The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंतरराष्ट्रीय करार मोडून रशियाने अंतराळात तोफ उडवली होती..!

by द पोस्टमन टीम
16 June 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


यु*ध्दाच्या इतिहासाच्या पोटात आपल्याला ज्ञात नसणारी अनेक गुपितं दडलेली असतात. शत्रू पक्षाला गारद करण्यासाठी वापरल्या गेलेल्या युक्त्या, शस्त्रास्त्रं यांच्या अनेक सुरस कथा कालांतरानं ऐकायला मिळतात. अशीच एक कथा दुसर्‍या महायु*ध्दानंतर तब्बल चाळीस वर्षांनतर उजेडात आली.

जमिनीवरची यु*ध्दं आकाशात गेली आणि काही देशांनी ती अगदी अंतराळात नेण्याचा प्रयत्न केला होता, ऐकायला हे एखाद्या सायफ़ाय सिनेमाच्या कथेसारखं वाट असलं तरीही हे वास्तवात घडलेलं आहे. शीत यु*ध्दाच्या समाप्तीनंतर एक चतुर्थांश शतक सरल्यानंतर ही गोष्ट उजेडात आलेली आहे. आजचं तंत्रज्ञान आणि विज्ञान खरंतर मधल्या काळात खूप पुढे आलेलं असलं तरीही आजही ही गोष्ट वास्तवात घडू शकते यावर विश्वास बसणं कठीण आहे.

आता तुम्ही विचाराल की असं काय घडलं होतं?

तर, १९७५ साली महासत्ता रशियानं एका अंतरिक्ष स्टेशनवरून तोफ़ डागली होती.

हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना?



१९७० च्या दशकात रशियाच्या अल्माज या अंतरिक्ष स्टेशनवर असणार्‍या R-23 M कार्टेक एका शक्तिशाली एअरक्राफ्ट वेपनमधून प्राप्त केलं होतं. मूळ २३ मिलीमिटर तोफ़ेला टुपोलोव टियु-२२ ब्लाईंडर सुपरसोनिक बॉ*म्बरसाठी एरोन रिख्तर यानं डिझाईन केलं होतं. हे शस्त्र सर्वश्रुत आहे, मात्र याचाच भाऊ जो अंतराळात होता त्याच्याबाबतीत मात्र बराच काळ कोणाला माहिती नव्हती. अगदी आत्ता आत्तापर्यंत अशा प्रकारच्या तोफ़ेच्या अस्तित्वाची जगाला काहीही माहिती नव्हती मात्र एका टिव्ही शोमुळे जगासमोर हे गुपित उघड झालं. या शोमध्ये चक्क या बंदुकीचं एक फ़ुटेज पहायला मिळाल्यानं तिच्या असण्याबद्दल काहीही शंका उरली नाही. यानंतर मात्र त्याच्या तंत्रज्ञानाबद्दल जगासमोर माहिती आली आणि या माहिती सर्वजण चकीत झाले.

हे यु*ध्द जमिनीवरचं नव्हतं तर अंतराळात खेळलं जाणारं होतं आणि यात सहभागी होते रशिया-अमेरिका हे महासत्ता म्हणून ओळखले जाणारे देश! या सत्तरच्या दशकात या दोन्ही देशात अंतराळ मोहिमांबाबत चढाओढ चालूच होती. या मोहिमा हे एक प्रकारचं शक्तीप्रदर्शन असल्यानं त्याबाबत कमालीची गुप्तताही पाळली जात असे. मात्र ही गुप्तताच समोरच्या शत्रूपक्षाला कुरापती करायला भाग पाडत असावी.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

अंतरिक्ष युगाच्या अगदी सुरवातीच्या कालखंडात सोविएत सेना अमेरिकेची अंतरिक्ष यानं सोविएत उपग्रहांच्या निकट जाऊन निरिक्षण करण्याच्या शक्यतेनं धास्तावली होती. क्रेमिलिनच्या प्रचारानुसार हे असं काही वास्तवात अस्तित्वातही नव्हतं.

मात्र खरं सांगायचं तर हा काही रशियाचा वेडेपणा किंवा शंकेखोरपणा म्हणता येणार नाही, कारण अशा प्रकारच्या मोहिमांची पूर्ण शक्यता होतीच. म्हणूनच दोन्ही बाजूंनी ही असुरक्षितता भेडसावत होती. या दोन्ही तटांवर उपग्रहविरोधी शस्त्रांवर संशोधन चालूच होतं.

या चढाओढीत रशियाचं अंतराळ स्टेशन-अल्माज रक्षात्मक अंतरिक्ष शस्त्राचा पहिला अधिकृत उमेदवार ठरला. सैन्याच्या वास्तव्यासाठी उपयुक्त अशा गोष्टींसह ही चौकी सज्ज होती. 

या चौकीमध्ये टेहळणीपासून सुसज्ज टेहळणी कॅमेरे, हेरगिरीसाठी उपयुक्त रडार अशा अत्याधुनिक उपकरणांसहीत अनेक अद्ययावत शस्त्रांचा यात समावेश होता. या चौकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि गुपित हे होतं की, इथे अल्माज तोफ़ सज्ज केली गेली होती.

या शस्त्राच्या डेव्हलपमेंटची संपूर्ण जबाबदारी मॉस्कोस्थित केबी टोचमॅश डिझाईन ब्युरोच्या अलेक्झांडर न्युडलमॅनच्या नेतृत्वाखाली होती. या टिममधील इंजिनियर्सनी दुसर्‍या महायु*ध्दानंतर एअरक्राफ़्ट वेपन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती. या विशिष्ट अशा मोहिमेसाठी या चमुनं १४.५ मिलीमीटर रॅपिड-फ़ायर तोफ़ विकसीत केली होती. असं मानलं जातं की, ही तोफ दोन मैल दूर असणारं लक्ष्य टिपू शकणार होती. या तोफ़ेची जेंव्हा जमिनीवर चाचणी घेतली होती तेंव्हा तिनं एक मैल अंतरावर असणार्‍या एका धातूच्या बॅरलला यशस्वीरित्या छेदलं होतं.

मात्र अंतरीक्ष स्टेशन्सवर हत्यारं बाळगण्याला आणि ती वापरण्यालाही काही मर्यादा आहेत आणि याचं कारण आहे अंतराळातली एकूणच स्थिती. असं असलं तरीही कॉस्मॉनट्स आपल्या कॉकपिटमध्ये बसून फ़ायरिंग करू शकत होते. मात्र हे करण्यासाठी त्यांना २० टनाचं अख्खं स्पेसस्टेशन लक्ष्याच्या दिशेने फ़िरवावं लागणार होतं.

रशियाचं अल्माज हे काळाच्यापुढे असणारं अंतरीक्ष स्टेशन होतं. हे तीन भागात विभागलं होतं. या ऑरबिटल पायलटेड स्टेशन मॉड्युलमध्ये फ़ंक्शनल कार्गो ब्लॉक, ज्याचा वापर स्टेशनसाठी क्राफ़्टचा पुरवठा करण्यासाठी होत असे, व्हिए स्पेसक्राफ़्टमध्ये दोन किंवा तीन व्यक्ती बसून जाऊन परतु शकतील असं अंतरीक्ष वाहन होतं. याचा साधारणपणे दहा फ़ेर्‍यांसाठी वापर करता येत असे.

ऑरबिटल पायलटेड स्टेशन अर्थात OPS १३ फ़ूट ६ इंच आणि २० टन वजन इतक्या आकारमानाचं होतं. या स्पेस क्राफ़्टमधल्या क्रूला अंतराळात ३० ते ६० दिवस रहाणं बंधनकारक होतं. पृथ्वीवर परतण्यासाठी व्ही या कॅप्सुलचा वापर केला जात असे आणि यातूनच नवा क्रू अंतरिक्ष स्टेशनवर पाठवला जात असे. अर्थातच सोविएत रशिया सौनिकी वापरासाठी असलेल्या या स्टेशनवर अत्यंत कडक सुरक्षा राखली जात असे. या OPS च्या Ford belly वर २३ मिलिमीटर गॅस पॉवर्ड रॅपिड फ़ायर तोफ़ तैनात केलेली होती. कॉस्मोनटना कॉकपिटमधे बसूनच याद्वारे मारा करता येत असे.

सत्तरच्या दशकात अल्माजचं आयुष्य संपत आलं आणि १९ जुलै १९७४ या दिवशी अल्माजवरून अखेरचा क्रू पृथ्वीवर परतला. मात्र परतण्यापूर्वी या तोफ़ेचा मारा त्यांनी रशियाच्याच एका उपग्रहावर करून ही तोफ़ निकामी केली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

पारंपरिक यु*द्धं मागे पडून आपली आता जैव-यु*द्धाकडे वाटचाल सुरु आहे..!

Next Post

एका चहावाल्याने गरज म्हणून बनवलेला बर्म्युडा आता फॅशन झाला आहे..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

एका चहावाल्याने गरज म्हणून बनवलेला बर्म्युडा आता फॅशन झाला आहे..!

२१व्या वर्षी 'हज'ला निघालेला इब्न बतुता तीस वर्ष जग फिरून घरी गेला..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.