The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून सप्टेंबर महिन्यातील ११ दिवस कमी केले होते

by द पोस्टमन टीम
28 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी सूचित करणारा असतो. प्रत्येक दिवस आपल्याला जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा असतो पण १७५२ साल हे असं होतं की या दिवशी ११ दिवस गायब होते. सप्टेंबर महिन्यात २ तारखेनंतर कॅलेंडरमध्ये एकदम १४ तारीख दाखवण्यात आली. इंग्लंड, अमेरिका आणि काही युरोपियन देशातील नागरिक ज्युलियन कॅलेंडरमधील या तारखेच्या घोळाचे साक्षीदार होते.

त्यानंतर तेथील नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी गावागावांत दं*गली आणि जाळपोळ झाली होती. अनेकांनी अचानक झालेल्या बदलाने आश्चर्य व्यक्त केले होते. स्थानिक दैनिकाने याबाबत अनेक दिवस लिखाण सुरू होते परंतु त्याकाळी आजच्या सारखे आभासी माध्यम नव्हते त्यामुळे पुढे जास्त दिवस हा विषय चालला नाही. २०२०-२०२१ सालचे लॉकडाऊन आणि अनलॉक यातून आपण गेलो असल्याने आपल्याला याची जाणीव नक्कीच होईल. म्हणायला गेलं तर ११ दिवसांचा हा काळ छोटा वाटेल पण त्यावेळी सामान्य नागरिकांना हे मान्य नव्हते आणि त्यातून पुढे अनेक महिने यावर विचार-मंथन करण्यात गेले होते.

मुळात त्यावेळी पारंपारिक पद्धतीने ज्युलियन कॅलेंडर वापरले जात असे. ज्युलियन कॅलेंडर हे ज्युलियस सीझरद्वारे ४६ B.C.मध्ये अमलात आणलं गेलं होतं. हे कॅलेंडर पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या प्रदक्षिणेनुसार तयार करण्यात आलं होतं.

ज्यामध्ये ३६५ दिवस कॅलेंडर आणि दर चार वर्षांनी येणारं लीप इयर हे मान्य करण्यात आलं होतं. या पद्धतीनुसार नवीन वर्ष हे २५ मार्चपासून सुरू होत असे. कालांतराने असं लक्षात आलं की, ज्युलियन सिस्टीममुळे सोलार वर्ष हे दर १३१ वर्षांनी येताना १ दिवसाचा उशीर होत असे. पुढे हा फरक ४०० वर्षात ३ दिवसांचा पडत होता. 325 A.D. ते 1582 A.D. मध्ये हा फरक दहा दिवसांचा झाला होता. यामुळें सरकार विचार करू लागली.

जगातील सर्व प्रमुख देशांनी एकत्र येऊन हे मान्य केले की, ज्युलियन सिस्टीम ही लीप इयरची मोजणी बरोबर करत नाही. दिवस मोजायची अजून एक पद्धत होती जी की पोप ग्रेगोरी यांनी १५८२ मध्ये सुरू केली होती. पण ही पद्धत इंग्लंडला मान्य नव्हती. जो बदल जगातील इतर देशांनी ५ ऑक्टोबर १५८२ रोजी मान्य केला तो बदल इंग्लंडला १७५२ च्या सप्टेंबरमध्ये मान्य करावाच लागला कारण दिवसांचं अंतर वाढून ११ दिवसांपर्यंत वाढलं होतं.



चर्च ऑफ रोमला असलेल्या विरोधामुळे हा बदल इंग्लंडने आधी मान्य केला नव्हता. इंग्लंड सोडून इतर देशांनी हा बदल १०० वर्षाआधीच मान्य केला होता. १५८२ ते १७५२ या काळात जॉर्जियन आणि ज्युलियन या दोन्ही प्रकारचे कॅलेंडर फॉलो केले जायचे. ज्यामुळे प्रचंड घोळ व्हायचे. १५८२मध्ये बदल मान्य करणाऱ्या देशांमध्ये फ्रांस, इटली, पोलंड, पोर्तुगाल आणि स्पेन हे अग्रस्थानी होते. ‘टर्की’ हा देश हा बदल सर्वात शेवटी मान्य करणारा देश ठरला.

इंग्लंडमध्ये हा बदल घडवून आणण्यासाठी कॅलेंडर ऍक्ट पास करण्यात आला होता. या ऍक्टला The calendar (New Style) Act 1750 हे नाव देण्यात आलं होतं. या बदलामुळे १७५१ हे वर्ष फक्त २८२ दिवसांचं मान्य करण्यात आलं होतं. पण, हा बदल मान्य करणं गरजेचं होतं म्हणून २ सप्टेंबर १७५२ ला हा निर्णय घेण्यात आला होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

तत्कालीन ब्रिटन नेता विलियम होगार्थ यांनी त्यांच्या एका चित्राद्वारे “Give us 11 days” हा निषेध व्यक्त केला होता. पण, या सर्व विरोधासमोर इंग्लंडचे सरकार झुकलं नाही. कॅलेंडरमधून गायब झालेल्या या ११ दिवसांचा काळ जुळवून आणणे हे गुंतागुंतीचे होते.

पुढे ब्रिटन सरकारने अजून एक बदल जाहीर केला होता. १७५२ च्या आधी नवीन वर्ष हे २५ मार्चपासून सुरू व्हायचं. ते बदलून नवीन वर्ष १ जानेवारीला सुरू होईल.

पण हा बदल लोकांना मान्य करायला कठीण गेले. कारण देशांतर्गत परिस्थतीत होणारे काही बदल हे आपल्याला मान्य नसतात आणि आपण ते सहजासहजी मान्य करत नाही. कारण आपल्याला खात्री असते की काहीं प्रश्न हे सुटतच नाही. पण सरकारला अशा परिस्थितीत पूर्ण समर्थन करणे हेच आपले कर्तव्य असते आणि प्रसंगी फायद्याचे असते.

ज्यादिवशी सरकारला आपण एखाद्या बदलासाठी पूर्ण समर्थन करू त्यादिवशी देश कोटी पाऊले पुढे जाणार आहे. फक्त आपण सरकारला पूर्ण समर्थन करणे गरजेचे आहे कारण तो बदल देशहिताचा असणार आहे याची खात्री आपण केली तर अनेक प्रश्न आपोआप मार्गी लागणार आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ऐश्वर्यासारखी दिसते म्हणून सलमानने लॉन्च केलेल्या स्नेहा उल्लालचं पुढे काय झालं..?

Next Post

जेव्हा एका भारतीय राजाचं लॉर्ड माउंटबॅटनच्या घरी डिनर टेबलवरच निधन झालं होतं..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

जेव्हा एका भारतीय राजाचं लॉर्ड माउंटबॅटनच्या घरी डिनर टेबलवरच निधन झालं होतं..!

टायटॅनिक बुडणार हे या माणसाने आधीच लिहून ठेवलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.