The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुकेश अंबानींनी नीता अंबानींना बड्डे गिफ्ट दिलेलं प्रायव्हेट जेट सरकारने जप्त केलं होतं

by द पोस्टमन टीम
14 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतात सर्वात श्रीमंत कोण? असा प्रश्न विचारला तर झोपेतून उठलेला माणूस पण मुकेश अंबानी नाव सांगून मोकळा होईल. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी भारतासोबतच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी यांनी जिओफोन नेक्स्ट फोर जी ची घोषणा करून भारतीयांना स्वस्तात स्मार्टफोन देण्याची नवीन योजना पण जाहीर केली आहे.

सध्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या ग्रँड व राजेशाही थाटातील विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या विवाह सोहळ्याला देशभरातूनच नाही तर जगभरातील दिग्गज उपस्थित होते.

अशा या  मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना कोण ओळखत नाही! मुंबई इंडियन्स संघाच्या सहमालकीण असणाऱ्या नीता अंबानी संघाच्या प्रत्येक सामन्याला जातीने हजेरी लावत असत. नीता अंबानी महागड्या शानशौकीसाठी ओळखल्या जातात.

मुकेश अंबानी यांनी आपल्या बायकोला ४४व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एक प्रायव्हेट जेट गिफ्ट म्हणून दिलं. या जेटमध्ये खास काय होतं  असं तुम्ही विचाराल, तर ते फक्त जेट विमान नसून उडणारा एक राजमहालच होता. याच राजेशाही “गिफ्ट”बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचाच!



आपल्या बायकोला तिच्या ४४व्या वाढदिवशी मुकेश अंबानी यांनी गिफ्ट दिलेलं हे विमान एअरबस कंपनीचे होते. त्या विमानात सुखसोयी होत्या, अगदी मिटिंग घेण्यासाठी ऑफिस आणि केबिनची सोयदेखील यात करण्यात आली होती. प्रवास आरामात करता यावा म्हणून एक मोठी बेडरूम, संपर्क तुटू नये म्हणून सॅटेलाईट फोन आणि वायरलेस कॅम्युनिकेशनची पण जोड देण्यात आली होती.

एवढंच नाही तर कंटाळा येऊ नये म्हणून गेम झोन, सिनेमा बघायची सोयही या विमानात करण्यात आली होती.

आता एवढ्या लॅव्हिश विमानाची किंमत काय कमी असणार का! नीता अंबानींच्या या विमानाची किंमत होती तब्बल २३० कोटी रुपये!

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

हे विमान खास त्यांच्यासाठी म्हणून परदेशातून आयात करण्यात आले होते. हे विमान प्रथम दिल्ली विमानतळावर आणि नंतर मग मुंबई विमानतळावर येणार होते. पण तत्पूर्वीच त्या विमानाची जप्ती इंडियन एअर इंटेलिजन्स युनिटने केली.

जप्ती का करण्यात आली?

कुठलीही गोष्ट परदेशातून आयात करायला तुम्हाला सरकारला काही कर द्यावा लागतो. आता हे एवढं मोठं विमान आयात केलं तर त्यासाठी सरकारच्या सीमा शुल्क विभागाचा कर भरावा लागणार होता.

पण तो कर मुकेश अंबानी यांनी न भरल्यामुळे विमानावर जप्ती आली.

एअरबस ३१९ नाव असणाऱ्या प्रायव्हेट जेट विमानाची मालकी रिलायन्स कमर्शियल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे होती. रिलायन्स इंडस्ट्रीला इंडियन एअर इंटेलिजन्स युनिटने स्पष्ट सांगितले की, जोपर्यंत पूर्ण दंड भरला जात नाही तोपर्यंत विमान ताब्यात देणार नाही.

आयात करण्यात आलेल्या एअरबस ३१९ विमानाचा वापर फक्त खाजगी कामांसाठीच केला जात होता. खाजगी कामांसाठी जेव्हा विमानांचा वापर केला जातो तेव्हा त्यांच्यावर सरकार १८% कर लावते. रिलायन्स इंडस्ट्रीने हा कर न भरल्यामुळे विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले.

यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीने त्यांची बाजू स्पष्ट करण्यासाठी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, “सीमाशुल्क विभागाकडून कायमच तपासण्या करण्यात येतात. त्याच तपासणीचा भाग म्हणून नॉन शेड्युल ऑपरेटरना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. सीमाशुल्क चौकशीसाठी विमानाला ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी तपासणी पूर्ण झाल्यानंतर विमान रिलायन्स इंडस्ट्रीकडे सुपूर्द करण्यात आले”.

जेव्हा हे प्रायव्हेट जेट घेण्यात आलं होतं त्याकाळी सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती, पण आज मात्र या सगळ्या गोष्टींचे कोणाला फारसे काही नवल वाटत नाही. पण तुम्ही अंबानी असा किंवा साधे मध्यमवर्गीय, करचोरीच्या खटल्यात कोणीही कधीही फसू शकतं हेच या किस्स्यावरून सिद्ध होते!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

४३६ लोकांचा जीव घेऊन चंपावत वाघिणीने गिनीज बुक रेकॉर्ड केला होता..!

Next Post

निळ्या त्वचेच्या कुटुंबाचं कोडं शास्त्रज्ञांनी शोधून त्यावर इलाज पण केलाय..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

निळ्या त्वचेच्या कुटुंबाचं कोडं शास्त्रज्ञांनी शोधून त्यावर इलाज पण केलाय..!

बकार्डीने क्युबात बंडखोरांना सत्तेत यायला मदत केली, त्यांनीच बकार्डीला देशाबाहेर काढलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.