The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक हात फ्रॅक्चर झाला तरी एका हाताने बॅटिंग करून आपल्या देशाला विजयी केलं

by द पोस्टमन टीम
26 May 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


वेस्ट इंडीज आणि इंग्लंडचा सामना होता. १९८४ साली झालेला हा सामना आजही अनेक कारणासाठी लक्षात ठेवला जातो. वेस्ट इंडीजच्या सगळ्याच खेळाडूंनी हा खूप चांगली कामगिरी केली होती, पण त्यातही माल्कम मार्शलची या सामन्यातील खेळी विशेष लक्षात राहणारी होती. वेस्ट इंडीजने हा सामना जिंकला होता आणि या विजयाचा शिल्पकार होता माल्कम मार्शल.

मार्शल फास्ट बॉलर होता. मोठमोठे फलंदाजही त्याच्या बॉलिंगचा धसका घेत असत. त्यादिवशी मात्र मार्शल उतरला होता बॅटिंगसाठी. त्याच्या डाव्या हाताचा अंगठा फॅक्चर झाला होता. तरीही उजव्या हातात बॅट घेऊन मार्शल मैदानात उभा होता.त्याचा साथीदार लॅरी गोम्सच्या ८२ धावा झाल्या होत्या. त्यालाही शतक खुणावत होते.

मार्शल एकाच हाताने बॅटिंग करत होता. गोम्सच्या हातून हे शतक हुकणार असे वाटत असतानाच मार्शलने त्याला अशी साथ दिली की गोम्सचे शतक तर पूर्ण झालेच पण ३२ धावांनी वेस्ट इंडीजचा विजयही झाला.

फक्त एका हातात बॅट धरून त्याने इतका चांगला खेळ कसा केला याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. मार्शलची आपल्या संघाप्रती किती एकनिष्ठता होती हे या खेळावरून दिसून आले. क्लीव्ह लॉयड म्हणतो, “कुणी एका हातानेही बॅटिंग करू शकतं हे मी तेव्हाच पाहिलं. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील तो सर्वात अविस्मरणीय क्षण होता. मला अजूनही आठवतं की, सगळेजण म्हणत होते तो खेळू शकणार नाही, आपण हरू. मी त्याला विचारले, “तुला काय वाटतं तू खेळू शकशील?” तो म्हणाला, “सोड, जर तुला वाटत असेल की मी खेळावं तर मी खेळेन!”

मार्शलच्या बॉलिंगची भल्याभल्यांना धास्ती वाटत असे. त्याच्या बॉलिंगचा वेग पाहूनच डोळे विस्फारले जात असत. वेस्ट इंडीजच्या संघात खेळणारी ८० च्या दशकातील जोएल गॉर्नर, कर्टली एम्ब्रोज, कर्टनी वाल्श आणि माल्कम मार्शल ही चौकडी आपल्या बॉलिंगसाठी विशेष प्रसिद्ध होती. त्यातही इतर खेळाडू सहा किंवा सात फुट उंचीचे होते तशी माल्कमची उंची इतर तिघांच्या तुलनेत कमीच म्हणजे ५ फुट ११ इंच होती.



आंतरराष्ट्रीय सामन्यात माल्कमने ५३३ विकेट घेतल्या. यातील ३७६ विकेट कसोटी मालिकेत तर १५७ विकेट या एकदिवसीय सामन्यातील आहेत.

माल्कम मार्शलकडे एक आदर्श गोलंदाज म्हणून पहिले जाते. त्याचा जन्मण बार्बाडोस इथे १८ एप्रिल १९५८ ला झाला होता. त्याचे वडील उत्तम क्रिकेट खेळत असत. ते पोलीसदलात काम करत होते. माल्कमला खेळाचा वारसा घरातूनच मिळाला, पण दुर्दैव हे की माल्कमला एक उत्कृष्ट क्रिकेटपटू झाल्याचे त्याच्या वडिलांना पाहता आले नाही. तो जन्मल्यानंतर एकाच वर्षाने एका अपघातात त्यांचे निधन झाले. माल्कमला क्रिकेटमधील श्रीगणेशा शिकवला तो त्याच्या आजोबांनी.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

जमैकामधे झालेल्या एका फस्ट क्लास सामन्यात मार्शलने ७७ धावा आणि ६ विकेट घेतल्या होत्या. या सामन्यातील त्याचा खेळ पाहून निवडकर्त्यांनी त्याला वेस्ट इंडीज संघात सामील करून घेतले.

बँक्स ब्राउरीतील एका स्टोअररूममध्ये काम करत असताना माल्कमने आपली निवड झाल्याची बातमी रेडीओवरून ऐकली. 

१९७८ साली वेस्ट इंडीजचा संघ भारत दौऱ्यावर येणार होता आणि याच संघात माल्कम मार्शलची निवड झाली होती. अर्थातच त्याचा पहिला सामना हा भारताविरोधात होता. माल्कमने यापूर्वी कधीच भारताचे नाव ऐकले नव्हते. भारतात खेळण्यासाठी जायचे आहे हे जेव्हा त्याला कळले तेव्हा त्याचा पहिला प्रश्न होता-जगाच्या नकाशात नेमका भारत कुठे आहे? १५ डिसेंबर १९७८ रोजी जेव्हा माल्कमने भारताविरुद्धचा सामना खेळला तेव्हा संपूर्ण जगाला माल्कमची ओळख झाली. मालिकेच्या शेवटपर्यंत माल्कमने तीन कसोटी सामन्यात एकूण ३७ विकेट घेतल्या होत्या.

ब्रायन लारा म्हणजे वेस्ट इंडीजचा ‘दी बेस्ट’ फलंदाज. एका फस्ट क्लास क्रिकेट सामन्यावेळी ब्रायन लाराची गाठ माल्कम मार्शलशी पडली. दोघेही तेव्हा एकमेकांना ओळखत नव्हते. माल्कमच्या पहिल्याच बॉलने माझी धडधड वाढवली होती असे ब्रायन लारा सांगतात. माल्कमने पहिल्याच बॉलवर लाराला आउट केले होते.

ब्रायन लारासारख्या खेळाडूला घाम फोडणाऱ्या या बॉलरचा वेग कसा असेल याची कल्पना करा. फक्त लाराच नाही तर जगभरातील फलंदाजांवर माल्कमची अशीच दहशत होती.

भारताचा लिटल मास्तर सुनील गावस्कर त्याकाळात विना हेल्मेट खेळण्यासाठी ओळखला जात असे. सुनील गावस्करची ही निडरता त्याकाळी चर्चेचा विषय होती. पण जेव्हा गावस्करची गाठ मार्शलशी पडली तेव्हा मार्शलच्या बॉलिंगच्या वेगाचा गावस्करनेही धसका घेतला.

१९८३च्या वेस्ट इंडीज सोबतच्या एका सामन्यात मार्शलचा बाउंसर गावस्करच्या डोक्यात आपटला होता तेव्हापासून गावस्कर हेल्मेट घालून खेळू लागला.

त्यानंतर मार्शलबद्दलच्या आठवणी सांगताना एकदा गावस्कर म्हणाला होता की, झोपेत असताना जर मार्शलची आठवण आली तरी, दरदरून घाम फुटतो, इतकी मला त्याची भीती वाटते.

फक्त सुनील गावस्करच नाही तर कपिल देव, दिलीप वेंगसरकर या भारतीय खेळाडूंनीही मार्शलचा धसका घेतला होता. गोळीच्या बंदुकीसारखा सुटणारा मार्शलचा बॉल कधी कुणाचा विकेट काढील याचा अंदाज बांधणेच कठीण होते.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इतक्या महान खेळाडूला मात्र नियतीने खूपच कमी आयुष्य दिले. मैदानात प्रतिस्पर्धी फलंदाजांना नामोहरम करणारे माल्कम कॅन्सरला हरवू शकला नाही. या आजाराने त्याला आपल्यातून कायमचे हिसकावून नेले. ४ नोव्हेंबर १९९९ रोजी त्याचे निधन झाले.

माल्कम मार्शलने फक्त तेरा वर्षे मैदान गाजवले पण, जगातील प्रत्येक खेळाडूच्या मनावर त्याने आपला ठसा उमटवला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अनेकांना माहिती नाही पण अमेरिकेलासुद्धा एक सम्राट होता

Next Post

या खटल्यातील आरोपीला माफी द्यावी म्हणून लोकांनी रस्त्यावर मोर्चे काढले होते

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

या खटल्यातील आरोपीला माफी द्यावी म्हणून लोकांनी रस्त्यावर मोर्चे काढले होते

डोक्याला शॉट देणारे हे पाच साऊथ इंडियन पिच्चर बिलकुल चुकवू नका..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.