The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वेस्ट इंडिजकडे त्यांचा स्वतःचा सेपरेट क्रिकेटचा देव आहे, त्याचं नाव ब्रायन लारा..!

by द पोस्टमन टीम
6 January 2026
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


क्रिकेटसारख्या खेळात रोज नवनवे विक्रम स्थापित होत असतात. आज कुणीतरी केलेला विक्रम उद्या कुणीतरी मोडीत काढतोच. पण असेही काही विक्रम स्थापन झालेले आहेत, जे आजवर कोणी मोडू शकलेले नाही.

मुथैया मुरलीधरनचा ८०० विकेट घेण्याचा विक्रम असो की ब्रायन लाराचा एका इनिंगमध्ये ४०० धावा करण्याचा विक्रम असो, हे विक्रम मोडणे तर सोडा पण याच्या आसपासही कुणी फिरकलेले नाही.

ब्रायन लाराने आपल्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत क्रिकेटरसिकांच्या मनावर एकसुरी अधिराज्य गाजवले. पीचवर जास्त वेळ टिकून राहण्याचे लाराचे कौशल्य निर्विवाद होते. आज ब्रायन लाराने क्रिकेटमधून संन्यास घेतला असला तरी त्याची ४०० धावांची इनिंग आजही कुणी विसरू शकणार नाही. त्याच्या चाहत्यांसाठी तर ही एक अविस्मरणीय भेट आहे.

१२ एप्रिल २००४ रोजी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजच्या संघाने २ आउट ९८ धावा केल्या होत्या. यानंतर लारा मैदानात उतरला. त्याने जी तुफान बॅटींग सुरू केली ती चार शतक ठोकल्यावरच त्याचे समाधान झाले.

एका इनिंगमध्ये चार शतक ठोकणे हा क्रिकेटमधील एक चमत्कारच होता. यानंतर लाराने पाच शतकांचाही चमत्कार करून दाखवला. या दोन्ही वेळेस लारावर जितका कौतुकाचा वर्षाव झाला तितकीच टीकाही झाली.



क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक उत्तुंग विक्रम रचणाऱ्या या खेळाडूने २००७ साली क्रिकेटमधून संन्यास घेतला. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर टाकलेली ही एक नजर.

२ मे १९६९ रोजी त्रिनिदादमध्ये लाराचा जन्म झाला. त्याचे पूर्ण नाव ब्रायन चार्लस लारा असे होते. वेस्ट इंडीजमध्ये क्रिकेट खूपच लोकप्रिय खेळ आहे, कदाचित म्हणूनच लारा या खेळाकडे आकर्षित झाला असेल. लाराने बॅट हातात घेतली तेव्हा तो फक्त आठ वर्षांचा होता. मित्रांसोबत क्रिकेट खेळताना आउट झाला तरी लारा सहजासहजी बॅट सोडत नसे. आठव्या वर्षीही तो तासनतास क्रिकेट खेळू शकत असे. त्याचे हे क्रिकेटचे वेड पाहून त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट कोचिंग अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन दिला.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

लाराच्या स्वप्नांना जणू पंख मिळाले होते. त्याच्या प्रशिक्षकांनी लाराकडून भरपूर मेहनत करून घेतली. इतर मुले सुट्टीत घरी जात तेव्हाही लारा मैदानावर क्रिकेटचा सराव करण्यात व्यस्त असे. लवकरच तो शालेय क्रिकेट संघात निवडला गेला. या सामन्यात लाराने उत्तम कामगिरी केली. त्याचे प्रशिक्षक रामदास यांनाही त्याचा अभिमान वाटला. त्याच्या संघाने सामना जिंकला होता आणि लारा या सामन्याचा मानकरी ठरला होता.

शालेय क्रिकेटमध्येच लाराने एकूण ७४५ धावा काढल्या होत्या. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. आपल्या या अफाट कामगिरीने त्याने सर्वांना चकित केले होते. लाराचे हे कौशल्य नंतरही त्याला खूप फायदेशीर ठरले.

शालेय क्रिकेटनंतर त्याने सोळा वर्षाखालील संघामध्येही चांगली कामगिरी करून दाखवली. त्याच्या अप्रतिम कौशल्यावर निवडकर्तेही फिदा झाले होते. त्यांनी लाराला आंतरराष्ट्रीय संघात सामील करून घेण्याचे ठरवले.

१९९० साली वेस्ट इंडीजचा सामना पाकिस्तानशी होणार होता. या मालिकेसाठी निवडलेल्या संघात लाराला स्थान देण्यात आले.

त्यावेळी पाकिस्तानच्या संघात एकापेक्षा एक मुरलेले आणि वेगवान गोलंदाज होते. शिवाय लाराचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच सामना होता. शालेय क्रिकेटपासून धावांचा पाऊस पडणाऱ्या लाराकडून सर्वांनाच खूप अपेक्षा होत्या, पण लारा यावेळी थोडासा नर्व्हस होता. या सामन्यात लाराने फक्त ११ धावा केल्या. वकार युनुसच्या एका स्विंग बॉलवर तो आउट झाला. वेस्ट इंडीजचा या सामन्यात पराभव झाला. या पराभवासाठी अनेकांनी लाराला जबाबदार धरले. त्याला इतक्या लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी देणे चुकीचे होते असेही जाणकारांचे म्हणणे होते.

पहिल्याच सामन्यात लारावर अशी टीका झाली असली तरी तो खचून गेला नाही. दुसऱ्या सामन्यात त्याने सगळी कसर भरून काढली आणि टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.

१७ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने १३१ कसोटी सामने खेळले. या सामन्यात त्याने एकूण ११,९५३ धावा काढल्या. यात ३४ शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात लाराने २९९ सामने खेळले ज्यात त्याने एकूण १०,४०५ धावा काढल्या, यात १९ शतके आणि ६३ अर्धशतके समाविष्ट आहेत.

२००४ साली एंटीगुआ कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्धच्या खेळात त्याने केलेली कामगिरी क्रिकेट रसिक आणि लाराचे चाहते कधीच विसरणार नाहीत.

वेस्ट इंडीजचा संघ त्यावेळी इंग्लंड दौऱ्यावर होता. वेस्ट इंडीजने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ९८ धावा २ विकेट अशी स्थिती असताना लारा मैदानात उतरला. इंग्लंडच्या गोलंदाजांना त्याने चक्रावून सोडले. कुणी कल्पनाही केली नसेल असा विक्रम त्या दिवशी लाराकडून रचला गेला.

एकाच इनिंगमध्ये ४०० धावा.

आज इतक्या वर्षानंतरही लाराचा हा विकम कुणीच मोडीत काढू शकलेले नाही. क्रिकेट रसिकांसाठी तर हा जागेपणी पाहिलेला चमत्कारच होता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सामना संपला तरी लारा नॉट-आउट होता. यानंतर सर्वांच्याच तोंडावर एकच नाव होते ब्रायन लारा. लोकांना आता लाराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. अर्थात, त्यानंतरही लाराने विक्रम स्थापित करण्याची संधी सोडली नाही.

काउंटी क्रिकेटचा सामना होता. एजबेस्टन मैदानावर हा सामना खेळाला जात होता. लाराने या सामन्यात आधी १२ धावा केल्या आणि बोल्ड झाला पण अंपायरने त्याला नो बॉल दिला. १८ धावावर पोहोचताच पुन्हा एकदा विकेट कीपर क्रिस स्कॉटच्या हातून त्याचा कॅच निसटला आणि पुन्हा एकदा लाराला मैदानावर टिकून राहण्याची संधी मिळाली. हा कॅच सुटल्यानंतर विकेट कीपरच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडले, “आता शतक ठोकल्याशिवाय लारा ऐकत नाही.”

झालेही तसेच या सामन्यात लाराने एक-दोन नव्हे तर पाच शतके ठोकली. शेवटच्या बॉलवर चौकार मारून त्याने ५०१चा आकडा पार केला. आजपर्यंत लाराचा हा विक्रमही अबाधित आहे.

लाराच्या क्रिकेटमधील योगदानासाठी त्याला वीजडन क्रिकेट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

मुरलीधरनसारखा सर्वोत्तम गोलंदाजदेखील लाराचा चाहता आहे. ब्रायन लारासमोर गोलंदाजी करणे म्हणजे एक आव्हान असते, अशा शब्दांत त्याने लाराच्या खेळाचे कौतुक केले होते. २००६ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि २००७ मध्ये त्याने एकदिवसीय सामन्यातूनही निवृत्ती घेतली.

लारा आज मैदानावर नसला तरी त्याच्या चाहत्यांना त्याच्या खेळाची आठवण होत राहते. लारासारखे खेळाडू निर्माण होण्यासाठी शतकांचा अवधी जावा लागतो. लाराच्या ऐतिहासिक कामगिरीने त्याला क्रिकेट जगतात अढळपद प्राप्त झाले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

दर सहा महिन्यांनी मोबाईल बदलणाऱ्या पिढीला नोकिया ११०० चे किस्से सांगून खरे वाटणार नाहीत

Next Post

एकोणसाठ वर्षांचा मिलिंद सोमण आजही २५ वर्षांच्या पोरांना कॉम्प्लेक्स देतोय..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

एकोणसाठ वर्षांचा मिलिंद सोमण आजही २५ वर्षांच्या पोरांना कॉम्प्लेक्स देतोय..!

महाबलीपुरमचा हा दगड न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताला १३०० वर्षांपासून फाट्यावर मारतोय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.