The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काळानुसार बदललं नाही की मग ‘ब्लॅकबेरी’सारखी गत होते..!

by द पोस्टमन टीम
4 February 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आज प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत जो टिकेल त्यालाच डोक्यावर घेतलं जातं. आता तुमच्या हातात असलेल्या मोबाईल फोनचाच विचार करा, यात अक्षरशः दर सहा महिन्यांनी कितीतरी अपडेट्स येत असतात. अनेक कंपन्या सातत्याने हे अपडेट्स फॉलो करतात म्हणून टिकून राहतात. नाही तर कधी काळी मार्केटवर राज्य गाजवणाऱ्या कंपन्यांनाही इथे आपला गाशा गुंडाळावा लागतो.

उदाहरणच द्यायचे झाले तर ब्लॅकबेरीचे घ्या. २०१८ साली या कंपनीला चक्क आपले प्रोडक्शन बंद केल्याचे जाहीर करावे लागले. नाही तर एक काळ असा होता की ब्लॅकबेरीशिवाय लोकांचं पानही हलत नव्हतं. मग नेमकं असं काय झालं की कंपनीला आपले प्रोडक्शन बंद करण्याची वेळ आली? जाणून घेऊया या लेखातून.

आज आपण आपल्या फोनवरून इमेल, सोशल मिडिया आणि अनेक प्रकारचे गेमिंग अ‍ॅप्स वापरू शकतो. हे कशामुळे शक्य झाले? तर मोबाईलमध्ये मिळणाऱ्या इंटरनेट सुविधेमुळे. नाहीतर एक काळ असा होता जेव्हा ईमेल चेक करण्यासाठीसुद्धा कंप्युटरचा वापर करावा लागत होता. अशा काळात ब्लॅकबेरीने सर्वात आधी इंटरनेट फिचर देणारा मोबाईल आणला.

ईमेल चेक करणे, फॉरवर्ड करणे, इंस्टंट मेसेजेस पाठवणे या सगळ्या सुविधा त्याकाळी ब्लॅकबेरीने दिल्या होत्या म्हणूनच या फोनला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

एकेकाळी लाखो भारतीयांच्या वापरातील हा फोन आज धूळ खात पडला आहे, यामागे तशी अनेक करणे आहेत, पण आज आपण त्यातील काही प्रमुख कारणांचा विचार करू.



टचस्क्रीन सुविधेकडे दुर्लक्ष करणे पडले महागात

बाजारात जोपर्यंत इंटरनेट सुविधा देणारा ब्लॅकबेरी हा एकच फोन होता, तोपर्यंत ब्लॅकबेरीची चलती होती. त्यानंतर अ‍ॅपल आणि सॅमसंग यांसारख्या कंपन्यांनी त्यांच्या फोनला टचस्क्रीनसारखे पर्याय दिले ज्यामुळे फोन हाताळणे एकदम सोपे झाले. अशाच फोनची बाजारात संख्या वाढू लागली.

टचस्क्रीनच्या जमान्यातही ब्लॅकबेरीने मात्र आपला क्वार्टी कीबोर्ड सोडला नाही. याआधी ब्लॅकबेरी इंस्टंट मेसेजिंगसाठी आणि इंटरनेटसाठीच तर वापरले जात होते मात्र त्याच सुविधा इतर मोबाईलमध्येही मिळत असतील आणि त्या वापरणे जास्त सोपे असेल तर ब्लॅकबेरीचा तो किचकट किबोर्ड आणि स्क्रोलिंग बटण वापरण्याला कोण प्राधान्य देईल?!

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

लोकांना आता फोनवरून फोटो, व्हिडीओ, अ‍ॅप्स, गेम्स करायचे होते, हे सगळं त्या क्वार्टी कीबोर्डमुळे निव्वळ अशक्यप्राय होतं. साध्या टेक्स्ट मेसेजमध्ये इमोजी वापरण्याचीही सुविधा नव्हती. बाजारपेठेतील या बदलत्या मानसिकतेशी ब्लॅकबेरीने जुळवून न घेता ग्राहकांच्या माथी तो क्वार्टी कीबोर्ड थोपवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ग्राहकांनीही ब्लॅकबेरीकडे पाठ फिरवली.

फोनचं जाडजूड डिझाईन

ब्लॅकबेरीचा आणखी एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्याचं डिझाईन. इतर फोन्समध्ये टचस्क्रीन फिचर असल्याने कीबोर्ड गायब झाला होता. ब्लॅकबेरी मात्र कीबोर्डशी चिकटून राहिल्याने त्याची डिझाईनही जुनाट आणि जड वाटत होती. हा कर्मठपणाच त्यांना पुढे जाऊन महागात पडला.

बीबीएमचा दुराग्रह

ब्लॅकबेरीने बीबीएमसारखे टेक्स्ट मेसेजिंग फिचर देऊन एकेकाळी आपली हवा केली होती. थोडक्यात बीबीएम म्हणजे त्याकाळातील व्हाट्सअ‍ॅपच! ज्यात इंस्टंट मेसेजेसची सुविधा होती, ग्रुप चॅट करता येत होते, एखादा महत्त्वाचा नंबर पिन करून ठेवता येत होता. बल्क मेसेजेस पाठवता येत होते. या सुविधेमुळेच भारतात हा फोन तरुणांच्या आणि कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता.

ब्लॅकबेरीने ही सुविधा प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यास नकार दिला. बीबीएम ही फक्त ब्लॅकबेरीचीच मक्तेदारी राहील असे पाहिले.

पुढे व्हाट्सअ‍ॅप आले आणि बीबीएमला कुणीही विचारेनासे झाले.

एकतर व्हाट्सअ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध असल्याने कोणत्याही फोनवरून वापरता येत होते. त्यामुळे ज्या बीबीएमच्या जोरावर ब्लॅकबेरीने मार्केट मारले होते ते बीबीएम फिचरही आता मागे पडले होते. नंतर ब्लॅकबेरीने बीबीएमबद्दलचा दुराग्रह बदलला पण तोपर्यंत व्हाट्सअ‍ॅप, किक आणि आय मेसेजसारख्या अनेक अ‍ॅप्सनी मार्केट काबीज केले होते.

अ‍ॅप्सची मर्यादा

ब्लॅकबेरीने आपल्या ओएस सिस्टीमवर उपलब्ध करून दिलेले अ‍ॅप्स खूपच मर्यादित होते. एकीकडे प्ले स्टोअरवर रोज वेगवेगळ्या अ‍ॅप्सची जत्रा लागलेली असताना ब्लॅकबेरीने मात्र हा ऑप्शन खूपच मर्यादित ठेवला, ज्यामुळे हवे ते अ‍ॅप्स डाऊनलोड करणे शक्य नव्हते. यामध्ये फेसबुक आणि ट्विटरसारखे अ‍ॅप्स वापरता येत असले तरी, हे अ‍ॅप्स फक्त हाफस्क्रीनवरच दिसत होते. ज्यामुळे ते वापरताना असुविधा निर्माण होत असे. हाफस्क्रीनवर या अ‍ॅप्सवरील संपूर्ण कंटेंट पाहता येणे शक्य नसे. साहजिकच ग्राहकांनी ब्लॅकबेरीकडे पाठ फिरवायला सुरुवात केली.

कार्पोरेट क्षेत्राशी जुळवून न घेणे

कार्पोरेट हाच ब्लॅकबेरीचा खरा ग्राहक वर्ग होता. तंत्रज्ञान बदलेल तसे बदलणारा हा ग्राहक वर्ग टिकवून ठेवणे ब्लॅकबेरीला जमले नाही. सर्वांत आधी इंटरनेट आणि बीबीएमसारख्या सुविधा देऊन ब्लॅकबेरीने याच कार्पोरेट वर्गाला आपले लक्ष्य बनवले होते आणि नंतर मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

फक्त बिझनेसच्या कामासाठी फोन वापरणारा हा ग्राहक वर्ग आयफोन आणि स्मार्टफोनकडे वळला होता. दिवसेंदिवस कार्पोरेट वर्गाचे मोबाईलवरील अवलंबन वाढत होते. त्यामुळे त्यांना अधिक सुरक्षित मोबाईल फोनची गरज होती. ब्लॅकबेरी आपला फोन अधिक सुरक्षित असल्याचा दावा करत होती. मात्र नंतर अशा अफवा उठू लागल्या की भारत आणि पाकिस्तान सरकारच्या दबावाला बळी पडून या कंपनीने आपल्या फोनचा डेटा अ‍ॅक्सेस करण्याची मुभा या दोन्ही देशांतील सरकारांना दिली आहे. त्यामुळे या फोनच्या सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आला.

कार्पोरेट वर्गातील ग्राहकांना ही रिस्कच नको होती.

ज्या कार्पोरेट ग्राहकाकडून कंपनीला ९०% नफा मिळत होता तो सगळाच ग्राहकवर्ग कंपनी गमावून बसली. फक्त कार्पोरेट वर्गाचा विचार करून जरी कंपनीने स्वतःच्या मॉडेलमधे आणि फीचर्समध्ये बदल केले असते तरी, कंपनी टिकून राहिली असती.

स्पर्धेकडे दुर्लक्ष

ब्लॅकबेरीची मोठी घोडचूक ठरली ती हीच की आजूबाजूच्या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणे तर दूरच पण त्यांनी किमान स्पर्धेत टिकून राहण्याचाही विचार केला नाही. आयफोन आणि स्मार्टफोनच्या जमान्यात जिथे रोजरोज नवे बदल येत असतात तिथे या कंपनीने मात्र आपल्या फोनमधे, सुविधेमध्ये काही नवेपणा आणण्याचा विचारच केला नाही.

नवा ग्राहकवर्ग आकर्षित करणे तर राहूदेच, पण आहे तो ग्राहकवर्ग कसा टिकून राहील यासाठीही काही पावले उचलली नाहीत. सुरुवातीला काळाच्या पुढे राहून सुविधा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कंपनीने नंतर काळासोबत चालण्याचाही प्रयत्न करू नये हे कंपनीसाठी खूपच घातक ठरले. ब्लॅकबेरीच्या किंमतीत नवनवे फीचर्स देणाऱ्या आयफोन आणि स्मार्टफोन येत असताना, ग्राहकांनी याच्याकडे पाठ फिरवणे साहजिकच होते.

ब्लॅकबेरीला एकेकाळी बाजारपेठेत अ‍ॅपलचा दर्जा होता पण फक्त आपल्या कर्मठ, हेकट धोरणांमुळे या कंपनीने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सहारांनी कागदपत्रांनी भरलेले १२८ ट्रक सेबीच्या कार्यालयात पाठवून ट्राफिक जॅम केलं होतं

Next Post

कर्नल आर्देशीर तारापोर – पाकिस्तानचे साठ रणगाडे उ*ध्वस्त करणारा वीर जवान..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

कर्नल आर्देशीर तारापोर - पाकिस्तानचे साठ रणगाडे उ*ध्वस्त करणारा वीर जवान..!

जगात कोणी उपाशी राहू नये म्हणून आयुष्यभर झटला पण अन्नासाठीच तडफडून मेला..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.