The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पॅराशूटची आयडिया पण ‘लिओनार्दो दा विंची’च्या सुपीक डोक्यातून आली होती

by द पोस्टमन टीम
16 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


ज्यांना साहसी खेळ खेळण्याचा छंद असतो त्यांनी कधी ना कधी पॅराशूट उडवण्याचा अनुभव घेतलाच असेल. हवेत तरंगण्याचा थरथरक अनुभव देणारे हे पॅराशूट्स मानवासाठी एक वरदानच ठरले आहे. पॅराशूटच्या शोधामुळे विमान अपघातात होणारे मृत्यू कमी झाले. विमान प्रवास करताना सोबत जर पॅराशूट असेल तर आपत्कालीन परिस्थितीत याच्या सहाय्याने सुरक्षितरित्या जमिनीवर येता येते. अनेकांचे जीव वाचवणाऱ्या या पॅराशूटचा शोध कुणी आणि कधी लावला हे तुम्हाला माहिती आहे का?

आज या लेखातून आपण जाणून घेणार आहोत पॅराशूटची गोष्ट.

पॅराशूटचा शोध लागण्यापूर्वी लिओनार्डो-दा-विंचीने अशा एका यंत्राची कल्पना केली होती, ज्याच्या सहाय्याने आकाशात उडता येईल. त्यांनी आपली ही कल्पना चित्राद्वारे कागदावर उतरवली होती. त्यांनी हे चित्र बनवले तेव्हा पॅराशूट ही फक्त एक कल्पना होती. अजूनही त्याबाबत कुणी विचार केला नव्हता. पॅराशूटसारखे यंत्र बनवण्याची धडपड तर १६१७ पासून सुरू झाली. शेवटी १७८३ मध्ये याला यश मिळाले.

जगाला पॅराशूटची पहिली ओळख करून दिली ती लुईस सेबास्टीयन लेनॉरमँड यांनी. त्यांनी पॅराशूटचे काम कसे चालते हेही दाखवून दिले. त्यानंतर अनेकांनी पॅराशूटच्या चाचपणीस सुरुवात केली.



१७८५ मध्ये जीन पिअर नावाच्या एका संशोधकांनी याचा पहिल्यांदा वापर केला. त्यांनी पॅराशूटला एक टोपली बांधली आणि त्यात आपल्या कुत्र्याच्या पिल्लाला बसवले आणि हवेत सोडले. पॅराशूटमुळे ते कुत्र्याचे पिल्लू सुरक्षितपणे परत आले.

या प्रयोगानंतर पॅराशूटमुळे आपण सुरक्षितरित्या आकाशातून जमिनीवर येऊ शकतो याची अनेकांना खात्री पटली. पॅराशूटचा शोध लागला असला तरी, याच्या सहाय्याने उंचावरून उडी मारण्याचा प्रयत्न मात्र अजून झाला नव्हता.

१९९७ साली अँड्र्यू नावाच्या एका व्यक्तीने हॉट एअर बलूनमध्ये बसून पॅरीस शहरावरून उड्डाण केले होते. अँड्र्यूने ३,२०० फुट उंचीवर हा पॅराशूट नेला होता. इतक्या उंचावर पॅराशूट चालेल की नाही हे माहित नसतानाही अँड्र्यूने पॅराशूटचा वपर केला. पॅराशूटचा हा पहिला वैयक्तिक वापर होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

यात अँड्र्यूला दुखापत होण्याचीही शक्यता होतीच. खांद्यावर पॅराशूट घेऊन अँड्र्यू उडी मारण्यासाठी तयार होता. त्याने धावत येऊन उडी मारली पण नंतर तो हवेत गटांगळ्या खाऊ लागल्या. सर्वांना वाटत होते अँड्र्यूचा हा प्रयोग फसणार. अँड्र्यूची पाळण्याची गती थोडी जास्त झाली होती.

अँड्र्यू जेव्हा खाली येत होता तेव्हा त्याचा वेग खूप अधिक होता. पाहणाऱ्यांना वाटत होते की, अँड्र्यू नक्कीच कुठेतरी आपटणार पण अँड्र्यू जेव्हा जमिनीवर पोहोचला तेव्हा तो अगदी सुखरूप होता. त्याचे पॅराशूटही व्यवस्थित होते. पण पॅराशूटचा पहिला वापरकर्ता म्हणून अँड्र्यूने आपले नाव इतिहासात नोंदवले होते. यानंतर दोन वर्षांनी अँड्र्यूच्या पत्नीनेही अशाच प्रकारे पॅराशूट मधून उडण्याचा प्रयत्न केला होता. ती सुद्धा या प्रयोगात यशस्वी झाली होती. पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली महिला म्हणून इतिहासात तिच्या नावाची नोंद झालेली आहे.

अँड्र्यूने आपल्या पहिल्या उडी नंतर पुन्हा एकदा जास्त उंचावरून उडी मारण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्यांदा त्याने आठ हजार फुट उंचीवरून उडी घेऊन सर्वांना आश्चर्य चकित केले होते.

यानंतर अँड्र्यूने कित्येक नवे पॅराशूट बनवले. आपण बनवलेल्या प्रत्येक पॅराशूटमधून अँड्र्यू स्वतः उडी मारून त्याची चाचणी करत असे.

त्याचा हा छंदच त्याच्या जीवावर बेतला. १८२३ मध्ये त्याने एक नवा पॅराशूट बनवला होता. याची तपासणी करण्यासाठी अँड्र्यूने उडी घेतली पण यावेळी त्याचा अंदाज सपशेल चुकला होता. या प्रयोगात त्याला आपला जीव गमवावा लागला.

दुसऱ्या महायुद्धात जेव्हा हवाई हल्ले होऊ लागले तेव्हा पॅराशूटची खरी किंमत कळाली. अनेकदा प्लेन क्रॅश झाल्यावर वैमानिकांचा जीव वाचवण्यासाठी पॅराशूट खूपच उपयोगी ठरले. जमिनीवरून सैनिकांची ने-आण करणे शक्य नसे तेव्हाही पॅराशूटचाच वापर केला जाई.

अमेरिकेने या युद्धात वापरता येईल अशा पद्धतीचे खास एअरबॉर्न पॅराशूट बनवले. १९४२ साली इटलीच्या सिसिली बेटावर कब्जा मिळवायचा होता जे जर्मन सैनिकांच्या ताब्यात होते. यासाठी अमेरिकेने युद्धासाठी बनवलेल्या या खास पॅराशूटचा वापर केला.

ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिकन सैनिकांना एकत्रित या मिशनवर जायचे होते. रात्रीच्या वेळी हे सैन्य पॅराशूटच्या सहाय्याने या बेटावर उतरवण्यात आले. जमर्न सैन्याला याची जराही खबर लागली नाही आणि अचानक झालेल्या या हल्ल्याने जर्मन सैनिक हडबडून गेले. गाफील राहिलेल्या जर्मन सैन्याचा अर्थातच या युद्धात पराभव झाला. इथून पुढेही अनेक अवघड ठिकाणी सैनिकांनी याच प्रकारे हल्ला केला.

हवाई हल्ले करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लढाऊ विमानांची गती खूपच जास्त असते. गोळीच्या वेगाने हवेतील अंतर कापणारी ही विमाने जेव्हा जमिनीवर उतरतात तेव्हाही त्यांचा वेग अत्याधिक असतो. म्हणून या विमानाचे लँडिंग करण्यासाठी धावपट्टीही तितकीच मजबूत हवी असते. धावपट्टी जर खराब असेल तर लँडिंग करताना या विमानांचा अपघात होण्याची शक्यता असे. या समस्येवरही पॅराशूट हाच एकमेव जबरी तोडगा निघाला.

सर्वात आधी रशियाने १९३७ मध्ये याचा प्रयोग केला. रशिया तेव्हा आर्क्टिकवर काही तरी संशोधन करीत होती. आर्क्टिकवर सर्वत्र बर्फच असतो अशावेळी विमान उतरल्यानंतर त्याची गती कमी करणे शक्य नसते, तेव्हा रशियाने आपल्या विमानांची गती कमी करण्यासाठी विमानाच्या मागे अशा पद्धतीचे पॅराशूट लावले. जे विमान लँडिंग करत असताना उघडले जाई. पॅराशूटमध्ये हवा शिरल्याने विमानाची गती कमी होई. आर्क्टिकवर उतरणाऱ्या विमानांसाठी ही युक्ती कामी आली.

त्यानंतर जिथे धावपट्टी खराब असेल अशा ठिकाणी लढाऊ विमाने उतरवताना देखील हीच युक्ती वापरली जाऊ लागली. यामुळे लढाऊ जहाजांचे होणारे अपघातही कमी झाले.

अनेक चित्रपटातूनही तुम्ही पॅराशूटची ही कमाल पाहिली असेलच. ज्यांना साहसी खेळांची आवड आहे त्यांनाही पॅराशूट रायडींगची ही भन्नाट कल्पना आवर्जून साद घालते. तुम्ही कधी केले आहे का पॅराशूट रायडींग? केले असेल तर तुमचा अनुभवही आमच्याशी नक्की शेअर करा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जपानमध्ये आजही मियामोटो मुसाशीच्या शौर्याच्या गोष्टी सगळ्यांच्या ओठांवर आहेत

Next Post

या रडणाऱ्या मुलाच्या पेंटिंगला जगातली सगळ्यात अपशकुनी पेंटिंग मानतात..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या रडणाऱ्या मुलाच्या पेंटिंगला जगातली सगळ्यात अपशकुनी पेंटिंग मानतात..!

गुजरातमध्ये एक बहादूर शाह होऊन गेला जो हुमायूनला नडला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.