The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओव्हर कॉन्फिडन्समुळे अमेरिकेला सोमालियासारख्या देशाकडून यु*द्धात हरावं लागलं होतं..!

by द पोस्टमन टीम
30 December 2025
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एखादं यु*द्ध कुणामध्ये लढलं गेलं, यु*द्धाची पार्श्वभूमी काय, यु*द्धाची रणनीती काय आणि यु*द्धाची परिणीती काय? अशा अंगाने विचार केल्यास प्रत्येक यु*द्धात एक वेगळी कथा दडलेली असते. यु*द्धाची कथा ही पराक्रमाची असू शकते, शौर्याची असू शकते, पण यासोबतच क्रौ*र्य आणि हिं*सेचीही कथा असते. पुस्तकातल्या किंवा गोष्टीतल्या यु*द्धात नेहमीच चांगल्याचा विजय होतो, सत्याचा विजय होतो. पण खऱ्या लढाईतही असंच होतं का?

आज आम्ही अशाच एका यु*द्धाची कथा घेऊन आलो आहोत. सोमालियातील मोगादिशु यु*द्धाची कथा. या वास्तव यु*द्धाला पडद्यावरील कथेतही स्थान मिळाले.

मोगादिशु यु*द्धाची ही गोष्ट सुरू होते १९९१ सालापासून. मोगादिशु ही सोमालियाची राजधानी. सोमालिया आफ्रिकेतील एक अत्यंत गरीब देश. लोकांच्या दोन वेळच्या जेवणाचीही मारामार. समुद्रातील प्रवासी आणि व्यापारी जहाजे लुटणाऱ्या चाच्यांसाठीही हा देश विशेष ओळखला जातो. रोजगाराच्या अपुऱ्या संधी आणि अन्नटंचाइमुळे इथल्या लोकांना जाणीवपूर्वक जीव धोक्यात घालून अशी जोखीमीची आणि नामुष्कीजनक कामे करावी लागतात.

१९९१ साली सोमालियातील मोहम्मद सिआद बर्रने तिथल्या अतिरेकी आणि विरोधी गटांना हाताशी धरून प्रस्थापित सरकार उलथवून लावले होते. सोमालियातील अ*तिरेक्यांनी आपल्याच सरकारविरोधात विद्रोह पुकारला आणि देशाच्या राजधानीत हाहाकार माजवला होता.

सरकार तर बदलले पण मोगादिशुमध्ये सगळीकडे अंधाधुंदी माजली. वेगवेगळ्या अ*तिरेकी गटांना हातांशी धरून सरकर पाडण्यात तर सिआद यशस्वी झाला पण याच अतिरेकी गटाच्या एक म्होरक्याने स्वतःलाच सोमालियाचा शासक घोषित करून टाकले. या म्होरक्याचे नाव होते, मोहम्मद फराह एडेड. सिआद करायला गेला एक आणि झाले तिसरेच अशी परिस्थिती निर्माण झाली. या विविध गटांतच फुट पडल्याने त्याच्यासमोर नवे पेचप्रसंग उभे राहिले.

अ*तिरेकी गटातील आपसातील लढायांमुळे सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होऊ लागले आधीच परिस्थिती अत्यंत दयनीय त्यात या संकटाने त्यांची अवस्था आणखीनच विकलांग करून टाकली. जमेल तसे आणि वाट दिसेल तिकडे हे लोक जीव मुठीत धरून पळत होते. सोमालियातील हा अंतर्गत हिंसाचार रोखण्यासाठी शेवटी संयुक्त राष्ट्राला हस्तक्षेप करावा लागला. यासाठी संयुक्त राष्ट्राने अमेरिकेच्या लष्करावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. सोमालियातील सरकारच गुंडांच्या हाती असल्याने त्यांना या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीणच होते.



नागरिक हतबल होऊन देश सोडून पळून जात होते. भूकमारीने लोक एकमेकांच्या जीवावर उठले होते. जिकडे बघेल तिकडे फक्त विनाशाचे विद्रूप रूप दिसत होते.

आता अमेरिकेला दोन आघाड्यांवर तोंड द्यायचे होते. एक तर आधीच गृहयु*द्धात होरपळून निघालेल्या जनतेला त्यांना आधार द्यायचा होता आणि दुसरीकडे मोहम्मद फराह एडेडला पकडायचे होते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अमेरिकेच्या शांतीदूतांनी सोमालियात प्रवेश करताच निष्पाप नागरिकांना हरेक प्रकारची मदत पोहोचवण्यासाठी कंबर कसली. थोड्या फार प्रमाणात त्यांना यात यशदेखील मिळाले. संपूर्ण मोगादिशु शहरात जो हाहाकार माजला होता त्यावरही त्यांनी नियंत्रण मिळवले. पण, एडेडला पकडून अटक करणे हे वाटते तितके सोपे नव्हते. एडेड एक अ*तिरेकी होता. त्याच्याकडे भरपूर शस्त्रसाठा आणि मनुष्यबळही होते. अमेरिकन लष्कराला याचा अंदाजच आला नाही आणि इथेच त्यांची चूक झाली.

एडेडच्या अ*तिरेक्यांनी अमेरिकेची लढाऊ हेलिकॉप्टर पाडण्यास सुरुवात केली. जमिनीवरील सैन्यालाही त्यांनी सळो की पळो करून सोडले. अमेरिकेचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरही एडेडच्या रॉकेट ह*ल्ल्यात पाडण्यात आले. अमेरिकन सैन्याचे या यु*द्धात प्रचंड नुकसान झाले होते.

अमेरिकेने आता मोहम्मद फराह आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी एक नवी मोहीम आखली. या मोहिमेचे नाव होते ऑपरेशन गॉथिक सर्पंट. सापाप्रमाणे एकेकाला मारू अशा उद्देशाने हे ऑपरेशन आखले होते. पण, मोहम्मदचे अ*तिरेकी अमेरिकन लष्कराला पुरून उरले. आता अमेरिकी लष्करासमोर स्वतःचा जीव वाचवण्याचे आव्हान उभे राहिले. कारण सोमालियाच्या भूमीतील हे अ*तिरेकी कधी कुठून तुटून पडतील याचा नेम नव्हता. या ऑपरेशनमध्येही अमेरिकन लष्कर अपयशी ठरले. हे अ*तिरेकी इतके घातक होते की आता अमेरिकेला तिथे यु*द्ध सुरू ठेवणे कठीण जाऊ लागले. शेवटी अमेरिकन लष्कराने मोगादिशुमधून काढता पाय घेण्याचे ठरवले. या यु*द्धात अमेरिकन फौजेची मोठी हानी झाली होती. त्यामुळे अमेरिकने या प्रश्नातून स्वतःला बाजूला काढले आणि आपल्या सैन्य तुकडीलाही माघारी बोलावले. अमेरिकेने आपला एक धडाडीचा अधिकारी सार्जंट मॅट रीयर्सन यालाही या यु*द्धात हरवले.

प्रसिद्ध दिग्दर्शक रिडले स्कॉट यांनी मोगादिशुमधील या यु*द्धावर आधारित ‘ब्लॅक हॉक डाऊन’ नावाचा चित्रपट बनवला. सोमालियन अतिरेक्यांची ताकद काय आहे याचा अंदाज या चित्रपटावरून नक्कीच येतो. यातील ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाडण्याच्या दृश्याने तर कमाल केली आहे.

अमेरिकन सैन्य माघारी गेले असले तरी सोमालियातील परस्थिती मात्र ‘जैसे थे’च होती. सामान्य नागरिकांनी देश सोडून जाणेच पसंत केले. या नागरिकांकडे याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता एक तर देशात राहून मरा किंवा देश सोडून पळा.

आपली संपत्ती आपले नातेवाईक सर्व गमावल्यानंतर किमान आपला जीव तरी वाचावा या उद्देशाने या नागरिकांनी इतर देशात जाण्याचा मार्ग स्वीकारला.

सोमालियात शांतता प्रस्थापित करण्याचा अमेरिकन लष्कराचा मनसुबा तिथल्या अ*तिरेक्यांनी शिताफीने हाणून पाडला. त्यानंतरही सोमालियात शांतता प्रस्थापित करण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण अजूनही यातील एकही प्रयत्न पूर्णतः यशस्वी झालेला नाही. तरीही आज सोमालियात पूर्वी इतकी अराजकता राहिलेली नाही हेही खरे आहे. हळूहळू सोमालियाचा प्रवास शांततेच्या दिशेने सुरू आहे. देश सोडून गेलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा आपल्या मायभूमीत परत जाण्याची अशा निर्माण झाली आहे.

तरीही, यु*द्ध हा शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा मार्ग होऊ शकतो का? तुम्हाला काय वाटते?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

यांच्या पेंटिंग्स परदेशात करोडोत जातायत आणि आपल्याला यांचं नाव सुद्धा माहित नाही..!

Next Post

दर सहा महिन्यांनी मोबाईल बदलणाऱ्या पिढीला नोकिया ११०० चे किस्से सांगून खरे वाटणार नाहीत

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

दर सहा महिन्यांनी मोबाईल बदलणाऱ्या पिढीला नोकिया ११०० चे किस्से सांगून खरे वाटणार नाहीत

वेस्ट इंडिजकडे त्यांचा स्वतःचा सेपरेट क्रिकेटचा देव आहे, त्याचं नाव ब्रायन लारा..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.