The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या दोन महिलांनी चर्चला फसवून स्पेनमधील पहिला समलैंगिक विवाह केला होता

by द पोस्टमन टीम
28 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लग्न म्हटलं की, नखशिखांत सजलेली नवरी आणि तितकाच रुबाबदार नवरदेव क्षणात आपल्या नजरेसमोर उभे राहतात. लग्न हे फक्त एका स्त्रीचं पुरुषाशी किंवा एका पुरुषाचं स्त्रीशी होतं, असा सर्वधारण समज किंबहुना समाजाचा नियम आहे. आपल्या देशात तर मुलगी वयात आली की, एखादा अनुरूप मुलगा शोधून तिचं लग्न करून देण्याची घाईचं असते. कित्येक ठिकाणी आजही मुलीला तिची मर्जी विचारली जात नाही.

पूर्वी देखील मध्ययुगात आणि आधुनिक युगाच्या सुरुवातीला समाजामध्ये महिलांना फारसं महत्त्व दिलं जातं नव्हतं. त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी देखील अथक परिश्रम करावे लागले. अनेक देशांमध्ये महिलांना लग्नासाठी स्वत:चा जोडीदार निवडण्याची देखील परवानगी नव्हती.

अशा परिस्थितीत दोन महिलांनी एकमेकींशी लग्न केलं होतं असं जर सांगितलं तर विश्वास बसणं कठीणच आहे. मात्र, ही अशक्यप्राय आणि क्रांतीकारी गोष्ट स्पेनमधील दोन महिलांनी करून दाखवली होती.

दोन पुरूषांनी एकमेकांशी किंवा दोन स्त्रियांनी एकमेकींशी लग्न केल्यास त्याला समलिंगी विवाह म्हणतात.



८ जून १९०१ रोजी स्पेनमधील मार्सेला ग्रेसिया इबियास आणि एल्सा सान्चेझ लॉरिगा या दोन स्त्रियांनी समलिंगी विवाह केला होता. गॅलिसियन शहरातील सेंट जॉर्ज चर्चमध्ये दोघींना विवाह केला होता. मात्र, यासाठी एल्साला पुरुषाचा वेश घ्यावा लागला होता. चर्चने त्यांच्या लग्नाची नोंद देखील केलेली आहे.

कालांतरानं त्यांच्या लग्नाचं सत्य बाहेर आलं. मात्र, शेवटपर्यंत चर्चनं त्यांच्या लग्नाचं प्रमाणपत्र रद्द केल नाही. त्यामुळे मार्सेला आणि एल्सा यांचा विवाह हा स्पेनमधील पहिला समलिंगी विवाह मानला जातो. जेव्हा त्यांच्या लग्नाचं सत्य बाहेर आलं तेव्हा दोघींनाही अर्जेंटीनाला पलायन करावं लागलं होतं.

ज्याकाळी बहुतांशी गॅलिसियन रहिवासी अशिक्षित होते, त्याकाळी या दोघीही शिक्षिका म्हणून काम करत होत्या. टीचर ट्रेनिंग कॉलेजमध्ये मार्सेला आणि एल्साची ओळख झाली होती. सामान्य मैत्रीपेक्षा दोघींमध्ये जास्त शारिरिक जवळीक होती. त्यांचं नातं एका वेगळ्या वळणावर जात असल्याचं मार्सेलाच्या आई-वडिलांच्या लक्षात आलं. त्यांनी मार्सेलाला माद्रिदला पाठवून दिलं. त्यामुळे एल्सानं करुआना आणि मार्सेलानं माद्रिदमध्ये राहून आपापलं शिक्षण पूर्ण केलं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्यानंतर एल्साला कुसो याठिकाणी शिक्षिकेची नोकरी मिळाली. योगायोगानं त्याचवेळी कुसोपासून जवळ असलेल्या कॅलो गावामध्ये मार्सेला वरिष्ठ शिक्षिका म्हणून रूजू झाली होती. याची माहिती एकमेकींना मिळाल्यानंतर पुन्हा त्या कॅलोमध्ये एकत्र राहू लागल्या. पुढे १८८९ साली मार्सेलाची बदली झाल्यानं दोघींना वेगळं व्हावं लागलं. मात्र, काही काळानंतर एल्सा पुन्हा तिच्यासोबत राहण्यासाठी आली. १९०१ साली एल्सानं मारिओ नावासह पुरुषीवेश धारण केला. आपलं बालपण लंडनमध्ये गेलं असून वडील नास्तिक असल्याच्या तिनं सांगितलं. ८ जून १९०१ रोजी एल्सा आणि मार्सेलानं लग्न केलं.

मात्र, त्यांच्या शेजाऱ्यांना या लग्नाबाबत संशय आला आणि गॅलिसियन व माद्रिदमधील वृत्तपत्रांनी त्यांच्या लग्नाची सत्यता जगजाहीर केली. यामुळे दोघींच्याही नोकऱ्या गेल्या. प्रशासनानं त्यांच्याविरोधात अरेस्ट वॉरन्ट काढलं. त्यानंतर दोघींनी अर्जेंटीना पलायन केल्याच्या बातम्या स्पेनमध्ये पसरल्या होत्या. बराच काळ लोटल्यानंतर एल्साचा मृत्यू झाल्याच्या आणि मार्सेलानं तिच्यापेक्षा २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या क्रिस्टिअन जेसन या व्यक्तीशी लग्न केल्याच्याही काही बातम्या आल्या होत्या. त्यानंतर मात्र, दोघींबाबत काहीही माहिती समोर आली नाही.

१८ डिसेंबर २००८ रोजी नार्सिओ दी गॅब्रिएलचा या लेखिकेनं ‘एल्सा अँड मार्सेला-बियॉण्ड मेन’ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. ३०० पानांच्या या पुस्तकात लेखिकेनं एल्सा आणि मार्सेलाच्या नात्याविषयी आणि संघर्षाविषयी लिहिलं आहे.

२०१९ साली इसाबेल कोशेट या दिग्दर्शिकेनं दोघींच्या कथेवर आधारीत एक चित्रपट तयार केला.

२००५ साली स्पेनमध्ये समलिंगी विवाहाला कायद्यानं मान्यता मिळाली. त्याचवर्षी ११ जुलैला कायद्यानुसार पहिला समलिंगी विवाह पार पडला. माद्रिदमधील एमिलियो मेन्डेंझ आणि कार्लोस बिट्रून या दोन पुरुषांनी विवाह केला. त्यापूर्वी ते दोघे ३० वर्षे सोबत राहत होते. त्यानंतर ११ दिवसांनी कायद्यानुसार बार्सिलोनातील दोन महिलांनी समलिंगी विवाह केला.

इतिहासाचा धांडोळा घेतला तर अगदी पहिल्या शतकात देखील समलैंगिक विवाह झाल्याच्या काही नोंदी आढळल्या आहेत. आधुनिक युगात १ एप्रिल २००१ रोजी नेदरलँड्समध्ये सर्वप्रथम समलैंगिक जोडप्यांना विवाह करण्यास कायद्यानं मान्यता मिळाली. असे करणारा तो पहिलाच देश होता. आजतागायत जगभरातील अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जिअम, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, कोस्टा रिका, डेन्मार्क, इक्वेडोर, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, आइसलँड, आयर्लंड, लक्झेमबर्ग, माल्टा, मेक्सिको, नेदरलँड्स, न्यूझीलंड, नॉर्वे, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, तैवान, इंग्लंड, अमेरिका आणि उरुग्वे या एकूण २९ देशांमध्ये समलिंगी विवाहाला कायद्यानं मान्यता मिळालेली आहे.

आपल्या देशाचा विचार केला तर, भारतात अद्याप समलिंगी विवाहाला मान्यता मिळालेली नाही. मात्र, समलिंगी विवाह हा गुन्हा देखील मानलेला नाही. २०११ साली हरियाणातील दोन मुलींनी समलिंगी विवाह केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये समीर समुद्रा आणि अमित गोखले या दोघांनी समलिंगी विवाह केला होता.

या व्यतिरिक्त जगभरातील ३३ देशांनी समलिंगी विवाह कायद्यानं गुन्हा ठरवलेला आहे.  एल्सा आणि मार्सेला या दोन महिलांनी एका शतकापूर्वीचं समलिंगी विवाह करण्याचं धाडसं केलं होतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अमेरिकेच्या या तुरुंगात जायला खुंखार गुन्हेगार देखील घाबरायचे..!

Next Post

इंग्लंडच्या किल्ल्यात घुसून दादाने आधी त्यांचा माज उतरवला आणि मग शर्ट..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

इंग्लंडच्या किल्ल्यात घुसून दादाने आधी त्यांचा माज उतरवला आणि मग शर्ट..!

आपलं मनोरंजन करणाऱ्या विदुषकाच्या जडणघडणीचा देखील एक इतिहास आहे!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.