The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्नल आर्देशीर तारापोर – पाकिस्तानचे साठ रणगाडे उ*ध्वस्त करणारा वीर जवान..!

by द पोस्टमन टीम
6 January 2026
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारतीय सैन्य-दल देशाचे रक्षण करण्यात किती तत्पर आहे याचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करणे असो की देशावर कोसळलेली एखादी नैसर्गिक आपत्ती असो कोणत्याही परिस्थितीत भारतीय सैन्याने नेहमीच आपल्या प्राणांची बाजी लावत सामान्य जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.

१९६५ च्या भारत-पाक यु*द्धातही अनेक जवानांनी दाखवलेल्या शौर्य आणि पराक्रमामुळेच भारताला या यु*द्धात विजय मिळाला. या यु*द्धात हौतात्म्य पत्करणारे लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर यांनी केलेला पराक्रम अतुलनीय आहे. भारतीय सैनिकांना ही शौर्यगाथा आजही प्रेरणा देत आहे.

लेफ्टनंट कर्नल तारापोर यांनी आपल्या छोट्या तुकडीचे नेतृत्व करत पाकिस्तानचे ६० टँ*क उ*ध्वस्त केले होते. त्यांच्या या बहाद्दुरीमुळे विजयावर शिक्कामोर्तब झाले असले तरी कर्नल तारापोर यांच्यासह अनेक जवान यात शहीद झाले होते.

कर्नल तारापोर यांना मृत्युपश्चात लष्करातील सर्वोच्च सन्मान मनाला जाणाऱ्या परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कर्नल तारापोर यांना धाडस आणि शौर्य हे गुण वारसाहक्कानेच मिळाले होते. त्यांचे पूर्वज मराठ्यांच्या सैन्यात होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांच्या पराक्रमावर खूष होऊन त्यांना १०० गाव इनाम दिले होते. या शंभर गावात एक गाव होते तारापोर. याच गावाच्या नावावरून त्यांचे आडनाव तारापोर असे पडले.



लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर यांचा जन्म १८ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई येथे झाला. अर्देशीर अभ्यासाच्या बाबतीत एकदम सर्वसाधारण होते पण त्यांना खेळाची प्रचंड आवड होती. पोहणे, टेनिस आणि क्रिकेटसारख्या खेळात ते तरबेज होते. त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केले.

त्यांची सैन्यात भरती होण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते. सैन्य भरतीसाठी होणारी परीक्षा पास करून सैन्यात भरती होण्याचे आपले स्वप्न त्यांनी पूर्ण केले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

तारापोर यांना सशस्त्र दलात भरती व्हायचे होते. एकदा राज्य दलाचे प्रमुख कमांडर बटालियनची पाहणी करण्यासाठी आले. त्यांनी सैनिकांकरवी ग्रेनेड फेकण्याचा सराव करून घेतला. हा सराव करत असताना एका सैनिकाकडून चूक झाली. त्याने ग्रेनेड फेकला पण त्याचे लक्ष्य चुकले. तो ग्रेनेड जवळच पडला. तो तिथेच फुटला असता तर आजूबाजूच्या सैनिकांना दुखापत झाली असती. प्रसंगावधान राखून अर्देशीर यांनी झटकन तो ग्रेनेड उचलला आणि तिथून दूरवर फेकून दिला.

मात्र तो ग्रेनेड अर्देशीर यांच्या हातातच फुटला आणि त्यांच्या हाताला व छातीला जखम झाली.

अर्देशीर यांचे हे प्रसंगावधान आणि साहस पाहून कमांडर प्रमुख त्यांच्यावर फारच खूष झाले. त्यांनी अर्देशीर यांना सशस्त्र दलात सामावून घेतले. अर्देशीर यांच्यावर उपचार झाल्यानंतर आणि ते यातून पूर्णपणे बरे झाल्यावर कमांडर-इन-चीफ यांनी स्वतःहून अर्देशीर यांना बोलावून त्यांचे कौतुक केले आणि त्यांना पुणे हॉर्स रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात केले.

१९६५ साली भारत-पाकिस्तान यु*द्ध सुरू झाले त्यावेळी अर्देशीर भारतीय सैन्य दलातील कमांडिंग ऑफिसर पदापर्यंत पोहोचले होते. यावेळी पुणे हॉर्स रेजिमेंटचे नेतृत्व त्यांच्यावर सोपवण्यात आले.

या यु*द्धात अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने होती आणि पाकिस्तानला यावेळी अमेरिकेने आपल्या लष्करातील पॅटन टँक दिले होते. या टँकमुळे पाकिस्तानी सैन्याचे धाडस वाढले होते. ११ सप्टेंबर १९६५ रोजी लेफ्टनंट कर्नल तारापोर सियालकोट परिसरात आपल्या तुकडीसह हजर होते. इतक्यात त्यांना सियालकोटच्या फिल्लौर येथील पाकिस्तानी सैन्यावर ह*ल्ला करण्याचे आदेश दिले. कर्नल आपल्या तुकडीसह फिल्लौरकडे निघाले होते. पाकिस्तानी सैन्य वाटेतच वजीराली परिसरात दबा धरून बसले होते. भारतीय सैन्याची ही तुकडी टप्प्यात येताच पाकिस्तानी सैन्याने ह*ल्ला चढवला.

कर्नल तारापोर यांच्या नेतृत्वाखालील सैन्य तुकडीने अत्यंत हिमतीने या ह*ल्ल्याला प्रत्युत्तर दिले. वजीराली येथील परिस्थिती भारतीय सैन्याच्या नियंत्रणात आली होती. आता त्याने पुढे जायचे होते कारण त्यांचे मुख्य लक्ष होते चाविंडवर कब्जा करणे.

चाविंडवर आक्र*मण करून तिथे कब्जा करण्यासाठी कर्नल तारापोर यांनी एक योजना आखली.

त्यांनी १७ हॉर्स आणि ८ गढवाल रायफल्स यांना जसोरनच्या मैदानावर जमण्याचे आदेश दिले. जसोरनच्या या यु*द्धात गढवाल रायफल्सचे आठही अधिकारी शहीद झाले. आता कर्नल तारापोर यांच्यासोबत फक्त हॉर्स तुकडीचे सतरा सैनिक होते.

शत्रू सैन्याकडे मनुष्यबळ आणि शास्त्रसाठाही पुष्कळ होता. त्यांच्या सतरा सैनिक म्हणजे खूपच कमी संख्या होती. पण आपल्या सैन्याचे मनोबल दृढ होते. त्यांनी एकेक करून शत्रूचे टँ*क्स उ*ध्वस्त करण्याचा सपाटाच लावला. या सगळ्या धुमश्चक्रीत आपले सैनिकही गंभीररित्या जखमी झाले होते. कर्नल तारापोर सैनिकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा आणि त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करत होते.

कर्नल तारापोर यांच्यासोबत सैन्य बळ कमी असल्याचे कळताच भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मदतीसाठी ४३ टँकर्सची तुकडी पाठवून दिली. पण हे अधिकचे सैन्यबळ तिथे पोहोचेपर्यंत खूपच उशीर झाला होता. भारतीय सैन्याने तोपर्यंत पाकिस्तानचे ६० टँ*क्स नष्ट केले होते. आपलेही नऊ टँ*क्स आपण गमावले होते आणि त्याहून अधिक आपण आपले सैनिक गमावले होते.

कर्नल तारापोर सैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होते. तिकडून शत्रूचा माराही काही थांबलेला नव्हता. अशातच शत्रूला कर्नल तारापोर यांनाच लक्ष करण्यात यश मिळाले. या ह*ल्ल्यात तारापोर गंभीर जखमी झाले होते. इतर सैनिक त्यांना मैदानावरून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न करत होते, पण तारापोर यांनी सैनिकांना अशा अवस्थेत यु*द्धभूमीवर सोडून जाण्यास नकार दिला. जखमी होऊनही ते यु*द्धभूमीवरच राहिले. अखेरच्या श्वासापर्यंत सैनिकांना धीर देत राहिले. त्यांना मार्गदर्शन करत राहिले.

चाविंडाच्या या लढाईत आपले पाच अधिकारी आणि ६४ सैनिकांना प्राण गमवावा लागला. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

त्यांची ही जीवनकहाणी आजही भारतीय सैनिकांचे मनोबल उंचावते आहे. त्यांची आठवण म्हणून आजही पुण्यातील कॅम्पमधील, पूर्वी आर्सेनल रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

काळानुसार बदललं नाही की मग ‘ब्लॅकबेरी’सारखी गत होते..!

Next Post

जगात कोणी उपाशी राहू नये म्हणून आयुष्यभर झटला पण अन्नासाठीच तडफडून मेला..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जगात कोणी उपाशी राहू नये म्हणून आयुष्यभर झटला पण अन्नासाठीच तडफडून मेला..!

आकाशातून आगीचा लोळ घेऊन आलेली उल्का अंगावर पडूनसुद्धा ही महिला सुखरूप होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.