The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्राचीन इजिप्शियन पुतळ्यांच्या ‘तुटक्या नाका’मागे ही अंधश्रद्धा आहे..!

by द पोस्टमन टीम
15 May 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


नाईल नदीच्या काठी वसलेली इजिप्तची संस्कृती एक समृद्ध संस्कृती होती असे मानले जाते. या परिसरात केलेल्या उत्खननावरून याचे पुरावे आजही सापडतात. तेथील पिरॅमिड, मृतदेह जतन करून ठेवण्याची म्हणजे ममीफिकेशनची कला, कोरीव पुतळे, कोरीव शिलालेख यावरून ही संकृती एक प्रगत संस्कृती होती हेही समजते. या सगळ्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे इजिप्शियन लोकांची कलासक्ती.

इजिप्तमधील लोक धार्मिक होते आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. त्यांच्या शवपेट्यांवरही विविध प्रकारची चित्रे चितारलेली असत आणि ते रंगवलेलीही असत. पुतळे हा तर या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य भाग.

इजिप्तमधील जुने राजवाडे आणि मंदिरांच्या बाहेर अनेक प्रकारचे पुतळे कोरलेले आहेत किंवा त्यांची शिल्पे घडवलेली आहेत. या प्रत्येक मूर्तीचा आकार, रचना वेगवेगळी आहे.

मात्र या सगळ्यातून जाणवणारे एक साम्य म्हणजे त्यांचे छाटलेले नाक. इजिप्तमधील या प्रत्येक मूर्तीचे नाक छाटलेले आहे.

आता तुम्ही म्हणाल कुठल्या तरी परकीय राजाच्या आक्र*मणामुळे किंवा पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीमुळे या पुतळ्यांची झीज झाली असेल. पण तसे अजिबात नाही. कारण या ठिकाणच्या प्रत्येक पुतळ्याचे नाक तुम्हाला छाटलेलेच दिसेल. काही काही पुतळ्यांच्या चेहऱ्याची ही तोडफोड केलेली आढळते. काही पुतळ्यांचे हात किंवा पाय छाटलेले आहेत. प्रत्येक पुतळ्याची कुठल्या ना कुठल्या प्रकारे मोडतोड झालेली आहेच. एकही पुतळा त्याच्या मूळ आणि पूर्ण स्वरुपात आढळत नाही.



पुतळ्याचे नाकच का छाटले गेले हा प्रश्न अभ्यासकांनाही सतावत होता. यामागचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर याचे कारण स्पष्ट झाले. या पुतळ्यांचे नाक छाटण्यामागे या समाजात प्रचलित असलेली अंधश्रद्धा हे एकमेव मुख्य कारण होते.

इथल्या अनेक पुतळ्यांचे नाक छाटलेले आहे कारण, इजिप्तमधील पूर्वीचे लोक असे मानत असत की, हे पुतळे जिवंत आहेत. त्यांच्यात प्राण आहे. एखादा माणूस जेव्हा काही गैर उद्देशाने एखाद्या मंदिरात किंवा पिरॅमिडमध्ये जाई तेव्हा हे पुतळे त्याला विरोध करतात असाही समज होता. कदाचित मंदिरे आणि पिरॅमिडमधील मौल्यवान वस्तूंची होणारी चोरी रोखण्यासाठी मुद्दाम कुणीतरी ही अफवा पसरवली असावी, पण, याच अफवेमुळे या पुतळ्यांची बेसुमार हानी झाली. या पुतळ्यांना निष्प्राण करण्यासाठी त्यांचे नाक छाटले जाऊ लागले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पुतळ्यांमध्ये जरी प्राण असले तरी पुतळे आपल्या जागेवरून अजिबात हलत नाहीत, हे कदाचित तत्कालीन लोकांना लक्षात आले नसावे. धातूचे, लाकडाचे किंवा दगडाचे पुतळे कसे हलतील? हा प्रश्न कदाचित त्यांना पडलाच नसेल.

हे पुतळे श्वासोच्छवास करू शकत नाहीत हेही त्यांना दिसत होते. तरीही पुतळ्यांमध्ये प्राण असल्याचा त्यांचा समज पक्का होता.

पुतळ्यांमध्ये प्राण हा नाकाद्वारेच येतो हाही त्यांचा पक्का समज होता. त्यांचा प्राणवायूचा पुरवठा बंद केला तरच त्यांच्यातील प्राण निघून जाईल अशी अटकळ त्यांनी बांधली आणि एकेक करून सगळ्या पुतळ्यांचे नाक छाटून टाकले.

इजिप्शियन लोक धार्मिक होते हे तर आधीच सांगितले आहे. त्यामुळे या पुतळ्यांना अभिषेक वगैरे घालण्याची प्रथा तिथेही चालत असे. हे अभिषेक करताना त्या पुतळ्यांना तेल वगैरे लावून मालिश केली जाई. त्यांचे तोंड उघडण्याचीही एक प्रथा त्या काळात इजिप्तमध्ये होती. इतरही काही वस्तूंचा त्यांच्यावर अभिषेक केला जाई. अशा सगळ्या प्रथांमुळे पुतळे जिवंत असतात आणि त्यांच्यात शक्ती असते हा समज आणखीन दृढ होत गेला.

पुतळे जिवंत असतात हा समज इतका दृढ होता आणि तो इतक्या खोलवर रुजला होता की, मंदिरांवर ह*ल्ला करणारे आक्र*मक, मंदिर लुटणारे लुटारू या सगळ्यांचा या गोष्टीवर पक्का विश्वास होता. म्हणून मंदिर, थडगे, राजवाडे, अशा ठिकाणी ह*ल्ला करण्याआधी किंवा त्या ठिकाणी प्रवेश करताना ते तिथल्या पुतळ्यांचे नाक छाटू लागले. ज्यामुळे या मुर्त्या निष्प्राण झाल्याचे समाधान त्यांना मिळत असे. असे केले नाही तर हे पुतळेच आपल्यावर ह*ल्ला करतील किंवा आपला घात करतील असा त्यांचा समज होता. विशेष म्हणजे फक्त पुतळ्यांच्या बाबतीतच नाही तर प्राण्यांच्या प्रतिमा, त्यांची चित्रे यांच्या बाबतीतही हाच समज रूढ झाला होता.

म्हणून त्यांना संपवण्यासाठी त्यांचे नाक छाटणे हाच एकमेव मार्ग उरत असे. ह*ल्लेखोर फक्त पुतळ्यांचे नाक छाटण्यावरच थांबत नसत तर त्यांचे हात-पायही छाटून टाकत. काही जण पुतळ्यांचा चेहरा विद्रूप करत. या सगळ्यामागे त्यांचा एकच उद्देश असे की या पुतळ्यांच्या श्वास थांबला पाहिजे.

इजिप्तच्या गादीवर जो कोणी नवा ‘जरा’ म्हणजेच ‘फरो’ येईल त्याने मागच्या राजाच्या किंवा फरोच्या ज्या काही खुणा असतील त्या नष्ट करण्याचा चंग बांधला आणि मागच्या राजापेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी मागच्या राजाने केलेल्या कामांची मोडतोड सुरु केली. त्यातूनही या ऐतिहासिक वारशाची बरीच मोडतोड झाली.

सेंट लुई येथील पुलित्झर आर्ट्स फाउंडेशनच्या संग्रहालयात अशा पुतळ्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पूर्वी ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी आणि फारो लोकांनी कशा पद्धतीने या पुतळ्यांचे नुकसान केले आहे ते या प्रदर्शनातून पाहता येईल.

प्राचीन काळच्या या प्रगत आणि संपन्न संस्कृतीचा एका अंधश्रद्धेतून आणि राजकीय द्वेषातून कितीतरी विनाश झाला आहे. अंधश्रद्धा आणि राजकीय चढाओढीने एका समृद्ध संस्कृतीला विद्रूप करून टाकले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मोस्ट वॉन्टेड सलमानचा अनवॉन्टेड ‘राधे’

Next Post

आपल्या कीबोर्डवर ABCD अशी क्रमाने बटणं का नाहीत..?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आपल्या कीबोर्डवर ABCD अशी क्रमाने बटणं का नाहीत..?

गव्हाचे भाव कमी करण्यासाठी अमेरिकेत 'स्लाइस ब्रेड'वर बंदी घालण्यात आली होती!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.