The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंगळावर अतिक्रमण केलं म्हणून तीन कार्यकर्त्यांनी ‘नासा’वरच केस ठोकली होती

by द पोस्टमन टीम
12 May 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


प्रसिद्ध व्यक्ती किंवा संस्था कधी ना कधी वादाच्या भोवऱ्यात अडकतातच. अंतराळ संशोधन करणारी नासासारखी संशोधन संस्थादेखील याला अपवाद कशी असू शकेल? पृथ्वीबाहेरच्या अवकाशात काय काय विखुरले आहे आणि त्यात पृथ्वीसारखी मानवी वस्ती असणारा आणखी एखादा ग्रह आहे का? दुसऱ्या एखाद्या ग्रहावर जाऊन माणसाला वस्ती निर्माण करता येईल का? यासारख्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी नासा सदैव कार्यरत असते हे तर आपल्याला माहितच आहे.

या प्रश्नाच्या ध्यासातूनच नासाने चंद्र आणि मंगळ या दोन ग्रहांचा अभ्यास सुरू केला. चंद्रावर माणूस पाठवण्यात यश मिळाल्यानंतर नासाने आपला मोर्चा मंगळाकडे वळवला. मंगळावर रोव्हर्स पाठवण्यातही नासाला यश आले.

नासाने १९९५-९६ च्या दरम्यान सजर्नर आणि पाथफाईंडर हे दोन रोव्हर मंगळावर पाठवले. पण, त्यांना याची अजिबातच कल्पना नव्हती की या शोध मोहिमेमुळे त्यांना कोर्टात खेचले जाईल. या दोन रोव्हर्सनी आपले काम चोख बजावले होते. त्यांनी मंगळाचे असंख्य फोटो काढून तिथल्या वातावरणाची माहिती नासाकडे पाठविली होती. या रोव्हर्समुळे मंगळासारख्या तप्त गोळ्याबद्दल असलेल्या ज्ञानात आणखी भर पडत होती. नासाने वेळोवेळी ही माहिती प्रसिद्धही केली होती.

नासाच्या या मंगळ मोहिमेनंतर १९९७ साली तीन येमेनी तरुणांनी नासाविरोधात खटला दाखल केला. त्यांच्या मते, मंगळ ग्रह ही त्यांची खाजगी मालमत्ता आहे.

नासाने त्यांची परवानगी न घेता मंगळावर रोव्हर पाठवले त्याचे फोटो आणि तिथल्या वातावरणाची माहिती उघड केली हे त्यांना अजिबात पटले नव्हते. एखाद्याच्या खाजगी मालमत्तेवर असे अतिक्रमण करणे चुकीचेच असते आणि मंगळ हा ग्रह ही आदम इस्माईल, मुस्तफा खलील आणि अब्दुल्लाह अल-उमरी यांनी हा खटला दाखल केला होता त्या तिघांचीच खाजगी मालमत्ता होती.  नासाने या ग्रहावरील आपले सगळे प्रकल्प रद्द करावेत आणि त्यांनी पाठवलेली रोव्हर्स माघारी बोलवावीत अशीही त्यांनी मागणी केली होती.



त्यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, “सजर्नर आणि पाथफाइंडर या अमेरिकेने मंगळावर पाठवलेल्या रोव्हरनी तिथली माहिती घ्यायला सुरुवात केली आहे आणि नासा ती माहिती उघड करत आहे. तेही आमच्या परवानगीशिवाय”. येमेनच्या साना येथील कोर्टात त्यांनी हा खटला दाखल केला आणि येमेनमधील अल-थावरी या वर्तमानपत्रात त्यांनी याबबतची बातमीही प्रसिद्ध केली.

त्यांचा असा दावा होता की, हा ग्रह त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून वारसाहक्काने मिळालेला आहे. मंगळ ग्रहावर त्यांच्या पूर्वजांचा हक्क होता. ३००० हजार वर्षांपूर्वीपासून हा ग्रह त्यांच्या मालकीचा आहे. विशेष म्हणजे याबद्दलचे पुरावेही सादर करण्याची त्यांनी तयारी दाखवली होती.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

पृथ्वीबाहेरच्या कोणत्याही खगोलीय वस्तूवर कोणतीही व्यक्ती, संस्था, देश आपली सत्ता सांगू शकत नाही. तरीही या तीन तरूणांनी हे धाडस केले. १९६७ साली संयुक्त राष्ट्राने अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय अंतराळ करार संमत केला आहे, ज्याला सर्व देशांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे या तरूणांचा हा दावा म्हणजे नुसती माकडचेष्टा होती.

नासाचे संचालक ब्रायन वेल्श यांनी, हा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले होते. मंगळ हा सूर्यमालिकेतील एक ग्रह आहे. कोणत्याही मनुष्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. येमेनमधल्या दोन-तीन तरूणांचा तरी मंगळावर कसा अधिकार असेल?

मग या तरूणांनी असा दावा करण्यामागे नेमके कारण तरी काय होते?

तर त्यांनी हा दावा एका दंतकथेवरुन केला होता. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर हिम्याराईट्स आणि सेबिअन्स अशा दोन संस्कृती होत्या. अगदी रोमन आणि हडप्पा संस्कृतीच्याही पूर्वी या संस्कृती पृथ्वीवर वसलेल्या होत्या.

या संस्कृतीच्या श्रद्धेनुसार, दोन प्रकारचे मानवी वंश होते. या दोन्ही वंशाच्या लोकांनी आकाशात दिसणाऱ्या सात ग्रहांसाठी सात मंदिरे बांधली होती.

पूर्वी सूर्यमालिकेत सातच ग्रहांचा समावेश होता, जे उघड्या डोळ्यांनी दिसत होते. उरलेल्या दोन ग्रहांचा शोध नंतर लागला.

पण या पूर्वजांनी हे ग्रह आपले मानले होते का? किंवा हे पूर्वज परग्रहावरून आले होते का? याबद्दल कसलाही पुरावा या तरुणांकडे नाही. इस्माईल, काहलील आणि अल-उमरी यांचे मत होते की ते या वंशाचे आहेत म्हणजे त्याच्या मंगळावर हक्क आहे. बस्स संपला विषय. एवढ्याशा गोष्टीवरून त्यांनी थेट नासाला कोर्टात खेचण्याचे धाडस केले होते.

नासाने मंगळाबाबत जी काही माहिती मिळवलेली आहे ती आमच्याकडे सुपूर्द करावी अशीही या तरूणांची मागणी होती.

कोर्टाने यावर उत्तर दिले की, त्या तरूणांचा दावा ग्राह्य धरता येत नाही. खगोलीय वस्तूवर कुणा एका व्यक्तीचा, संस्थेचा किंवा देशाचा अधिकार असू शकत नाही. कोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली. न्यायाधीशांनी या तिघांना तुरूंगात डांबण्याचीही धमकी दिली.

नासाने तर त्यांच्या या खटल्याची दखलही घेतली नाही. कोर्टाने दम देऊनही या तिघांनी आपले हे हास्यास्पद उद्योग काही बंद केले नाहीत.

कहर म्हणजे या तिघांनी मंगळावरील त्यांच्या मालकीची जमीन विकायला काढली. यासाठी त्यांनी कोर्टात दाखल केलेली याचिका आणि त्यासाठी सादर केलेला पुरावा दोन्हीही प्रसिद्ध केले.

मंगळावर योग्य दारात जागा विकण्याची असल्याची जाहिरातही केली. यावर कडी म्हणजे त्यांनी मंगळावरील जमिनीसाठी पर स्क्वेअर मीटर दोन बक्स इतकी किंमत लावली होती.

न्यायालयाच्या धमकीनंतरही मंगळावरील आपला काल्पनिक हक्क त्यांनी सोडला नाही. तिघांचेही हे कृत्य म्हणजे निव्वळ मुर्खपणा होता. तरीही अशाप्रकारे नासावर खटला दाखल होण्याची ही काही पहिलीच वेळ होती असेही नाही. यापूर्वीही अनेकांनी अशाच पद्धतीने नासाला कोर्टात खेचले आहे. अवकाशीय वस्तूंवर स्वतःची मालकी सांगितली आहे. सूर्यमालेतील ग्रह आपल्या मालकीचे असल्याचे जाहीर करून तिथल्या जमिनी विकण्याची जाहिरातही केलेली आहे.

हे सगळे प्रकार यापूर्वीही झाले होते आणि यानंतरही होत राहिले. नासासाठी यात काहीच नवीन नव्हते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेत लोक आपल्या पोरांना पोस्टाने मामाच्या गावाला पाठवायचे..!

Next Post

एकेकाळी ‘बुलेट’ला टक्कर देणारी ही बाईक पुन्हा मार्केटमध्ये आली आहे !

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

एकेकाळी 'बुलेट'ला टक्कर देणारी ही बाईक पुन्हा मार्केटमध्ये आली आहे !

मेटल डिटेक्टरचा शोध लागायला अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची ह*त्या कारणीभूत आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.