The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फिलिपिन्सच्या या शिक्षिकेने २०० जपानी सैनिकांना यमसदनी धाडलं होतं..!

by द पोस्टमन टीम
19 December 2025
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


विद्यार्थ्यांवर मातेसमान प्रेम करणार्‍या शिक्षिकेनं वेळ पडली तेंव्हा या विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी रणरागिणीचा अवतार धारण करून थोडेथोडके नाही तर दोनशे जपानी सैनिक गारद केले. अशा या फ़िलिपाईन्सच्या रणरागिणीची विस्मृतीत गेलेली गोष्ट.

निक्स फ़र्नांडिस एक विद्यार्थिप्रिय शिक्षिका होती. मुलांना मुळाक्षरं शिकविणारी आणि त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करणारी ही शिक्षिका वेळ आल्यावर देशासाठी रणरागिणी म्हणून उभी राहिली.

जिथे ती मुलांना मुळाक्षरं शिकवत होती तिथे ती विद्यार्थ्यांना शस्त्र चालविण्याचं प्रशिक्षण देऊ लागली. देशासाठी प्राण वेचावे लागले तरीही मागे हटायचं नाही ही शिकवण देत तिनं मुलांचे गट बनविले आणि जपानी ह*ल्ल्याला तोंड दिलं.

१९४१ पर्यंत इतर चारचौघांसारखं निक्स फ़र्नांडिस या फ़िलिपिनो शिक्षिकेचं आयुष्य चालू होतं. शाळेत, विद्यार्थ्यांत ती छान रमत असे. मात्र १९४१ साली जपान्यांनी फ़िलिपाईन्सवर चाल केली आणि तिचं शांत, साधं आयुष्य ढवळून निघालं. लाडानं विद्यार्थी तिला “मिस फ़र्नांडिस” म्हणत आणि तिचं त्यांच्यावर मातृवत प्रेम होतं. जपानी सैनिकांनी या विद्यार्थ्यांना मारण्याची धमकी दिली आणि तिच्यातली झुंझार माता जागी झाली.

१९४१ साली जेव्हा जपानी फ़िलिपिन्समध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी इथल्या सामान्य नागरिकांचं सामानसुमान जप्त केलं. कोणालाही कसलाही व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती. इम्पिरियल जपानची परवानगी नसणारं काहीही शिकवण्यास परवानगी नव्हती. निक्सच्या गावी म्हणजे टॅक्लोबनमध्ये तर जपान्यांनी अ*त्याचाराची परिसीमा गाठली होती. जपानी सैनिकांनी छुपा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना पाण्यात भिजण्याची शिक्षा केली होती.



जपानी आले की टोळधाडीसारखे येत असत. त्यांना ज्यांच्याकडून जे हवं ते ते हिसकावून घेतलं जायचं आणि कोणीही त्यांना विरोध करू शकत नसे. फ़र्नांडिसही या अ*त्याचाराला बळी पडली. तिचा छोटासा व्यवसाय मोडला. होतं नव्हतं ते जपान्यांनी हिसकावून घेतलं आणि ती या अ*त्याचारानं प्रचंड संतापली.

आता मात्र उत्तर द्यायलाच हवं! या विचारानं पेटून उठली. यात तेल ओतलं गेलं जेव्हा जपानी सैनिकांनी तिचे विद्यार्थीही उचलून नेण्याची धमकी दिली तेंव्हा.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

फ़र्नांडिस आता “सायलेंट कि*लर” म्हणून ओळखली जाऊ लागली. ती एकटीच जपान्यांशी लढू लागली होती.

संपूर्ण काळा पोषाख घालून ती जंगलात दबा धरून बसत असत. ह*त्याराच्या नावाखाली केवळ एक शॉटपुट शॉटगन होती. जी तिने स्वत:च गॅसपाईप आणि इतर सामग्रीच्या मदतीनं बनविली होती. थोडीथोडकी नाही तर अडीच वर्षं फ़र्नांडिसनं अशा प्रकारे दबा धरून बसून ह*ल्ले केले.

डझनभर सैनिकांना एकटीनं मृत्यूसदनाला पाठविण्याचा पराक्रम या रणरागिणीनं केला. अखेर तिच्या या धैर्यानं गावातील अनेक पुरुषांनाही प्रोत्साहीत केलं आणि तेही या लढाईत उतरले. मिस फ़र्नांडिसने गावातील पुरुष आणि हाताखालच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं.

तिच्या या लढाईचं वैशिष्ट्य असं होतं की आवाज न करता, कोणालाही न कळता एक एक सैनिक गारद करत जायचं. एकदमच हल्लाबोल करून जपानी सैन्य जे अवाक्यानं आणि सामर्थ्यानं मोठं होतं त्याचं लक्ष वेधून घ्यायचं नाही.

विद्यार्थ्यांत मिस फ़र्नांडिस म्हणून परिचित असणारी ही शिक्षिका आता कॅप्टन फ़र्नांडिस म्हणून ओळखली जाऊ लागली. ११० साथीदारांसह तिनं जपानी सैन्याविरूध्द सशस्त्र लढाईची मोहिम उघडली. संख्येनं छोटी असली तरीही तिची ही छोटेखानी “गुरिला आर्मी” प्रचंड द*हश*त निर्माण करणारी होती. दुसर्‍या महायुध्दात ती फ़िलिपाईन्सची एकमेव महिला गुरिला कॅप्टन म्हणून ओळखली जाते.

जपान्यांमध्ये तिची द*हश*त इतकी पसरली की तिच्यावर चक्क दहा हजार पेसोचं रोख रकमेचं बक्षिस लावलं गेलं. जेणेकरून तिच्याच साथीदारांपैकी कोणीतरी फ़ितुरी करुन तिचा ठावठिकाणा देईल आणि तिला पकडता येईल.

मात्र जपान्यांच्या दुर्दैवानं त्यांची ही इच्छा कधीच पूर्ण झाली नाही कारण फ़र्नांडिस आर्मीमधील कोणीच कधीच गद्दारी केली नाही. फ़र्नांडिस आणि तिची ही आर्मी जपानी सैन्याची रसद तोडत असे आणि त्यांच्या छावण्यांवर हल्ले करून त्यांना हैराण करत असे. युद्धाच्या अंतिम टप्प्यात अमेरिकन सैन्य फ़िलिपाईन्समध्ये आलं तोवर फ़र्नांडिस आर्मीनं अनेक गावं जपानी सैन्याच्या तावडीतून मुक्त केली होती. एवढंच नाही तर, डझनभर बंदी स्त्रियांची मुक्तता केली होती.

तिच्या या कर्तुत्वानं अमेरिकन सैन्यही चकीत झालं होतं. त्यांनी तिला ती कशाप्रकारे जपानी सैनिकांशी मुकाबला करायची असं विचारल्यावर तिनं त्यांना प्रात्यक्षिक दाखवलं ज्याचे फ़ोटो आजही संग्रहालयात बघायला मिळतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

महाबलीपुरमचा हा दगड न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताला १३०० वर्षांपासून फाट्यावर मारतोय

Next Post

आपल्या नाशिकचा मॅग्नेटो डुप्लिकेट असेल पण हा मात्र शंभर टक्के खरा आहे..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आपल्या नाशिकचा मॅग्नेटो डुप्लिकेट असेल पण हा मात्र शंभर टक्के खरा आहे..!

जपानच्या भीतीने अमेरिकेने इमर्जन्सी करन्सी सुरु केली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.