The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका हाताने पाळण्याची दोरी हलवणारी ही बाई दुसऱ्या हाताने संपूर्ण जग हलवीत होती

by द पोस्टमन टीम
6 December 2024
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


लष्कर आणि गुप्तचर संघटना या कोणत्याही देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे दोन मुख्य पैलू आहेत. कोणत्याही एकावर पूर्णत: अवलंबून राहून चालत नाही. गुप्तचर यंत्रणेत काम करणारे अधिकारीही जवानांप्रमाणेच जीव तळहातावर घेऊन काम करत असतात. काही काही देशाच्या उभारणीत तर सैन्यापेक्षाही गुप्तचर संघटनांचा वाटा मोठा आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे इस्राईल.

इस्राईलच्या उभारणीत गुप्तचर संघटनांनी आणि त्यांच्या गुप्तहेरांनी मोठे योगदान दिले आहे. इस्राईलमधील ज्यू लोकांसाठी गुप्तहेर हे कुठल्याही सुपर हिरोपेक्षा कमी नाहीत. त्या देशात गुप्तहेरांना खूप मोठा सन्मान दिला जातो. इस्राईलची एक गुप्तहेर तर चौदा वर्षे लेबनानमध्ये राहिली. या कालावधीत तिने मोठमोठ्या नेत्यांशी जवळीक साधली होती.

शुलामित कोहेन-किशिक असे तिचे पूर्ण नाव. तिला स्वतःला शुला याच नावाने हाक मारलेली आवडत असे. एक गुप्तहेर म्हणून ‘द पर्ल’ हे तिचे सांकेतिक नाव होते.

इस्राईलच्या निर्मितीसाठी शुलाने स्वतःला झोकून दिले होते. यासाठी तिने वाटेल ती जोखीम पत्करली. एकदा तर सात महिन्याची गर्भवती असतानाही तिने यहुदींना लेबनानच्या सीमेपार पोहोचवले होते. आपल्या देशासाठी ती किती समर्पित वृत्तीने काम करत होती हे या एका उदाहरणावरून लक्षात येईल.

शुला कोहेनचा जन्म १९३६ साली जेरुसलेममधे झाला. शुला कोहेनचे आई-वडील झायोनिस्ट्स होते. झायोनिस्ट्स म्हणजे स्वतंत्र यहुदी राष्ट्राचे पुरस्कर्ते. अर्जेंटिनातील हे कुटुंब नंतर इस्राईलला स्थलांतरित झाले. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे सोळाव्या वर्षीच तिचे लग्न, वयाने तिच्यापेक्षा तिप्पट वयाच्या म्हाताऱ्याशी लावून दिले. हा म्हातारा बैरातमधील एक श्रीमंत व्यक्ती होता. असे म्हटले जाते की लेबनानमध्ये प्रवेश मिळवण्याच्या हेतूनेच शुलाचे लेबनीन ज्यू व्यापाऱ्याशी लग्न लावून देण्यात आले होते.



लग्न झाल्यावर तीही त्याच्यासोबत लेबनानमध्ये स्थायिक झाली. जवळच तिला काही इस्राईली तरुणांच्या गुप्त संघटनेच्या बैठका भरत असल्याचा सुगावा लागला. तीही त्या तरुणांच्या गटात सामील झाली आणि इस्राईलसाठी काही तरी करण्याची इच्छा व्यक्त केली. मोसादच्या त्या गटाने तिच्यावर पहिल्यांदा एका यहुदी व्यक्तीला तिच्या घरात लपवून ठेवण्याची जबाबदारी दिली. खरे तर हे खूप मोठे जोखमीचे काम होते तरीही शुलाने ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. यानंतर शुलावरील जबाबदाऱ्या वाढत गेल्या.

पहिल्या महायु*द्धाच्या काळात अल्पसंख्याक यहुदी जगभर विखुरले होते. सुरक्षेच्या दृष्टीने यहुदींनाही एक राष्ट्र म्हणून एकजूट होण्याची गरज भासू लागली. त्याकाळी पॅलेस्टाइनवर यहुदी आणि मुस्लीम दोघेही आपला दावा करत होते. यहुदींनाही याच देशात स्वतःचा देश वसवायचा होता. पण पॅलेस्टाइनमधील मुस्लिमांना पॅलेस्टाइनचे तुकडे होऊ द्यायचे नव्हते.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

पहिल्या महायु*द्धाच्या काळात पॅलेस्टाइन इंग्रजांच्या ताब्यात होता, त्यावेळी करण्यात आलेल्या बाल्फोर करारात इंग्रजांनी यहुदींच्या स्वतंत्र राष्ट्रासाठी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

यहुदी लोकांच्या मते याच ठिकाणी त्यांच्या जीजसला क्रॉस वरून उतरवण्यात आले होते. जीजसने याच परिसरात त्याचे शेवटचे दिवस घालवले म्हणून या भूमीवर त्यांचा हक्क आहे. तर मुस्लिमांच्या मते त्यांचे नबी मोहम्मद यांनी देखील याच परिसरात अखेरचे दिवस काढले. म्हणून त्यांच्यासाठीही ही भूमी पवित्र होती. अशा वेळी पॅलेस्टाइनमधील काही यहुदी या प्रदेशावरील आपला दावा प्रबळ करण्याच्या प्रयत्नात होते.

शुला सत्ताविसाव्या वर्षापासून मोसाद या गुप्तहेर संघटनेसोबत काम करू लागली. इतर अरब देशातून हाकलून दिलेल्या ज्यूंना इस्राईलमध्ये प्रवेश मिळवून देणे आणि अरब राष्ट्रांच्या लष्करी हालचालींची माहिती मिळवणे हे तिचे मुख्य काम होते. तिचा नवरा एक श्रीमंत व्यापारी होता. लेबनानच्या उच्चभ्रू वर्तुळात त्याची उठबस असल्याने शुलाला लेबनानच्या उच्चभ्रू वर्तुळात प्रवेश करणे खूप सोपे झाले.

तिने एक खास सलून सुरू केले होते. जिथे मोठमोठे राजकारणी, नेते, अधिकारी भेट देत असत. शुला दिसायला सुंदर आणि मादक होती. त्यामुळे लोकांना आपल्या जाळ्यात ओढणे तिला फारसे अवघड गेले नाही. असे म्हटले जाते की या लोकांना खुश करण्यासाठी शुला तिच्या सलूनमध्ये वेश्या देखील पुरवत होती. तब्बल चौदा वर्षे तिने हे काम निर्धोकपणे केले तरी तिच्यावर कुणालाही संशय आला नाही.

अरब देशातील ज्यूंना पॅलेस्टाइनमधे प्रवेश मिळवून देण्यासाठी ‘आलीय बेट’ नावाची एक गुप्त मोहीम चालवण्यात आली होती ज्याची एक प्रमुख हस्तक शुला कोहेन होती. ‘पॅलेस्टाइन’मध्ये ज्यूंना प्रवेश देण्यास अरब आणि मुस्लीम लोकांचा विरोध होता म्हणूनच त्यांना छुप्या मार्गाने प्रवेश मिळवून देणे आवश्यक होते.

लेबनानचे अध्यक्ष फुआद चेहाब यांनी स्थापन केलेली गुप्तचर संघटना ‘ली डॉक्झिम ब्युरो’ला कोहेनवर नजर ठेवण्याचे आदेश दिले गेले, कारण तिच्या सलूनमध्ये मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु असल्याच्या अफवा उठल्या होत्या.

कोहेनवर नजर ठेवण्यासाठी या संघटनेने तिच्या सलूनच्यासमोर, खाली आणि वरच्या मजल्यावर एकेक फ्लॅट भाड्याने घेतले. तिच्या सलूनमध्ये ती काय बोलते, कुणाशी बोलते हे रेकॉर्ड करण्यासाठी तिच्या भिंतीवर, छतावर रेकॉर्डिंग करणाऱ्या छुप्या तारा जोडण्यात आल्या. या संघटनेचे गुप्तहेर तिच्या आजूबाजूला राहून तिचे बोलणे ऐकत होते. ती कोणाला भेटते? काय बोलते? याकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. तिचे बोलणे रेकॉर्ड केले जात होते.

तरीही तिचा उद्देश काय आहे आणि ती कुणासाठी काम करते हे अजूनही उघड झाले नव्हते. शेवटी यासाठी एक वेगळी योजना आखण्यात आली. तिच्या मुलांना शिकवण्यासाठी म्हणून ‘मिलाद-अल-काराह’ नावाच्या एका गुप्तहेराला तिच्या घरी पाठवण्यात आले.

‘मिलाद ने हळूहळू शुलाला आपल्या जाळ्यात ओढले. त्याने तिच्यावर अशी काही जादू केली की, जे सांगू नये तेही शुला त्याच्याजवळ बोलून बसली. ती काय काम करते? कुणासाठी करते? तिचा उद्देश काय आहे? याची सगळी माहिती आता लेबनानच्या गुप्तचर यंत्रणेकडे होती आणि ती स्वतः कोहेननेच दिली होती. शेवटी मिलाद शुला कोहेनचे भांडे फोडण्यात यशस्वी झाला.

तिच्या विरोधात बक्कळ पुरावे मिळाल्यानंतर ९ ऑगस्ट १९६१ रोजी लेबनान सरकारने तिला अटक केली. तिच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. या खटल्यात तिला फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. पण, आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याने तिची ही शिक्षा कमी करून वीस वर्षांच्या जन्मठेपेत परावर्तीत करण्यात आली.

पुढे सहाच वर्षात इस्राईलने काही अ*तिरे*क्यांच्या बदल्यात शुला कोहेनची सुटका करून घेतली. पण, सहा वर्षाच्या तुरुंगवासात तिचा प्रचंड छळ करण्यात आला. तिने केलेल्या कामाला थोडेफार तरी यश मिळाले होते. इस्राईलची एक यहुदी राष्ट्र म्हणून निर्मिती झाली असली तरी, पॅलेस्टाइनशी असलेला वाद संपुष्टात आला नव्हता.

शुला शंभर वर्षांचे आयुष्य जगली. तिला सात मुले होती. तिच्याबद्दल बोलताना लेबनन न्यायाधीश म्हणाले होते, “एका हाताने पाळण्याची दोरी हलवणारी ही बाई दुसऱ्या हाताने संपूर्ण जग हलवीत होती.” या वाक्यावरूनच इस्राईलच्या निर्मितीत शुला कोहेनचा वाटा किती मोठा होता याची कल्पना येते.

२१ मे २०१७ रोजी जेरुसलेममध्येच तिचे निधन झाले. शुला कोहेन आज हयात नसली तरी तिने केलेले काम कधीच विस्मृतीत जाऊ शकत नाही. तिची मुले आणि नातवंडे देखील आज इस्राईलमध्ये मोठमोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत. तिच्या मुलांनी तर तिला ‘लेडी जेम्स बॉंड’ची पदवीही दिली. तिच्या असंख्य आठवणीच्या रुपात ती आजही त्यांच्यासोबत आहे.

आपल्या देशासाठी पूर्ण समर्पण भावनेने काम करणारी ‘लेडी जेम्स बॉंड’ हीच तर तिची खरी ओळख.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

ShareTweet
Previous Post

रामदेव बाबांनी जगभर पॉप्युलर केलेला ‘योग’ शोधला कोणी..?

Next Post

वयाच्या दुसऱ्या वर्षी चीनच्या राजगादीवर बसलेला शापित सम्राट!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

वयाच्या दुसऱ्या वर्षी चीनच्या राजगादीवर बसलेला शापित सम्राट!

तीन दिवस, अकरा कॉम्पिटिशन्स आणि पाच गोल्ड, पी.टी. उषांनी इंडोनेशियात डंका पिटला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.