The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेल्यावरसुद्धा ‘विजेने’ या माणसाचा पिच्छा सोडला नव्हता..!

by द पोस्टमन टीम
2 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


एखाद्या जीवावरच्या संकटातून एखादी सुखरूप बचावली तर तिला, “नशीब चांगलं होतं म्हणून वाचलास,” हे वाक्य नेहमीच ऐकवलं जातं. पण तीच घटना जर त्याच्यासोबत वारंवार घडू लागली तर? तर नक्कीच लोकं लगेच म्हणतात, काय बिचाऱ्याचं नशीबच फुटकं. एखाद्या व्यक्तीवर सतत जेव्हा असा दुर्दैवी प्रसंग ओढवतो तेव्हा त्याला कमनशिबी असंच म्हटलं जातं ना? तसं तर प्रत्येक व्यक्ती आपल्या नशिबाला दोष देत असतेच. जगातील सर्वात कमनशिबी किंवा दुर्दैवी व्यक्ती कोण असा जर प्रश्न विचारला तर एकच उत्तर दिले जाते, ते म्हणजे ‘मी’. प्रत्येकालाच वाटते की माझ्यासारखं फुटकं नाशिब कुणाचंच नाही.

पण, इतिहासात अशी एक व्यक्ती होऊन गेली जिला जगातील सर्वात कमनशिबी व्यक्ती समजली जाते. कोण आहे ती व्यक्ती आणि असं काय घडलं होतं तिच्यासोबत की तिला सर्वात कमनशिबी समजलं गेलं?

या सर्वात दुर्दैवी माणसाचं नाव आहे वॉल्टर समरफोर्ड.

समरफोर्ड हा ब्रिटीश सैन्यातील एक अधिकारी होता. १९१८ साली पहिल्या महायु*द्धाच्या वेळी त्याला बेल्जियममध्ये तैनात होता. एक दिवशी यु*द्धाच्या ठिकाणी निगराणी करण्यासाठी तो घोड्यावरून फेरफटका मारत होता. इतक्यात आकाशात जोराची वीज कडाडली आणि थेट वॉल्टरच्या अंगावर कोसळली.

आकाशातील वीज किती शक्तिशाली असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वीजेच्या झटक्यातूनही जिवंत राहिण्याच्या घटना खूप कमी घडल्या आहेत. ब्रिटनच्या नॅशनल सिव्हर स्टॉर्म लॅबोरेटरीच्या निरीक्षणानुसार १३००० व्यक्तीमागे एका व्यक्तीवर वीज कोसळण्याचा धोका संभवतो. आकाशातून थेट जमिनीत येणाऱ्या या विजेचे तापमान सूर्याच्या तापमानाच्या पाचपट अधिक असते. विजेच्या धक्क्यातून माणसं वाचली तरी त्यांच्या मेंदूवर, मज्जासंस्थेवर, याचा थेट परिणाम होतो.



वाल्टर समरफोर्डवरही पहिल्यांदा वीज कोसळली तेंव्हा त्याच्या कमरेखालील भाग लुळा झाला. आता तो सैन्यात काम करण्याच्या पात्रतेचा राहीला नाही त्यामुळे त्याला सैन्यातून काढून टाकण्यात आले. दोन वर्षे बिछान्यावर पडून राहिल्यावर समरफोर्ड यातून बरा झाला. तो आधीसारखा हिंडू-फिरू लागला होता.

लष्करातून कमी केल्यामुळे तो कॅनडातील व्हँकूवर येथे राहायला गेला. दोन वर्षांनी त्याने आयुष्याची पुन्हा नवी सुरुवात केली. सगळे काही सुरळीत सुरू होते. वॉल्टर एक चांगला खेळाडू होता. विविध प्रकारच्या खेळात तो स्वतःला गुंतवून ठेवत असे. पहिला विजेचा झटका बसून आता सहा वर्षे झाली होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१९२४ साली असाच तो गावातील नदीकिनारी मासे पकडत बसला होता. एका झाडाखाली बसून तो मासे पकडत असतानाच आकाशात ढग दाटून आले.

आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि नेमकी त्याच झाडावर वीज कोसळली ज्या झाडाखाली वॉल्टर बसला होता. दुसऱ्यांदा बसलेल्या या विजेच्या धक्क्याने त्याची पूर्ण उजवी बाजू लुळी पडली होती.

दोन वर्षांनी तो यातूनही बरा झाला. पुन्हा पूर्ववत हिंडूफिरू लागला. दोन वर्षानंतर त्याला आपल्या पायावर उभे राहून चलू शकत होता. यावेळी तो जास्तीत जास्त वेळ चालण्यातच घालवत असे.

१९३० साली एका संध्याकाळी असाच एका बागेतून फिरत तो निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत होता. यावेळीही ढग भरून आले आणि तिसऱ्यांदा वॉल्टरच्या अंगावर वीज कोसळली. यावेळी वीज इतक्या वेगाने त्याच्यावर आदळली होती की, त्याचे संपूर्ण शरीरच लुळे पडले. यावेळीही त्याने दोन वर्षे आयुष्याशी झुंज दिली. पण नशिबाने जणू त्याच्या विरोधातच कट रचला होता. हा विजेचा धक्का इतका जोराचा होता की वॉल्टर यातून पुन्हा उठू शकला नाही.

दोन वर्षानंतर म्हणजे १९३२ साली वॉल्टरचे निधन झाले. निसर्गातील काही घडामोडी मागचे रहस्य आपल्याला अजूनही उकलेले नाही. आकाशातील विजेबाबतही हेच म्हणता येईल. गेली कित्येक शतके यावर अभ्यास सुरू आहे तरीही त्यामागचे पूर्ण रहस्य काही केल्या उकलत नाही.

दर सहा वर्षानंतर वॉल्टरसोबत नेमके असे का घडत होते याचे उत्तर मात्र कुणाकडेच नव्हते. वॉल्टरचे निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला व्हँकूवर येथील माउंटन व्ह्यू सिमेट्रीमध्ये दफन केले. आता स्मशानात गेल्यावर तरी बिचाऱ्याच्या दुर्दैवाचे फेरे सुटावेत की नाही?

आश्चर्य म्हणजे १९३६ साली पुन्हा एकदा आकाशात वीज कडाडली आणि पडली ती वॉल्टरच्या कबरीवरच. या विजेने त्याची कबरही उ*द्ध्वस्त केली.

दर सहा वर्षांनी घडणाऱ्या योगायोगाप्रमाणेच यावेळी ही १९३० नंतर १९३६ साली वीज कोसळली. मात्र हे विजेचे शेवटचे कोसळणे होते. मेल्यावरही विजेने त्याची पाठ सोडली नाही कसले हे दुर्दैव? त्याच्या बाबतीतच वारंवार असे का घडले याचेही उत्तर मिळू शकले नाही.

म्हणूनच तर वॉल्टरला इतिहासातील सर्वात दुर्दैवी व्यक्ती म्हटले गेले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

स्कॉटलंडने विनंती केली आणि राहुल द्रविड स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय मॅच खेळला..!

Next Post

आयुष्यभर खुंखार मगरींसोबत राहिला पण एका निरुपद्रवी माशाचा शिकार बनला

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

आयुष्यभर खुंखार मगरींसोबत राहिला पण एका निरुपद्रवी माशाचा शिकार बनला

फेमस 'ह्युगो बॉस' ब्रँडने त्यांच्या काळ्या इतिहासाबद्दल माफी मागितली आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.