The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेच्या या तुरुंगात जायला खुंखार गुन्हेगार देखील घाबरायचे..!

by द पोस्टमन टीम
28 June 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


स्वर्ग आणि नरक या पारलौकिक संकल्पना आहेत. स्वर्ग ही अशी जागा आहे जिथे गेल्यानंतर माणसाला ती सगळी सुखे प्राप्त होतात ज्यासाठी तो आसुसलेला असतो. नरक म्हणजे अशी जागा आहे जिथे माणसाच्या पापकर्माचा हिशेब करून त्यानुसार त्याला कठोर शिक्षा दिली जाते अशी सर्वसामान्य धारणा आहे. अर्थात, कुणालाही नरकात जाण्याची इच्छा होणार नाहीच. स्वर्ग काय किंवा नरक काय आजवर या ठिकाणांना कुणी प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. फक्त पुराणकथांतून याबद्दलची वर्णन वाचली असतील इतकीच.

आता काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. पण धरतीवरील नरक कशाला म्हटले जाते हे तुम्हाला माहितीये का? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचाच.

न्यूयॉर्क शहराच्या बाहेर एक रिकर्स नावाचे बेट आहे. या बेटावर १९३२ साली एक भला मोठा तुरुंग बांधण्यात आला. पण हा तुरुंग नसून नरक असल्याने तो बंद करण्याचीही मागणी सुरू होती.

या तुरुंगाला नरक का म्हणतात?

न्यूयॉर्कमध्ये त्याकाळी गुन्हेगारीचे प्रमाण खूपच वाढले होते. गल्लीबोळात गुंडांच्या छोट्या-छोट्या टोळ्यांनी गदारोळ माजवला होता. या गुंडांना पोलीस अटक करत होती. पण गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले होते की, शहरातील तुरुंग पुरत नव्हते.



तेव्हा नवा तुरुंग बांधण्यासाठी या बेटाची निवड करण्यात आली. तसेही हे बेट रिकामेच पडले होते. इथे शहरातील सगळा कचरा टाकला जायचा. एवढ्या मोठ्या जमिनीचा काही तरी वापर झाला पाहिजे असा विचार करून तिथे प्रशासनाने जेल बांधण्याचे आदेश दिले गेले.

रिकर्सचा परिसर तसाही एकदम शांत होता. अशा वातावरणात या कैद्यांना एकांत छळू लागेल असा विचार करूनच हा तुरुंग उभारण्यात आला.

कुठेही गुन्हा घडला की पोलीस गुन्हेगाराला अटक करत आणि इथे आणून टाकत. न्यायालयाचे कामकाज कसे गोगलगाईच्या गतीने चालते हे तर सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे आपली ट्रायल किंवा जामीन होण्याची वाट बघत हे कैदी वर्षानुवर्षे इथेच खितपत पडत.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

हे कैदी तर होतेच खुंखार. त्यांचे आपापसांत भांडणंही फार होत. कधीकधी ते इतके विकोप्याला जात की भांडणं सोडवणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांचा जीव घ्यायलाही हे कैदी मागेपुढे बघायचे नाही .

तुरुंगाबाहेर प्रशासनाची द*हश*त होती पण तुरुंगात या कैद्यांसमोर कुणाचेच काही चालत नव्हते. या तुरुंगात एकाच वेळी हजारो कैदी बंद असत. त्या ठिकाणची परीस्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी. या कैद्यांच्या डोक्यात एकच गोष्ट सतत घोळत असे एक तर मारा किंवा मरा! एकमेकांविषयीचा द्वेष आणि सूडबुद्धी यातूनच इथल्या कित्येक कैद्यांनी आपला जीव गमावला असेल.

अशा परिस्थितीत कुणीही व्यक्ती नैराश्याचा शिकार होणारच. इथले जीवनच एकदम खडतर असल्याने कैद्यांचीच नव्हे तर सुरक्षा रक्षकांचीही मानसिक स्थिती बिघडून जाते. अशा वातावरणात जर एखादा अल्पवयीन कैदी आला तर त्याच्या मानसिकतेचे काय होईल.

फक्त चोरीचा आरोप असणाऱ्या सोळा वर्षांचा कलीफ ब्रावडर याच्या बाबतीतही असेच काहीसे झाले.

त्याला सोडवून आणण्यासाठी त्याच्या नातेवाईकांकडे पैसे नव्हते. त्यामुळे कलीफ ब्रावडर त्याच तुरुंगात खितपत पडला. या वातावरणाने कलीफच्या मनावर असे काही ओरखडे उमटवले की त्याला ते सहन झाले नाहीत.

कलीफ वयाने लहान असल्याने कोणीच त्याच्याशी नीट वागत नसे. पोलीसवाले असो की कैदी प्रत्येकजण त्याच्यावर दादागिरी करत असत. त्याला मानसिक, शारीरिक त्रास देत असत. 

अशा वातावरणात त्याला तीन वर्षे काढावी लागली. तीन वर्षांनी त्याला जामीन मिळाला. पण, तुरुंगामधील यातनांनी त्याच्या मनावर केले गेलेले घाव पुसले नाहीत. तुरुंगातून बाहेर आल्या आल्या त्याने आत्मह*त्या केली.

कलीफच्या या घटनेने संपूर्ण अमेरिका हादरून गेली. एका निष्पाप मुलाच्या आत्मह*त्येला जबाबदार कोण? त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप करणारे फिर्यादी? कसलीही शहानिशा न करता त्याला पकडून तुरुंगात डांबणारे पोलीस की त्याच्या जामिनासाठी तीन वर्षाचा वेळ घालवणारे न्यायालय? या घटनेनंतर तत्कालीन राष्ट्रपती ओबामा यांनी अल्पवयीन गुन्हेगारांना तुरुंगात न डांबण्याचे आदेश दिले.

या तुरुंगात तैनात असणारे पोलीसांनीही स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. दररोज कामावर आल्यावर आज आम्ही सुरक्षित घरी पोहोचू एवढीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, असे ते म्हणतात. हे कैदी पोलिसांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जेवण द्यायला गेलेल्या पोलिसांच्या अंगावर हे थुंकतात, लघवी करतात. डोकं शांत ठेवण्याशिवाय पोलिसांकडे काहीच पर्याय नसतो.

शेवटी अमेरिकेच्या नागरिकांनी, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी २०१९ मध्ये हा नरक बंद करण्याचीही प्रशासनाकडे मागणी केली होती. प्रशासनानेही या तुरुंगातील भयानक वातावरणाबाबत अंदाज असल्याने हा तुरुंग बंद करण्याचा निर्णय घेतला.

आता सांगा जिथे चोवीस तास तुमच्या डोक्यात मृत्यूची भीती घर करून बसलेली असेल अशा वातावरणाला नरक नाही तर आणखी काय म्हणणार? जिथे कधी कोण शारीरिक, मानसिक हिं*सा करेल याची खात्री नाही. कुठल्या क्षणी काय पाहावे लागेल याची शाश्वती नाही. नुसता द*हश*तीच्या सावलीखाली वावरावे लागत असेल तर याला काय म्हणाल? नरकच ना?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

महिंद्रांनी २०२१च्या ‘फादर्स डे’ला वडिलांसोबत शेअर केलेल्या फोटोमागची स्टोरी माहिती आहे का..?

Next Post

या दोन महिलांनी चर्चला फसवून स्पेनमधील पहिला समलैंगिक विवाह केला होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या दोन महिलांनी चर्चला फसवून स्पेनमधील पहिला समलैंगिक विवाह केला होता

इंग्लंडच्या किल्ल्यात घुसून दादाने आधी त्यांचा माज उतरवला आणि मग शर्ट..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.