The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा आहे चंद्रावर दफन केलेला एकमेव माणूस..!

by द पोस्टमन टीम
8 May 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


चंद्र अनेक कवी लेखकांचा हा आवडता उपग्रह आहे. कोणी प्रेयसीला चंद्र म्हणतो तर कोणी तिच्यासाठी चंद्र पृथ्वीवर आणण्याच्या गप्पा मारतो (अर्थात हे शक्य नसतं पण प्रेमात पडलेल्यांना कोण सांगणार!).

प्रत्यक्ष चंद्रावरच जीव तोडून प्रेम करणाऱ्या आणि चंद्रावरच आपल्याला दफन करण्यात यावे अशी अनोखी आणि जगावेगळी इच्छा बाळगणाऱ्या युजीन शूमेकर यांच्याविषयी फार कमी लोकांना माहित असेल. युजीन अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन संस्थेत काम करणारे एक वैज्ञानिक होते. नासाचे चंद्रावर जाण्याचे उपक्रम यशस्वी करण्यातही त्यांचा मोठा हात राहिला आहे.

युजीन यांना चंद्राची इतकी ओढ होती की आपल्याला चंद्रावरच दफन केले जावे अशी त्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे त्यांची ही जगावेगळी इच्छा पूर्णही झाली.

चंद्रावर दफन करण्यात आलेली पहिली व्यक्ती म्हणून युजीन शूमेकर यांना इतिहास कायम स्मरणात ठेवीलच.

पण, तेवढ्यापुरतेच त्यांचे कर्तृत्व मर्यादित नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन त्यांना १९९२ साली नॅशनल मेडल ऑफ सायन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.



युजीन यांनी आयुष्यातील बराच मोठा कालवधी त्यांनी चंद्राच्या अभ्यासात आणि त्यावरील संशोधनात घालवला होता. प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवून तिथल्या जमिनीला स्पर्श करण्याचीही त्यांना खूप इच्छा होती. मात्र, त्यांना ऍडिसन आजार असल्याने त्यांची अंतराळवीर होण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. पण जेव्हा १९९७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अस्थी चंद्रावर दफन करण्यात आल्या. त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचे चीज झाले.

त्यांनी अरिझॉना फ्लॅगस्टाफजवळील बॅरिंगर क्रेटरच्या अभ्यास करून, हा ५७० फुट खोल खड्डा एका लघुग्रहाच्या आदळण्याने निर्माण झाला असल्याचे सिद्ध केले. चंद्रावरील खड्ड्यांचा अभ्यास करून त्यांनी चंद्राबद्दलच्या भौगोलिक माहितीतही बरीच मोठी भर घातली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

१९६१ साली अमेरिकेच्या भौगोलिक निरीक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ॲस्ट्रोलॉजी रिसर्च प्रोग्रामचे नेतृत्व त्यांच्याकडेच सोपवण्यात आले होते. युजीन शूमेकर यांना खरे तर अंतराळविज्ञानाचे जनक मानले जाई. युटा आणि कोलोरॅडो येथील युरेनियमच्या साठ्यांचा अभ्यास करणे हे त्यांचे पहिले उद्दिष्ट होते. शिवाय ज्वालामुखीच्या प्रक्रियेचाही त्यांना अभ्यास करायचा होता. कारण, युरेनियमचा जास्तीत जास्त साठा हा प्राचीन ज्वालामुखीच्या केंद्रातच सापडतो.

नासाच्या अपोलो या चंद्रयान कार्यक्रमातील अंतराळवीरांना त्यांनीच प्रशिक्षण दिले. त्या नंतरच्याही अंतराळ मोहिमेत सहभागी झालेल्या इतर अंतराळवीरांना त्यांनीच प्रशिक्षित केले.

डायनासोरसारखे महाकाय प्राणी या पृथ्वीवरून कसे गायब झाले? यामागच्या अंतरीक्षीय घटनेचा त्यांनीच शोध लावला.

आजपासून करोडो वर्षापूर्वी एक उल्कापिंड आणि पृथ्वी यांची टक्कर झाली होती. या विध्वंसात फक्त डायनासोरच नाही तर, पृथ्वीवरील अनेक जीव नष्ट झाले होते असा सिद्धांत त्यांनी मांडला.

बुध ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी लेवी ९ कॉमेट नावाचा एक उपग्रह तयार करण्यात आला जो १९९४ साली अंतराळात स्थापित झाला. हा उपग्रह युजीन आणि त्यांची पत्नी कॅरोलीन यांनी मिळून बनवला होता. युजीन यांची पत्नी कॅरोलीन ही देखील नासाची संशोधक होती. तिने युजीनच्या अनेक संशोधनात त्याला सहाय्य केले.

१८ जुलै १९९७ रोजी कॅरोलीन आणि युजीन यांचा एक गंभीर कार अपघात झाला. ज्यातून कॅरोलीन वाचली पण युजीन यांना प्राण गमवावे लागले. अंतरीक्ष संशोधनात आपल्या अभ्यासाने बहुमोल भर घालणाऱ्या या शास्त्रज्ञाचा असा दुर्दैवी अंत होणे कोणालाच अपेक्षित नव्हते.

त्यांचे निधन झाले त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची एक विद्यार्थिनी कॅरोलीन पोर्को हिने त्यांना योग्य ती आदरांजली मिळावी म्हणून आगदी तत्परतेने त्यांच्या अस्ठीतील १ औंस म्हणजे २८ ग्रॅम एवढ्या अस्थी काढून घेतल्या. त्यांची इच्छा आणि चंद्राबद्दलच्या अभ्यासाबद्दल त्यांना असलेली आस्था, चंद्राच्या अभ्यासात त्यांनी घातलेली भर, त्यासाठी त्यांनी दिलेला बहुमुल्य वेळ या सर्वांची परतफेड करण्यासाठी आपण एवढेच करू शकतो हे कॅरोलीन जाणून होती. म्हणून तिने त्या अस्ठीतील काही भाग काढून तो जपून ठेवला.

अंतराळात या अस्थी पाठवण्यासाठी पॉली कार्बोनेट कॅप्सूल तयार करण्यात आली आणि त्यात त्या अस्थी ठेवल्या गेल्या. १९९८ मध्ये चंद्रावर पाण्याचा शोध घायला गेलेल्या नासाच्या ल्युनार प्रॉस्पेक्टर स्पेसक्राफ्ट मधून या अस्थी चंद्रावर पाठवण्यात आल्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्यांच्या अस्थिनी भरलेली ती कॅप्सूल दफन करण्यात आली.

युजीन यांच्यानंतर कुणालाच हा मान अजूनपर्यंत मिळालेला नाही. त्यांची पत्नी कॅरोलीन म्हणते, “जेव्हा जेव्हा मी चंद्राकडे पाहते तेव्हा तेव्हा युजीन माझ्यासोबत असल्याची ग्वाही मिळते. तो आम्हाला सोडून कुठेही दूर गेलेला नाही याची खात्री पटते. आता तर चंद्र आणि मी युजीनमुळे अधिक जवळ आलो आहोत.”

तांत्रिकदृष्ट्या इथून पुढे तरी अशापद्धतीने कुणालाच चंद्रावर दफन करता येणार नाही. विशेष बाब म्हणजे ज्या कंपनीने युजीन यांच्या अस्थी चंद्रावर पोहोचवल्या त्या कंपनीने आता चंद्रावर प्लॉट उपलब्ध असल्याची घोषणा केली आहे. भविष्यात कदाचित जेव्हा चंद्रावर मानवी वस्ती वसवण्यात यश येईल तेव्हा ही गोष्ट शक्य होईल. तरीही चंद्रावरील मानवालाही कायमच युजीन यांच्या ऋणात राहावे लागेल.

प्रबळ इच्छा काय असते आणि ती कितीही अशक्य कोटीतील असली तरी कशी पूर्ण होते, याचे युजीन शूमेकर हे एक अद्भुत उदाहरण आहे. आपल्या ध्येयावर प्रेम करणे आणि शेवटपर्यंत त्याच्याशी प्रामाणिक राहणे या दोन गोष्टींची प्रेरणा त्यांच्या चरित्रातून मिळते. त्यांच्या या जीवनप्रवासातून आणखी एक मोठा संदेश मिळतो तो म्हणजे आपल्या स्वप्नांना नक्कीच कधी ना कधी मूर्त स्वरूप मिळतेच, फक्त त्यावर आपला विश्वास हवा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एका बेकरीत आग लागली आणि थोड्याच वेळात लंडनची अक्षरशः राख झाली

Next Post

मिहीरकुल – आपल्या क्रौर्याने भारतभर तांडव घालणारा ‘हूण’ सम्राट

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

मिहीरकुल - आपल्या क्रौर्याने भारतभर तांडव घालणारा 'हूण' सम्राट

जगाला स्पर्शही न करता जग बदलणाऱ्या चिमुकल्याची गोष्ट

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.