The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयुष्यभर खुंखार मगरींसोबत राहिला पण एका निरुपद्रवी माशाचा शिकार बनला

by द पोस्टमन टीम
21 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


तुमचा आवडता प्राणी कोणता? असा प्रश्न विचारल्यावर कुत्रा, मांजर, गाय, बैल, शेळी, घोडा, अशी अनेक उत्तरे येतील, पण माझा आवडता प्राणी मगर आहे, असे उत्तर कदाचित कुणालाच अपेक्षित नसेल. मगरीला घाबरत नाही अशी व्यक्ती सापडणे कठीणच! मगरींशी मैत्री करणारा, एखाद्या मांजर किंवा कुत्र्याच्या पिल्ल्याशी खेळावे तसे मगरींशी खेळणारा माणूस तुम्ही कधी पाहिला आहे का? पण ‘क्रोकोडाईल हंटर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टीव्ह आयर्विनबद्दल वाचाल तर थक्क होऊन जाल!

स्टीव्ह आयर्विनचा जन्म २२ फेब्रुवारी १९६२ रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नजवळील एसिडोन या लहानशा शहरात झाला. त्याचे पूर्ण नाव स्टीफन रॉबर्ट आयर्विन असे होते. त्याचे वडील वन्यजीवतज्ज्ञ होते आणि आई वन्यजीव पुनर्वसनतज्ज्ञ होती. त्यामुळे प्राणीप्रेम त्याच्या रक्तातच भिनलेले होते. त्याचे वडील एक वाईल्डलाईफ पार्कही चालवत. लहानपणापासून आयर्विनचा जास्तीत जास्त वेळ हा त्याच्या मित्रांपेक्षा जास्त या वन्यजीवांसोबतच जात असे.

तो सहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला वाढदिवसाची भेट म्हणून एक बारा फुट लांबीचा अजगर दिला होता.

आपण ज्या प्राण्यांशी आपले मित्र समजून खेळतोय, ज्यांच्यासोबत वेळ घालवतोय ते आपल्या जीवावर उठू शकतात, याची स्टीव्हला जराही फिकीर नव्हती. प्राण्यांसोबत अधिकाधिक वेळ घालवल्याने त्याला प्राण्यांची भाषा कळू लागली होती. प्राण्यांबद्दल जाणून घेण्यासाठी त्याला कुठल्याही विद्यापीठाच्या पदवीची गरज नव्हती. या सगळ्यांत त्याचा सगळ्यात आवडता प्राणी म्हणजे मगर. नऊ वर्षांचा असल्यापासून तो मगरी हाताळत होता. याच वयात त्याने मगरीशी पहिली कुस्ती केली, अर्थात त्याच्या वडीलांच्या निगराणीखालीच! क्वीन्सलँड्स इस्ट कोस्ट क्रोकोडाईल मॅनेजमेंट प्रोग्रॅममध्ये सहभागी होऊन त्याने सुमारे १०० मगरी पकडल्या होत्या. यातील काही मगरी त्याने आपल्या घरच्या वाईल्डलाईफ पार्कमध्ये आणून सांभाळल्या होत्या.

१९९१ साली त्याच्या वडिलांनी या वाईल्डलाईफ पार्कची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. १९९८ साली त्याने या पार्कचे ‘ऑस्ट्रेलियन झू’ असे नामकरण केले. १९९१ सालीच त्याची भेट टेरी रेन्सशी झाली. टेरी एक अमेरिकन निसर्गअभ्यासक होती. अभ्यासाचा भाग म्हणून ती ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आली असताना तिने या प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन झूला भेट दिली. स्टीव्हला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली आणि १९९२ साली दोघेही विवाहबद्ध झाले.



हनिमूनसाठी गेल्यावर दोघांनी मिळून त्यांची पहिली डॉक्युमेंट्री शूट केली होती. या डॉक्युमेंटरीत स्टीव्ह मगरींशी असा खेळत होता जणू त्या मगरी त्याने पाळलेल्याच होत्या. या डॉक्युमेंट्रीने स्टीव्हला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतरच लोक त्याला ‘क्रोकोडाईल हंटर’ नावाने ओळखू लागले. याच नावाने त्याने एक टीव्ही शो देखील सुरू केला ज्यातून तो लोकांना मगरींविषयी माहिती देत असे. हळूहळू स्टीव्हचा हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला. स्टीव्हच्या धाडसाचे सगळीकडून कौतुक होऊ लागले.

नदीत, तलावात, अडकलेल्या आणि माणसांसाठी घातक ठरणाऱ्या मगरी पकडण्यासाठी स्टीव्हला दूरदुरून बोलावणी येऊ लागली. या कामाच्या निमित्ताने स्टीव्हने अनेक ठिकाणांचा प्रवास केला. अगदी दुर्गम आणि दूरस्थ प्रदेशातही तो या निमित्ताने जाऊन आला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

स्टीव्हने मगरींनाच जीवदान दिले असे नाही तर विषारी साप, अजगर, अशा अनेक घातक प्राण्यांना त्याने पकडून त्यांच्या अधिवासात परत सोडले. आपण जर वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित ठेवला तर तेही आपल्या अधिवासात अतिक्रमण करणार नाहीत, असे स्टीव्ह वारंवार सांगत असे. वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठीही त्याने अनेक प्रयत्न केले.

ऑस्ट्रेलिया, व्हानुआतु, फिजी आणि अमेरिका अशा देशांमध्ये त्याने मोठ-मोठ्या जमिनी विकत घेऊन तिथे या प्राण्यांसाठी अधिवास तयार केले. ज्याला त्याने नॅशनल पार्क असे नाव दिले. प्रत्येकाच्या योगदानामुळे पर्यावरणात आणि वन्यजीवांच्या अधिवासात नक्कीच फरक पडतो, हे तो आपल्या बोलण्यातून नेहमी पटवून देत असे.

पण स्टीव्हचे हे अतिरिक्त प्राणीप्रेम अनेकदा टीकेचा विषयही बनत असे. २००४ साली आपल्या एका महिन्याच्या मुलाला कडेवर घेऊन तो मगरीला खाऊ घालत होता. एका हातात इतक्या छोट्या बाळाला घेऊन मगरीच्या जवळ जाण्याची कल्पना तर कोणी करेल का? त्याच्या या कृत्यामुळे चहुबाजूंनी त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. आयर्विनला शेवटी आपल्या या कृत्याबद्दल प्रेक्षकांची माफी मागावी लागली.

२००४ मध्येच एकदा तो अंटार्टिकामध्ये एका डॉक्युमेंटरीचे शुटींग करत होता तेव्हा त्याच्यावर अंटार्टिकातील वन्यजीवांना त्रास दिल्याची टीका झाली होती. त्याने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचे ‘द ग्रेट लीडर ऑफ द नेशन’ अशा शब्दात कौतुक केले होते तेव्हाही त्याच्यावर टीका झाली होती. राजकीय व्यक्तींशी असलेल्या त्याच्या संबंधावरून नेहमीच त्याला लक्ष्य केले जात असे.

भयानक अजगर आणि मगरींशी खेळणारा आणि त्यांना क्षणात शांत करणाऱ्या स्टीव्हचा मृत्यूही तितकाच धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारा होता. द डेडली सी नावाच्या एका कार्यक्रमासाठी हे शुटींग चालले होते. शुटींगचा शेवटचा टेक घेण्यासाठी म्हणून तो पुन्हा एकदा त्या स्टिंगरे माशाजवळ गेला. खरे तर याआधी त्याने या माशासोबत बरेच टेक घेतले होते. हा अखेरचा टेक त्याला स्टिंगरेच्या पाठीवर बसून घ्यायचा होता. यावेळीही तो नेहमीप्रमाणे त्या माशाच्या पाठीवर बसला पण अचानकच माशाने ह*ल्ला केला.

स्टिंगरे मासा हा तसा शांत स्वभावाचा म्हणून ओळखला जातो, पण त्यादिवशी अचानकच त्याने स्टीव्हवर असा काही ह*ल्ला चढवला की, एका मिनिटात स्टीव्ह गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले पण, प्रत्यक्षात खूप उशीर झाला होता. स्टीव्ह जाता जाता एवढेच म्हणाला, “मी आता चाललो.”

लहानपणापासून वन्य जीवांच्या संगतीत वाढलेल्या आयर्विनचा मृत्यू एका माशाच्या ह*ल्ल्यात व्हावा हे सत्य कुणालाच पटत नव्हते. स्टिंगरेसारखा शांत मासा त्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरावा हे तर अजूनच अविश्वसनीय!

प्राण्यांना समजून घेणे ही तशी निश्चितच सोपी गोष्ट नाही. कदाचित मला प्राण्यांची सगळी माहिती आहे या अहंकारानेच स्टीव्हचा बळी घेतला असावा असे वाटते. तुमचे मत काय?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मेल्यावरसुद्धा ‘विजेने’ या माणसाचा पिच्छा सोडला नव्हता..!

Next Post

फेमस ‘ह्युगो बॉस’ ब्रँडने त्यांच्या काळ्या इतिहासाबद्दल माफी मागितली आहे..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

फेमस 'ह्युगो बॉस' ब्रँडने त्यांच्या काळ्या इतिहासाबद्दल माफी मागितली आहे..!

हा 'सील' रोज पाण्यातून बाहेर येऊन, रस्ता ओलांडून दुकानात जाऊन मासे खायचा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.