी महाविद्यालीन जीवनापासूनच लागली. त्याने कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमात, अनेक नाटकात काम करत आपली आवड जपली. महाविद्यालय, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत लक्ष्याला अनेक पारितोषिके देखील मिळाली होती. लक्ष्याचा अभिनय चित्तवेधक होता. आपल्याला करियर करायचे तर ते चित्रपटातच असे त्यांनी मनाशी ठरवले व महाविद्यालयीन शिक्षणानंतर थेट मुंबईच्या मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून व्यावसायिक नाटकांत पदार्पण केलं आणि त्याचे पहिलेच नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

त्याने काम केलेलं ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ हे नाटक चांगलंच गाजलं होतं.

मराठी नाटक गाजत होते पण सिनेमांना मात्र थोडीफार आलेली मरगळ प्रकर्षाने जाणवत होती. हा काळ होता ८०-९० च्या दशकाचा हिंदी चित्रपट प्रचंड चालत होते. मराठीपेक्षा प्रेक्षकांमध्ये हिंदी चित्रपट व त्यातील संवाद यांचे आकर्षण वाढत होते. त्याकाळातील मराठी चित्रपटांचा भर कौटुंबिक आणि भावनिक विषयांवर जास्त होता.

मराठी रंगभूमीवरचे एकेकाळचे विनोदवीर सिनेमात व्यस्त झाल्याने रंगभूमीला पुन्हा उतरती कळा लागायला सुरुवात झाली होती. मराठी चित्रपटांना हवा तसा प्रेक्षकवर्ग मिळत नव्हता. पण अशा प्रतिकूल परिस्थितीत लक्ष्या नावाच्या एका अवलियाची मराठी चित्रपटात एन्ट्री झाली आणि सिनेसृष्टीचे जणू दिवसच पालटले.



अभिनय, अभिनयातील हजरजबाबीपणा, विनोदी संवाद आणि लक्ष्याच्या अदा यामुळे पुन्हा प्रेक्षक वर्ग मराठी चित्रपटांकडे आकर्षित झाला. लक्ष्याच्या बरोबरीला अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे असे तरुण कलाकार होतेच. पण लक्ष्याबद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष आवड होती. लक्ष्या आणि सहकारी कलाकार आपल्या विनोदी अभिनयाने एक वेगळे रूप देत होते.

लक्ष्या, अशोक मामा आणि सचिन या त्रिकुटाने चित्रपटसृष्टीत अक्षरश: धुमाकूळ घातला होता.

मराठी सिनेसृष्टीत दादा कोंडके व्यतिरिक्तसुद्धा एक विनोदी अभिनेता आहे हे प्रेक्षकांना समजले होते. दादा कोंडकेंचे विनोद हे अनेकदा द्विअर्थी (डबल मिनिंग) असतात त्यामुळे कुटुंबीयांसोबत पाहणे शक्य होत नाही अशी ओरड नेहमी उठवली जायची, याला लक्ष्या हा नवा पर्याय मिळाला होता. लोक लक्ष्या काम करत असलेले सिनेमे कुटुंबासोबत पाहू लागले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

लक्ष्या विनोदी कलाकार असला तरी त्याच्या करियरची सुरुवात १९८५ सालच्या “लेक चालली सासरला” या चित्रपटातून झाली. पाठोपाठ आलेले धुमधडाका, अशी ही बनवा बनवी, थरथराट या चित्रपटांनी तर लक्ष्याचे आयुष्यच बदलले.

त्यानंतर हयात असेपर्यंत लक्ष्याने कधी वळून पहिले नाही. लक्ष्याच्या अभिनयाने मराठी कलाप्रेमींना त्याची भुरळ पडली. अनेक दिग्गज दिग्दर्शक निर्माते लक्ष्याला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी रांगा लावू लागले.

मराठी सिनेसृष्टीत लक्ष्याने अतुलनीय योगदान दिले. आजही लक्ष्याचे चित्रपट लोकं आवर्जून बघतात. लक्ष्याने शेम टू शेम, अफलातून, एक गाडी बाकी अनाडी, पछाडलेला, झपाटलेला, किस बाई किस, धमाल बबल्या गणप्याची, हमाल दे धमाल, धडाकेबाज, भुताचा भाऊ, रंगत संगत, शुभ बोल नाऱ्या असे अनेक सिनेमे गाजवले.

लक्ष्याचा अभिनय बोलका होता, त्याच्या अभिनयात विनोदाबरोबर गांभीर्य देखील असायचं. त्याने केलेला “एक होता विदुषक” चित्रपट तर प्रेक्षकांसाठी आयुष्यभर लक्ष्याची आठवण बनून राहिला आहे.

लक्ष्याने आपल्या अभिनयाचा ठसा अनाडी, मैने प्यार किया, तकदीरवाला, हम आपके है कौन अशा अनेक हिंदी चित्रपटातूनही उमटवला. त्याच्या हिंदी अभिनयामुळे तर तो पुढे भारतभर ओळखला जाऊ लागला.

प्रसिद्धीच्या मागे मागे लक्ष्याच्या घरी मदिरादेखील येऊन पोहोचली. लक्ष्याची पहिली पत्नी रुही बेर्डे यांच्या निधनानंतर लक्ष्या चांगलाच खचला होता. पत्नीच्या निधनानंतर काही दिवसांनी लक्ष्याने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळचे प्रसिद्ध साहित्यिक अरुण कर्नाटकी यांची मुलगी आणि लक्ष्याची सहकारी अभिनेत्री प्रिया हिच्यासह त्याने विवाह केला. २००० नंतर लक्ष्याला यकृत व छातीचा त्रास अधिक जाणवू लागला. त्याला वारंवार रुग्णालयात जावे लागत असे, ज्यामुळे प्रेक्षक वर्गातही चिंतेचे वातावरण होते.

अशातच, १६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्या गेल्याचं वृत्त येऊन धडकलं आणि सारा महाराष्ट्र हळहळला. एखाद्या नाटकात इंटर्वल व्हावा तसं लक्ष्याने एक्झिट घेतली. आजपर्यंत लोकांना हसवणारा लक्ष्या आपल्यातून गेला यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. तो आजही बसत नाही व जाणवत नाही.

लक्ष्या वयाने, मानाने, संपत्तीने मोठा असला तरी संपूर्ण महाराष्ट्र त्याला लक्ष्मिकांतजी ऐवजी आपुलकीने आजही लक्ष्या म्हणतो हेच लक्ष्याने कमवलेलं खरं प्रेम आहे.

लक्ष्या हजरजबाबी होता. प्रेक्षकांबरोबर सहज खुला संवाद साधून त्याने अनेकदा गरजवंतांना मदत केल्याचे त्यांचे समकालीन आवर्जून सांगतात. लक्ष्या अभिनयाने जेवढा मोठा होता तेवढाच तो मनाने देखील मोठा होता.

चित्रपटात सहकारी म्हणून काम करणारे अनेक जण लक्ष्या बद्दल यादगार किस्से सांगतात. अशोक सराफ व लक्ष्याने बहुतांश वेळी एकत्र काम केलं त्यामुळे लक्ष्याविषयी विचारल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आजही पाणी येते. लक्ष्यावर प्रेम कारणारा मोठा वर्ग आजही महाराष्ट्रात आहे.

या अद्वितीय कलाकाराच्या कलेला, अभिनयाला आमचा सलाम!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कोण आहेत चीनचे उईगर मुस्लीम ? जाणून घ्या त्यांचा इतिहास आणि भीषण वर्तमान

Next Post

या अधिकाऱ्याच्या प्रयत्नामुळे, चेन्नईत संपूर्णपणे सुकलेल्या तळ्यात परतलं पाणी…

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या अधिकाऱ्याच्या प्रयत्नामुळे, चेन्नईत संपूर्णपणे सुकलेल्या तळ्यात परतलं पाणी...

राजीव गांधींनी एक फोन केला आणि रामायणाच्या प्रसारणाचे सगळे अडथळे पार झाले

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.